Islam Darshan

अमेरिकेची भयंकर दुर्घटना - कोण जबाबदार?

Published : Sunday, Mar 06, 2016

वर्ल्ड ट्रेड सेंटर व पेन्टॅगॉनचा विध्वंस आणि पाशविकता व निष्ठुरपणाच्या या कृतीची जितकी निदा केली जाईल तितकी ती थोडीच आहे. मानवी स्वभाव याचा तिरस्कार करतो. इस्लामची नैतिक मूल्ये आणि मुस्लिमांचा सदाचारी स्वभाव अशा प्रकारच्या सर्रास कत्तलीचा तीव्र निषेध करतो. निष्पाप लोकांचे जीव घेणे आणि तेही अशा प्रकारे की त्यांच्या शरीराच्या चिध्या उडाव्यात किवा त्यांना आगीत फेकून देणे की त्यानी मृत्यूच्या कुशीत हुंदके देऊन-देऊन मरुन जावे हे दयाळू धर्माच्या स्वभावाविरुद्ध आहे. म्हणूनच मानवाच्या शरीराच्या नाक-कानसारख्या अवयवांना कापण्याची प्रेषितांनी मनाई कली आहे. या शिकवणीच्या फलस्वरुप मुस्लिमांची ही प्रतिक्रिया स्वाभाविक आहे की त्यांनी दहशतवादाला बळी पडलेल्या लोकांच्या दुःखात सामील व्हावे.

या मोठ्या दुर्घटनेमुळे दुःख व क्रोधाबरोबर अविश्वासाची प्रतिक्रियादेखील समोर आली आहे. अमेरिकेच्या सर्वसामान्य लोकांच्या मूळ मानसिकतेत हा समज खोलवर रुजलेला होता की त्यांचा देश एक सुरक्षित किल्ला आहे. जेथपर्यंत पोचणारे लांब हात अद्याप अस्तित्वात आले नाहीत. शास्त्रज्ञ व कुशल तंत्रज्ञांना आपल्या न ओलांडता येण्याजोग्या उंचीवर असाधारण विश्वास होता. सरकारला आपल्या आण्विक हत्यारे, आपल्या गुप्तहेर खात्याची विश्वव्यापी पोच आणि आश्चर्यकारक आर्थिक दृढता आणि आपल्या सतर्क वार्ता देणार्या व निरीक्षक शक्तीवर इतका विश्वास होता की ते संपूर्ण जगाला आपल्या अधीन समजत होते. या सर्व कारणामुळे वर्तमानकाळातील अमेरिकन मनुष्याला या गोष्टीवर विश्वास करण्यासाठी वेळ लागला की न्यूयॉर्क व वॉशिग्टनच्या दुर्घटना चित्रपट नव्हेत तर वास्तविकता आहेत. परंतु या घटनेने सिद्ध केले की जगातील मोठ्यात मोठी शक्तीदेखील अजिक्य नाही. मानवी निश्चय व धैर्य जगाच्या सर्वात मोठ्या शक्तीला असले दुःख पोचवू शकतात जो त्याच्या गर्वाच्या मनोर्यात भेग पाडू शकतात. त्याच्या विश्वासाचा चक्काचूर करु शकतात. वर्तमान संस्कृतीची सर्वात विनाशकारी घोडचूक अशी आहे की तिने माणसाच्या नावावर माणसाकडे कानाडोळा करुन यंत्र व साधनांना केंद्रीय महत्त्व दिले आहे. वस्तुस्थिती अशी आहे की दोन पायावर चालणार्या मनुष्याला महान अल्लाहने ती बुद्धी दिली आहे जी सुपर कॉम्प्युटरलादेखील लज्जित होण्यास भाग पाडू शकेल. त्याच्या छातीत तो हृदय ठेवला आहे. जो पर्वत व खडकाला टक्कर देऊ शकतो. त्याने इच्छिले तर दुष्टतेचा असा नरक बनू शकतो ज्यात तंत्रज्ञानाची उत्तम कृती वितळून अशा प्रकारे पडू शकते जसे की न्यूयॉर्कमध्ये घडले आणि जर त्याने इच्छिले तर पुण्यकर्म व कृपेच्या उच्चतम शिखरावर पोचू शकतो. जेथे लेजरकिरणदेखील प्रवेश करु शकत नाहीत. जो साधारण चाकूने रडार व ट्रान्स्पॉन्डरच्या डोळ्यातदेखील धूळ टाकू शकतो. म्हणून कोणत्याही समाजाला न्याय व कृपेपर्यंत पोचविण्यासाठी यंत्राची नव्हे तर मानवाच्या सुधारणेची गरज आहे. पाश्चिमात्य संस्कृतीने या वास्तविकतेकडे कानाडोळा केला आहे. यापूर्वी प्रत्येक जडवादी संस्कृतीने हीच कार्यपद्धती अवलंबिली होती आणि त्याचे भयंकर परिणाम भोगत होते आणि आजसुद्धा भोगत आहेत. महान अल्लाहने या वास्तविकतेकडे इशारा केला आहे,

’’आम्ही मानवाला उत्तम पद्धतीने निर्माण केले आणि मग त्याला सर्वात वाईट बनविले.’’ (सूरतुत्तीन - ४, ५)

मग आपल्या सर्व निर्मितीमध्ये मानवाला उत्तम म्हटले आहे,
’’आणि आदम पुत्रांना आम्ही आपल्या बर्याचशा निर्मितीवर प्रतिष्ठा आणि श्रेष्ठत्व प्रदान केले.’’ (सूरतुल बनी इस्राईल असराअ-७०)

या श्रेष्ठत्वाचे सर्वात मोठे उदाहरण असे आहे,
’’त्यानंतर अल्लाहने आदमला सर्व वस्तूंची नावे शिकविली.’’ (सूरतुल बकरह ३१)

महान अल्लाहने आदम यांना वस्तूंची वैशिष्ट्ये सांगितली. अशा प्रकारे आदमला ज्ञानाची संपत्ती प्रदान केली. परंतु त्याने मानवाला ईशसंदेश उतरण्याची जागा ठरविले. ती ठेव धारण करणारा ठरविले ज्यावर महान अल्लाहच्या बक्षिसांची पूर्णता होते.
’’आम्ही त्या ठेवीला आकाश व पृथ्वी आणि पर्वतासमोर प्रस्तुत केले तेव्हा ते त्याला उचलण्यास तयार झाले नाहीत आणि त्याला भ्याले परंतु मानवाने ते उचलले.’’ (सूरतुलअहजाब-७२)

जेव्हा जेव्हा जगाने या वास्तविकतेची उपेक्षा केली आहे तेव्हा ते उपद्रवाने भरले आहे. वर्तमानकाळातील माणसानेदेखील अशीच चूक केली आहे. परंतु त्यांच्या असंमजपणाची पद्धती निराळी आहे. त्याने दोन परस्परविरोधी पद्धतींचा अवलंब केला आहे. एकीकडे त्याने जड साधने व शास्त्र आणि तंत्रज्ञानाला मानवाचा सेवक गृहित धरले. परंतु दुसरीकडे या सेवकावर आपली दृष्टी अशा प्रकारे केंद्रित केली की तो त्यांना आपल्या सर्व आजारांचा उपाय समजू लागला. त्यांच्या प्रगतीवर आपली खुशाली व त्यांच्यातील सुधारणा व अधिक चांगलेपणावर आपल्या जीवनाची सुधारणा व अधिक चांगलेपणा अवलंबून आहे असे समजू लागला. मग हळूहळू अशी पाळी आली की तो आपल्या यंत्रांच्या किल्ल्यात स्वतःला सुरक्षित समजू लागला.

