Islam Darshan

राजकारण धर्मकारणाचा अविभाज्य अंग

Published : Saturday, Apr 16, 2016

सार्वभौमत्व हा अल्लाहचा मौलिक विशेष गुण आहे आणि तो मनुष्याच्या राजकीय जीवनाचा मूलाधार सूचित करतो की अल्लाहच्या सार्वभौमत्वात कोणी दुसरा भागीदार नाही. हा या सत्याचा दाखला आहे की मनुष्याचे राजकीय जीवन धर्माच्या कक्षेतील आहे. धर्मापासून राजकारणाला वेगळे यामुळेच करणे अशक्य आहे. आपण जर धर्म आणि राजकारण वेगवेगळे ठरविले तर अल्लाहच्या सार्वभौमत्वाला काही अर्थ राहात नाही. दिव्य प्रकटनात राजकीय तत्त्वांचा समावेश आहे, तसेच इस्लामची एक परिपूर्ण राजकीय व्यवस्था आहे. धर्म आणि राजकारणाची फारकत करणे इस्लामविरोधी आहे. राजकीय व्यवस्थेविना खऱ्या आणि पूर्ण इस्लामची कल्पना करणेसुध्दा अशक्य आहे. आपण सदृढ माणसाची प्रतिमा डोळ्यांपुढे उभी करताना त्याला पूर्ण रूपात पाहतो, त्याच्या शरीराचे दोन अवयव वेगळेवेगळे करून नव्हे.

वरील विवेचनावरून हे स्पष्ट झाले की सार्वभौम सत्ते (राजकीय सत्ता) विना धर्माच्या अनेक आदेशांचे पालन होऊच शकत नाही. आणि आपण हेसुध्दा पाहिले आहे की इस्लामच्या एखाद्या भागाचे पालन करून इतर भागांकडे दुर्लक्ष करणे गैरइस्लामी कृत्य आणि महापाप आहे. काय याचा अर्थ असा होत नाही की राजनीती इस्लाम धर्माचा अंगभूत आणि अविभाजित भाग आहे? राजनीती राजकारणात तेव्हाच महत्त्वपूर्ण ठरते जेव्हा मानवी जीवन आणि इस्लामच्या आदेशांची उपयुक्तता राजकीय सत्तेवरच अवलंबून असते.

जेव्हा आपण इस्लाम धर्मात राजकारणाचे महत्त्व आणि त्याच्या कार्यक्षेत्राबद्दल माहिती करून घेतो तेव्हा माननीय उमर (र.) यांच्या त्या कथनातील सत्यतेची आपणास जाणीव होते. ते म्हणतात, ‘‘इस्लामचे जमातविना (समाज) आणि राजकारण म्हणजेच समाजकारणविना अस्तित्व शक्य नाही आणि इस्लामी राष्ट्रा (जमात) चे अस्तित्व नेता (अमीर) विना अशक्य आहे.’’

काब अलअहबार (र.) यांनी वरील सत्यवचन स्पष्ट करताना सांगितले,

‘‘इस्लाम, राज्यशासन आणि प्रजा ही एका तंबूसारखी आहे. इस्लाम तंबू आहे, खांब राज्यशासन आहे आणि खुंटी प्रजा आहे. दोघाव्यतिरिक्त एक त्याच्या स्थितीत व्यवस्थित राहूच शकत नाही.’’ (अल फरिद, खंड - १)

अशा प्रकारे इस्लामला जर राजकारणापासून आणि राज्य शासनापासून वेगळे केले तर शिल्लक राहते ते इस्लामचे विद्रुप आणि बनावटी स्वरुप! अल्लाहने अवतरित केलेला इस्लाम अजिबात शिल्लक राहात नाही. शिल्लक राहात नाही तो इस्लाम जो कुरआन बरहुकूम आहे! शिल्लक राहात नाही तो इस्लाम ज्याला प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आपल्या आचरणात आणून आदर्श निर्माण केला होता. इस्लाम त्याच्या मूळ आणि खऱ्या स्वरुपात तेव्हाच पाहावयास मिळेल जेव्हा सार्वभौम राज्यसत्ता त्याच्या पाठीमागे असेल.

इस्लामचे दुसरे क्रांतिकारक स्वाभाविक गुणवैशिष्ट्य आहे त्याचे राजकीय सत्तेविषयीचे धोरण. इस्लामला राज्यसत्ता म्हणजे जगात मिळालेले फळ आहे असे मान्य नाही, तर धार्मिक कृत्य आहे अशी इस्लामची मान्यता आहे. राजकारण हे तिरस्कार आणि घृणा करण्यासारखे अथवा राजकाराणापासून अलिप्त राहाणे इस्लामला मान्य नाही. राजकारण एक हवीहवीशी व आवडीची आणि जवळची गोष्ट आहे. इस्लाम राजकारणाशी संबंध तोडत नाही तर इस्लामला राज्यसत्ता प्राप्त करण्याची प्रखर इच्छा असते. जोपर्यंत राज्यसत्ता आपल्या हातात नाही तोपर्यंत इस्लाम आपले अस्तित्व दाखवू शकत नाही. अशा प्रकारे इस्लाम आणि राजसत्तेचे अतुट नाते आहे.

संबंधित लेख

  • आर्थिक समस्या आणि अर्थशास्त्राच्या जटील परिभाषा

    वर्तमान काळात विभिन्न देशांच्या आणि राष्ट्रांच्या तसेच सामुहिक रूपाने वैश्विक आर्थिक समस्यांना जे महत्व दिले जात आहे, कदाचित अगोदर या समस्यांना कमीत-कमी स्पष्ट रूपाने कधी महत्व दिले गेले नाही. ‘स्पष्ट रूपाने’ या शब्दाचा मी यासाठी उपयोग करीत आहे की वास्तवात मानवी जीवनामध्ये त्याची जीविका महत्व ठेवते. त्या दृष्टीने प्रत्येक युगात मनुष्यांच्या, समुहांच्या देश आणि राष्ट्रांच्या सर्व मानवांनी काही प्रमाणात या कडे लक्ष दिले आहे. परंतु आज यास ज्या गोष्टीने स्पष्ट रूप दिले आहे ती अर्थशास्त्राच्या नावाने एक सुव्यवस्थित मोठ मोठी पुस्तके, भारी भरकम परिभाषांच्या आणि अलीशान(शानदार) संस्थाचं अस्तीत्वात असणं, तसेच जीवन सामग्रीचे उत्पादन आणि उपार्जनाच्या पध्दतींच कठीण ते कठीण होत जाणे आहे.
  • प्रेषित्वावर श्रध्दा

    प्रेषित्वाची गरज: इस्लामचे तिसरे मूलतत्त्व प्रेषित्व आहे. अरेबिक भाषेत यासाठी ‘रिसालत’ हा शब्द आलेला आहे ज्याचा अर्थ प्रेषित्व आहे. पारिभाषिक व्याख्येत अल्लाहने मनुष्याच्या मार्गदर्शनासाठी पाठविलेले प्रेषित असा अर्थ आहे. अरेबिक भाषेत दुसरा शब्द ‘नबूवत’ हा वापरला जातो. प्रेषितांची एक साखळी ईश्वराने का निर्माण केली? याची गरज का भासली होती आणि प्रेषित्वावर श्रध्दा ठेवणे आवश्यक का आहे? या प्रश्नांच्या उत्तरासाठी आपणास थोडे सविस्तर चितन करावे लागेल. प्रथमतः आपल्याला पाहावे लागले की मनुष्याच्या जीवनाचा उद्देश प्राप्त करण्यासाठी कोणती कार्यप्रणाली आहे?
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]