Islam Darshan

अमेरिकन दहशतवाद व पाशवी सूड

Published : Sunday, Mar 06, 2016

वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या घटनेनंतर तीन चार आठवड्याच्या सर्वसंमत तयारीनंतर अखेर अमेरिकन संयुक्त संस्थानांनी अफगाणिस्थानवर हल्ला चढविला. या युद्धाचे वैशिष्ट्य असे आहे की ही दोन तुल्यबळ शक्तींदरम्यानची युद्ध मोहीम नाही, तर जगातील सर्वांत बलाढ्य शक्तीचे जगाच्या सर्वांत निर्बळ आणि दारिद्र्यग्रस्त देशाविरुद्ध हे युद्ध आहे. इंग्लंडच्या पार्लमेंटमधील एक लेबर सदस्य एम्. पी. जॉर्ज गॅलोवे यांनी या युद्धाचे उदाहरण असे दिले आहे, ’’जणू माइक टायसन एका पाच वर्षाच्या मुलाविरुद्ध मैदानात उतरला आहे.’’

हे एक अघोषित युद्ध आहे. त्याला कारण असे की अमेरिकेने रिवाजाप्रमाणे अफगाणिस्थानशी युद्धाची घोषणा केलेली नाही. एखाद्या दुसर्या देशानेदेखील अमेरिकेविरुद्ध युद्धाची घोषणा केलेली नाही. हे युद्ध व्हिएतनामच्या युद्धाप्रमाणे जागतिक युद्धाचे रुप धारण करील अशी लांबवरचीदेखील शक्यता नाही. व्हिएतनामच्या युद्धात जगातील दुसर्या सुपर पॉवर महाशक्तीरशिया व चीनचे समर्थन व्हिएतनामला प्राप्त होते. तेथे दोन जागतिक महाशक्तींच्या सरळ-सरळ संघर्षाचा धोका होता. त्यामुळे व्हिएतनामच्या लढाऊ सेनेला सर्व प्रकारचे समर्थन प्राप्त होत होते. परंतु येथे तर अफगाणिस्थान स्वतःच दारिद्र्यग्रस्त आहे आणि त्याला कोणत्याही जागतिक शक्तीचे प्रत्यक्ष तर सोडाच अप्रत्यक्षसुद्धा समर्थन प्राप्त नाही. ही एक भयंकर त्रासदी आहे. ज्यात कित्येक दशलक्ष डॉलर किमतीचे क्रूझ प्रक्षेपास्त्र, ध्वनि-गतीपेक्षा जास्त वेगवान बॉम्बवर्षक विमान आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा हत्यारांच्या मार्यात गरीब व दुर्दशाग्रस्त अफगाणांचे तंबू आहेत; माती व दगडाने रचलेले वाईट स्थितीतील घरे आहेत. पर्वत व दगड आहेत, वाळूच्या टेकड्या आहेत भूतकाळातील सामान्य शस्त्र आहेत आणि उपासमारीने त्रस्त माणसे आहेत.

आकाशाने इतके भयंकर युद्ध क्वचितच पाहिले असेल. पण जरा थांबा आणि इतिहासाची पृष्ठे चाळा. आपण पाहाल की बलशाली विजेते अशाच प्रकारे तुल्यबळ नसलेल्यांशी युद्ध करीत आलेले आहेत आणि आजसुद्धा करीत आहेत. भारतातील जहागीरदारांनी आपल्या रयतेच्या साधारण दुष्टतेचा बहाणा करुन तसेच त्यांना बेघर करुन टाकले आहे. त्यांची अब्रू लुटली आहे आणि त्यांचा स्वाभिमान पायाखाली तुडवला आहे. हल्लीच्या महाशक्तीप्रमाणे त्यांना तुडवले आहे आणि त्याचबरोबर भाकरीचे तुकडेसुद्धा त्यांच्यासमोर टाकले आहेत. अशाच प्रकारे सिध प्रांतातील वडीरांनी व पंजाबच्या जहागीरदारांनी आपल्याविरुद्ध बोलणार्यांच्या जिभादेखील कापल्या आहेत. त्यांना तहहयात बुटाच्या लेसबरोबर ठेवले आहे. अशाच प्रकारे विजयी ब्राह्मण अत्याचार्यांनी दलित व अस्पृश्यांवर अत्याचार केला आहे आणि आजदेखील करीत आहेत. हे सर्व काही शक्तीव सत्तेच्या नशेत मदोन्मत्त झालेल्या शक्तींची, म्हातारे, निर्बळ व विकलांग लोक व टोळ्यांविरुद्धची युद्धकथा राहिली आहे. आज अमेरिकेचे अफगाणिस्थानविरुद्धचे युद्धदेखील याच रक्तरंजित कथेचा एक अंश आहे. महान अल्लाहने माणसाच्या वैशिष्ट्याचे वर्णन अशा प्रकारे केले आहे, ’’निःसंशय तो (मनुष्य) मोठा अत्याचारी व अज्ञानी आहे.’’

