Islam Darshan

दहशतवाद आाणि पाश्चात्यांचे हिसक संकल्प

Published : Sunday, Mar 06, 2016

अकरा सप्टेंबर इ. सन २००१ चा दिवस अमेरिकन इतिहासातील एक काळा दुःखद व अविस्मरणीय दिवस होय. असे म्हटले जाते की ज्याप्रमाणे ७२ वर्षापूर्वी इ. सन १९२९ मध्ये अमेरिकेचा शेअर बाजार बताशाप्रमाणे विरघळून गेल्यामुळे आणि नंतर ६० वर्षापूर्वी इ. सन १९४१ मध्ये पर्ल हार्बर वर अकस्मात जपानी हल्ल्याने, ज्यात सुमारे अडीच हजार अमेरिकन ठार झाले होते, अमेरिकेची आर्थिक स्थिती, राजनीती व जागतिक भूमिकेचे पितळ उघडे पडले, अगदी तसेच ११ सप्टेंबरच्या या दुर्घटनेने केवळ अमेरिकेलाच नव्हे तर संपूर्ण पाश्चिमात्य जगताला हलवून सोडले आहे. शीतयुध्दानंतर अमेरिका व भांडवलशाहीच्या जागतिक आणि स्वतःच्या अहंकारामुळे ‘अविनाशी’ श्रेष्ठत्वाचा जो डांगोरा पिटला जात होता आणि इतिहासाच्या अंताची जी शुभवार्ता ऐकविली जात होती ती संपूर्ण कथा वर्ल्ड ट्रेड सेंटरचे दोन्ही मनोर्यांच्या विध्वंसाबरोबर जमीनदोस्त झाली आणि अशी भीती आहे की अध्यक्ष बुश यांनी ज्याला एकविसाव्या शतकाचे पहिले युध्द म्हणून संबोधले आहे तो एक नवीन उष्ण व शीतयुध्दाचा प्रारंभ ठरू नये आणि त्यापेक्षाही मोठा धोका असा आहे की तो पाश्चिमात्य जगत व इस्लामी जगतादरम्यान नवीन ख्रिश्चन धर्मयुध्दाची नांदी ठरू नये.

ही ११० मजली वर्ल्ड ट्रेड सेंटर ची एक अब्ज डॉलर्स खर्च करून २३ वर्षापूर्वीची इमारत ११६ एकर जमिनीवर बांधलेली होती. या इमारतीने न्यूयॉर्क शहराला एक वेगळे श्रेष्ठत्व प्रदान केले होते. हल्ली त्यात ५०००० लोक काम करीत असत. या इमारतीचे सध्याचे वार्षिक भाडे तीन अब्ज डॉलर्सच्या पुढे गेलेले होते. सदर इमारत अमेरिकेच्या आर्थिक व सांपत्तिक शक्तीचे चिन्ह आणि जागतिक भांडवलदारीच्या वैभवाचे प्रतीकच नव्हे तर ही इमारत अमेरिकेची सांपत्तिक राजधानी बनली होती.

अशाच प्रकारे वॉशिग्टनमध्ये संरक्षण मंत्रालय एखाद्या किल्ल्याच्या तटात बंदिस्त असलेल्या शहराचे दृश्य प्रस्तुत करीत होते. यात चोवीस हजार लोक काम करीत असत आणि ही इमारत अमेरिकेच्या जागतिक सैनिक शक्तीची निदर्शक होती. या दोन्ही इमारती एका तासाच्या अल्पावधीत तीन अपहृत अमेरिकन विमानांच्या मार्यात येऊन उलथ्या पालथ्या झाल्या. या दोन्ही इमारतींचा विध्वंस आणि सहस्त्रावधी लोकांचे मृत्युमुखी पडणे काही लहान सहान दुर्घटना नव्हती की तिचा प्रहार हल्लीच्या एकमेव महाशक्तीकी जी केवळ आपल्या संरक्षणावर संपूर्ण जगाच्या एकत्रित संरक्षणा खर्चाच्या ३६ टक्के खर्च करीत होती, तिच्या प्रतिष्ठा व सन्मानावर अशा प्रकारे झाला की ती अजिक्य असल्याची जादू नाहीशी झाली काही वेळेसाठी अमेरिकेची संपूर्ण संरक्षण व्यवस्था व शासन व्यवस्था ‘गर्भगळित व श्वास अवरूध्द’ स्थितीचे चित्र बनून राहिली आणि २४ तासांपर्यंत तर ही जागतिक शक्तीजी सध्या सिहाप्रमाणे गर्जना करीत आहे. प्रत्यक्षपणे कोणत्याही राष्ट्रप्रमुखाविना निराश्रित बनून राहिली. राष्ट्राध्यक्ष, उपराष्ट्राध्यक्ष आणि काँग्रेसचे सभापती सर्वजण एकेकाळी वार्याच्या खांद्यावर बसून ज्या जागतिक धोक्यापासून सुरक्षेचे इच्छुक होते तर कधी जमिनीखालील आश्रय स्थानात खुशालीची इच्छा बाळगत होते. त्याचे उदाहरण या शतकाच्या इतिहासात आढळत नाही. या दुर्घटनेनंतर अमेरिकेच्या नेतृत्वाला ज्या दिव्यातून जावे लागले आणि त्याच्या चेहर्या व घोषणावर जो रंग पाहिला जाऊ शकतो त्याचे आश्चर्य व दुःख, तुच्छता, दुःखावेग व क्रोध, संताप व त्वेष आणि याशिवाय प्रतिकार व सूड आणि उन्मादावस्था घटनांच्या रुपात वर्णन केले जाऊ शकते.

चिताजनक व्यवहार

ही घटना होऊन एक दीर्घकाळ लोटला आहे. परंतु अमेरिकाच नव्हे तर संपूर्ण पाश्चिमात्य जगतावर एक गोंधळाची परिस्थिती पसरली आहे, अविश्वासाची छाया पसरत आहे आणि या भावनाप्रधान वातावरणात काहीतरी करण्याच्या चिन्हांच्या धोक्याची घंटा वाजवीत आहेत. ’माकडाची आपत्ती तबेल्याच्या शिरी’ या म्हणीप्रमाणे अरबस्थान आणि इस्लामी जगताला लक्ष्य बनविले जात आहे. उसामा बिन लादेनवर सर्व राग काढला जात आहे आणि अफगाणिस्थानवर अमेरिका तुटून पडला आहे. हत्तीने डासावर चढाई केली आहे आणि दगड मातीचा सर्व ढिगारा एकाच व्यक्तीवर पाडून आपल्या अपयश, तिरस्कार व अविश्वासाच्या मूळ कारण व उत्तेजनाकडून लक्ष हटविण्याचा अनुचित प्रयत्न केला जात आहे.

ही मोठी चिताजनक स्थिती आहे की थंड मन बुद्धीने सत्य व न्यायाच्या तत्त्वांच्या प्रकाशात स्थितीचे परीक्षण व विश्लेषण (काही निर्बळ आवाजाव्यतिरिक्त) न झाल्यासारखे आहे. ज्यांच्या हाती शक्तीआहे व ज्यांच्यावर जागतिक नेतृत्वाची जबाबदारी आहे ते एखाद्या जखमी हिस्त्र पशुप्रमाणे ज्याच्यावर शंका येईल त्याला नष्ट भ्रष्ट करण्याचा संकल्प सोडीत आहेत आणि त्यासाठी युद्धात उतरले आहेत. राष्ट्रपती बुश म्हणतात की हा दहशतवाद नव्हे तर युद्धाची घोषणा आहे. परंतु हे सांगू शकत नाहीत की या युद्धात प्रतिपक्षी कोण आहे? सामना कोणत्या राज्य अथवा शक्तीशी आहे? आणि हे युद्ध कोणत्या भूमीवर होत आहे? पर्ल हार्बरच्या वेळी चढाई करणाराही माहीत होता आणि त्याचे स्थानसुद्धा. सद्यस्थितीत हे सिद्ध झालेले नाही की कोणी या दहशतवादाचा अवलंब केला आहे? आणि याचीदेखील कल्पना नाही की या आत्मघाती हल्ल्यात मरणार्यांच्या पाठीशी खरोखर कोण लोक आहेत व ते कोठे आहेत? या घटनेला अधिक स्फोटक बनविण्यासाठी तिचे स्वार्थी ’संस्कृतीविरुद्ध युद्ध’ असे नामाभिधान केले जात आहे आणि अशा प्रकारे जगाला दोन तटांत विभाजित करण्याचा निदनीय प्रयत्न केला जात आहे. जणु पाश्चिमात्य जग केवळ जग आहे आणि उरलेल्या भागातील लोक जणु रानटी युगात जीवन जगत आहेत. असे म्हटले जात आहे की केवळ दहशतवाद्यांचाच नायनाट केला जाईल असे नव्हे तर त्या देशांनासुद्धा नामशेष केले जाईल जेथे त्यांना आश्रय मिळालेला आहे

(आणि हे विसरुन गेले आहेत की आजपर्यंत खुद्द अमेरिकेत आय.आर.ए. या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांना आश्रय प्राप्त होते आणि क्युबा ते लॅटिन अमेरिकेतील अनेक देश व इराक, लिबिया व इराण वगैरे देशात दहशतवाद करणारे कित्येक सशस्त्र टोळ्यांसाठी अमेरिका केवळ आश्रयस्थान होते असे नव्हे तर सी.आय.ए. आणि विशिष्ट लॉबी अनिर्बंधपणे त्यांचे प्रशिक्षण व त्यांना शस्त्र सज्ज करण्याची व्यवस्था करीत राहिल्या आहेत)

उपराष्ट्रपती डिक चेनी आणि संरक्षण सचीव यांनी तर स्पष्टपणे सांगितले की आमचे लक्ष्य तर त्या देशांनाच नष्ट करण्याचे आहे. जे दहशतवादाला वृद्धिगत करतात. विचारवंत, लेखक आणि प्रसारमाध्यमावर विश्लेषण करणार्यांची एक फौज आहे जी सूड व सरकारी दहशतवादाचा प्रचार करीत आहे.
माजी सेक्रेटरी ऑफ स्टेट लॉरेन्स ईगल वर्गर म्हणतात,

’’अशा प्रकारच्या लोकांचा निकाल लावण्याचा प्रारंभ करण्याची अशीही एक पद्धत आहे - आपल्याला त्यांच्यापैकी काहींना ठार केले पाहिजे मग ते या बाबतीत सरळसरळ संबंधित असोत की नसोत.’’

अमेरिकन परराष्ट्र धोरणाचे गुरु व व्हिएतनाम कंबोडिया, चिली आणि न जाणो किती देशात लक्षावधी माणसांच्या वंश-निर्मूलनाला जबाबदार असलेल्या हेन्री किसिजर यांचे म्हणणे आहे की जरी या गोष्टीचा पत्ता नाही की या पाऊला पाठीमागे खरोखर बिन लादेनचा हात होता किवा नाही परंतु अनुशासनात्मक पाऊल ताबडतोब उचलणे आवश्यक आहे आणि तेदेखील अपुरे आहे. खरे लक्ष्य ती संपूर्ण व्यवस्था आणि त्या देशाविरुद्ध कार्यवाही आहे जेथे या व्यवस्थेचे थोडे का असेनात यंत्र व सुटे भाग आढळतात.