याच मानव विस्मरणाचे विनाशकारी परिणाम आज जग भोगत आहे. मानवाच्या विरुद्ध यंत्र व तंत्रज्ञान. सर्व तुच्छ आहेत. जगातील सुपर पॉवर (महाशक्ती)देखील मानवासाठी अजिक्य असू शकत नाही. या असाधारण घमेंड व अभिमानाचे फळ असेदेखील आहे की अमेरिकामधील सामान्य व विशेष लोक दोघे ही हे विसरुन गेले आहेत. बहुतेक वेळा उपद्रव बाहेरुन येत नाही तर आतूनदेखील उसळतो. बाहेरुन सुंदर दिसणे या गोष्टीचे प्रमाण नव्हे की त्यात किती तिरस्करणीय उत्तेजना पल्लवित व पोषित होत आहेत.

या घटनेमुळे जेथे दुःख व शोकाचे मेघ आच्छादिलेले आहेत तेथे क्षोभ, क्रोध आणि सूड भावनादेखील उसळून आली आहे. दहशतवादाविरुद्ध संपूर्ण जगाला युद्ध पुकारण्याचे आवाहन केले गेले. परंतु या दुर्घटनेला कारणीभूत असलेल्या अपराध्याचा शोध करण्याची गरज वाटली नाही. त्याला कारण असे की ते सर्व इस्लामी दहशतवादी होते ज्यांचा पुढारी उसामा बिन लादेन आहे. दुर्घटनेच्या पहिल्या दिवशीच एका प्रसिद्ध काँग्रेसमनने (अमेरिकन पार्लमेंटचा सदस्य) इस्लामी दहशतवादावर आपला राग काढला. त्यानंतर लगेच अमेरिकेच्या केंद्रीय चौकशी ब्युरोच्या अनेक अधिकार्यांनी उघडउघड अशी घोषणा केली की त्यांच्यापाशी अनेक असे पुरावे आहेत की या घटनांच्या पाठीमागे उसामा बिन लादेनचा हात आहे. त्यानंतर जणू इस्लामी दहशतवादाच्या आरोपाचा पूरच आला. अमेरिकन टी.व्ही. चॅनल सी.एन.एन.ने असा अनर्थ केला की यरुशलमच्या पॅलेस्टिनी प्रदेशात या दुःखपूर्ण घटनेवर आनंद साजरा करताना दाखविले आहे. या दरम्यान उसामा बिन लादेनचा फोटो दाखविला गेला आणि त्यांचे हे निवेदन प्रसृत केले गेले की ’जरी माझा या घटनेत हात नाही तरी मला यावर प्रसन्नता वाटते.’ ते छायाचित्र दाखवितांना हा विचारदेखील आला नाही की त्यांच्याच प्रसारमाध्यमाद्वारे ही गोष्ट वारंवार प्रसृत केली जात होती की उसामा बिन लादेनचा गुप्त ठावठिकाणा कोणालाही माहीत नाही. (जर माहीत असते तर त्या दहशतवाद्याला त्यांनी केव्हांच पकडले असते) खरे आहे की खोटे बोलणार्याला स्मरणशक्तीअसत नाही. नंतर सेक्रेटरी ऑफ स्टेट (परराष्ट्र मंत्री) जनरल कॉलिन पॉवेल यांनी जाहीरपणे ही घोषणा केली की या घटनांचा सर्वात अधिक संशयित अपराधी उसामा बिन लादेन आहे. त्यानंतर अशी घोषणा केली गेली की केवळ अपराधीच नव्हे तर त्या अपराध्यांना आश्रय देणारे देशदेखील अमेरिकेच्या सैनिक कार्यवाहीचे लक्ष्य बनतील. अमेरिकेच्या अध्यक्षांनी मध्य-पूर्वेतील पंधरा देशदूतांना बोलावून असे म्हटले की तुमच्यापाशी केवळ एकच उपाय आहे की तुम्ही दहशतवादाच्या जागतिक युद्धात एक तर अमेरिकेला साथ द्यावी अथवा त्याच्या क्रोध व प्रकोपाचे लक्ष्य बनण्यास तयार व्हावे. अध्यक्ष बुश यांनी पुन्हा पुन्हा याची पुनरावृत्ती केली आहे की हे युद्ध आहे. युद्ध सदाचाराचे दुराचाराविरुद्ध! संस्कृतीचे रानटीपणाविरुद्ध! आणि संपूर्ण जगाला याविरुद्ध एकत्रितपणे युद्ध करावे लागेल. दहशतवादाविरुद्ध युद्ध करण्यासाठी संपूर्ण जगाला आवाहन केले गेले आहे आणि निरंतर ही घोषणा केली जात आहे की हे युद्ध दीर्घकालीन, सर्वव्यापी आणि सहनशक्तीचे परीक्षण असेल येथपावेतो की दहशतवादाचा अंत व्हावा.

उसामा बिन लादेनला सर्वात मोठा अपराधी ठरविण्याबरोबरच अमेरिकेच्या केंद्रीय गुप्तहेर ब्यूरो एफ.बी.आय.ची विभिन्न माध्यमे आपला दावा दृढ करण्यासाठी अशी सूचनादेखील देत राहिली आहेत की त्याने एक आंतरराष्ट्रीय नेटवर्क अलकायदाच्या नावाने बनवून ठेवला आहे जो जरी विभिन्न देशात कार्यरत आहे परंतु रिवाजाच्या दृष्टीने सुनियोजित म्हटले जाऊ शकत नाही. त्याच्या कार्यरत दहशतवाद्यानी जर्मनी, इंग्लंड, इराण, पाकिस्तान व इराकमध्ये आपली केंद्रे स्थापित केली आहेत.

त्यांच्या काही लोकांनी फ्लोरिडामधील काही शाळामध्ये विमान चालकाचे प्रशिक्षण घेतले होते. त्याचबरोबर अशीदेखील सूचना दिली जात राहिलेली आहे की सुमारे १५, १८ किवा १९ असे नवतरुण पकडले गेले आहेत ज्यांनी या घटनेत सामील असलेल्या लोकांना मदत केली होती. प्रारंभी या कार्यवाहीच्या दरम्यान अशी सूचनादेखील कधी उघडपणे आणि कधी लिखित रुपात दिली जात राहिली आहे की दहशतवाद वास्तविकतः इस्लामी जिहादच्या कल्पनेचा परिपाक आहे. ज्याचे लक्ष्य केवळ अमेरिकाच नव्हे तर लोकशाही, सुसंस्कृत समाज, विचार व मत प्रदर्शन आणि पारदर्शिता आहे. म्हणून हे युद्ध इस्लाम व पाश्चिमात्य संस्कृतीचा तो संघर्ष आहे ज्याची बातमी हंटिग्टनसारख्या लेखकांनी आपल्या ‘‘संस्कृती-संघर्ष’’मध्ये दिली होती. आणि असेही सांगितले होते की इस्लामी दहशतवाद संपूर्ण जगासाठी मोठा धोका आहे. अध्यक्ष बुश यांनी दहशतवादाविरुद्ध जागतिक युद्धाला ख्रिश्चन धर्मयुद्ध संबोधिले आहे.