अत्याचार व अन्यायाच्या या कथा व अमेरिकेच्या अलीकडच्या युद्धात कोणताही मौलिक फरक नाही. अशा प्रकारच्या अगणित घटनांमध्ये अपराधापेक्षा कित्येक पटीने कठोर शिक्षा तेथे दिल्या गेल्या होत्या आणि आजसुद्धा दिल्या जात आहेत. त्याचप्रमाणे आजदेखील जरी संशयित गुन्हेगार उसामा बिन लादेन आणि अलकायदा आहे तरी शिक्षा मात्र अफगाणिस्थानच्या सर्व लोकांना दिली जात आहे. परंतु एक अंतर दोघांदरम्यान अवश्य आढळतो. तो असा की अमेरिका वर्तमान युद्धास संस्कृतीचे दहशतवादाविरुद्ध, लोकशाही विचार व दृष्टिकोनाच्या स्वातंत्र्याचे बळजबरी व उन्मादाविरुद्ध, न्यायाचे जुलुम व पाशविकतेविरुद्ध युद्ध ठरवीत आहे, त्याने आपल्या स्वार्थाच्या सुरक्षेला जागतिक शांतता व सुरक्षेचे रक्षण ठरविले आहे.

अमेरिकन संयुक्त संस्थानांचा असा दावा आहे की हे न्याय्य युद्ध आहे, परंतु इतिहासाची नोंद अशी आहे की जागतिक शक्तींनी ज्या युद्धाला जेव्हा इच्छिले तेव्हा न्याय्य युद्ध ठरविले आहे. युरोप व अमेरिकेने सूडाच्या युद्धाची आपली कथा लिहिली आहे आणि युद्धाच्या अनेक कार्यवाहींना न्यायपूर्ण सूड ठरविले आहे. इ. स. १८२७ मध्ये ब्रिटन, प्रन्स आणि अमेरिकेने तुर्कस्थानची नाकेबंदी केली. इ. स. १८५० मध्ये ब्रिटनने ग्रीसला डॉन पेसी फिस्को घटनेत केवळ अशासाठी धमकी दिली होती की एका ज्यू वंशीय इंग्लंडच्या नागरिकाचे घर जाळले गेले होते. अमेरिकेच्या प्रसिद्ध मुन्रो डॉक्ट्रीनला असा अधिकार दिला होता की त्याने उत्तर व दक्षिण अमेरिकेच्या संरक्षणविषयक बाबतीत हस्तक्षेप करु शकावे. इ. स. १८५४ मध्ये अमेरिकेने ‘निकारागुआ’च्या शहर ‘ग्रे टाऊन’वर बॉम्बवर्षाव केला कारण अमेरिकेच्या अध्यक्षांनी त्याला गुन्हेगारांचे आश्रयस्थान ठरविले होते. हाच युक्तीवाद आज अफगाणिस्थानच्या ‘तालिबान’विरुद्ध अमेरिकन कार्यवाहीच्या औचित्यासंबंधाने केला जात आहे. इ. सन १८९५ मध्ये अमेरिकन नौदलाच्या तांड्याने ‘पॅराग्वे’ (Paraguay) मध्ये हस्तक्षेप केला. इ. सन १९१४ मध्ये मेक्सिकोच्या एका भागावर कब्जा केला कारण अमेरिकन अधिकारी व गुन्हेगारांना धोका होता. दि. २२ एप्रिल १९१४ च्या अमेरिकन काँग्रेसच्या ठरावात व त्याच्याच इ. सन २००१ च्या अफगाणिस्थानाशी संबंधित घोषणामध्ये किती जवळचे सादृश्य आहे याचा अंदाज येण्यासाठी इ. सन १८१४ च्या घोषणावर विचार करा. तेथेदेखील असे म्हटले गेले होते की मेक्सिकोच्या नागरिकांशी अमेरिकेचे कसलेही शत्रुत्व नाही. तथापि अमेरिकेच्या अध्यक्षांना या ठरावाने अधिकार दिला गेला आहे की त्यानी अमेरिकेच्या अपमानाची नुकसान भरपाई करुन घ्यावी. इ. सन १९२३ मध्ये इटलीने आपल्या काही अधिकार्यांच्या खुनाबद्दल कोराफिस या ग्रीसच्या प्रदेशाला काबिज केले होते. इ. स. १९४१ च्या पर्ल हार्बर वरील हल्ल्यानंतर व्हिएतनाममध्ये पाशविकता व रक्तपिपासेचा अत्यंत वाईट खेळ खेळला गेला कारण ‘स्वतंत्र जगाला’ कम्युनिझमच्या फैलावण्याचे भय होते.