"परंतु सरकारला एक सुव्यवस्थित प्रतिक्रियेची जबाबदारी उचलावी लागेल. आशा आहे की हे तशाच प्रकारे संपुष्टात येईल जसा पर्ल हार्बरचा हल्ला अंताला पोचला होता, म्हणजे त्या व्यवस्थेचा विनाश जी याला जबाबदार आहे.’’ (वॉशिग्टन पोस्ट, १२ सप्टेंबर २००१)

महाशयांनी असादेखील सल्ला दिलेला आहे की जर दुसर्या देशांनी अमेरिकेला साथ दिली नाही तर अमेरिकेने एकट्यानेच ही कार्यवाही पूर्णत्वास नेली पाहिजे आणि कसल्याही सहमतीची प्रतीक्षा करता कामा नये. ही तर मोठ्या विचारवंत व जबाबदार महाभागांची वर्णनशैली आहे. सर्व साधारण स्तरावर जी वर्णनशैली अवलंबिली जात आहे त्याची कल्पना केवळ या तीन उदाहरणावरुन येऊ शकते.

वॉशिग्टन पोस्टमध्ये रिच लॉरीने लिहिले आहे,
’’जर आम्ही दमास्कस किवा तेहरान अथवा जे काही असेल, याचा एक भाग उद्ध्वस्त केला तर हादेखील प्रश्नाच्या सोडवणुकीचा एक भाग आहे.’’ (१३ सप्टेंबर २००१)

न्यूयॉर्क पोस्टमध्ये स्ट्यू डेलव्हरी लिहितात,
’’एकविसाव्या शतकाच्या या पर्ल हार्बरचे उत्तर तितकेच साधे असले पाहिजे जितके की कठोर. वेळ न घालवता त्या, हरामखोरांना ठार करा. डोळ्यांच्या मध्यभागी गोळी मारा. त्यांचे कण-कण करुन टाका, आवश्यकता वाटल्यास विष द्या आणि जी शहरे व देश या कीटकांना समर्थन देत आहेत त्यांच्यावर बॉम्बचा वर्षाव करा.’’ (१२ सप्टेंबर २००१)

न्यूयॉर्क डेली न्यूजमध्ये एक श्रीमती कमल्टर तर येथपर्यंत म्हणतात,
’’ही वेळ अशी नव्हे की दहशतवादाच्या या विशिष्ट हल्ल्यात सरळ सरळ गुंतलेल्या लोकांचा रीतसर व काळजीपूर्वक शोध लावला जावा. आम्ही त्यांच्या देशावर हल्ला केला पाहिजे. त्यांच्या पुढार्यांना ठार केले पाहिजे. आम्ही हिटलर आणि त्याच्या ज्येष्ठ अधिकार्यांचा शोध करणे आणि शिक्षा देण्याच्या बाबतीत पारंपरिक नियमांचे बंधन पाळत नव्हतो. आम्ही जर्मन शहरात कारपेट बॉम्ब वर्षाव केला. आम्ही शहरातील नागरिकांना ठार केले. ते युद्ध होते व हेदेखील युद्ध आहे.’’ (१२ सप्टेंबर २००१)

हे ते वातावरण आहे जे तयार केले जात आहे आणि मुस्लिम व अरब त्याचे लक्ष्य आहेत. राष्ट्रपती बुश यांनी ख्रिश्चन धर्मयुद्ध शब्दाचा प्रयोग करुन जळत्या आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. इस्लामला एक दहशतवादी धर्म व मुस्लिमांना दहशतवादी समूह म्हणून प्रस्तुत केले जात आहे. याचा परिणाम असा की अमेरिका व ब्रिटनमध्ये शेकडो घटना समोर आल्या, ज्यात मस्जिदी, मदरसे, मुस्लिमांची केन्द्रे, घराणे येथपावेतो की रस्त्याने गोश्यात (बुर्का) जाणार्या स्त्रिया लक्ष्य बनल्या आहेत. केवळ अमेरिकेत ३०० सुडाच्या घटना घडलेल्या आहेत. आणि हा क्रम सुरु आहे. अन्यायकारक गोष्ट तर अशी आहे की शीखदेखील केवळ मुस्लिमांशी दिसण्यात साम्य असल्यामुळे मारले जात आहेत. काय हीच ती संस्कृती व श्रेष्ठ जीवनव्यवस्था आहे जी दहशतवादामुळे धोक्यात असल्याबद्दल ओरड केली जात आहे!

इस्लामी आंदोलनाचा दृष्टिकोन

अमेरिका व पाश्चिमात्यांच्या व्यवहार मग तो कसा का असेना आणि आपल्या भावनांच्या अभिव्यक्तीसाठी ते कोणत्याही भाषेचा प्रयोग का करेनात, मुस्लिम म्हणून व मुस्लिम उम्मत (एका प्रेषिताचे अनुयायी) म्हणून आमचा व्यवहार, सत्य, न्याय, आणि मध्यम मार्गावर आधारित असला पाहिजे आणि जशास तसे उत्तर देण्याऐवजी आम्ही प्रमाणाची भाषा आणि सत्यनिष्ठतेच्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे, त्याला कारण असे की पवित्र कुरआनची आमच्यासाठी अशीच आज्ञा आहे की जेव्हा जेव्हा माणसादरम्यान काही बोलाल तेव्हा न्यायानुसार बोला.

’’आणि जेव्हा लोकांच्या दरम्यान निर्णय कराल तर न्यायपूर्ण रीतीने करा.’’ (सूरतुन्निसा - ५८)
’’हे लोकहो ज्यांनी ईमान आणले आहे! अल्लाहसाठी सत्यावर टिकून राहणारे आणि न्यायाची ग्वाही देणारे बना. एखाद्या टोळीच्या शत्रुत्वाने तुम्हाला इतके प्रक्षुब्ध करु नये की तुम्ही न्यायाकडून तोंड फिरवावे. न्याय करा, हे ईशभीरुतेशी अधिक अनुकूल आहे.’’ (सूरतुल माइदह -८)

मानवी प्राणाचे रक्षण व आदर इस्लामची मौलिक शिकवण आहे आणि यात मुस्लिम व मुस्लिमेतर, पुरुष व स्त्री, मित्र व शत्रूमध्ये कोणताही भेदाभेद नाही. सर्वांचा जीव समान आहे आणि सत्याशिवाय कोणाचाही जीव घेणे अल्लाह व त्याच्या प्रेषितांच्याविरुद्ध बंड आहे. महान अल्लाहचे कथन आहे,

’’आम्ही सर्व आदम संततीला प्रतिष्ठित व सन्मानित बनविले आहे.’’ (केवळ मुस्लिम अथवा ग्रंथधारकांनाच नव्हे.)

अशाच प्रकारे-

’’माणसाला ठार करण्याचा अवलंब करु नका, ज्याला अल्लाहने निषिद्ध ठरविले आहे, पण सत्यानिशी.’’ (सूरहबनी इस्त्राईल-३३)
’’ज्याने एखाद्या माणसाला खुनाचा सूड किवा पृथ्वीवर उपद्रव माजविण्याशिवाय एखाद्या अन्य कारणाने ठार केले, त्याने जणू सर्व माणसांना ठार केले आणि ज्याने एखाद्याला जीवनदान दिले त्याने जणू सर्व माणसांना जीवन प्रदान केले.’’ (सूरतुल माइदह - ३२)

ज्या धर्माची शिकवण अशी असेल तो धर्म निष्पाप लोक दहशतवादाने अत्याचारपीडित होऊन मृत्युमुखी पडावेत हे कसे सहन करु शकतो? हेच कारण आहे की अमेरिका व युरोपच्या मुस्लिमांनीच नव्हे तर संपूर्ण जगातील मुस्लिमांनी त्यांच्या धार्मिक चळवळींनी व सर्वच इस्लामी सरकारांनी ११ सप्टेंबरच्या दहशतवाद व त्याच्या परिणामस्वरुप हजारो माणसांच्या मृत्यूवर अश्रू गाळले आहेत. या दुःखाची अनुभूति हृदयतलापर्यंत केली आहे आणि त्याचा उघड उघड निषेध केला आहे आणि खर्या अपराध्यांना कर्मदंडापर्यंत पोचविण्याची मागणी केली आहे. आमच्या दृष्टीने ही केवळ अमेरिकेचीच हानी नव्हे तर संपूर्ण मानवजातीची हानी होय आणि हा शोक केवळ कोणत्या एका जातीचा नव्हे तर संपूर्ण मानवजातीचे दुःख आहे. ही हानी व या दुःखाला ज्या गोष्टीने अधिकच आपुलकीचे स्वरुप प्रदान केले आहे ती अशी हकीकत आहे की वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये ठार झालेल्या पाच हजारापेक्षा अधिक लोकात, ज्यांचा संबंध ६३ देशांशी आहे आणि ज्यात सर्व धर्माचे अनुयायी समाविष्ट आहेत, एक हजारापेक्षा अधिक मुस्लिम होते म्हणजे प्रत्येक पाचपैकी एक मुस्लिम होता.

जगातील इस्लामी चळवळीच्या शंभरपेक्षा अधिक नेत्यांनी आणि इस्लामी जनतेच्या सर्वोच्च धर्मपंडित व विचारवंतांनी आपल्या संयुक्त निवेदनाने १२ सप्टेंबरलाच या नाहक कत्तलीचा निषेध केला आणि नंतर १८ सप्टेंबरला आणखी एका निवेदनाने इस्लाम व मुस्लिम जमातीचा दृष्टिकोन स्पष्टपणे जगासमोर मांडला. त्यांनी जेथे नाहक कत्तलीचा निषेध केला तेथे सूड उगविण्याविरुद्ध व प्रतिनाहक रक्तपाताविरुद्धदेखील खबरदार केले आहे आणि श्रेष्ठतम विवेक आणि पूर्ण धैर्याने न्याय-निवाडा आणि कायद्याच्या शासनाची गोष्ट सांगितली आहे. हे निवेदन संपूर्ण मुस्लिम जातीच्या लोकांच्या भावनांचे प्रतिनिधित्व करते.
आम्ही न्यूयॉर्क व वॉशिग्टनवरील भ्याड दहशतवादी हल्ल्यांचा अगोदरच निषेध केलेला आहे. या हल्ल्याचा लक्ष्य बनलेले लोक सर्व देशांचे व जगातील मोठमोठ्या धर्माशी संबंधित होते.