दहशतवादाच्या या दुःखद घटना आणि त्याने उत्पन्न होणार्या प्रसारमाध्यमाचे वादळ व अमेरिकन अधिकार्यांच्या प्रारंभिक निवेदनाच्या दरम्यान काही अत्यंत महत्त्वाच्या आणि दूरवर परिणाम करणार्या पैलूंकडे दुर्लक्ष केले गेले आहे. एक असे की दहशतवाद केवळ दहशतवाद आहे, त्याचा कोणताही धर्म असत नाही आणि तत्त्वही असत नाही. अमेरिकन दुर्घटनेला या पाश्र्वभूमीत असे प्रस्तुत करणे की जणू हा इस्लाम व पाश्चिमात्य संस्कृती दरम्यानचा संघर्ष आहे, एक तिरस्करणीय दुर्भावना तर असू शकते परंतु सत्य नव्हे! त्याचे प्रथम कारण तर असे आहे की इस्लाम धर्म आपली उद्दिष्टे, प्रतिष्ठा, कार्यपद्धती आणि आपल्या शेकडो वर्षांच्या प्रकाशात, कधीही आम कत्तलीचा समर्थक राहिला नाही आणि त्याने कधीही याची अंमलबजावणी केली नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की अफगाणिस्थान बिन लादेन आणि सद्दाम हुसेन हे इस्लाम आणि इस्लामी जमातीचे प्रतिनिधीही नाहीत. अमेरिका, ब्रिटन आणि प्रान्स हे ख्रिश्चन धर्माचे प्रतिनिधी नाहीत. यांची उद्दिष्टे आणि निकडी राजनीतिक आहेत. ही गोष्ट वेगळी आहे की हे दोघे गरजेच्या वेळी आपापल्या धर्माचे नाव आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी वापरतात. जेव्हा सद्दाम हुसेन आपल्या युद्दाला कादसियाचे युद्ध ठरवितात तेव्हा त्याचा हेतु सर्वसामान्यांना मूर्ख बनविण्याचा असतो. त्याचप्रमाणे जर आज अमेरिकेतील लोक चर्चमध्ये जातात व अध्यक्ष बुश अशी प्रार्थना करतात की ईश्वराने अमेरिकेवर आपली कृपा करावी आणि भविष्यातसुद्धा करीत रहावे. किवा अशी घोषणा करतात की ‘‘हे एक धर्मयुद्ध आहे’’. तेव्हा त्यांचा हेतु असा नसतो की ते ख्रिश्चन धर्माचे प्रतिनिधी म्हणून उभे राहत आहेत. तिसरे कारण असे आहे की दहशतवादी प्रत्येक राष्ट्रातील व प्रत्येक धर्माचे लोक असू शकतात, आणि आहेत. ख्रिश्चन धर्माचे अनुयायीदेखील कित्येक असे आहेत जे आपली लबाडी व दहशतवादाची कामगिरी बजावीत राहिले आहेत आणि आजदेखील त्या कारवाईत निमग्न आहेत जसे की आयर्लंडमध्ये चालले आहे हा एक लहानसा व मर्यादित वर्ग आहे जो कधी निराशा व अत्याचाराने पीडित होऊन अमानवी कृत्ये करीत आहे. अशाच प्रकारे ज्यूदेखील आहेत जे पॅलेस्टाईनमध्ये रक्ताचे पाट वाहवत आहेत. त्याचप्रमाणे बौद्ध मताचे काही अनुयायी आहेत ज्यांनी रोहिग्या (ब्रह्मदेश, म्यानमार) मधील मुस्लिमाविरुद्ध दहशतवादाची गंभीर कार्ये तडीस नेली आहेत. त्याचप्रमाणे हिदुत्वाचे ध्वजवाहक आहेत जे दहशतवादाला आपल्या जीवनाचा उद्देश मानत आहेत. त्यांच्यातील कोणत्याही प्रकारचे दहशतवादी आम जनतेचे प्रतिनिधीही नाहीत आणि आपल्या धर्माचे ध्वजवाहकही नाहीत. हे सर्व मार्गापासून भरकटलेले लोक आहेत- ज्यांच्या डोक्यात असा वेड आहे की ते आपले कल्पित जीवन उद्देश विनाश आणि दहशतवाद व सर्रास कत्तलीद्वारे प्राप्त करु शकतात. हे ते सत्य आहे ज्याची कबुली अमेरिकेतदेखील दिली जात आहे. म्हणून उदाहरणार्थ कॅलिफोर्निया युनिव्हार्सिटीचे प्रसिद्ध प्राध्यापक रोनाल्ड तकाकी यांचे नाव या बाबतीत घेतले जाऊ शकते, ज्यांनी अमेरिकेला अशी धमकी दिली आहे की या दुर्घटनेला ‘पर्ल हार्बर दुर्घटने’ची उपमा देऊन अमेरिकन नागरिकांना मुस्लिमाविरुद्ध हिसाचार व तिरस्कारासाठी उत्तेजित करण्याचा कल भयंकर आहे. यापूर्वी प्रन्सच्या पंतप्रधानांनीदेखील असे म्हटले होते की दहशतवादाला इस्लामशी जोडणे योग्य नव्हे. नंतर ब्रिटनचे पंतप्रधानदेखील हा संघर्ष करण्यात निमग्न आहेत की मुस्लिम पंथाला ‘दहशतवादी’ म्हणणे चूक आहे आणि अखेरीस भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनीसुद्धा असेच म्हटले की दहशतवादाचा संबंध इस्लामशी जोडणे चूक आहे.
(टाइम्स ऑफ इंडिया, १९ व २० सप्टेंबर २००१ आणि दि हिदु, १८ सप्टेंबर २००१)

वर्तमानकाळात दहशतवादाचा एक नवीन प्रकार समोर आला आहे. आणि तो सरकारी दहशतवाद आहे परंतु हा दहशतवाद ’लॉ अॅण्ड ऑर्डर’च्या नावाने सहन केला जात आहे. किवा समाजाची उद्दिष्टे व प्रतिष्ठेचे संरक्षण ठरविले जात आहे. उदाहरणार्थ, चीनमधील तीनामन स्क्वायर चा दहशतवाद किवा अल्जीरियातील इस्लाम प्रेमींची सर्रास कत्तल अथवा व्हिएतनाममधील अमेरिकेचा कार्पेट बॉम्ब वर्षाव काश्मीरमध्ये निष्पाप नागरिकांची कत्तल व विनाश किवा चेचनियातील निराश्रित मुस्लिमांची कत्तल व विध्वंस किवा बोस्नियातील मुस्लिमांची निष्ठुर कत्तल किवा एल सेल्वाडोरमधील विनाश आणि कत्तल किवा भारतातील १९८४ मधील निष्पाप शिखांची सर्रास कत्तल! मोजत जा परंतु आपण मुश्किलीने त्यांना परिसीमेत बांधू शकाल.