दुसर्या महायुद्धाच्या अखेरच्या टप्प्यात हिरोशिमा व नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले गेले जेणेकरुन युद्ध करणार्या जपानला त्याची शिक्षा दिली जावी. आणि त्याच्या लाखो लोकांना ठार किवा निष्क्रीय केले जावे. आणि अशा प्रकारे शांती व सुरक्षितता प्रस्थापित केली जावी. इ. स. १९९२ साली इराकवर बॉम्बचा वर्षाव केला गेला जेणेकरुन कुवैतचे रक्षण केले जावे. इ.स. १९९८ मध्ये युगोस्लाव्हियावर बॉम्बचा वर्षाव केला गेला. सुडानच्या औषधे बनविणार्या कंपनीवर बॉम्बचा वर्षाव करुन कंपनी नष्ट केली गेली जेणेकरुन नैरोबीच्या अमेरिकन दूतावासावर आत्मघाती हल्ला करणार्या अपराध्यांना शिक्षा दिली जावी. बॉम्बचा वर्षाव करण्याची अमेरिकेची नवीन रणनीती आहे ज्याचा नवीन टप्पा अफगाणिस्थान आहे. काय ही सर्व युद्धे न्यायाला धरुन होती? या युद्धात गुन्हा व शिक्षेदरम्यान औचित्य होते आणि आहे काय? जेव्हा तालिबाननी असा प्रस्ताव केला होता की अमेरिकेने उसामा बिन लादेनविरुद्ध पुरावा प्रस्तुत करावा तेव्हा संपूर्ण अफगाणिस्थानवर बॉम्बवर्षाव करण्यास न्यायपूर्ण युद्ध म्हणता येईल का? जरी अमेरिकन कायद्यानुसार एखाद्या अपराध्यावर हात घालण्यासाठी योग्य व अयोग्य पद्धती अलबंविल्या जाऊ शकतात तरी वर्तमान कार्यवाही तर सर्व सीमा ओलांडून केली जात आहे, यालाच न्याय म्हणतात काय?
दहशतवादाविरुद्ध विश्वयुद्धाच्या योजनेने त्या मूल्यांना व तत्त्वांना किती हानी पोचू शकते व पोचत आहे ज्यांचा अमेरिका ध्वजवाहक असल्याचा दावा करतो? अपेक्षा तर अशी होती की अमेरिकेसारख्या विशाल दृष्टिकोन असलेल्या देशाचे नेतृत्व व सुसंस्कृत व संपन्न समाजाला याची चाड असेल. परंतु दुःखाची गोष्ट अशी की असे झाले नाही आणि असे करण्याची इच्छादेखील नाही. अमेरिकेच्या बॉम्बवर्षावामुळे नागरी वस्त्यांना जी हानी पोहचत आहे आणि जितकी प्राणहानी होत आहे त्याची कल्पना परदेशी वार्ताहरांच्या त्या वृत्तांन्तावरुन येते जे त्यांनी तालिबानच्या परवानगीने त्या प्रदेशांचे निरीक्षण करुन दिले आहे. रेड क्रॉसच्या मदत कार्यालयांना नष्ट केले आहे ते खुद्द याचे पुरावे आहेत. खुद्द अमेरिकेच्या प्रदेशातून काम करणार्या एजन्सीने (Refugee International) सरकारला तंबी दिलेली आहे की अफगाणिस्थानच्या समाजावरील बॉम्ब वर्षावाची मार आम जनतेवर पडेल आणि हल्लीही पडत आहे. ’अॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ या मानव अधिकाराच्या जागतिक संघटनेने राष्ट्रपती बुश यांना सांगितले आहे की त्यांनी या कार्यवाहीत मानव अधिकाराच्या उच्चतम दर्जाचे भान ठेवाव

अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे सेक्रेटरी जनरल आयरीन खान यांनी आपल्या संघटनेकडून अमेरिकन बॉम्बवर्षावाची निर्भर्त्सना केली आहे. या संघटनेने अमेरिकन सरकारवर दबाव टाकला होता की त्याने हल्ल्यापूर्वी सर्वतोपरी शक्य पद्धतींचा अवलंब करुन अपराध्यांना कर्म-दण्ड द्यावा. हल्ला सुरु झाल्यानंतर लक्षावधी अफगाण निर्वासित आपला देश सोडीत आहेत. परंतु शेजारील देशांच्या सीमा त्यांच्यासाठी बंद आहेत. बाहेरुन येणारे सहाय्य अत्यल्प आहे.

अफगाणिस्थानचा हिवाळा अत्यंत कडक असतो. आम लोकांची एक मोठी संख्या भयभीत होऊन आपली घरे-दारे सोडीत आहेत. हिवाळ्यात त्यांची अवस्था कशी होईल की जेव्हा ते अगोदरच दुष्काळ व उपासमारीने मेटाकुटीस आले आहेत? अखेर त्यांना कोणत्या अपराधाबद्दल शिक्षा दिली जात आहे?