इस्लाम मानवी प्राणांना प्रतिष्ठित मानणार्यांचा ध्वजवाहक आहे. पवित्र कुरआनानुसार एका निष्पाप माणसाची हत्या करणे म्हणजे संपूर्ण मानवजातीविरुद्ध अपराध करणे होय. सार्या जगातील मुस्लिम या अतिरेकामुळे झालेल्या प्राणहानीबद्दल दुःखी व कष्टी आहेत कारण ही अमेरिका व संपूर्ण जगाची संयुक्त हानी आहे.

आम्ही अशी घोषणा करतो की जगाच्या सर्व भागात दहशतवादाचे लक्ष्य बनणारे अशाच सहानुभूती व चिता करण्यास पात्र आहेत. जे लोक मानवी समानतेचे ध्वजवाहक आहेत त्यांनी जगाच्या सर्व भागातील दहशतवादाचा निषेध केला पाहिजे आणि त्यांच्याविरुद्ध लढा दिला पाहिजे.

आम्ही या तत्त्वाचे समर्थक व ध्वजवाहक आहोत की माणसाविरुद्ध दहशतवाद करण्यास जे जबाबदार आहेत- व्यक्ती, गट अथवा सरकार, त्यांना न्यायालयाच्या कठड्यात उभे केलेच पाहिजे आणि कसल्याही सहानुभूती अथवा भेदभावाविना निष्पक्ष न्यायालयीन पद्धतीप्रमाणे त्याबद्दल शिक्षा दिली पाहिजे. परंतु दहशतवादाविरुद्ध युद्धाच्या नावाने संशयितांना एखाद्या निष्पक्ष न्यायालयाच्या पद्धतीनुसार त्यांचा अपराध सिद्ध केल्याशिवाय, एकतर्फी शिक्षा देण्याचा प्रयत्नदेखील दहशतवादच ठरेल, ज्याची अनुमती दिली जाऊ शकत नाही व सहनदेखील केले जाऊ शकत नाही.

न्यायनिवाडा व निसर्गनियम आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तत्त्वाची कमीत कमी अशी निकड आहे की अपराधाचा निष्पक्ष स्पष्ट पुरावा असावा. म्हणून आम्ही जगातील सर्व राष्ट्रांना विशेषतः अमेरिकन शासनाला अशी विनंती करतो की त्याने निव्वळ शंकेच्या आधारावर एकतर्फी व वाटेल तसा बळ प्रयोग करु नये. आणि दावेदार, वकील, न्यायाधीश व फासावर चढविणारा, सर्व काही स्वतःच बनण्याचा प्रयत्न करु नये. आम्ही संयुक्त राष्ट्र संघाच्या सेक्रेटरी जनरल आणि सर्व अरब, मुस्लिम व युरोपीय देशांच्या प्रमुखांना कळकळीची विनंती करतो की त्यांनी जगाला निष्कारण रक्तपात आणि हिसाचारातील वाढी पासून वाचवावे की ज्यामुळे जगातील राष्ट्रे व सरकारामध्ये अधिक तंटे व संघर्ष उत्पन्न होऊ नयेत. दहशतवादाचा प्रतिकार केवळ अशाच मार्गाने केला जाऊ शकतो जो न्यायाधिष्ठित असावा आणि ज्याने जगात सुखशांतीचे कारण बनावे. आम्ही अशा पाऊलासंबंधी त्यातील भागीदार अथवा बघे बनून राहू नये - की ज्यात सूड, अहंकार आणि आंतरराष्ट्रीय दिवाळखोरीचा गंध येत असावा. या, सर्वजण न्यायासाठी उभे राहू या आणि दहशतवादाचा प्रतिकार करण्यासाठी दहशतवाद्यांना कायदेशीर शिक्षा देण्यासाठी सामूहिक प्रयत्न करु या आणि जगात दहशतवादाच्या मुळाशी आढळणार्या अन्याय, अपहरण व बळप्रयोगाच्या धोरणाचा अंत करण्यासाठी प्रयत्न करु या!

असा आहे मुस्लिम धर्मियांचा तात्विक व खरा दृष्टिकोन. सर्व न्याय-प्रिय राज्ये व संघटनांचे असे कर्तव्य आहे की या नाजुक क्षणी विवेक, प्रामाणिकपणा व धैर्याने आपल्या या दृष्टिकोनाशी त्यांनी दृढ राहावे. केवळ शक्ती, धमकी व अत्याचारापुढे हत्यारे टाकू नये आणि प्रचाराच्या हल्ल्याने प्रभावित होऊ नये आणि कोणत्याही अशा उत्तरादाखल प्रतिक्रियेच्या मार्गाचा अवलंब करु नये जो सत्य व वास्तविकतेपासून दूर असावा.

अमेरिकन व्यवस्थेचे लज्जास्पद अपयश

या वेळी सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो असा आहे की हे सर्व काही कसे घडले आणि त्यास खरे जबाबदार कोण आहेत? गोष्ट केवळ संशय व सूडाची नव्हे तर निष्पक्ष शोध, चौकशी व तपास, रोकड व हिशेब आणि सत्यशोधनाची आहे. दुर्दैवाने याकडे दुर्लक्ष केले जात आहे आणि सर्व बाबी एका गोंधळाच्या पद्धतीने निकालात काढण्याची भयंकर चूक केली जात आहे. आश्चर्याची गोष्ट आहे की कोणी असा आहे की जो राजाला असे सांगण्याचे धाडस करु शकेल की त्याने प्रथम आपल्या शरीरावर दृष्टी टाकावी आणि पाहावे की खरोखर त्याच्या अंगावर कपडे नाहीत व तो नग्न आहे?

हा अद्याप चौकशीचा प्रश्न आहे की हा अपराध करणारे कोण होते? आणि त्यांचे मूळ उद्देश व त्यांचे पाठीराखे कोण होते? परंतु पहिला प्रश्न तर असा आहे की अमेरिकेच्या स्वतःच्या शासन व्यवस्था आणि विशेषकरुन त्याच्या राष्ट्रीय सुरक्षा, हेरगिरी व पोलीसांच्या व्यवस्थेचे अपयश आणि या अपयशाला जबाबदार मंडळींची विचारपूस व चौकशी का टाळली जात आहे? एखादी रेल्वे दुर्घटना झाली तरी तात्कालिक कारणांच्या तपास व चौकशीपूर्वी संस्थेच्या जबाबदार माणसांची तपासणी केली जाते व त्यांना उत्तरदायित्वाच्या कठड्यात उभे केले जाते. अमेरिकेची गुप्तहेर संघटना जगाची श्रेष्ठतम व सर्वात अधिक खर्चाची व्यवस्था आहे. केवळ सी.आय.ए. च्या खर्चाचा वार्षिक अंदाजपत्रक ३० अब्ज डॉलर आहे आणि जगात त्याचे एक लक्ष पूर्णकालीन नोकर आहेत. एफ.बी.आय आंतरिक सुरक्षेला जबाबदार आहे. त्याचे वार्षिक अंदाजपत्रक ३ अब्ज डॉलरचे आहे. त्याचे अमेरिकेत ५५ केंद्रे व २७ हजार आठशेचा नोकरवर्ग आहे. त्याच्या कार्यव्यवस्थेत एकूण अंदाजपत्रकाचा पाचवा भाग केवळ माहिती गोळा करण्यासाठी ठरविला आहे आणि ही देखरेख करण्यासाठी आधुनिकतम तंत्रज्ञानाचा प्रयोग करीत आहे.

आणखी एक संस्था National Reconnaissance Office आहे जी हेर उपग्रहांच्या मदतीने जीवनाच्या प्रत्येक पैलूची आहोरात्र देखरेख करीत असते. आणि या संस्थेचा वार्षिक अंदाजपत्रक सहा अब्ज दोन कोटी डॉलर्सचा आहे. आणखी एक संस्था National Security Authority नावाने आहे, ज्यात एकवीस हजार लोक काम करतात आणि त्यात माहिती संकलनाची जगातील सर्वश्रेष्ठ व्यवस्था आहे आणि तिचा नोकरवर्ग जगातील सर्व महत्त्वाच्या भाषांत प्रवीण आहे. त्याशिवाय दुसर्या नऊ गुप्त बातम्या गोळा करणार्या संस्था आहेत ज्या सेना, अर्थ मंत्रालय, वाहतुक मंत्रालय व जल आणि ऊर्जा मंत्रालयाच्या अधीन कार्यरत आहेत आणि त्यांच्यापैकी प्रत्येकीचे अंदाजपत्रक एक अब्ज डॉलर्स वार्षिक आहे. या सर्वाव्यतिरिक्त एक National Imagery and Mapping Agency आहे. या संस्थेचे वार्षिक अंदाजपत्रक एक अब्ज दोन कोटी डॉलर्सचे आहे. आणि तिचे काम केवळ इतकेच आहे की अमेरिकेच्या भूमीवर जे काही घडत आहे त्यांचे नकाशे सुरक्षित ठेवावेत. अशा प्रकारे इन्टलिजन्स (बातम्या काढणे) व निरीक्षणाच्या संस्था वार्षिक ५० अब्ज डॉलर्सच्या अंदाजपत्रकाने राष्ट्रीय सुरक्षा व संरक्षणासाठी जबाबदार आहेत. याशिवाय माहिती प्राप्त करणार्या Non-Intelligence Agencies चे वार्षिक अंदाजपत्रक २७ अब्ज डॉलर्स आहे. जणू केवळ गुप्त बातम्या व दुसरी माहिती प्राप्त करण्यासाठी अमेरिका वार्षिक ७७ अब्ज डॉलर्स खर्च करीत आहे.
(साप्ताहिक गार्जियन, २० ते २६ सप्टेंबर, २००१ पृष्ठ ५)

असे असूनदेखील या संपूर्ण व्यवस्थेला एक अशा क्रमबद्ध आणि विविधअंगी नियोजनाचा थांगपत्तासुद्धा लागला नाही ज्यात अमेरिकेच्या कथनानुसार १९ आत्मघातकी अपहरणकर्ते सामील होते ज्यांनी दोन वेगवेगळ्या विमानतळावरुन कार्यवाहीचा प्रारंभ केला, ज्यात त्यांच्याशिवाय कमीतकमी आणखी तीस लोक सामील असतील असा अंदाज आहे जे कित्येक महिन्यापासून या कृतीचे नियोजन करीत होते, मोठ्या शहरात राहत असत, कॅनडा आणि जर्मनीचा प्रवास करीत होते, क्युबात मद्यपान आणि नृत्य व धुंदीच्या मैफिलीत सामील असत. शरीरसौष्ठवासाठी तालमीत जात असत आणि विमानोड्डाणाच्या संस्थांचे रीतसर सभासद म्हणून हवेतील उड्डाणाचा सराव करीत होते. जर इतकी मोठी रक्कम खर्च करुन आणि इतकी आधुनिक व प्रगतव्यवस्था असूनदेखील अमेरिकेच्या नेतृत्वाला अशा कारस्थान व भयंकर नियोजनाची चाहूलदेखील लागत नाही तर मग या व्यवस्थेचे मूल्यांकन न करणे हे कसे समजण्याजोगे आहे? सी.आय.ए. च्या प्रमुखाने राजीनामा दिला नाही, एफ.बी.आय. च्या प्रमुखाला निलंबित केले नाही. अॅटर्नी जनरल जो या संपूर्ण व्यवस्थेचा प्रमुख आहे त्याला काहीही हानी पोचली नाही तर उलट अॅटर्नी जनरल पूर्णतः उद्दामपणे सांगत आहेत की आता प्रश्न न्यायाचा नव्हे तर उत्तरादाखल कार्यवाही करण्याचा आहे. खरे अपयश अमेरिकेच्या स्वतःच्या व्यवस्थेचे आहे. केवळ उसामा बिन लादेन आणि अफगाणिस्थानवर बॉम्बवर्षाव केल्याने अमेरिकेच्या स्वतःच्या अपयशावर पांघरुण घातले जाऊ शकत नाही.

