Islam Darshan

इस्लामी कायदे आणि राजकारण

Published : Saturday, Apr 16, 2016

साधारणतः खालील बाबींचा समावेश राजकारण म्हणून होतो आणि त्यामुळे मनुष्याच्या राजकीय जीवनाचा साचा तयार होतो.

सामाजिक शिस्त कशासाठी आवश्यक आहे? समाज सार्वभौमत्व कोणाला बहाल करते? मनुष्याचे खरे स्थान काय आहे? नागरिकांचे मूलभूत हक्क कोणते? शासनाचे अधिकार कोणते आणि मर्यादा काय आहे? राज्यघटना कोण तयार करतो? कोणती राज्यघटना कार्यान्वित आहे? आपण आता पाहू या की या प्रश्नांची उकल कुरआन आणि हदीसमध्ये झालेली आहे का? या प्रश्नांचे उत्तर ‘इस्लामची राजकीय व्यवस्था’ या प्रकरणात देण्यात आले आहे. या प्रकरणात स्पष्ट करण्यात आले आहे की इस्लामने सर्व राजकीय प्रश्नांची उकल केलेली आहे आणि त्यासाठी दिव्य प्रकटने आलेली आहेत. यावरून हे सिध्द होते की इस्लामजवळ परिपूर्ण राजकीय जीवनव्यवस्था आहे.

धर्मपालन आणि शासन: इस्लामी आदेश असे अनेक आहेत की ज्यांचे पालन (इस्लामी कायद्याचे पालन) राजकीय व्यवस्थेशिवाय आणि शासनाधिकारा (राजकीय सत्ता) व्यतिरिक्त अशक्य आहे. उदाहरणार्थ,

१) जर कोणी खून केला तर खून झालेल्या व्यक्तीच्या वारसाला बदला घेण्याचा अधिकार आहे. अल्लाहने कुरआनमध्ये आदेश दिला आहे,

‘‘हे श्रध्दावंतांनो! हत्येच्या बाबतीत तुमच्यासाठी हत्यादंडाचा आदेश नियत केला आहे.’’ (कुरआन २: १७८)

२) अल्लाहने कुरआनमध्ये चोराचे हाथ कापून टाकण्याचा आदेश दिला आहे,

‘‘आणि चोर मग तो पुरुष असो अथवा स्त्री दोघांचे हाथ कापून टाका, हा त्यांच्या कर्माचा बदला आहे आणि अल्लाहकडून अद्दल घडविणारी शिक्षा!’’ (कुरआन ५: ३८)

३) ज्याने व्यभिचार केला त्या व्यभिचारी व्यक्तीला शंभर फटके द्यावेत असा आदेश अल्लाहने दिला आहे. कुरआनोक्ती आहे,

‘‘व्यभिचारी स्त्री व व्यभिचारी पुरुष दोहोंपैकी प्रत्येकास शंभर फटके मारा. आणि त्यांची कींव करू नका, अल्लाहच्या धर्माच्या बाबतीत जर तुम्ही सर्वश्रेष्ठ अल्लाह आणि अंतिम दिनावर श्रध्दा बाळगत असाल आणि त्यांना शिक्षा देतेवेळेस श्रध्दावंतांचा एक समूह उपस्थित असावा.’’ (कुरआन २४: २)

४) जर कोणी व्यभिचाराचा आळ घेत असेल तर त्याला ऐंशी फटके मारण्याचा आदेश कुरआनमध्ये अल्लाहने दिला आहे,

‘‘आणि जे लोक मर्यादाशील स्त्रियांवर आळ घेत असतील मग चार साक्षीदार घेऊन येत नसतील, त्यांना ऐेंशी फटके मारा.’’ (कुरआन २४: ४)

५) इस्लामच्या शत्रुसंगे कुरआनमध्ये युध्द पुकारण्याचा आणि त्यांना चिरडून टाकण्याचा आदेश अल्लाह देत आहे.

‘‘आणि त्यांच्याशी तोपर्यंत युध्द करा जोपर्यंत उपद्रव नाहीसा होईल आणि अल्लाहसाठीच धर्म होईल.’’ (कुरआन २: १९३)

अशा प्रकारे असे अनेक ईशआदेश आहेत की ज्यांचे कार्यान्वयन इस्लामी राज्यसत्तेविना शक्य नाही. उदाहरणार्थ,

   १) दांभिकांना कठोरतेने संपविण्याचा आदेश आहे.

   ‘‘तुमच्यापैकी कोणी दुष्टकर्मीला पाहिले तर त्याला आपल्या हाताने रोखा.’’ (बुखारी)

   २) कुरआनने मुस्लिमांना न्यायावर अढळ राहण्यास सांगितले आहे,

   ‘‘हे मुस्लिमांनो! न्यायावर अटळ राहा आणि अल्लाहसाठी साक्षीदार बना.’’ (कुरआन ४: १३५)

   ३) ही या जगातील क्षणिक न्यायालये (ऐहिक न्यायालये) पात्र नाहीत की मुस्लिमांनी त्यांचे मामले न्यायनिवाड्यासाठी तिथे सुपूर्द करावेत. कुरआनोक्ती आहे,

   ‘‘परंतु इच्छितात असे की आपल्या बाबींचा निवाडा करण्यासाठी तागूतकडे (विद्रोहीकडे) रुजू व्हावे. वस्तुतः त्यांना तागूतशी (विद्रोहींशी) द्रोह करण्याचा आदेश देण्यात आला होता.’’ (कुरआन ४: ६०)

