Islam Darshan

अनुभूती

Published : Sunday, Mar 06, 2016

सध्या अमेरिकेने अफगाणिस्तानवर आपल्या पूर्ण शक्तीनिशी हल्ला चढविलेला आहे. त्याची काय उद्दिष्टे आहेत? यावर विभिन्न प्रकारे लोक आपले विचार मांडीत आहेत. कोणत्याही परिस्थितीत मतभेद असणे मानवाची प्रकृतीसुद्धा आहे आणि त्याचा अधिकारदेखील. परंतु काही मौलिक गोष्टी अशा आहेत ज्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अत्यंत खेदाची गोष्ट अशी आहे की नवीन ख्रिश्चन (इसवी) शतकाचा प्रारंभच एका भयंकर युद्धाने होत आहे. गत शतकाच्या शेवटी सर्वजण कल्पना करीत होते की पुढील शतक कसे असेल आणि त्यात मानवाचे भविष्य किती उज्ज्वल होण्याची संभावना आहे. अमेरिकेच्या वर्तमान अध्यक्षांचे (ज्युनि. बुश) वडील दहा वर्षांपूर्वी जेव्हा अमेरिकेच्या शासनाच्या सिहासनावर विराजमान होते तेव्हा त्यांनी एका नवीन जागतिक व्यवस्थेची घोषणा केली होती. नवीन शतकासाठी त्यांनी जे स्वप्न पाहिले होते कदाचित तेच स्वप्न त्यांच्या चिरंजीवांच्या प्रयत्नामुळे खरे ठरत आहे. त्यांची कल्पना अशी होती की नवीन जागतिक व्यवस्थेचा कणा व केंद्र अमेरिका असेल. जग ते करील जी अमेरिकेची इच्छा असेल, तेच पाहील जे अमेरिका दाखवील आणि तेच ऐकेल जे अमेरिका ऐकवील. हे उघड आहे की संपूर्ण जगाला आपल्या पकडीत घेणे व आपल्या विशिष्ट साच्यात बसविण्यासाठी हे शक्य नव्हते की प्रत्येक ठिकाणी त्याच्या फौजा व त्याची माणसे हजर असावीत. त्यांची कल्पना अशी होती की ते आपल्या देशात राहून सर्व देशांचे पाटील बनतील. तेव्हा साम्यवादी शक्ती व रशियाची निरंकुश सत्ता विस्कटल्यानंतर आता कोणतीही अन्य सुपर पॉवर (महासत्ता) उरली नव्हती की जी अमेरिकेच्या मार्गात अडथळा बनू शकत होती.

एके काळी ही म्हण प्रसिद्ध झाली होती की ’जिसकी लाठी उसकी भैस’ (बळी तो कान पिळी). इतिहासाच्या विभिन्न युगात लोक हे कृतीत आणीत राहिले आहेत आणि ते सत्य असल्याचे सिद्ध करीत राहिले आहेत. आता याची ग्वाही देण्याची जबाबदारी अमेरिकेने उचलली आहे की ज्याच्यापाशी शक्ती असेल केवळ त्याचेच ऐकले जाईल. आश्चर्याची गोष्ट आहे की याच शक्तीच्या चमत्कारामुळे-

’’जो था नाखूब बतदरीज वही खूब हुआ।’’
अर्थात - जो वाईट होता तोच हळूहळू चांगला ठरला.

हल्लीच्या सुसंस्कृत जगात जेथे ’युनायटेड नेशन्स ऑर्गनाइझेशन’ (ळर्ध्) देखील आहे, न्यायाचे जागतिक न्यायालयेसुद्धा आहेत, समानता व मानवी हक्काबद्दल जोरदार चर्चा होत आहेत आणि सूक्ष्म गोष्टींचा विचार केला जात आहे, त्याच जगात निर्ममतेने निष्पाप लोकावर बॉम्बचा वर्षाव केला जात आहे, आणि सर्वजण असे भावनाशून्य प्रेक्षक बनलेले आहेत जणू ते क्रिकेटचा सामना पाहत आहेत.