त्यातील प्रथमोल्लेखित दहशतवादाचा इस्लाम व ख्रिश्चन धर्म अथवा बौद्ध मताशी किवा हिदु धर्माशी काही संबंध नाही आणि नंतर उल्लेख केलेल्या इस्लामी अथवा ख्रिश्चन धर्माशीही नाही. हे सर्व मानवाच्या मनातील दुष्टतेचे बहाणे आहेत. किवा मग जुलुम व अत्याचाराची नैसर्गिक प्रतिक्रिया. याचे परीक्षण आम्ही पुढील ओळीत करु.

हल्ली आम्ही केवळ इतके म्हणू इच्छितो की अमेरिकेतील हल्लीच्या दहशतवादाचा इस्लाम धर्माशी काहीही संबंध नाही आणि हा ख्रिश्चन धर्म आणि वर्तमान संस्कृतीच्या विरुद्ध युद्धाचा एखादा टप्पाही नाही. हा दृष्टिकोन रद्द करण्यासाठी आम्ही वरील तीन कारणे दिली आहेत. परंतु याचे सर्वात महत्त्वाचे कारण असे आहे की हल्लीच्या परिस्थितीत दहशतवादाच्या या घटनेमुळे जर कोणाला लाभ होऊ शकतो, तो कोणत्याही परिस्थितीत मुस्लिम किवा इस्लामला होऊ शकत नाही. इस्लाम या वेळी त्या अमेरिकेत एक उत्तम जीवनाचा - पर्यायी दृष्टिकोन म्हणून गंभीर चितन व मननाचा विषय बनत चालला आहे आणि अल्प संख्येत का होईना अमेरिकन लोक इस्लामकडे वळत चालले आहेत. जगातील विभिन्न देशातून सुशिक्षित मुस्लिम व व्यावसायिक तरुण या देशाला प्रत्यक्षपणे आपली दुसरी मातृभूमी बनवीत आहेत. त्यांना धार्मिक सुरक्षा व सामाजिक स्थैर्याच्या संधी प्राप्त होत आहेत. इस्लाम धर्माला हळूहळू राजनीतिक व सरकारी स्तरावर तोंडी कां होईना, परंतु आदर मिळत आहे. दुर्दैवाने काही मुस्लिम राष्ट्रात अत्याचार व यातना, भाषणबंदी आणि सैनिक हुकुमशाही आहे. त्यांच्याकडून त्रस्त झालेल्या या देशात आश्रय घेणार्या लोकांची संख्यादेखील लक्षणीय आहे. अशा स्थितीत काय मुस्लिम अमेरिकेत घृणा व हिसेला प्रोत्साहन देणे व लोकशाही मूल्यांचा गळा दाबण्याची कृती करणार्याची भूमिका वठवू शकतील?

इस्लामसाठी पोषक वातावरण, मुस्लिमांची वाढती संख्या, त्यांच्या सांस्कृतिक व धार्मिक तन्मयता त्यांचे आर्थिक स्थैर्य आणि त्यांची वाढत असलेली लोकसंख्या आणि अमेरिकेच्या मुक्त संमिश्र समाजाचा लाभ उचलण्याच्या संभावना जर एखाद्या गटाला काट्याप्रमाणे बोचू शकत असतील तर ते यहूदी (ज्यू) असू शकतात, मुस्लिम नव्हे. काय कुणी या शक्यतेची तपासणी करण्याचा लहानसादेखील प्रयत्न केला आहे का की इस्लामदेखील या दुःखद घटनेला कारणीभूत अपराधी असू शकतो? अपराधाची चौकशी करताना उत्तेजकाचीदेखील तपासणीच्या आम व परिचित पद्धतीचा अवलंब केला जाऊ शकतो. संयोगाने ज्यू लोकांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि सामुग्रीदेखील प्राप्त आहे. परंतु अडचण अशी आहे की या संभावनांची तपासणी करण्यासाठी जर तयारी झाली तरी अमेरिकेची शोध व वार्तासंग्रह करण्याची साधने सर्वच ज्यू मंडळींच्या ताब्यात व अधिकारात आहेत. मग कोणात असे सामर्थ्य आहे की याची चौकशी त्याने करु शकावे. काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे की अमेरिकेच्या नौसेना दलाच्या एका जहाजासंबंधी अशी बातमी मिळाली होती की त्या जहाजाला ईस्त्राईलने तुर्की समुद्राच्या एखाद्या भागात नष्ट केले होते अथवा त्याला असाधारण हानि पोचविली होती. ज्यू लोकांच्या इतिहासात आपल्या निद्य उद्देशासाठी आपल्या लोकांना ठार करण्याचा धोका पत्करण्याचीदेखील पद्धत राहिली आहे. म्हणून यात काय असंभव आहे की ते आपल्या दूरगामी उद्देशासाठी न्यूयॉर्क (ज्याला सामान्यतः ज्यूयॉर्कदेखील म्हटले जाते) शहराला हानि पोचविणार नाहीत?

या दुर्घटनेचा तिसरा पैलू असा आहे की खुद्द युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका (संयुक्त संस्थान अमेरिका) मध्ये कित्येक असे गट आहेत. जे अत्याचारपीडित राहिलेले आहेत. आणि ज्यांच्या सांस्कृतिक व भाषिक विचार स्वातंत्र्याला अमेरिकन धोरणाने भरुन न येण्याजोगी हानि पोचली आहे. त्यामुळे त्यांच्या हृदयात अमेरिकेत स्थापित झालेल्या राजनीतिक व्यवस्थेबद्दल फार तिरस्कार आहे. त्यात सर्वात महत्त्वाचे उदाहरण कृष्णवर्णीय अमेरिकनांचे आहे ज्यांच्या संघर्षाच्या परिणाम स्वरुप त्यांना काही अधिकार मिळाले आहेत. आणि राजनीतिक व आर्थिक जगतात त्यांना काही स्थैर्यदेखील प्राप्त झाले आहे, परंतु आजदेखील त्यांच्याशी दुजाभाव व भेदभावाचा व्यवहार केला जातो. त्याची कल्पना आपण न्यूयॉर्क व शिकागोसारख्या शहरांच्या त्या मोहल्ल्यांना पाहून करु शकता जेथे कृष्णवर्णीय अमेरिकन राहतात. तेथील वाईट स्थितीतील रस्ते, तुटली फुटलेली दारे आणि बोलकी गरीबी, भारतातील मुस्लिमांच्या मोहल्ल्यांची आठवण करुन देतात. जर अपराधांची मोजदाद पाहिली तर त्यात बहुसंख्य कृष्णवर्णीय अमेरिकन आढळतील त्यांच्याविरुद्ध वंशीय पक्षपाताची एक घटना वर्तमानपत्रांची शोभा बनलेली आहे की गौरवर्णीय पोलीस अधिकार्यांनी एका साधारण अपराधासाठी एका कृष्णवर्णीय अमेरिकनाला खूप मारहाण केली. या लोकांच्या मनात लपलेल्या तिरस्काराची कल्पना करण्यासाठी आपण एखाद्या सामान्य गरीबीने पीडित कृष्णवर्णीय अमेरिकनाशी बातचीत करु शकता. हे लोक तिरस्काराचे सुप्त ज्वालामुखी आहेत. ते अशासाठी की आधुनिक अमेरिकेची आर्थिक प्रगती, त्याची रचना व स्थैर्यात कृष्णवर्णीय अमेरिकन निग्रोंनी असाधारण प्रमुख भूमिका बजावली आहे. इतिहास ज्याची साक्ष देतो परंतु आजदेखील त्यांच्याशी अत्याचार, भेदभाव व पक्षपाताचा व्यवहार ही आम गोष्ट आहे.