अमेरिकेने सध्याच्या युद्धाला ’लोकशाहीचे रक्षण व विचार आणि दृष्टिकोनाच्या स्वातंत्र्याचे युद्ध’देखील ठरविले आहे. आणि संपूर्ण जगाला दहशतवादाविरुद्ध युद्धाचे आवाहन केले आहे. या विश्वयुद्धाचा लोकशाहीच्या आत्म्यावर व विचार आणि दृष्टिकोनाच्या स्वातंत्र्यावर कोणता प्रभाव पडला आहे? काय यावर विचार करण्याची अमेरिकेला गरज भासली नाही? ते अधिकार ज्यांना तो आपल्या देशात लागू करण्याची व्यवस्था करीत आहे ते सर्व परिचित आहे. अमेरिका स्वातंत्र्य व लोकशाहीतील अधिकारांचा पाळणा राहिलेला आहे तेथे लोकशाहीची मूल्ये मजबूत आहेत. तेथील निवासियांना याची सवयदेखील आहे आणि त्याचे मूल्य ही ते जाणतात. परंतु न्यूयॉर्कच्या दुःखद घटनेच्या परिणामस्वरुप अमेरिकन प्रशासन इतके गोंधळून गेले की अॅटर्नी जनरलने आणि अमेरिकेच्या केंद्रीय चौकशी कार्यालय FBI (Federal Bureau of Investigation) ने अत्यंत दूरगामी अटी व मर्यादांची मागणी करण्यास सुरवात केली की प्रत्येक परदेशी संशयित दहशतवाद्याला, त्याच्यावर खटला न चालविता, देशातून बाहेर काढण्याचा अधिकार प्राप्त केला जावा. ईमेलवर लक्ष ठेवले जावे, वेबसाईटला सेन्सॉर केले जावे, वगैरे. परंतु लोकशाही अधिकारांचा पाया या देशात इतका दृढ आहे की बहुतेक मागण्या काँग्रेसने (अमेरिकन पार्लमेंट) रद्द केल्या. ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर खुद्द अमेरिकेत मानव अधिकाराच्या धडा घेण्याजोग्या पुष्कळ घटना उजेडात आल्या आहेत. स्टीवन शेपरिओ जो अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियनचे कायद्याचे डायरेक्टर आहेत. त्यांच्या माहितीनुसार मॅनहटनच्या हाय सेक्युरिटी करेक्शन सेंटर जेथे ११ सप्टेंबरची घटना घडली, मध्ये मध्य-पूर्वेच्या प्रदेशांतील नावासमान नावे असलेले कित्येक लोक कैदेत आहेत जे (८ * १०) फुटांच्या कोठडीत कैद आहेत.

ज्यांना खाट व एक हलकीशी घोंगडी उपलब्ध करुन दिली होती आणि जर त्यांनी इच्छिले तर त्यांना कुरआनसुद्धा दिले जात होते. ते आपसात मिळू-मिसळू शकत नव्हते आणि आपल्या कुटुंबियांशी भेटूही शकत नव्हते. त्यांची पोच केवळ वकिलापर्यंत आहे. कोणत्याही कोर्टात त्यांच्याविरुद्ध खटला भरलेला नाही. त्यांना त्यांच्या नावाने बोलावले जात नाही तर त्यांना ’दहशतवादी’ म्हटले जाते. स्टीवन शेमरिओ विचारतात की अखेर कितीजण अशा प्रकारे कैदेत आहेत? त्यांना न्यायालयाकडून फेरचौकशीची संधी आहे काय? या प्रश्नाचे काहीही उत्तर नाही. ही मॅनहटन भागाची एक घटना आहे. कोणास ठाऊक कितीतरी घटना अमेरिकेसारख्या लोकशाहीप्रिय देशात घडत आहेत, कोणासही ठाऊक नाही!

’’काही अमेरिकन कॉलेजात जे शिक्षक अफगाणिस्थानवरील बॉम्बवर्षावाची आलोचना करतात त्यांना चिढविले जाते. त्यांना नोकरी सोडण्यास भाग पाडले जाते. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील एका लायब्ररी असिस्टंटला काही दिवसांपूर्वी पगार न देता नोकरीवरुन काढून टाकले गेले. अमेरिकन तुरुंगातून ज्या बातम्या मिळत आहेत त्या हृदयाला कंपित करणार्या आहेत. न्यायाधीश जामीन मंजूर करीत नाहीत- न्यायालयात काय चालले आहे? आरोपीच्या वकिलांना हे कळत नाही की त्यांच्या अशीलावर काय अत्याचार होत आहेत! मिसीसिपीत २० वर्षाच्या एक पाकिस्तानी विद्यार्थ्याला नग्न करुन कैद्याकडून चोप दिला गेला. कोणत्याही तुरुंगरक्षकाने हस्तक्षेप केला नाही आणि त्याला वैद्यकीय सहाय्यदेखील उपलब्ध करुन दिले गेले नाही.’’ (राष्ट्रीय सहारा, उर्दू आवृत्ती, नवी दिल्ली, २३ ऑक्टोंबर २००१)