हे अपयश तेव्हा अधिकच लज्जास्पद बनते जेव्हा आम्ही पाहतो की दहशतवादाची संभावना व धोक्यासंबंधी चर्चा व बोलण्याचा क्रम सुरु होता. फेब्रुवारी १९९३ मध्ये याच वर्ल्ड सेंटरमध्ये बॉम्बस्फोट झाला होता ज्यात सहा लोक ठार झाले होते. एप्रिल १९९५ मध्ये ओक्काहामाची घटना घडली होती - जी एका अमेरिकन दहशतवादी ग्रोटमोथी लेकूनचे कृत्य होते आणि ज्यात १६८ लोक मृत्युमुखी पडले होते. आताच दोन महिन्यापूर्वी लेकूनला देशी व जागतिक दयेच्या विनंतीला धुकडावून फाशी दिली गेली होती आणि त्या टोळीकडून सूडाच्या कार्यवाहीचा धोका अद्याप होता. ऑगस्ट १९९८ मध्ये केनिया व टान्झानियात अमेरिकन वकिलातीत घडलेल्या दहशतवादात २२४ लोक ठार झाले होते. आणि तो खटला सुरु होता. ऑक्टोंबर २००० मध्ये अमेरिकन विमान (usscole) ची घटना घडली ज्यात १७ लोक मारले गेले होते आणि त्या खटल्याचीदेखील सुनावणी सुरु होती. त्याच वर्षी मार्चमध्ये सिनेटच्या इंटलिजन्स कमिशनने अपेक्षित दहशतवादाबद्दल खबरदार केले होते आणि हा अहवाल अलिकडेच प्रसिद्ध झाला होता. आताच तीन आठवडयापूर्वी सी.आय.ए. ने त्या दोन व्यक्तीची छायाचित्रसह माहिती प्रसिद्ध करुन लक्ष आकर्षित केले होते. ज्यांच्या बाबतीत शंका आहे की ते ११ सप्टेंबरच्या विमान अपहरणामध्ये सामील होते. ७ सप्टेंबरला आणखी एक आगाऊ सूचना प्राप्त झाली होती. अशा सर्व गोष्टी असतादेखील सर्व गुप्त व जमीनीवरील संस्थांचे अपयश खरा चितेचा क्षण आहे परंतु त्याचा कोणताही उल्लेख अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या निवेदनात नाही आणि प्रसारमाध्यमांच्या शाब्दिक युद्धातही नाही.

उसामा बिन लादेन

संपूर्ण शक्तीउसामा बिन लादेनवर लागली आहे जो १० वर्षापासून निर्वासित व भटके जीवन व्यतीत करीत आहे आणि ज्याच्यापाशी टेलीफोनही नाही आणि बाह्य जगताशी संपर्काचे कोणतेही साधन नाही. तो एका असा देशात आहे. ज्यावर अनेक वर्षापासून कडक नजर ठेवली जात आहे ज्याच्याजवळ आधुनिक तंत्रज्ञान नाही आणि दूतावास किवा प्रसारमाध्यमाच्या सवलतीही नाहीत. त्याच्याजवळ जागतिक प्रसारमाध्यमेच काय इंग्रजीत आपले म्हणणे पोचविण्याचे साधनदेखील नाहीत. त्याच्याविरुद्ध अनेक वर्षापासून निर्बंध लागली आहेत. दळणवळण व्यवस्था प्रभावहीन आहे आणि त्या देशाच्या बँका बाह्य जगताशी कोणताही आर्थिक व्यवहार करु शकत नाहीत, तरीदेखील अशीच खात्री दिली जात आहे की तो अफगाणिस्थानातील एका गुहेतून हे सर्व खेळ करीत आहे. उसामाच्या संपत्तीचादेखील मोठा गवगवा आहे. वास्तविकतः खरी गोष्ट अशी आहे की ज्या ३० कोटी डॉलर्सचा उल्लेख केला जात आहे (जरी गोष्ट खरी असली तरी खुद्द अमेरिकेच्या केवळ हेरगिरीच्या ७७ अब्ज डॉलर्स व संरक्षण अंदाजपत्रकाच्या ३५० अब्ज डॉलर्सच्या तुलनेत याची काय किमत आहे?) त्यांच्याबद्दल वास्तविकता अशी आहे की १२ वर्षापूर्वी उसामा बिन लादेनला त्याच्या वडिलाकडून वारसासंपत्ती म्हणून ३०० नव्हे तर आठ कोटी डॉलर्स मिळाले होते. त्यापैकी जी काही रक्कम त्याच्यापाशी उरली होती ती १९९६ मध्ये त्याचे सौदी नागरिकत्व संपुष्टात आल्यानंतर संपूर्ण जगात गोठवून टाकली होती. त्यानंतर तो भांडवलाची कसलीही गुंतवणूक करु शकत नाही की कोणत्याही बँकेत हिशेब ठेवू शकत नाही आणि कोणत्याही कारभारात व्यवहार्यतः सामील होणे शक्य नाही. प्रश्न असा आहे की जर काही कोटी डॉलर्स त्याच्याजवळ होते तरीसुद्धा त्यापासून काय आणि केव्हा केले जाऊ शकते? इकॉनॉमिस्टने आपल्या संपादकीय लेखात कबूल केले आहे की बिन लादेनच्या संपत्तीबाबत मोठी अतिशयोक्तीआहे (२२ सप्टेंबर पृष्ठ १७) इतकेच नव्हे तर वास्तविकता अशी आहे की बिन लादेन आणि त्याचे मित्र अत्यंत कठीण आर्थिक अडचणीत आहेत.

पूर्व आप्रिकेत बॉम्बस्फोट करणार्यांच्या खटल्यात एका अलीकडच्या ग्वाहीवरुन कोणत्याही परिस्थितीत एक शंका निर्माण होते. बिन लादेनच्या पूर्वीच्या मित्रांनी सांगितले आहे की ते संपत्तीच्या उणीवेला बळी पडले आहेत. त्यांनी सांगितले की त्यांचे लोक त्रस्त आहेत. आणि त्यांच्या दरम्यान निरंतर भांडणे होत असतात. त्यांच्या एका माजी अकाऊंटंटला, जो अमेरिकेचा सर्वात मोठा साक्षीदार आहे, जेव्हा कर्ज देण्यास नकार दिला गेला तेव्हा तो अलकायदा मधून बाहेर आला. (इकॉनॉमिस्ट, १५ सप्टेंबर २००१, पृष्ठ १९)

जर आर्थिक साधनांच्या बाबतीत वास्तविक गोष्टी अशा आहेत तर मग उसामाच्या विरुद्ध संपूर्ण मोहीम काल्पनिक गोष्टी नाहीत तर अन्य काय आहे? खुद्द अमेरिकन न्यायालयात दूतावासावरील हल्ल्यांचा जो खटला चालला आहे त्यात उसामाच्या विरुद्ध कोणतीही गोष्ट सिद्ध होऊ शकली नाही. इकॉनॉमिस्ट आपल्या या लेखात कबूल करतो की, ’’कोणत्याही परिस्थितीत सरकारी वकील हे सिद्ध करु शकले नाहीत की मिस्टर बिन लादेनने हल्ले करण्याची आज्ञा दिली.’’

हल्ले कोणी केले?

जर उसामा बिन लादेन आणि अफगाणिस्थानने अशा प्रकारची सुनियोजित, सर्वांगीण व उच्च कोटीच्या नियोजनाची कार्यवाही करणे शक्य नाही आणि याची अपेक्षा एखाद्या अन्य अरब संघटनेकडून ही केली जाऊ शकत नाही. (आणि बिन लादेनशिवाय एखाद्या दुसर्या गटाकडे अमेरिकन व पाश्चिमात्य प्रसारमाध्यमे आणि सरकारे कोणताही संकेतदेखील करीत नाहीत) तर मग प्रश्न असा उत्पन्न होतो की ही भयंकर कार्यवाही कोण करु शकतो? आम्ही केवळ ऐतिहासिक पुरावे आणि अलिकडच्या लक्षणांच्या आधारावर काही गृहीत धरलेल्या गोष्टीकडे लक्ष वेधणे आवश्यक समजतो.

पहिली शक्यता अशी आहे की ही कार्यवाही एखाद्या संघटित अमेरिकन गटाकडून केली गेली असावी जो समाजद्रोही आणि शासन व्यवस्थेची आज्ञा न मानणारा असावा. अलीकडच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आढळतात ज्या त्या भींतीना बळ देतात. देशात अपराधांची तर कधीच कमतरता नव्हती परंतु काही गत दिवसात शाळेतील मुलांना पद्धतशीरपणे ठार करण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत ज्यात कॅलिफोर्नियात एकाच हल्ल्यात शाळेच्या १२ विद्यार्थ्यांच्या खुनांच्या स्मृती ताज्या आहेत. टिमोथीमॅक्वीने ओक्काहामात २६८ लोकांना ठार केले आणि यापेक्षा अधिक लोकांना ठार करण्याची इच्छा न्यायालयात प्रकट केली. ही घटना टिमोथीला फाशी दिल्यानंतर दोन महिन्यांच्या आत घडलेली आहे आणि हा दहशतवाददेखील टिमोथीच्या टोळीचे कृत्य असू शकते. आणखी एक अमेरिकन अध्यक्ष बुश यांच्या टेक्सास राज्याची ’जॅको’ नामक संघटित टोळी आहे जिने एका संपूर्ण गावाला आग लाऊन नष्ट केले. डेव्हिड कोरीश आणि त्याच्या अनुयायांची टोळीदेखील बंडखोर टोळी आहे आणि त्यांच्याकडून विनाशकारी कृत्याची शक्यतादेखील असंभवनीय ठरविली जाऊ शकत नाही.
विचार करण्याचा एक पैलू असादेखील आहे की या प्रश्नाचा विचार केला जावा की या कार्यवाहीचा लाभ कुणाला होऊ शकतो? खुद्द अमेरिकेत अशी तत्त्वे आहेत की जे सरकारी संस्थावर आपली पकड मजबूत करु इच्छितात आणि विचार व कृती स्वातंत्र्यावर अनेक प्रकारचे निर्बंध लादले जाण्याचे इच्छुक आहेत. ते असे वातावरण निर्माण करु इच्छितात की लोकशाही स्वातंत्र्याला लगाम लावला जाऊ शकावा आणि त्या प्रभावी आणि स्वार्थी वर्गांची पकड देशावर मजबूत होऊ शकावी. अशा संस्थादेखील आहेत ज्या विशेष सरकारी साधनांची याचना करतात ज्यात सुरक्षा संस्थादेखील आहेत. देशाच्या युद्धविषयक उद्योगांच्या दबाव गटाचीदेखील एक भूमिका असू शकते.