भाषिक अत्याचार व कठोरतेचा व्यवहारदेखील अमेरिकेच्या आधुनिक इतिहासाचा एक घृणास्पद कलंक आहे. इंग्लिश बोलणार्या अमेरिकनांनी असा निर्णय घेतला आहे की त्यांच्या भाषेलाच हा अधिकार आहे की तिचा प्रसार व्हावा. म्हणून या उन्मादाचा प्रहार सर्व प्रथम जर्मन भाषा बोलणार्यावर झाला. इ. सन १७९० पर्यंत जर्मन भाषा बोलणार्यांचे प्रमाण ८.७ टक्के होते, परंतु दुसर्या जागतिक युद्धानंतर त्यांना विवश केले गेले की त्यांनी इंग्रजी भाषेचा अवलंब करावा. लोवा राज्यात जर्मन भाषा बोलणार्याविरुद्ध १९१७ मध्ये कायदादेखील संमत केला गेला. टेक्सास, मसूरी आणि लोवाने अशा पुजार्याविषयी माहिती प्राप्त केली जे जर्मन भाषेत धर्मोपदेश करीत होते. येथपावेतो की १९८० पर्यंत पोचता पोचता जर्मन बोलणार्यांचे प्रमाण ढासळून परदेशी भाषांमध्ये तिसरा क्रमांक आला. या सर्वांना विवश केले गेले की त्यांनी आपल्या भाषेचा त्याग करावा आणि आपल्या संस्कृती व सभ्यतेचाही त्याग करावा आणि आता अॅबेसिनियन भाषा व अॅबेसिनियन लोकांविरुद्ध केवळ इंग्रजीची चळवळ चालू आहे. याला कारण गौरवर्णीय अमेरिकनांची ही भीती आहे की अॅबिसिनियन वंशातील लोक अमेरिकेत प्रभुत्व प्राप्त करु शकतील. इ. सन १९९० च्या खानेसुमारीप्रमाणे ५ वर्षावरील १५टक्के लोक अॅबिसिनियन भाषा बोलत होते. परंतु इ. सन २००० च्या जनगणनेत अॅबिसिनियन भाषा बोलणार्यांची संख्या ५८टक्के ने वाढून ३५.३ मिलियन्स झाली. मग काय त्यांच्याविरुद्ध एक जबरदस्त चळवळ सुरु झाली जिची पद्धत व कल वंशवादाची द्योतक आहे. या चळवळीच्या एक नेत्यानुसार अॅबिसिनियन लोकांच्या वाढीचे दर इंग्रजी बोलणार्यासाठी मोठा धोका आहे. या चळवळीची अशीदेखील मागणी होती की अॅबिसिनियन लोकांनी याच संस्कृतीशी एकरुप झाले पाहिजे, जी इंग्रजी बोलणार्यांची विशेष योग्यता आहे. किती साम्य आहे या मागणीत आणि हिदुत्वाच्या या मागणीत की मुस्लिमांनी राष्ट्रीय प्रवाहात मिसळले पाहिजे! काय या लोकातील तिरस्कार व विद्रोहाच्या भावनांची कधी चौकशी केली गेली आहे?

अशाच प्रकारचा परंतु याच्यापेक्षाही अधिक अत्याचार न्यू इंग्लंडमधील नागरिकांना संपविण्यासाठी केला गेला होता. ही घटना अठराव्या शतकातील होय. त्यातील उरले सुरले अत्याचारपीडित लोक हल्लीसुद्धा अमेरिकन समाजात आहेत.

इतकेच नव्हे तर अमेरिकन समाजाच्या सुस्थितीच्या सोनेरी पडद्यापाठीमागे असमतलपणा आणि अधिक अन्यायाची दृश्ये खोलवर गेल्यास पाहावयास मिळतात. गरीबी केवळ कृष्णवर्णीय अमेरिकन लोकातच आढळते असे नव्हे तर आम गौरवर्णीय अमेरिकनांचा एक मोठा भागदेखील याने प्रभावित झालेला आहे. हे स्पष्ट आहे की हा वर्ग घृणा व शत्रुत्वाच्या भावनांचे संगोपन करु शकतो आणि करीत आहे. एक दबकी अस्वस्थता, श्रीमंत वर्गाविरुद्ध वंचित राहण्याची भावना, वर्तमान प्रशासनाबद्दल अत्याचाराची तक्रार वगैरे गोष्टी भांडवलशाही समाजाच्या वैशिष्ठ्यात आहेत आणि अमेरिका भांडवलशाही जीवनव्यवस्थेच्या उच्चतम स्थानावर आहे. परंतु यावर शोध व विश्लेषणासाठी संशोधन संस्था पुढे येत नाहीत आणि युनिव्हर्सिटीसुद्धा आकृष्ट होत नाहीत. त्याला कारण असे की त्यांच्यापाशी भांडवल नाही आणि भांडवल ज्यांच्याजवळ आहे त्यांना या बाबतीत स्वारस्य नाही.

राजनीतीच्या जगात लोकशाही व स्वातंत्र्याची चर्चा आहे. अलिकडील दुर्घटनेनंतर अध्यक्ष बुश यांनी दहशतवादाविरुद्धच्या युद्धाला ’स्वातंत्र्याचे संरक्षण’ असे नाव दिलेले आहे. परंतु अमेरिकन राजनीतिक व्यवस्थेत लोकशाही ज्यू लोकांच्या भांडवलाच्या इशार्यावर चालते. ज्यू लॉबीने काँग्रेस व सिनेट आणि त्याच्या निवडणूक व्यवस्थेला अशा प्रकारे जखडून ठेवले आहे की त्यांच्या स्वार्थाविरुद्ध कार्य करणारे प्रथम तर निवडले जाऊ शकत नाहीत आणि जरी निवडले गेले तरी ते झायोनिझमच्या स्वार्थाविरुद्ध काहीही करु शकत नाहीत. या जखडबंदी व घेराबंदीने अमेरिकन सरकारला ज्यू लॉबीचा सेवक बनवून टाकले आहे. या विषयावर एका प्रसिद्ध सिनेटरचे पुस्तक (They Dare to Speak Out) अध्ययन करण्याजोगे आहे. काय या जखडबंदी आणि ज्यू लोकांच्या प्रभावाने अमेरिकन जनतेचा प्रत्येक वर्ग प्रसन्न आहे?
अथवा असे लोकदेखील या समाजात आढळतात ज्यांची मने अमेरिकन शासनाविरुद्ध तिरस्काराच्या भावनेने भरलेली आहेत? काय अमेरिकन सरकार व अमेरिकन प्रसारमाध्यमे आणि अमेरिकन विद्वानासाठी ती वेळ अद्याप आलेली नाही की या दुर्घटनेला कारणीभूत असलेल्या आंतरिक आवाहनांचा विचार केला जावा? दुर्दैवाने अमेरिकेचे वातावरण असे आहे की यात बाहेरचे शत्रू, बाहेरचा हिसाचार, बाहेरचा रानटीपणा, बाहेरचे वेडेपण कम्युनिस्टांची दहशतवादी व व्यापकता प्रिय विचारसरणी आणि आता इस्लामी दहशतवाद तर दिसून येतो, परंतु आंतरिक, अगदी सुरक्षित, सुसंस्कृत बुद्धिवादी, सहिष्णु व सदाचाराचा उत्तम नमुना दिसून येतो. हाच कल सध्यादेखील प्रभावी आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या बुद्धीवर पगडा बसलेला आहे. सरकार पासून कायदे बनविणार्यापर्यंत, प्रसारमाध्यमापासून विद्वानापर्यंत, तज्ञापासून आमलोकापर्यंत सर्वांचा असा विश्वास आहे की न्यूयॉर्क व वॉशिग्टनमध्ये जे काही घडले ते बाहेरच्या माथेफिरु तत्त्वांचे काम आहे नाही तर आपल्या देशाचे लोक असले कृत्य करण्याची कल्पनादेखील करु शकत नाहीत.