असे आहे अमेरिकेचे लोकशाही स्वातंत्र्य आणि मानवी हक्कावरील दहशतवादाविरुद्ध जागतिक आरडाओरड व प्रचार! की ज्या मूल्यांच्या व तत्त्वांच्या रक्षणाची योजना जागतिक स्तरावर आखली गेली आहे त्यांची पायमल्ली खुद्द याच देशात होत आहे. परंतु या जागतिक मोहिमेचे दूरगामी परिणाम त्या देशावर होत आहेत जेथे लोकशाहीचा पाया भक्कम नाही अथवा जुलुम व हुकुमशाही आढळते. त्या देशांना अमेरिकेच्या अविवेकी डावपेचांचा फायदा उचलण्याचे केवळ जाहीर केले आहे असे नव्हे तर आपल्या स्वार्थी उद्देशासाठी त्यांचा प्रयोगदेखील सुरु केला आहे आणि आपल्या देशातील विरोधी मत असलेल्यांना दहशतवादी ठरविण्याची मोहीम हाती घेतली आहे. रशियाने अमेरिकेच्या जागतिक मोहिमेला चेचन बंडखोरांविरुद्ध निष्ठुरता व पाशविकतेवर आधारित आपल्या मोहिमेचे सरळसरळ समर्थन ठरविले आहे. चीनने तिबेटमधील आपल्या अत्याचारी धोरण व सिकियांगमधील मुस्लिम प्रदेशातील दडपशाहीसाठी योग्य कारण ठरविले आहे. इजिप्तने तर खरोखर दहशतवादाविरुद्धच्या आपल्या कार्यवाहीला जगाला आदर्श म्हणून अवलंबिण्याचे आवाहन केले आहे. आणि मानव अधिकाराच्या पायमल्लीवर केल्या गेलेल्या प्रत्येक आलोचनेवर तुटून पडला आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या सेक्रेटरी जनरलनेसुद्धा या व्यवहाराकडे लक्ष वेधले आहे.

मानव अधिकाराच्या निरीक्षक ह्यूमन राईटस् वॉच या संस्थेने अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जनरल पॉवेल यांचे लक्षदेखील इकडे आकर्षित केले आहे की ११ सप्टेंबरच्या घटनेचा लाभ घेऊन काही सरकारांनी आपल्या देशातील राजनीतिक विरोधी मत बाळगणार्यांचे दमन करण्याचा मार्ग अवलंबिण्यास प्रारंभ केला आहे. सौदी अरबस्थान व आखाती देशांनी, ज्यात लोकशाही व लोकशाही अधिकार अगोदरच क्षीण झालेले आहेत, अमेरिकेच्या विश्वव्यापी योजनेबद्दल आपापल्या योजना तयार ठेवल्या आहेत. जी.सी.सी. (Gulf Co-Operation Council) देशांनी वर्तमानपत्रांना नोटिसा पाठविल्या आहेत की त्यांनी सरकारवर टीका करु नये, नाहीतर त्यांची वर्तमानपत्रे व मासिके बंद केली जातील. सौदी अरबस्थानच्या गृहमंत्र्यांने अलिकडेच सौदी टी.व्ही.ला अत्यंत तिखट शब्दांत तंबी दिली आहे की ‘‘इस्लाम आणि आम्ही एक दुसर्याशी एकरुप आहोत. म्हणून जो कोणी आमच्या धोरणाने असमाधानी असेल त्याने आपले पद सोडावे. ते तर काही माथेफिरु आहेत जे अफगाणिस्थानच्या पर्वतात लपलेले आहेत आणि इस्लामला बदनाम करीत आहेत.’’ ही धमकी त्या देशात दिली जात आहे जेथे मतभेद व्यक्त करणे अगोदरच गुन्हा आहे. आता जर एखाद्याने मतभेद दर्शविला तर त्याची काय गत होईल? भारतातील वर्तमान सरकारदेखील या बाबतीत पाठीमागे राहू इच्छित नाही. तिच्यादृष्टीने जो कोणी ही उसामा बिन लादेनची प्रशंसा करील त्याचे शिरकाण करणे योग्य आहे. अशाच प्रकारे सरकारच्या दृष्टीने मदरसे (मुस्लिम धार्मिक पाठशाळा) मूलतत्त्ववादाचे अड्डे आहेत. त्यांच्याविरुद्ध टाडा कायदा (हल्ली पोटा) लावणे आवश्यक आहे. हे तर सुदैव होय की या प्रिय देशात काही अंशी लोकशाही दृढ आहे. म्हणून जास्त लांबपर्यंत मजल मारणे शक्य नाही. ह्यूमन राईटस् वॉचच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरचे एक वाक्य या धमकीचे अत्यंत महत्त्वाचे उदाहरण आहे.