   ४) प्रजेच्या तक्रारींचे न्यायनिवाडे दिव्य प्रकटनानुसारच करावेत. कुरआनोक्ती आहे,

   ‘‘तुम्ही अल्लाहने अवतरित केलेल्या कायद्यानुसार लोकांच्या मामल्यांचा न्यायनिवाडा करा.’’ (कुरआन ५: ४८)

   ५) श्रध्दावंत (मुस्लिम) तयार करण्याचा मूळ उद्देश आहे की त्यांनी ईशधर्माची सत्यता सर्व जगापुढे मांडावी. कुरआनोक्ती आहे,

   ‘‘आणि अशाच प्रकारे तर आम्ही तुम्हाला उत्तम समाज बनविले आहे, जेणेकरून जगातील लोकांवर तुम्ही साक्षी व्हा. आणि प्रेषित तुमच्यावर साक्षी असतील.’’ (कुरआन २: १४३)

म्हणून वरील ईशदेशांचे पालन तेवढेच धार्मिक महत्त्वाचे आहेत जेवढे इतर धार्मिक आदेश आणि नियमांसारखेच ते धार्मिक विधीनियम आहेत. त्यांना कार्यान्वित करणे तेव्हढेच अनिवार्य आहे जेवढे इतर धार्मिक कार्य, अल्लाहने घालून दिलेल्या नियमांमध्ये आणि दिव्य प्रकटनांत भेदभाव करण्याची मुभा दिेलेली नाही. जे आवडते आणि सोपे आहे त्या आदेशांचे पालन करावे आणि जे कठीण आणि नावडते आहे त्यांना सोडून द्यावे, अशा प्रकारचे स्वातंत्र्य अल्लाहने दिलेले नाहीत. अल्लाहने आपल्या दासांना आदेश दिला आहे की त्यांनी अल्लाहच्या सर्व आदेशांचे भेदभाव न करता पालन करणे आवश्यक आणि अनिवार्य आहे. कुरआन स्पष्टोक्ती आहे,

‘‘लोक हो! जे काही तुमच्या पालनकर्त्याकडून तुमच्यावर अवतरले गेले आहे त्याचे अनुसरण करा आणि आपल्या पालनकर्त्याला सोडून अन्य पालकांचे अनुकरण करू नका, पण तुम्ही उपदेश कमीच मानता.’’ (कुरआन ७:३)

आपण असे केले नाही आणि अल्लाहच्या आदेशांचे पालन करण्यात भेदभाव केला, आवडणारे आणि सोपे आदेशांचे पालन आणि कठीण आणि नावडणारे आदेशांकडे दुर्लक्ष, हे कृत्य व्यक्तीला श्रध्दावंत (मुस्लिम) ठरवित नाही तर अश्रध्दावंत सिध्द करते. यहुदी लोकांचे उदाहरण आमच्या समोर आहे जे ईशसंदेशांत अफरातफर करण्याचे दोषी आहेत. कुरआनोक्ती आहे,

‘‘तर काय तुम्ही ग्रंथाच्या एका भागावर श्रध्दा ठेवता आणि दुसऱ्या भागाला नाकारता? तुमच्यापैकी लोक असे करतील त्यांच्यासाठी याशिवाय अन्य कोणती शिक्षा असेल की या ऐहिक जीवनामध्येही कठोर यातनांकडे त्यांना नेले जाईल. अल्लाह त्या कारवायांपासून अनभिज्ञ नाही ज्या तुम्ही करीत आहात. हे तेच लोक आहेत ज्यांनी मरणोत्तर जीवनाचा सौदा करून हे नश्वर जीवन खरेदी केले आहे. न याची शिक्षा कमी होईल न यांना कोणती मदत लाभेल.’’ (कुरआन २: ८५)

संबंधित लेख

  • कन्या - भ्रूणहत्या

    मानव जीवनाच्या अवमानतेचे एक अत्यंत घृणास्पद रूप नवजात कन्या शिशुंची हत्या आहे. भारतात या युगातसुद्धा काही राज्यांमध्ये जसे केरळ, ओरिसा, बिहारमधे हा प्रकार आहे की माता स्वतः मोलकरणीच्या मदतीने आपल्या नवजात मुलींची निर्मम पध्दतींनी जन्माच्या काही महीन्यानंतर या भयाने हत्या करून टाकते की यांच्यामुळे हुंड्याचा प्रबंद करावा लागेल.
  • ‘हुदैबिया’चा तह

    हिजरत’ (मदीना स्थलांतर) च्या सहाव्या वर्षाच्या शेवटी घडलेल्या एका महत्त्वाच्या घटणेकडे वाचकांचे लक्ष आम्ही वेधत आहोत. या घटनेचे इस्लामी आंदोलनावर अतिशय दूरगामी परिणाम झालेले आहेत. त्या वेळी प्रेषित मुहम्मद(स) यांना एक असे स्वप्न पडले की, ते आपल्या काही सोबत्यांना घेऊन शांतीपूर्वक मक्केस गेले आणि उमरा (काबादर्शन) केला. या स्वप्नाचा त्यांनी आपल्या सोबत्यांसमोर उल्लेख करताच सर्वांच्या मनात ‘उमरा’ (काबादर्शन) करण्याची तीव्र कामना निर्माण झाली.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]