परंतु ही एक वास्तविकता आहे की अमेरिकन समाजातदेखील हिसाचारप्रिय गट आढळतात. त्यातदेखील तिरस्कार व नाराजीची तत्त्वे आहेत. जर असे नसते तर येथे आश्चर्यावर आधारित धार्मिक गट आढळले नसते. सामूहिक आत्महत्येला मुक्तीमार्ग समजणार्या वर्गांचे अस्तित्व राहिले नसते. येथे अशा माता मिळाल्या नसत्या ज्या आपल्या सहा मुलांना ठार करुन समाधानी दिसल्या असत्या. अशी हायस्कुले आढळली नसती जेथे विद्यार्थी आपल्या मित्रावर गोळी चालविण्यात काही हरकत नाही असे समजतात. असे विद्यार्थी आढळले नसते जे आपल्या शिक्षिकेला गोळी मारुन ठार करतात (या सर्व घटना माझ्या अलिकडच्या अमेरिकेच्या प्रवासादरम्यान (२० ऑगस्ट २००१) चव्हाटयावर आल्या होत्या. वास्तविकता अशी आहे की द्रुतगतीने होणारी संपत्तीमधील वाढ हिसाचाराच्या भावनेला जन्म देते आणि जर संपत्तीच्या या असाधारण वाढीबरोबर फरक व पक्षपातदेखील असेल तर हा प्रकोप प्राण घेणारा ठरतो.

या दुर्घटनेचे एक रुप असेदेखील आहे की उसामा बिन लादेन आणि इस्लामी दहशतवादावर निस्संकोचपणे आरोप लावला गेला की हेच या दुःखद घटनेला कारणीभूत आहेत. या अपराधासाठी जर एखाद्या चौकशीची गरज असली तरी ती अमेरिकन प्रसारमाध्यमें व केंद्रीय चौकशी ब्यूरो एफ.बी.आय.ने केली आहे. म्हणजे आरोप करणारा स्वतःच चौकशीदेखील करील आणि स्वतःच न्यायदेखील करील. या गुन्ह्यात तालिबाननादेखील पूर्णपणे गोवले आहे. आणि सरळ सरळ इराक, इराण आणि चालता चालता पाकिस्तानलादेखील गुन्हेगारांच्या पिजर्यात उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या प्रकारे अमेरिका, जड, मानसशास्त्रीय, राजनीतिक आणि वार्ता पोचविण्याच्या विस्तीर्ण साधनांचा गत कित्येक दशकापासून उपयोग करीत आहे. त्याप्रकारे ते जगातील दुसर्या प्रगत राष्ट्रात अद्याप कार्यवाहीत आलेले नाहीत. प्रगतीशील व मागासलेल्या मुस्लिम राष्ट्रांच्या तर ही गोष्ट कल्पनेबाहेरची आहे. म्हणून तो जे काही सांगत आहे तेच सत्याच्या जवळचे ठरेल. भारतातील टी. व्ही. वरील चर्चेत एका विद्वानाने हे मूल्यवान मत व्यक्त केले की आम्हाला हा आरोप मान्य करावाच लागेल. त्याला कारण असे की अमेरिकेसारखा सर्व माहिती ठेवणारा व सर्वकष दृष्टी ठेवणारा देश हे सर्व काही सांगत आहे. ज्याच्या कॅमेर्याच्या टप्प्यात जगातील प्रत्येक एकांतातील कोपरा आहे, ज्याच्याजवळ अशी खोटी गोष्ट पकडणारी यंत्रे आहेत की संभवतः सैतानालादेखील खरे बोलावे लागेल. आम्हाला हे ठाऊक नाही की उसामा बिन लादेन या घटनेस जबाबदार आहे किवा नाही. परंतु त्यांना हा अधिकार पोचतो की त्यांचा अपराध सिद्ध केला जावा.

तालिबानवर जो गुन्हा लादला जात आहे तो बर्याच अंशी पॅलेस्टाईनमधील लोकांच्या चित्रणासमान आहे. उदाहरणार्थ, ’’पॅलेस्टिनी दहशतवादी आहेत आणि निष्पाप ज्यू लोकांना ते आपल्या देशातून बाहेर काढू इच्छितात. त्यांच्या जिवावर उठले आहेत.’’ पॅलेस्टिनी लोक असे असंस्कृत आहेत की त्यांच्याशी चर्चा केली जाऊ शकत नाही. म्हणून संपूर्ण जगातील स्वदेशासाठी चळवळ करणार्या ज्यूंना, बुद्धिमान, अत्याचारपीडित आणि निष्पाप म्हणून प्रस्तुत केले जात आहेत आणि पॅलेस्टिनी दहशतवादी, रक्तपिपासू, डाकू आणि बिचार्या सुसंस्कृत व अत्याचारपीडित ज्यू लोकांचे शत्रू म्हणून प्रस्तुत केले जात आहेत आणि आज ते प्रत्येक न केलेल्या अपराधाचे गुन्हेगार ठरविले जात आहेत. जर इस्त्राइली सरकारने त्यांच्यावर हल्ला केला, येथपावेतो की त्यांच्या अध्यक्षांच्या (यासेर अराफात) मुख्यालयाला लक्ष्य बनविले तर त्याला जबाबदार स्वतः पॅलेस्टिनी लोक आहेत. असे कां घडत आहे? हे चित्र कसे तयार होत आहे? वास्तविकता काय आहे? जर आपणास हे जाणून घेण्याची इच्छा असेल तर प्रसारमाध्यमांच्या व्यवस्थेवर थोडा विचार करावा लागेल जो हल्लीदेखील या प्रदेशात आहे. इंग्रजी दैनिक ’द हिंदु’च्या १४ सप्टेंबर २००१ च्या आवृत्तीत एका इस्त्रायली शोधकाच्या नोव्हेंबर २००० च्या वृत्तांताची काही उद्धरणे प्रसिद्ध झाली आहेत. या चौकशीप्रमाणे-