("If an American led counter terrorism effort becomes associated with attacks on peaceful dissent and religious expression, it will undermine everything the United States is trying to achieve." (Mr. Kenn Roth, Executive Director of Human Rights Watch.) The Hindu, New Delhi-28-9-2001)

’’जर अमेरिकेच्या नेतृत्वात दहशतवादाचे उच्चाटन करण्याची मोहीम, शांततापूर्ण मतभेद व धार्मिक मतप्रदर्शनावर हल्ला केल्याने एकरुप होत असेल तर हे त्या गोष्टीचा पाया पोकळ करुन टाकील जिच्या प्राप्तीसाठी अमेरिका प्रयत्नशील आहे.’’
दहशतवादाच्या या जागतिक मोहिमेदरम्यान ही गोष्ट किती उत्साहवर्धक आहे की खुद्द अमेरिकेतील विवेकी व विचारवंतांच्या एका लक्षणीय संख्येने शासनाच्या वर्तमान धोरणावर प्रशासनास धमकावले आहे. इंग्लंडमध्ये युध्दाविरुध्द जनतेकडून कित्येक निदर्शने झाली आहेत. वर्तमानपत्रे व प्रसारमाध्यमांनी अनेक समीक्षा व समालोचन प्रसिध्द केले आहेत. प्रन्स व जर्मनीमध्येदेखील निदर्शने झाली आहेत आणि होत आहेत. बेल्जिअम सरकारमधील अनेक जबाबदार लोकांनी उघडपणे आपल्या विरोधी मताचे प्रदर्शन केले आहे. ख्रिश्चन मंडळींनी आपला विरोध व दुःख नोंदविला आहे. स्वतः पोपने शांतता व तहासाठी प्रार्थना केली आहे. या सर्व गोष्टी लोकशाही व दृष्टिकोन आणि विचार स्वातंत्र्याच्या मूल्यांच्या दृढतेची स्पष्ट चिन्हे होत. यावरून हेदेखील स्पष्ट होते की महान मानवतेने आपल्या दीर्घकालीन इतिहासात आणि राजनीतिक व वैचारिक संघर्षाच्या चढ-उतारानंतर ज्या आरोग्यवान मूल्याप्रत मजल मारली आहे, ती त्याला प्रिय आहे. म्हणून त्यांचे रक्षणदेखील त्याला प्रिय आहे. ही आम्हा सर्वांची समाईक देणगी आहे. याला भावना व टोळ्यांचे कट-कारस्थान आणि काही टोळ्यांच्या लढाऊ कला पुढे बळी दिले जाऊ नये. जर अमेरिका जगाचे नेतृत्व करण्याची इच्छा बाळगत असेल तर त्याला हे चांगल्या प्रकारे समजून घेतले पाहिजे की निर्बळ व विवश लोकांना तुडवून तो त्यांना आपला खरा मित्र बनवू शकत नाही. इतिहासाकडून हाच धडा मिळतो आणि या धड्याकडे दुर्लक्ष करणारे सदैव अपयशी ठरलेले आहेत. दुःखाची गोष्ट अशी आहे की असली राज्ये व असे शासक ज्यांच्या जीवनाचा उद्देश महान मानवतेचे कल्याण व उन्नती नाही, ते विचार व दृष्टिकोनाचे स्वातंत्र्य, मतभेद आणि मानवी अधिकारांना आपल्यासाठी धोका समजतात. म्हणून ते वर्तमान जागतिक परिस्थितीला आपल्यासाठी चालून आलेली देणगी समजून अत्याचार व अन्याय चालू ठेवण्यासाठी योग्य कारण समजत आहेत.