या शंकेला त्या माहितीने बळ मिळते जी आता घटनेपूर्वी स्टॉक एक्सचेंजच्या असाधारण व्यवहारासंबंधी धक्का देणार्या आकडेवारीवरुन प्राप्त होत आहे. लंडनच्या दैनिक इंडिपेंडन्टच्या व्यापारविषयक वार्ताहराने बातमी दिली आहे की ६ सप्टेंबरला (हे लक्षात असावे की ८ आणि ९ सप्टेंबरला शनिवार व रविवारची सुट्टी होती) अमेरिकेच्या त्या दोन्ही विमान कंपनींच्या शेअर्सच्या (भाग भांडवल) विक्रीत असाधारण तेजी दिसून आली ज्यांची विमाने या दुर्घटनेसाठी वापरली गेली आहेत आणि ज्यांच्या शेअर्सची किमत दुर्घटनेनंतर एकदम ढासळली. त्यावेळी तर या गोष्टीकडे दुर्लक्ष केले गेले परंतु आता हा प्रश्न विचारला जात आहे की अखेर असे कां घडले? एका दिवसात युनायटेड एअरलाइन्सचे दोन हजार करार झाले जे यापूर्वीच्या एका दिवसाच्या व्यवहाराच्या सरासरीपेक्षा २८५ पट जादा होते. त्या दिवशी एका शेअरची किमत ३० डॉलर होती जी सदर घटनेनंतर ढासळून १८ डॉलर्स राहिली. अमेरिकन एअरलाईन्सच्या शेअर्सची विक्री सदर दुर्घटनेपूर्वी दोन-तीन दिवसांत सरासरी ६० पट अधिक होती. अशाच प्रकारे वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये काम करणार्या दोन महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय फायनान्शियल कंपन्या Margan Stanley DeeefCe Marsh Mc Lennan यांच्या शेअर्सची विक्री त्या वेळी सरासरीच्या तुलनेत २५ पट व १०० पट अधिक झाली होती. भांडवल गुंतवणुकीच्या कलाविषयक तज्ञ असलेल्या जोन नाजारियन यांनी या असाधारण सौद्याबद्दल अशा प्रकारे आश्चर्य प्रकट केले आहे.

जेव्हा आम्ही इतके असाधारण सौदे पाहतो तेव्हा आम्ही असे समजतो की कांही न कांही घडणार आहे. (इन्डिपेंडंट, २० सप्टेंबर २००१)

यावरुन अगदी स्पष्ट होते की काहींना हे माहीत होते की काही तरी घडणार आहे आणि त्यांनी याने कोटयवधी डॉलर्स कमविले. परंतु या भयंकर घटनेमुळे सर्वात जास्त लाभ इस्त्राईलला झाला ज्याने याचा प्रयोग पॅलेस्टिनींना अमेरिकेच्या दुःख व क्रोधाचे लक्ष्य बनविण्यासाठी, आपल्या पापांवर पांघरुण घालण्यासाठी आणि नाममात्र शांतीच्या प्रक्रियेला उधळून टाकण्यासाठी केला. दुर्घटनेनंतर अर्ध्या तासातच हेन्री किसिजरने उसामा बिन लादेनचे नाव घेतले आणि संपूर्ण नेटवर्कला समाप्त करण्याची भाषा वापरली. इस्त्राईलच्या प्रधानमंत्री शेरॉनने घटनेनंतर लगेच सांगितले की ’अरफातदेखील आमचा लादेन आहे.’ आणि अरफात यांच्याशी ठरलेली आपली भेट रद्द केली. इन्डिपेंडटचा वार्ताहर जेरुसलेमहून लिहितो,

’’अमेरिकेच्या या दुःखद घटनेचा पॅलेस्टिनशी असलेल्या आपल्या भांडणात राजनीतिक लाभ घेण्याचा इस्त्राईल प्रयत्न करीत आहे. शेरॉन आणि त्यांचे सहकारी अरफातची तुलना उसामा बिन लादेनशी करीत आहेत. अमेरिकी हल्ल्यांनी पॅलेस्टिनींना एकाकी पाडले आहे आणि पाश्चिमात्य देशांत त्यांच्याबद्दल असलेली उरली सुरली सहानुभूती संपुष्टात आणली आहे.’’ (१६ सप्टेंबर २००१)

हीदेखील आश्चर्याची गोष्ट आहे की इंटरनॅशनल हेरॉल्ड ट्रिब्यूनने वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यात ज्या ४६ देशांच्या नागरिकांच्या मृत्यूची बातमी दिली आहे त्यात इस्त्राईलचा एकदेखील नागरिक नाही. न्यूयॉर्कमध्ये मोठ्या संख्येत यहूदी (ज्यू) राहतात आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरबद्दल असे म्हटले जाते की यात चार हजारपेक्षा अधिक ज्यू काम करीत होते परंतु मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या बाबतीत जी माहिती अद्याप प्रसिद्ध झाली आहे त्यात एकाही ज्यूचा उल्लेख नाही. ५-६ ज्यू लोकांच्या अटकेची व चौकशीची एक बातमी प्रसिद्ध झाली होती परंतु ती बातमी ताबडतोब दाबून टाकली गेली. कॅनडाहून Stern Intel ची एक अशी बातमी आहे की अमेरिकेच्या सैनिक गुप्तहेर माध्यमानुसार त्यात इस्त्राईलच्या गुप्तहेर एजन्सी मोसादचा हात आहे. इराणचे नेते खामनाई यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे,

’’या गोष्टीचा पुरावा आहे की अमेरिकेतील मोठ्या शहरावर हल्ली झालेल्या हल्ल्यात ज्यू लोकांच्या जागतिक स्वदेश चळवळीचा सहभाग होता.’’ (तेहरान टाइम्स, १९ सप्टेंबर २००१)

जर इस्त्राईल व ज्यू लोकांच्या जागतिक स्वदेश चळवळीच्या इतिहासाचे अवलोकन केले तर मोसादच्या भूमिकेच्या शंकेला बळ मिळते. दुसर्या जागतिक युद्धात ज्यू लोकांच्या जागतिक स्वदेश चळवळीच्या दहशतवाद्यांनी खुद्द देश त्याग केलेल्या ज्यू लोकाने भरलेल्या एका जहाजाला अशासाठी बुडविले होते की ब्रिटीश सरकारने त्या अवैध ज्यूंना पॅलेस्टाइनमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली नव्हती. अशा प्रकारे त्यांनी जागतिक मत प्रभावित करण्यासाठी हे रक्तरंजित नाटक रचले होते. बैतुल मकदिसमधील प्रिन्स एडवर्ड हॉटेलच्या विनाशाची घटनादेखील याच शृंखलेची एक कडी आहे. १९६७ च्या युद्धापूर्वी खुद्द अमेरिकेच्या नौका दलाच्या एका USS Liberty नामक जहाजाला इस्त्राईलने मिसाईलचा मारा करुन बुडविले होते. ते अशासाठी की अमेरिकेने इस्त्राईलच्या इजिप्तवरील अकस्मात हल्ल्याच्या तयारीची पडताळणी केली होती. या पाश्र्वभूमीवर आणि या राजनीतिक लाभांचे महत्त्व जाणून की जे इस्त्राईल प्राप्त करीत आहे, आणि अरबांना संपूर्ण पाश्चिमात्य जगतात तिरस्कार व प्रतिशोधाचे लक्ष्य बनवीत आहे त्यावरुन या शंकेला भरपूर बळ प्राप्त होत आहे की या दुर्घटनेच्या पाठीमागे इस्त्राईलच्या गुप्त एजन्सीचा हात आहे जो अशा प्रकारच्या कृतीची योग्यता व नैपुण्य बाळगतो. असेच नाटक रशियात शेशानविरुद्ध अलिकडच्या कार्यवाहीपूर्वी मास्को आणि बिलगाडविन्सकमध्ये १३ सप्टेंबर १९९९ रोजी दोन आठ मजली इमारतीत बॉम्बच्या स्फोटाच्या रुपात केली गेली होती ज्यात ३०० लोक ठार झाले होते आणि ज्याला पाया बनवून शेशानवर नवीन हल्ला चढविला गेला होता.

इन्डिपेन्डन्टच्या स्तंभलेखक पॅट्रिक कुकबर्न न्यूयॉर्क व वॉशिग्टनच्या अलिकडील दहशतवादाच्या पाश्र्वभूमीत मास्कोहून या घटनेसंबंधी तेथील आम लोकांच्या मतांच्या अलिकडील भावनेला अशा प्रकारे व्यक्त करतो,

’’दहापैकी केवळ एकाचा असा विश्वास होता की हे कृत्य चेचनियाच्या एखाद्या व्यक्तीचे आहे. केवळ प्रारंभी आमची अशी कल्पना होती की हे चेचनियाच्या एखाद्या व्यक्तीने केले आहे. आता आम्हाला वाटते की क्रेमलिनच्या लोकांनी सत्तेत राहण्यासाठी हे कृत्य केले.

अशी आहेत मेकावली राजकारणाच्या घटनांच्या पद्धती. न्यूयॉर्क आणि वॉशिग्टनमध्ये जे काही घडले त्या रहस्यावरील पडदादेखील एकेदिवशी खुला होईल. परंतु सध्यादेखील अशी चिन्हे दिसत आहेत की ’कुणीतरी आहे या हिरव्या पडद्यात!’
ज्या लोकावर विमानांच्या अपहरणाचा आरोप आहे त्यांच्या बाबतीत ज्या परस्परविरोधी गोष्टी समोर येत आहेत त्या संपूर्ण मामल्याला शंकास्पद बनवीत आहेत. असे म्हटले जाते की ते अलकायदाचे मुजाहित होते आणि त्याचबरोबर त्यांचे मद्यपान, नाच रंग आणि गर्लप्रें*डसशी आमोदप्रमोदच्या कथा सांगितल्या जात आहेत. एकीकडे जिहाद (धर्मयुद्ध) व स्वर्गातील अप्सरांच्या गोष्टी आहेत आणि दुसरीकडे ही जीवनपद्धती! यांच्यात कसली समानता आहे? अगदी स्पष्ट आहे की या अशा प्रकारे अकलेचे तारे तोडण्यास जबाबदार असणार्यांना इस्लामी शिष्टाचार, जिहाद (धर्मयुद्ध) व शहादत (हौतात्म्य धर्मासाठी बलिदान) बद्दलचे काडीमात्र ज्ञान नाही. ज्या १९ लोकांची नावे आलेली आहेत त्यात कमीतकमी एकजण ख्रिश्चन आहे. काय तो ख्रिश्चनदेखील जिहाद व हौतात्म्याची इच्छा बाळगत होता? त्यांच्यापैकी कमीतकमी पाचजणांच्या बाबतीत तरी ही गोष्ट स्पष्टपणे समोर आली आहे की ते जिवंत आहेत. ते सौदी अरबस्थान व मोरोक्कोत आहेत आणि त्यांचा विमान अपहरणाशी अजिबात संबंध नाही. इतकेच नव्हे तर त्यांच्यापैकी तिघांनी तर जाहीर केले आहे की ते अमेरिकेच्या सर्वसाधारण प्रसिद्धी संस्थांविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा करतील. हे स्पष्ट आहे की जी नावे दिली जात आहेत ती खोटी आहेत आणि खर्या गुन्हेगारांचा कोणताही पत्ता नाही.