’’केवळ इस्त्रायलमध्ये पत्रकारितेच्या ३०० परदेशी संघटना कार्यरत आहेत. त्यापैकी २/३ चा संबंध युरोप व अमेरिकेशी आहे. त्यांचा मोठा भाग ज्यू लोकांचा आहे आणि हे इस्त्रायलमध्ये अनेक वर्षापासून राहत आहेत. त्यांच्यापैकी काहींनी ज्यू स्त्रियांशी विवाह केला आहे ज्या स्वतःदेखील कुशल पत्रकार आहेत. त्यांचे इस्त्रायली ज्यू वस्तीशी निकटचे संबंध आहेत. त्यांच्यापैकी ९१ टक्के स्त्रियांनी असे सांगितले आहे की त्यांना इस्त्रायलच्या बाबतीत विपुल माहिती आहे. ४१ टक्के स्त्रियांनी सांगितले की त्यांच्या मते अरबासंबंधीची त्यांची माहिती उच्च दर्जाची आहे. ३५ टक्के स्त्रियांची अरबाविषयीची माहिती सामान्य दर्जाची आहे. त्यांच्यापैकी ५७ टक्के पत्रकारांनी सांगितले की ज्यू धर्माविषयक त्यांची माहिती उच्च दर्जाची आहे. केवळ १० टक्के पत्रकारांना इस्लामविषयी चांगली माहिती आहे. ५४ टक्के पत्रकारांना इबरानी भाषा चांगल्या प्रकारे येते आणि २० टक्के पत्रकारांना कामचलाऊ अरबी भाषा येते. त्यांच्यापैकी काहींना सोडून बाकीचे सर्व इस्त्रायली प्रदेशात राहतात. हेच ते लोक आहेत जे कायमस्वरुपी इंग्रजीत बातम्या पाठवितात. हे स्पष्ट आहे की त्यांची वर्णनशैली व त्यांनी दिलेल्या बातम्या इस्त्राईलचा पक्ष घेतात.’’

या माहितीच्या आधारे आपण अंदाज लावू शकता की पॅलेस्टाइनच्या भूमीवर घडणार्या घटनांचे चित्र ते कशा प्रकारे रेखाटत असतील? साधारणपणे अमेरिकन आम व विशेष लोकांसमोर कसला नकाशा प्रस्तुत केला जात असेल आणि कोणत्या आधारे अमेरिकन धोरण बनविले जात असेल?

या नकाशात आणखी एक वाढ करुन घ्या. हल्ली संपूर्ण जगात सॅटेलाईट टी.व्ही.चे राज्य केवळ सांस्कृतिक कार्यक्रमावरच नव्हे तर बातम्या व राजनीतिक विश्लेषणदेखील त्यांच्याकडून आवश्यक सामुग्री प्राप्त करतात. सॅटेलाईटची संपूर्ण व्यवस्था केवळ ४ किवा ५ संस्थांच्या हातात आहे ज्यांच्याकडून स्थानिक टी.व्ही.देखील आपले कार्यक्रम व आपल्या बातम्या प्राप्त करतात आणि अशा प्रकारे जगाला ते दाखवितात आणि ते ऐकवितात जे त्यांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असते. या सर्वच्या सर्व संस्था ज्यू लोकांच्या मालकीच्या आहेत.

याविरुद्ध तेलाच्या दौलतीने संपन्न अरबांची स्थिती पाहा, त्यांना जेव्हा महान अल्लाहने अमाप संपत्ती दिली तेव्हा त्यांनी ती श्रीमंतांच्या एका मर्यादित गटात वितरित केली. त्यांनी मोठमोठे वैभवशाली विमानतळ बनविले, पंचतारांकित हॉटेल्स बनविले. रस्त्यांना विजेने प्रकाशित केले. एका एका शासकाने आपल्यासाठी शद्दादसारखे स्वर्ग बनविले. परंतु ते सर्वजण मिळून एक विश्वसनीय न्यूज एजन्सी बनवू शकले नाहीत. पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांचे परावलंबन व मोतादी टिकून आहे. संशोधन व लेखनाच्या जगतात त्यांनी दुसर्यांच्या तुकडयांना आपल्या दस्तरख्वान वरील (डायनिग टेबलप्रमाणे उपयोगात आणले जाणारे कापड वगेरे) उत्तम पक्वान्न समजून बसले. जर त्यांनी इच्छिले असते तर पॅलेस्टाइनच्या समस्येवर दर्जेदार पुस्तकांचा ढीग लावू शकले असते. जर त्यांना अक्कल असती तर जगात इस्लामचे खरे चित्र प्रस्तुत करण्यासाठी पत्रकारितेची दृढ व्यवस्था स्थापित करु शकले असते. किती मोठे दुर्दैव आहे की पॅलेस्टाइनच्या समस्येवर दर्जेदार पुस्तके अमेरिका व युरोपमध्ये छापली गेली आहेत. जर अरब लोकात मानवी साधनांची उणीव होती तर ते मुस्लिम देशांच्या खजिन्यांचा लाभ घेऊ शकले असते. परंतु त्यांनी सल्ले त्यांचे मान्य केले जे त्यांचे जन्मजात शत्रू आहेत आणि ते मार्ग निवडले जे अमेरिका व युरोपने त्यांना दाखविले. त्यांनी महान अल्लाहने प्रदान केलेल्या संपत्तीची कदर केली नाही. म्हणून या दौलतीवर आज अमेरिकेचा कब्जा आहे.

अशा परिस्थितीत हे कसे शक्य आहे की उसामा बिन लादेन आणि इस्लामी दहशतवादाच्या आरोपासंबंधी दर्जेदार व कायमस्वरुपी अन्वेषण व्यवस्था आपला दृष्टिकोन जगासमोर प्रस्तुत करु शकेल? आता याशिवाय त्यांचा काय उपाय आहे की त्यांनी अमेरिकेच्या प्रत्येक आरोप व प्रत्येक दाव्यावर आम्ही मान्य करतो असे म्हणावे.

या दुर्घटनेचा जितका निषेध केला जाईळ तितका तो उचित आहे. परंतु या आकस्मिक प्रहाराने जे दुःख पोचले आहे आणि त्यामुळे निष्पाप लोकांचे जे रक्त सांडले आहे त्यावर संपूर्ण जगात जो कोलाहल माजला आहे, असा संताप व क्रोध व्यक्त केला गेला आहे आणि इतका शोक व्यक्त गेला आहे जो स्वतःच या जगाच्या अन्यायाचे खंडन न करता येण्याजोगा पुरावा आहे. हे जग श्रीमंत व शक्तीशाली लोकांचे आहे. जीवनातदेखील त्यांचे चालते आणि मेल्यानंतरदेखील त्यांचे गुणगान होते. अमेरिकेतील निष्पाप लोकांचे रक्त फार मौल्यवान आहे. ते ज्या निष्ठुरानी सांडले आहे ते शिरच्छेद करण्यास पात्र आहेत. परंतु काय माणसा माणसांच्या रक्तात फरक असतो? काय एक राजसी रक्त असतो आणि एक मजुराचा रक्त? अत्याचारपीडित पॅलेस्टिनी लोकांचे रक्त अर्ध्या शतकापासून वाहविले जात आहे परंतु पाश्चिमात्य शक्तींच्या दृष्टीने ते अप्रतिष्ठित आहे. कित्येक अत्याचारपीडित पॅलेस्टिनी लोक आहेत जे आपल्या मातृभूमीवर पाऊल ठेवण्याची इच्छा उरी बाळगून आपल्या खर्या निर्मात्याला जाऊन मिळाले. परंतु इस्त्रायली दहशतवादाचा निषेध तर दूरच राहिले त्याच्यावर टीका करणेदेखील अमेरिकेला सहन होत नाही. चेचनियाच्या मुस्लिमांचे रक्त विचार न करता सांडले जात आहे. परंतु पाश्चात्यांच्या मते त्या रक्ताची काही किमत नाही. ते अशासाठी की ते इस्लामवर प्रेम करणार्या वेडयांचे रक्त आहे! व्हिएतनाममध्ये अमेरिकेने कित्येक निष्पाप लोकांचे रक्त सांडले. परंतु ते तर साम्यवादाने झपाटलेल्या वेडयांचे रक्त होते! अशा प्रकारे रक्ता रक्तात फरक आहे, मानवी प्राणाचे वजनदेखील भिन्न असू शकते आणि आहे. जे शक्तीशाली शासक आहेत, कोठे त्यांचे रक्त आणि कोठे गरीबांचे रक्त! वर्तमान युगात आणि प्राचीन अंधकारयुगात काय फरक आहे? जेव्हा की चंगेझ खानने आपला जावई चुकून कोणाच्या बाणाने ठार झाल्याचा सूड नीशापूरच्या हजारो लोकांचे प्राण घेऊन उगविला होता.