अमेरिकेने ११ सप्टेंबरच्या घटनेनंतर भावनांच्या आवेशात आणखी एक मोठी चूक केली होती. असली चूक जी त्याच्या फार काळापासून करीत आलेल्या दाव्याच्या अगदी उलट होती. वर्तमानकाळाने एक असाही धडा घेतला की या जगात धर्म व संस्कृतीतील मतभेद एक अटळ गोष्ट आहे. ती संघर्ष व युध्दाने मिटणे शक्य नाही. आपसातील चर्चा व समजून घेणे आणि समजाऊन देण्यासाठी वातावरण चांगले ठेवणे आवश्यक आहे जेणेकरून शांती व सुरक्षितपणे जीवन जगणे शक्य व्हावे. हा उद्देश व्यक्त करण्यासाठी ‘मिश्र समाज’ ही परिभाषा प्रचलित केली गेली होती. परंतु हंटिग्टने ‘संस्कृती संघर्षाचा दृष्टिकोन’ गाजावाजाने प्रस्तुत केला आणि हे सिध्द करण्याचा प्रयत्न केला की संस्कृतीचा संघर्ष एक नैसर्गिक गोष्ट आहे. ती आपण स्वतःच निर्माण होत नाही. हा संघर्ष निर्माण करणारी नेहमी स्वार्थी राजनीती राहिलेली आहे. संभवतः ज्यू चितनशैली या राजनीतीची सर्वात मोठी आवाहक आहे. दुःखाची गोष्ट आहे की जगातील सर्वात शक्तीमान देशावर हल्ली विधिमंडळावरील सदस्यावर प्रभाव असलेल्या ज्यू लोकांचे (लॉबीचे) शासन आहे. अशा प्रकारे ११ सप्टेंबरच्या घटनेनंतर याच लॉबीच्या प्रभावामुळे दहशतवादाला ‘इस्लामी दहशतवाद’ म्हणून संबोधले गेले. दहशतवादाविरुध्द सैनिकी चढाईला ‘ख्रिश्चन युध्द’ ठरविले गेले आणि या युध्दास चिरकालीन युध्द ठरविले गेले. इस्लामी आत्म्याला बदनाम करण्याचे हे कट-कारस्थान नवीन नव्हते. तर फार पुरातन होते. आपल्या स्वतःच्या देशातसुध्दा या मानसिक रचनेचा खोलवर प्रभाव आहे. म्हणून येथेदेखील प्रत्येक धर्मभीरु व खर्या मुस्लिमास शंकेच्या दृष्टीने पाहिले जाते. जर जगात अशा कटुतेची पुनरावृत्ती होत राहिली व हे युध्द पसरत व चालू राहिले तर केवळ ईश्वरच जाणो की त्याचा परिणाम काय होईल! अमेरिकेने हे चांगल्या प्रकारे समजून घेतले पाहिजे की दहशतवाद सरकारी दहशतवादाने संपुष्टात येऊ शकत नाही. त्याचा बीमोड करण्यासाठी जेथे जुलुम, अत्याचार व असमानतेचे निवारण आवश्यक आहे तेथे विचार विनिमय व सामंजस्याचे साधन प्रभावी आहे. महान अल्लाहने मनुष्याची निर्मिती अशाच पध्दतीने केली आहे की तो सुस्वभाव, उपकार व न्यायाने प्रभावित होतो परंतु धमकी व फसवेगिरीने त्याच्यात हट्ट व उर्मटपणा उत्पन्न होतो.

अकरा सप्टेंबरच्या घटनेनंतर अमेरिकेतील आम जनतेत जी इस्लाम विरोधी लाट उसळली होती आणि ज्या दुर्भावनेचा पूर आला होता. मग तो कितीही अल्पशा काळासाठी टिकलेला असो, परंतु हे एक असले सत्य आहे ज्याची कांही अंशी जबाबदारी अमेरिकन मुस्लिमावरदेखील येते. अमेरिकेतील सामान्य मुस्लिम सुस्थितीत व सुशिक्षित आहेत. त्यांना आपल्या धार्मिक व सांस्कृतिक व्यक्तीत्वाशी एका परीने प्रेमसुध्दा आहे. याच प्रेमामुळे त्यांनी आपल्या सांस्कृतिक व धार्मिक सुरक्षेसाठी मशिदी बनविल्या शाळा व सांस्कृतिक केंद्रे बनविली, शैक्षणिक केंद्रे बनविली, परंतु त्यांनी हे सर्व काही केवळ आपल्या संस्कृतीला जिवंत व सुरक्षित ठेवण्यासाठी केले. त्यांनी याची चिता केली नाही की त्यांनी आम अमेरिकन लोकांशी धार्मिक व आवाहनाचा संफ साधावा आणि अशी पुस्तके तयार करावीत की ज्यांच्या सहाय्याने इस्लामच्या शिकवणीशी मुस्लिमेतरांना परिचित केले जाऊ शकावे. त्यांनी सामाजिक स्तरावर ऐहिक व जडवादी शिक्षण व संफ वृध्दीसाठी अवश्य प्रयत्न केले परंतु निव्वळ धार्मिक संफ साधण्याकडे दुर्लक्ष केले. हेच कारण आहे की थोडासा मार लागल्यावर भुताप्रमाणे शंका उसळून वर आल्या. मनात दबून राहिलेल्या गैरसमजुती हृदय व मनावर ताबा मिळविला. वास्तविकता अशी आहे की अमेरिकन मुस्लिम स्वतः देशीय प्रादेशिक व पंथीय गटात विभाजित झाले आहेत. त्यांचे आपापसातील संबंध मधुर नाहीत. तर ते दुसर्याशी मिळून ते वातावरण कसे निर्माण करू शकतील जे प्रेम व आसक्तीला फुलविते. लहान-सहान स्वार्थापायी ते एकदुसर्याशी स्वतःच भांडण करतात. क्षमा व शुभचितन मुस्लिमांची जीवनपध्दती आहे. त्यापासून आम्ही स्वतःला वंचित करून टाकले. त्यामुळे आमच्यात ते धैर्यही नाही आणि ती हिंमतही नाही की सत्य धर्मासाठी आम्ही आपले जीवन पणाला लावावे. प्राचीन संस्कृती अशा प्रकारच्या पुराला प्रभावीपणे प्रतिबंध करू शकत नाही. आता अशी वेळ आली आहे की आम्ही प्रत्येक अमेरिकन माणसापर्यंत पोचावे आणि न्याय्य व मानवताप्रिय इस्लामी शिकवणी त्यांच्यापर्यंत पोचवाव्यात. याचे स्मरण राहावे की या प्रयत्नाच्या मार्गावरील चिन्हे म्हणजे पवित्र कुरआन व प्रेषित मुहम्मद (स.) यांची जीवनपध्दती (सुन्नत) होत. पंथ व त्यावरील श्रध्दा नव्हे. पवित्र कुरआन एक अपार आगर आहे आणि पैगंबरांची सुन्नत (जीवनपध्दती, परंपरा) असीम जीवन स्रोत आहे आम्ही जर त्याच्याशी केवळ श्रध्देपोटी संबंध ठेवला आणि व्यवहाराला परंपरागत जीवनाच्या अधीन ठेवले तर आम्ही कोठेच राहणार नाही.