ही गोष्टदेखील विचारणीय आहे की ओक्काहामाच्या घटनेच्या वेळीसुद्धा अरब लोकावर आळ घेतला गेला होता आणि त्यांच्याविरुद्ध देशभर मोहीम सुरु झाली होती. सुदैवाने टिमोथी मॅक्वी पकडला गेला आणि असे कळले की हे सर्व काही एका अमेरिकन दहशतवाद्याचे कृत्य होते. खटल्याच्या दरम्यान ही सत्येदेखील उघडकीस आली की त्याच्या टोळीत ५०० पर्यंत लोक असावेत, परंतु टोळी इतकी शिस्तबद्ध होती की टिमोथीबरोबर ज्या दोघांना अटक झाली होती त्यांना टिमोथीने कसलीही हानी पोचू दिली नाही आणि सर्व पुरावे असूनदेखील त्यांना सोडून दिले गेले. न्यायाधीशा समोरील टिमोथीची जबानी अत्यंत महत्त्वाची आहे. त्याने केवळ त्या दहशतवादाची कबुलीच दिली असे नव्हे तर त्याने त्याला सत्याधिष्ठित ठरविले आणि स्पष्ट शब्दांत सांगितले की अमेरिकेला मी सावधान करु इच्छित होतो आणि जास्तीत जास्त लोकांना ठार करण्याचा माझा उद्देश होता. त्याने अखेरपर्यंत क्षमायाचना केली नाही तर आपल्या मृत्युसमयी त्याने जी कविता म्हटली त्यात आपल्या कामगिरीवर अभिमान प्रकट केले. टिमोथी एकटाच नाही तर त्याच्या टोळीत शेकडो लोक आहेत आणि त्याच्यासारख्या अनेक टोळ्या अमेरिकेत कार्यरत आहेत.

अकरा सप्टेंबरचा विध्वंस जितक्या सुनियोजित पद्धतीने, ज्या उच्चकोटीच्या कार्यक्षमतेने आणि जितक्या परस्पर सुसंवादाने केला गेला तो कोणाबाहेरच्या गटाचे कार्य असूच शकत नाही. हे तर तेव्हाच शक्य आहे जेव्हा अमेरिकेच्या अत्यंत प्रशिक्षित, सक्षम व संपूर्ण व्यवस्थेची रहस्ये जाणणारे त्यात सामील असावेत त्यांनी अरबांच्या नावांचा ढालीप्रमाणे प्रयोग केला आहे. आणि राज्यशासन व प्रसारमाध्यमे, उसामा व अफगाणिस्थानचा बळीच्या बकर्याप्रमाणे प्रयोग करुन आपल्या पराजयावर पांघरुण घालण्याचा आणि मूळ अपराध्यापर्यंत पोचण्याकडून डोळेझाक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे एक अपराधी कृत्य व इस्लामी जगताविरुद्ध उघड अत्याचार करण्याप्रमाणे आहे.

एक तात्विक समस्या अशी आहे की कोणत्याही अपराध्यावरील अपराध सिद्ध होण्यापूर्वी केवळ शंकेच्या आधारे कोणतीही कार्यवाही करणे स्पष्टपणे जुलुम व भांडणाचे मूळ होय. आज अमेरिका शक्तीच्या नशेत धुंद होऊन केवळ शंकेच्या आधारावर केवळ लोकच नव्हे तर जाती व देशाला नष्ट करण्याची, त्यांना पाषाण युगाकडे परत नेण्याची व नेस्तनाबूद करण्याची भाषा बोलत आहे आणि कायद्याच्या सत्तेची, जागतिक न्याय वसुद्धी आणि विवेकाची गोष्ट करणार्याला लाखोळ्या वाहून दूषणाचे लक्ष्य बनवीत आहे. हे निसर्गाच्या विरुद्ध आणि मानवतेने कदापि मान्य करण्याजोगे नाही, एका कवीने म्हटले आहे,

’’वही कातिल, वही शाहिद, वही मुनसिफ ठहरा।
अक्रबा मेरे करें खूनका दावा किसपर।।’’

अर्थात - तोच खुनी, तोच साक्षीदार आणि तोच न्यायाधीश असेल तर माझ्या संबंधियांनी कोणावर खुनाचा खटला भरावा?

दहशतवादाची कारणे

अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांच्या नेतृत्वाने या गोष्टीचादेखील विचार केला पाहिजे की ज्याला ते दहशतवाद म्हणत आहेत आणि ज्याचा नायनाट करण्यासाठी एकविसाव्या शतकाचे सर्वात लांब व सर्वव्यापी युद्धासाठी लंगोट बांधत आहेत त्याची वास्तविकता काय आहे आणि अशा प्रकारच्या समस्या व मामले कशा प्रकारे निकालात काढता येतील.

दहशतवादाचा जो पैलू असमर्थनीय व निदनीय आणि प्रतिकार करण्याजोगा आहे तो राजनीतिक व सत्याधिष्ठित उद्देशांच्या प्राप्तीसाठी अशा पद्धती व मार्ग अवलंबिणे होय, ज्याच्या परिणामस्वरुप निष्पाप लोकांचे जीव वाया जावेत. हा अक्षम्य गुन्हा आहे आणि यापासून लोकांना अलिप्त ठेवणे मानवतेची सेवा आणि खुद्द त्या अज्ञानी लोकासाठी शुभचितन आहे, जे समजून उमजून अथवा केवळ परिस्थितीच्या प्रवाहात अशा प्रकारचे अपराध करतात. परंतु जी गोष्ट विचारणीय आहे ती अशी की जर स्थितीत सुधारणा करण्याचे उचित व योग्य मार्ग बंद केले गेले, तर केवळ शक्तीव हट्टाग्रह, स्वार्थ, पक्षपात, गर्व, जडत्व व सैनिक श्रेष्ठत्व आणि प्रादेशिक अथवा जागतिक श्रेष्ठत्वाच्या दूषित उद्देशासाठी दुसर्या लोकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले गेले आणि स्थितीत सुधारणेच्या संभावनांना नाहीसे केले गेले तर त्याची स्वाभाविक प्रतिक्रिया दिसू लागते आणि तो योग्यबरोबरच अयोग्य मार्गांचादेखील अवलंब करतो. म्हणून इतिहासाचा धडा असा आहे की अत्याचार व अन्याय असता व त्यांच्या संरक्षणासह आणि त्या कारणांना दृष्टिआड करुन जे, लोक टोळ्या व जातींना हिसेवर आधारित संघर्षाच्या मार्गावर चालवतात, त्यांनी स्थितीत सुधारणा करणे शक्य नाही. अमेरिका व जागतिक भांडवलशाहीविरुद्ध जी घृणा व बेजारी आहे त्या जागतिक वास्तविकता आहेत आणि केवळ सैनिक कार्यवाहीचे दहशतवादाचा बीमोड होणे अशक्य आहे. ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य जॉर्ज गेलर यांनी पार्लमेंटमध्ये आपल्या भाषणात बरोबरच म्हटले होते की जर आपण एका बिन लादेनला ठार कराल तर एक हजार बिन लादेन जन्म घेतील.

खरा प्रश्न त्या कारणांचा शोध व त्यात सुधारणेचा आहे. ज्यांच्या परिणामस्वरुप जगातील बहुतेक प्रदेशात, ज्यात अमेरिका व युरोपचा समावेश आहे, विद्रोह व अस्वस्थतेच्या लाटा उसळत आहेत आणि अत्याचारपीडित लोक आपल्या जिवावर उदार होण्यास बाध्य होत आहेत. दहशतवादाच्या विरोधातील युद्ध बॉम्ब, मिसाईल व मानवी वस्त्यावर अग्नी वर्षाव केल्याने लढले जाऊ शकत नाही. हे युद्ध तर त्याच प्रकारचे युद्ध आहे जे दैन्यावस्था, आजार व अज्ञानासारख्या उपद्रवाविरुद्ध लढले जाते. हे क्रोध व शक्तीने नव्हे तर विवेक व युक्तीने लढले जाऊ शकते. मानवी समस्यांच्या सोडवणुकीचा मार्ग सोडून केवळ सैनिक शक्तीने माणसांचे दमन करण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला आहे तेव्हा तो असफल झाला आहे. हिसाचार वाढविण्याची आणि अत्याचारात वृद्धी करण्याची यापेक्षा अधिक प्रभावी कोणतीही अन्य पद्धत नाही की प्रतिशोधाच्या अग्नीडोंबात जळून सर्व साधारण चळवळींना शक्तीने तुडविण्याचा प्रयत्न केला जावा.

जागतिक वसाहतवादाने २०० वर्षापर्यंत ही लढाई लढली व अखेरीस स्वातंत्र्य चळवळीशी समेट करावा लागला आणि भूतकाळातील दहशतवादी आजचे राजकीय नेते व शासक बनले. अमेरिकेने याचा अनुभव व्हिएतनाम, चिली व कंबोडियामध्ये घेतला आहे. रशिया अफगाणिस्थानमध्ये हाच खेळ खेळला आणि तरीसुद्धा त्याने धडा घेतला नाही आणि आज शेशानमध्ये पुन्हा त्याच मूर्खपणा व अत्याचाराचा अवलंब करीत आहे. ब्रिटनने संपूर्ण जगात पराजय पत्करल्यावर अखेरीस उत्तरी आयर्लंडमध्ये २० वर्षापर्यंत युद्ध केल्यानंतर याचशीन फोनशी समझोता केला ज्याचे नाव घेण्याची, ज्याच्या नेतृत्वाचा आवाज आणि फोटोसुद्धा रेडिओ व टेलिव्हिजन वर ऐकण्याची अथवा पाहण्याची मनाई होती. इस्त्राईल पॅलेस्टाईनमध्ये हाच खेळ खेळत आहे. जगातील काही देश विभिन्न प्रदेशात राजनीतिक प्रश्नांची सोडवणूक सैन्याच्या सहाय्याने करण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत आहेत. समस्येच्या सोडवणुकीचा याशिवाय अन्य कोणताही मार्ग नाही की शांत मनाने सुख व मित्रत्वाला विसकटणार्या मंडळी व कारणाबद्दल विचार व्हावा आणि दहशतवादाकडे नेणार्या लोकापासून मुक्तीप्राप्त करावी.