निसर्गाने अमेरिकेला ही संधी उपलब्ध करुन दिली आहे की त्याने आपल्या कार्यप्रणालीची समीक्षा करावी. स्वातंत्र्य काही केवळ अमेरिकन लोकांचा हक्क नाही. न्याय प्राप्त करण्याचा केवळ अमेरिकन जनतेचा हक्क नाही. जीवन केवळ त्यांचेच मौल्यवान नाही जे पाश्चिमात्य देशांचे नागरिक आहेत, तर हा सर्व मानवांचा अधिकार आहे. जर त्याने क्रोध व सूडाच्या भावनेने प्रभावित होऊन मानवी हक्कांच्या चिध्या उडविल्या, लोकशाही व लोकशाही हक्कांचे तुकडे उडविले, न्याय व स्वातंत्र्याला आपल्या शक्तीशाली पायाखाली पददलित केले तर त्याचे नाव कोणाबरोबर लिहिले जाईल?

नोम चोम्स्की हा विद्वान लिहितो की आम्ही जर दहशतवाद्यांच्या उत्तेजनांचे परीक्षण केले नाही आणि त्या उत्तेजनांचे निर्मूलन केले नाही. ज्यांच्यामुळे त्यांनी हा अपराध केला आहे तर आम्ही दहशतवादाच्या आगामी पिकाला रोखू शकणार नाही. पॅलेस्टिनी व इस्त्रायली प्रदेशाने चांगल्या प्रकारे परिचित असलेल्या रॉबर्ट प्रिस्क या लेखकाने एका वैगळ्या शैलीत आपले विचार अशा प्रकारे व्यक्त केलेले आहेत-

’’हे लोकशाहीविरुद्ध दहशतवाद असे युद्ध नसेल ज्यावर विश्वास ठेवण्यास जगाला सांगितले जाईल. परंतु हा अमेरिकन क्षेपणास्त्रांचा पॅलेस्टिनी घरावरील विनाशकारी प्रहार आणि १९९६ मधील लॅबेनॉनच्या एका रुग्ण वाहिकेवरील हल्ला आणि अशा प्रकारच्या अनेक घटनांची समस्या आहे. याउपर दोन लक्ष निष्पाप इराकी जनतेला ठार करण्याचीदेखील समस्या आहे. विशेषतः व्हिएतनाम पासून क्यूबा, कोरिया, चाइल, सुदान व युगोस्लाव्हियामध्ये अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे हजारो प्राण गेले. या सर्व समस्या आहेत. या सर्वाविरुद्ध व्यापक युद्ध लढले गेले पाहिजे.’’ (द हिंदु, १८-९-२००१)

या सर्व चर्चांचा निष्कर्ष असा आहे की दहशतवाद, वर्तमान युगातील व्यापक रोगाचे उत्पादन होय. हे युग स्वतः त्या उत्तेजना उपलब्ध करुन देत आहे. ज्यामुळे त्याचे जंतु हे उत्पन्न होत आहेत. हा काळ जुलुम व अन्यायाचा आहे. येथे जबरदस्ती, शक्तीव हुकुमशाहीचे शासन आहे. यात हृदय व दृष्टीला स्थान नाही तर ’पैसा’ निर्णायक आहे. त्याला कारण असे की भांडवलशाही व्यवस्थेचे हेच वैशिष्ठय आहे, म्हणून त्यांचा प्रतिबंधक उपाय शोधला पाहिजे.

या दुर्घटनेचे भविष्यात काय परिणाम होतील त्याची भविष्यवाणी करणे तर कठीण आहे परंतु या कोलाहल व गोंगाटाने मुस्लिम फार त्रस्त झालेले दिसत आहेत. मुस्लिम सामान्यजन कमी व मुस्लिम शासनकर्ते अधिक! परंतु याप्रसंगी केवळ ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की महान अल्लाह अशाच प्रकारे ईमानधारकांना अजमावतो. जर आपण विश्वास व श्रद्धेची कास सोडली नाही तर हे आक्रमण पाहून आपण निःसंकोचपणे म्हणाल,

’’ही तीच गोष्ट आहे जिचा अल्लाह व त्याच्या प्रेषिताने आमच्याशी वायदा केला होता.’’ (सूरतुलअहजाब - २२)
आणि त्याचबरोबर यावर विश्वास ठेवावा,
’’असत्य नष्ट होण्यासाठीच असते.’’ (सूरह बनी इस्राईल-८०)
अर्थात- चूक व असत्याचे पाय असत नाहीत आणि वाईट वचनाला पृथ्वीवर स्थैर्य नसते.

संबंधित लेख

  • हजयात्रेचे धार्मिक विधी

    एखादी मुस्लिम व्यक्ती जेव्हा हजयात्रेसाठी निघते तेव्हा ती जाहीररित्या सर्वांना त्याची सूचना देते. ‘एहराम’ विशिष्ट प्रकारचा साधा पोषाख (सोवळं) असतो तो परिधान करण्यापूर्वी ती व्यक्ती शुचिर्भूत होते. स्नान केल्यानंतर ते वस्त्र ‘एहराम’ परिधान केले जाते. साधे दोन पांढरे शुभ्र कापड विना शिवलेले असते. एक कमरेभोवती गुंडाळले जाते आणि दुसरे खांद्यावर सोडले जाते. नंतर ती व्यक्ती दोन रकात नमाज अदा करते आणि औपचारिकरित्या हजयात्रेसाठी इरादा खालीलप्रमाणे मोठ्याने जाहीर केला जातो.
  • इस्लामच्या आधारस्तंभांचे विशेष महत्त्व

    मानवी शरीर अनेक अवयवांचे मिळून बनले असले तरी त्याच्या प्रत्येक अवयवाचे महत्त्व एकसारखे नाही. त्याचप्रमाणे भक्तीचे अनेक अंग आहेत आणि त्यांच्यापैकी प्रत्येक भागाचे महत्त्वसुध्दा एकसारखे नाही. जसे मानवी शरीरात मेंदू, हृदय यांचे विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे भक्तीमध्येसुध्दा इस्लामनुसार, नमाज, रोजा, हज यांचे विशेष महत्त्व आहे. हे इस्लामचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या विशेष महत्त्वाची कारणे खालीलप्रमाणे आहेत.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]