हेच ते स्रोत आहे ज्याने धर्मावरील ती दृढ श्रध्दा व विश्वास प्राप्त होतो जो प्रत्येक प्रवाही पुराविरूध्द महापूर बनण्याची शक्तीप्रदान करतो. त्याच्याच शिकवणी आम्हाला हे दाखवितात की अंधकारात मार्ग बनविणे आणि प्रकाश निर्माण करण्याची काय पध्दत आहे, त्यांच्याकडूनच आम्हाला हा धडा मिळतो की आमचे नेते व नायक केवळ प्रेषित मुहम्मद (स.) आहेत. दुसर्या सर्व व्यक्तीकेवळ त्याच मर्यादेपर्यंत आमच्या प्रेम व श्रध्देस पात्र आहेत ज्या मर्यादेपर्यंत ते प्रेषितांचे अनुयायी व आज्ञांकित आहेत. जगालादेखील हे समजावून देणे आवश्यक आहे की आमच्या श्रद्धेचे केंद्र उसामा बिन लादेनही नाही किवा अन्य कोणीही नाही. आम्ही तर केवळ सत्य धर्माचे अनुयायी आहोत. त्याने प्रदान केलेल्या मूल्यांवर व नैतिकते वर मोहित आहोत व त्यावर प्रेम करणारे आहोत. आमची जमात केवळ ती आहे जी या शिकवणीवर आधारित आहे आणि आमचे प्राण, प्रतिष्ठा व अब्रू, धन व संपत्ती केवळ प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या धर्मावर ओवाळून टाकतो आणि ईश्वराने इच्छिले तर त्यावरच ओवाळून टाकत राहू.

संबंधित लेख

  • मानव समाज व अनेकेश्वरवाद

    सर्वश्रेष्ठ अल्लाहचे (ईश्वराचे) मानवावर इतके उपकार आहेत की, त्यांचा सुमार करता येणार नाही. त्याने आम्हास एकमेव ईश्वराचीच भक्ती करण्याची बुद्धी व केवळ एकाच सर्वश्रेष्ठ शक्तीची उपासना करण्याची समज दिली, याबद्दल आपण त्याचे उपकार मानायला हवे. ईश्वरीय गुण, त्याचे अधिकार, त्याचे हक्क ईश्वराशिवाय इतर कोणासही प्राप्त नाहीत व त्याच्याशिवाय इतर कोणीही आराध्य नाही अशी श्रद्धा बाळगणे म्हणजे विवेक बुद्धीस मिळालेले सर्वश्रेष्ठ वरदान होय. याच विषयावर पुढे खुलासेवार चर्चा करण्यात आली आहे.
  • आखिरत (पारलौकिक जीवना) च्या मुक्ती आणि कल्याणासंबंधी इतर धर्मांचे सर्वसामान्य मत

    आखिरत(पारलौकिक जीवना) च्या मुक्ती आणि कल्याणासंबंधी इतर धर्मांचे सर्वसामान्य मत असे आहे की या संसाराचा त्याग करून पूर्णपणे एकान्त ग्रहण करावा आणि जग व जगातील सर्व रूचि आणि इच्छा-आकांक्षापासून स्वतःला मुक्त करून वन, पर्वत आणि गुफांमध्ये जीवन व्यतीत करावं.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]