आत्म परीक्षणाची गरज

पाश्चिमात्य देशातदेखील ज्यांची दृष्टी जीवनाच्या वास्तविकता व इतिहासाच्या संदेशावर आहे हे हीच गोष्ट सांगत आहेत. दैनिक इन्डिपेन्डन्टचा प्रसिद्ध राजकीय समीक्षक रॉबर्ट फिस्क अलिकडच्या दुर्घटनेवर मध्य-पूर्व आशियातील दुःखद दुरावस्थेच्या पाश्र्वभूमीवर जे विचार प्रकट करतो ते अमेरिकन नेतृत्वच नव्हे तर जगातील सर्व शासकांचे डोळे उघडणारे आहेत,
’’आता गोष्ट येथपर्यंत पोचली आहे. मध्य पूर्व आशियाचा संपूर्ण आधुनिक इतिहास, उस्मानिया राज्याचा र्हास, बिल्फोरची घोषणा, लॉरेन्स ऑफ अरेबिया (अरबस्थान) ची असत्य कथने, अरब विद्रोह, इस्त्राईल राज्याची स्थापना, अरब व इस्त्राईल दरम्यानची चार युद्धे आणि अरबांच्या मातृभूमीवरील इस्त्राईलच्या पाशवी कब्जाची ३४ वर्षे सर्व काही थोडयाच तासात नष्ट झाले की जेव्हा भरडले गेलेले आणि अपमानित केले गेलेल्या लोकांचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणार्यांनी अशा वचक बसविणार्या निर्दयता व चलाखीने प्रतिहल्ला चढविला जे तेच लोक करु शकतात ज्यांना निश्चितपणे विनाशाला तोंड द्यावे लागते. काय हा व्यवहार योग्य व नैतिक ठरु शकेल की त्याच्या बाबतीत इतक्या घाईने लिहिले जावे की जेव्हा कोणताही पुरावा नाही, साक्ष म्हणून साधीशी गोष्टसुद्धा नाही आणि हिसाचाराची अंतिम घटना जी ओक्काहामामध्ये घडली होती ती आपल्याच घरात पोसलेल्या अमेरिकनानी घडवून आणली होती? मला शंका आहे की असे (आतासुद्धा) आहे. अमेरिका युद्ध स्थितीत आहे आणि जर मी स्पष्टपणे चूक करीत नसेन तर मध्य-पूर्व आशियात कित्येक हजार अधिक लोक ठार केले जातील आणि कदाचित अमेरिकेतसुद्धा. आमच्यापैकी काही लोक ’येणार्या विनाशापासून’ खबरदार करीत राहिले परंतु आम्ही त्या भयानक स्वप्नाबाबत विचारही केला नव्हता. परंतु हे लोकशाही व दहशतवादाचे युद्ध नव्हे की ज्याची खात्री आगामी तासांत व दिवसांत जगाला दिली जावी. हे त्या अमेरिकन मिसाईलांच्या बाबतीतसुद्धा आहे जे पॅलेस्टिनी लोकांच्या घरावर आदळतात. त्या घटनांच्या बाबतीतसुद्धा आहे जेव्हा अमेरिकन हेलिकॉप्टरनी १९९६ मध्ये लेबॅनॉनच्या अॅम्ब्युलन्सवर मिसाईलने हल्ला केला होता आणि त्यानंतर काही दिवसांनी ’काना’ नामक गावात अमेरिकेने गोळे डागले होते. अमेरिकेची मित्रराष्ट्रे, इस्त्राईलने पदरी ठेवलेल्या लेबॅनॉनच्या सैन्याने निर्वासितांच्या वस्तीत रक्तपात, लुटालूट आणि बलात्काराचा धिगाणा घातला होता. यात काही शंका नाही की अमेरिकेत जे काही घडले आहे अवर्णनीय उपद्रव आहे. २० हजार ते ३५ हजार निष्पाप लोकांच्या हत्येच्या दुर्घटनेवर पॅलस्टिनींनी जो जल्लोष केला तो केवळ त्यांच्या निराशेचाच द्योतक आहे असे नव्हे तर राजनीतिक प्रौढत्वाचा अभावदेखील आहे, ते अशा साठी की ते आपल्या शत्रू इस्त्राईलवर अशाच प्रकारचे आरोप करीत असतात म्हणजे अप्रमाणबद्ध कार्यवाही परंतु आम्हाला खबरदार केले गेले होते. जोशपूर्ण भाषणांची अनेक वर्षे, अमेरिकेच्या हृदयावर हल्ले चढविण्याच्या प्रतिज्ञा, अमेरिकन सर्पाचे डोके ठेचण्याची घोषणा. आम्ही त्यांना पोकळ धमक्या समजत राहिलो.

पुरातनवादी, अप्रगत, अलोकशाही व भ्रष्टाचारी व लाचखोर प्रशासकांच्या टोळ्या आणि चिथावणी देणार्या लहानशा संघटना अशाच प्रकारची निराधार आश्वासने कशी पुरी करु शकतात! आता आम्हाला कळून चुकले आहे. कालच्या विध्वंस व विनाशाच्या काही तासानंतर मी अमेरिका व त्याच्या मित्र राष्ट्रावर होणार्या त्या मोठ्या व असाधारण हल्ल्यासंबंधी विचार करु लागलो जे कालच्या घटनेनंतर फारच सामान्य वाटू लागले. दि. २३ ऑक्टोंबर १९८३ ला आत्मघातकी बॉम्बस्फोट करणार्यांनी २४१ अमेरिकी नोकर आणि १०० छत्रीधारी सैनिकांना ठार केले होते. त्यावेळेपर्यंत अशा प्रकारच्या हल्ल्यांचे कोणतेही उदाहरण नव्हते. नौकादलावरील हल्ले आणि प्रेंच लोकांच्या विध्वंसादरम्यान सात सेकंदाचा उशीर झाला होता. त्यानंतर सौदी अरबस्थानमध्ये स्थापित अमेरिकन विमान तळावर हल्ले झाले होते आणि मागच्या वर्षी एडनमध्ये अमेरिकन जहाजाला बुडविण्याचा प्रयत्न जवळजवळ यशस्वी झाला होता. आम्ही मध्यपूर्वेची नवीन हत्यारे, निराश परंतु जिवावर उदार होणारे आत्मघातकी बॉम्ब स्फोट करणार्यांना ओळखण्यात पूर्णतः अपयशी ठरलो ज्याची बरोबरी अमेरिकन अथवा दुसरे युरोपियन करु शकत नाहीत. अरब म्हणतील की अमेरिकेची संपूर्ण शक्ती, संपत्ती व अभिमानदेखील आजपर्यंतच्या जगातील या सर्वात मोठ्या शक्तीचे या विनाशापासून संरक्षण करु शकले नाहीत.

आता आवश्यक व नैसर्गिकरीत्या अगदी अनैतिक पद्धतीचा अवलंब करीत मागील काळातील ऐतिहासिक चुका, अन्याय व रक्तपातावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला जाईल, जे कालच्या त्या दुर्घटनेच्या पाठीशी आहेत. आम्हाला सांगितले जाईल की हा बिनडोकपणाचा दहशतवाद आहे. बिनडोक ठरविणे अत्यावश्यक आहे. जर आम्ही ही वास्तविकता समजण्यास पात्र नसू की तीन महान धर्मांच्या भूमीत अमेरिकेबद्दल किती घृणा आहे तर बिनडोक म्हणणे आवश्यक आहे. एखाद्या अरबाला विचारा की २०-३० हजार निष्पाप लोकांच्या कत्तलीला तो कोणत्या दृष्टीने पाहतो? तो अरब पुरुष अथवा स्त्री सुसंस्कृत व समंजस नागरिकाप्रमाणे त्याला एक असह्य अपराध ठरवील, परंतु ते हे अवश्य जाणून घेऊ इच्छितात की अखेर आम्ही या शब्दांचा त्या वेळी कां प्रयोग केला नाही? जेव्हा निर्बंधामुळे ५ लक्ष बालके इराकमध्ये ठार झाले? जेव्हा लेबॅनॉनमध्ये १९८२ मध्ये इस्त्रालने सतरा हजार पाचशे नागरिकांना त्यांच्यावर हल्ला करुन ठार केले. आम्ही एका राष्ट्राला मध्य-पूर्वेत हा अधिकार का दिला की त्याने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावांना दृष्टिआड करावे आणि त्या सर्व देशावर निर्बंध घातली ज्यांनी त्याकडे कानाडोळा केला. आम्हाला हे पाहावे लागेल की गत सप्टेंबरमध्ये मध्य पूर्वेत ज्या ज्वाला भडकल्या त्याची कारणे कोणती होती? अरब प्रदेशावर इस्त्राईलचा अधिकार, पॅलेस्टिनी लोकांची त्या प्रदेशातून हकालपट्टी, इस्त्राईलचा अत्याचार, राज्याने पाडलेले मुडदे, त्या सर्व घटना लपविल्या पाहिजेत की एखादी घटनादेखील गत दिवसाच्या सामूहिक विनाशाला कारणीभूत ठरु शकते. इस्त्राईलवर कोणताही अपराध लादला जाऊ शकत नाही. आम्ही खात्री करु शकतो की सद्दाम हुसेनसारखे मूर्ख हुकूमशहा याचा दावा करु शकतील. परंतु इतिहासाने दुष्परिणाम आणि त्यातील आमची भूमिका, आरोपी व साक्षीदारासाठी तयार केलेल्या लाकडी चौकात आत्मघाती मानवी बॉम्बच्या खांद्याला खांदा लावून उभे केले जावे. आमचे आपल्या वचनापासून पराङमुख होणे, येथपावेतो की उस्मानी राज्याचा विनाश, या दुर्घटनेस कारणीभूत ठरले. इस्त्राईलचा युद्धखर्च इतक्या दीर्घकाळापासून अमेरिकेकडून दिला जात आहे त्याला तो फुकटच समजतो. भविष्यात हा क्रम चालणार नाही. हे पाऊल असामान्य धैर्य आणि विवेकाचे तेव्हा द्योतक ठरेल जेव्हा अमेरिका क्षणभर थांबून जगातील आपल्या भूमिकेचा, अरबांना होणार्या त्रासाकडील अमेरिकन शासनाची डोळेझाक आणि आपल्या वर्तमान अध्यक्षाच्या अकार्यक्षमतेचा विचार करील.
निस्संशय अमेरिकेची अशी इच्छा आहे की त्याने ’जागतिक दहशतवादा’विरुद्ध उत्तरादाखल कार्यवाही करावी, त्यांच्यावर कोण आरोप लावू शकतो? ’दहशतवादा’च्या भडकाविणार्या आणि कधी-कधी वंशवादाच्या शब्दाच्या प्रयोगासाठी कोण आहे जो अमेरिकेला दोषी ठरवील? असे लोक भेटतील जे त्या प्रत्येक योजनेला रद्द करतील ज्यात विश्वव्यापी प्रमाणावर होणार्या त्या दहशतवादाच्या कृतींच्या वास्तविक ऐतिहासिक कारणांचा शोध करण्यावर भर देतील. परंतु जर आम्ही असे केले नाही तर आम्ही अशा भयंकर संघर्षाला बळी पडू जसा आम्ही हिटलरच्या मृत्यूनंतर आणि जपानच्या पराभवानंतर पाहिला नाही. त्याच्या तुलनेत कोरिया व व्हिएतनामचे महत्त्व उरले नाही.

आठ वर्षापूर्वी मी टेलिव्हिजनवर एक क्रमवार कार्यक्रम केला होता आणि असे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला होता की मुस्लिमांची एवढी मोठी संख्या पाश्चिमात्य देशांचा इतका तिरस्कार का करते? गत रात्री मला त्या मुस्लिमांचे स्मरण आले ज्यांच्या स्थितीची नोंद केली गेली होती ज्यांची घरे अमेरिकेने बनविलेल्या बॉम्ब व शस्त्रांनी नष्ट झाले होते. ते म्हणत होते की अल्लाह शिवाय कोणीही आमच्या मदतीस येणार नाही. धर्म तंत्रविज्ञानासमोर आहे. आत्मघातकी मानव बॉम्ब अणुशक्तीशी दोन हात करण्यास तयार आहेत.

वॉशिग्टन पोस्टमध्ये एका अमेरिकन प्राध्यापक रॉबर्ट जी केवियाननेदेखील स्पष्टपणे आत्मपरीक्षणाचे आवाहन केले आहे. ही समीक्षा जी साप्ताहिक गार्डियनने (२०-२६ सप्टेंबर २००१, पृष्ठ ३०) आपल्या अगदी ताज्या प्रकाशनात प्रकाशित केली आहे ती सर्वांसाठी विचारणीय आहे.

आमच्या राजकीय नेत्यापैकी कोणीही त्या महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा केलेली नाही जे आमच्या नवीन परिस्थितीमुळे उभे राहिलेले आहेत. देश आपल्या सुस्थितीत मग्न व समाधानी आहे. बाह्य जगातून किवा अन्य कोठून येणार्या दुःखद बातम्यांकडे आम्ही कानाडोळा करीत राहिलो. परंतु आमच्या सामर्थ्याची मर्यादा व पात्रता काय आहे? याचे ज्ञान आम्हाला गत सप्ताहात खूप त्रास घेऊन झाले. आम्ही जगाची मार्गदर्शक जागतिक शक्तीआहोत परंतु आम्ही फारच थोडे मार्गदर्शन जगाला करतो. जेव्हा आम्ही करतो तेव्हा युद्ध स्थिती असते, जसे आखातातील युद्ध अथवा कोसोवातील युद्ध अलिकडच्या इतिहासात कोणता असा जटील प्रश्न आहे जो अमेरिकेच्या पुढाकाराने सुटला आहे? जगातील अत्यंत गरीब लोकांच्या सहाय्यासाठी आम्ही दुसर्या औद्योगिक देशांच्या तुलनेत प्रत्येक माणशी फार कमी दान देतो. कित्येक असे प्रश्न आहेत ज्यांच्याबद्दल दुसरे लोक असे समजतात की सामूहिक पाऊले आवश्यक आहेत आम्ही वेगळे उभे राहतो उदारहणार्थ, दारुच्या सुरुंगावर बंदी व अणुचाचण्यापासून वातावरणात ग्रीन हाऊस वायु सोडण्यापर्यंत.

मोठ्या शक्तींनी ज्या सामाजिक वातावरणात त्या कार्य करतात याचीदेखील काळजी वाहिली पाहिजे. एक शत्रू सामाजिक वातावरण एका साधनसंपन्न शत्रूप्रमाणे एखाद्या मोठ्या शक्तीच्या खालून प्रभावीपणे जमीन सरकवू शकतो. अमेरिकनांना हे समजून घेतले पाहिजे की त्यांच्यासाठी वातावरण बिघडत चालले आहे. उदाहरणार्थ, आम्हाला वाटते की गरीबीमुळे उद्भवणारे रोग जे जवळ जवळ नष्ट झाले होते, उदाहरणार्थ, क्षयरोग खुद्द आमच्या देशात सूड म्हणून पुन्हा हल्ला चढवीत आहे. एड्सदेखील एका संकटाचे चिन्ह होय. आम्हाला हेदेखील माहीत आहे की जगातील वंचित लोक संपन्न देशात संपत्ती कमविण्यासाठी अवैध रीतीने प्रवेश मिळविण्यासाठी कसल्या कसल्या धोक्यांना तोंड देतात. आम्हाला कल्पना आहे की मादक पदार्थांच्या व्यापाराला आळा घालण्यासाठी आम्ही जे जे प्रतिबंध लावले त्यांच्यावर मात केली गेली.

नव्या जागतिक व्यवस्थेचा एक पैलू अंतर समाप्त होणे होय. आता जगातील कोणतेही स्थळ लांब राहिलेले नाही. जगातील गावामधील गरीबांना कल्पना आहे की ते किती गरीब आहेत आणि श्रीमंत किती सुस्थितीत आहेत. साधने बाळगणारे गरीब आपल्या स्थितीला शांतपणे स्वीकारीत नाहीत. तर त्यात परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यापैकी लक्षावधी लोकांनी या उद्देशांच्या प्राप्तीसाठी अमेरिकेत प्रवेश केला आहे. जसे की मागील आठवड्यातील हल्लेखोर. निश्चितपणे हे एका वेगळ्या टोळीशी संबंधित आहेत, असले अत्याचारपीडित जे आपल्यावरील अत्याचाराला पचविण्यास नकार देत आहेत. (सा.गार्डियन, २०-२६ सप्टें.२००१)

हे दोन दीर्घ उतारे खुद्द पाश्चिमात्य जगतातील चितनशील व समंजस तत्त्वांच्या चितनाला प्रतिबिबित करतात.

वास्तविकता मान्य करण्याची आवश्यकता

अमेरिकन व युरोपीय नेतृत्व जोपर्यंत निम्नलिखित वास्तविकता मान्य करीत नाही तोपर्यंत उपद्रव व विनाशापासून वाचण्याचा अन्य कोणताही मार्ग नाही.

 1. दहशतवाद केवळ एक चिन्ह व अभिव्यक्तीआहे. जोपर्यंत त्याच्या कारणापर्यंत आम्ही पोचत नाही आणि त्या कर्त्यांचे निवारण केले जात नाही जे त्याकडे नेतात तोपर्यंत परिस्थितीत सुधारणा होऊ शकत नाही.

 2. दहशतवाद केवळ एक जागा व एका घटनेचा अर्थ नव्हे. अत्याचार मग तो कोठेही असो मानवतेसाठी एक धोका आहे. केवळ न्यूयॉर्क व वॉशिग्टनमध्येच अत्याचार पिडितांचे रक्त सांडले गेले नाही तर रक्त संपूर्ण जगात वाहत आहे आणि याबाबतीत माणसा-माणसांच्या दरम्यान भेदभाव व फरक करणे खुद्द दहशतवादाच्या वाढीचे एक कारण होय.

 3. दहशतवाद हा आपल्या प्रत्येक रुपात निदनीय आहे. त्याचा अवलंब करणारे मग लोक असोत किवा टोळी अथवा शासन असो.

 4. महाशक्तींची व शासकांची जबाबदारी सर्वात जास्त आहे. ते दहशतवादाला बळी पडलेले नव्हेत तर ते मुळात त्याचा अवलंब करणारे आहेत. जोपर्यंत ते आपले वर्तन व धोरण बदलत नाहीत तोपर्यंत परिस्थितीत सुधारणा होणे शक्य नाही.

 5. हिसाचाराचे उत्तर हिसाचार नव्हे आणि प्रमाणाची जागा वक्तृत्व घेऊ शकत नाही. सुधारणेचा मार्ग कठीणही आहे आणि जीव घटविणारासुद्धा. परंतु याशिवाय अन्य कोणताही मार्ग नाही.

 6. परिस्थितीत सुधारणा आणण्यासाठी सर्वांनी तत्पर झाले पाहिजे. ते ही जे सत्ताधारी आहेत आणि शक्तीशाली व वैभवशाली आहेत आणि तेदेखील जे अत्याचारपीडित विवश आणि अधीन आहेत परंतु आपल्या अधिकारांच्या प्राप्तीसाठी छातीचा कोट करण्यास तत्पर आहेत. पण सुधारणाशासक तत्त्वे व महाशक्तीवर अधिक अवलंबून आहे. त्यांना हे कळले पाहिजे,

’’जिनके रुतबे हैं सिवा उनकी सिवा मुश्किल है’’
अर्थात - ज्यांची प्रतिष्ठा मोठी आहे त्यांच्या अडचणीदेखील मोठ्या असतात.

संबंधित लेख

 • अमेरिकन दहशतवाद व पाशवी सूड

  वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या घटनेनंतर तीन चार आठवड्याच्या सर्वसंमत तयारीनंतर अखेर अमेरिकन संयुक्त संस्थानांनी अफगाणिस्थानवर हल्ला चढविला. या युद्धाचे वैशिष्ट्य असे आहे की ही दोन तुल्यबळ शक्तींदरम्यानची युद्ध मोहीम नाही, तर जगातील सर्वांत बलाढ्य शक्तीचे जगाच्या सर्वांत निर्बळ आणि दारिद्र्यग्रस्त देशाविरुद्ध हे युद्ध आहे. इंग्लंडच्या पार्लमेंटमधील एक लेबर सदस्य एम्. पी. जॉर्ज गॅलोवे यांनी या युद्धाचे उदाहरण असे दिले आहे, ’’जणू माइक टायसन एका पाच वर्षाच्या मुलाविरुद्ध मैदानात उतरला आहे.’
 • कुरआन : एक स्वप्रमाणित ईश्वरी ग्रंथ

  कुरआन एक असामान्य ग्रंथ आहे. त्याचे वाचन करताना स्पष्टपणे जाणवते की त्याचा लेखक एका अशा उच्च स्थानाहून बोलत आहे, जे कोणत्याही मनुष्यास प्राप्त नाही. त्याची लेखन शैली, भाषाशैली, निवेदन शैलीचा प्रवाह आणि त्याची निर्णायक मर्मभेदक वर्णनशैली, मानवी भाषाशैलीपेक्षा अगदी भिन्न व आर्श्चयजनक आहे. यावरून ही मानवी वाणी नव्हे तर सृष्टीच्या स्वामीची वाणी असल्याचे प्रकर्षाने जाणवते. हा ईश्वरी ग्रंथ आहे ज्यामध्ये ईश्वर आपल्या दासांना संबोधित असल्याचे, त्याची परिपूर्ण विश्वासाने ओतप्रोत श्रेष्ठ वाणी साक्ष देत आहे.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]