आपण ११ सप्टेंबरला ही वार्ता ऐकली असेल की वर्ल्ड ट्रेड सेंटर न्यूयॉर्कच्या इमारतीवर हल्ला झाला आणि नंतर वॉशिग्टनमधील त्या सैनिक केंद्राच्या इमारतीवरसुद्धा हल्ला झाला ज्याच्यासंबंधी जगाला अशी खात्री दिली गेली होती की (अल्ला रक्षण करो) पेन्टॅगॉनच वास्तविकतः सर्व काही ऐकणारा व पाहणारा, सर्व ज्ञान बाळगणारा व प्रत्येक गोष्टीची खबर राखणारा आणि सदैव उपस्थित व नजर ठेवणारे केंद्र आहे ज्याच्या पकडीतून जगाचा कोणताही भाग व कोणताही व्यक्ती बाहेर नाही. नवलाची गोष्ट अशी की या इतक्या भयंकर व सुनियोजित हल्ल्याचा सुगावादेखील पॅन्टॅगॉनला लागला नाही.

इतकी गुप्तता, इतक्या उच्च कोटीचे तांत्रिक कौशल्य आणि शास्त्रीय नैपुण्याचा पुरावा प्रस्तुत केला गेला की संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले. हे कोणत्या लोकांचे कार्य होते आणि खरोखर कोण लोक यात गुंतलेले होते याचा निक्षून तपास अमेरिकेने आपल्या हिताच्या दृष्टीने व विवशतेने केला नाही. इतक्या व्यवस्थित गुप्तता व इतक्या साधन-सामुग्रीनिशी कोण विनाश घडवून आणू शकतो याचा शोध कदाचित अमेरिका लावूही इच्छित नाही. अल्लामा इकबाल यांनी पाऊण शतकापूर्वी पाश्चिमात्य देशांच्या सर्वात मोठ्या निर्बळतेकडे संकेत केला होता-

’’फरंग की रगे जाँ पंजा-ए-यहूद में है।’’

अर्थात- पाश्चिमात्यांच्या शरीरातील मुख्य रक्तवाहिनी यहूदी (ज्यू) लोकांच्या पंजात आहे.
जगाचा इतिहास साक्षी आहे की प्रत्येक मोठा उपद्रव व प्रत्येक मोठ्या कट-कारस्थानाच्या केंद्रस्थानी ज्यू लोक राहिलेले आहेत. जगातील प्रत्येक मोठ्या पराभव व विस्कळीतपणात ही जात गुंतलेली पाहिली गेली आहे. परंतु ही मंडळी आपला अपराध दुसर्याच्या माथी मारण्याच्या कलेतसुद्धा अद्वितीय आहेत. आशा आहे की भविष्यकाळात वास्तविकता उघड होतील आणि लपून राहू शकणार नाहीत आणि मग या जागतिक इतिहासात उलथापालथ करणार्या घटनामागील मूळ अपराधी पुढे येतील. हे सत्य आहे की हल्ली प्रचाराची रणधुमाळी सर्वत्र पसरली आहे, परंतु सत्याच्या तेजोमय सूर्याचा निश्चितपणे उदय होईल. हल्ली स्थिती अशी आहे की कट-कारस्थान करणारे आपले कर्म करीत आहेत आणि त्यासाठी ज्यांचा वापर केला जात आहे त्यांना हे कळतदेखील नाही की आमचा वापर केला जात आहे. कधी एखादे वेड, कधी वैयत्तिक उद्दिष्टे आणि कधी एखाद्या खोल प्रहाराचे सूड अशा प्रकारे वापर होणार्यांचा प्रेरक बनतो. ही गोष्ट स्पष्ट आहे की ज्यांचे चेहरे समोर असतात त्यांनाच जबाबदार ठरविले जाते आणि संपूर्ण आरोप त्याच्या माथी मारले जाते. अशाच प्रकारची काहीशी स्थिती या प्रसंगाशी निर्माण झाली आहे की खरे अपराधी पडद्याआड राहिले आणि जगाला दुसर्यांना शिव्याशाप देण्यास भाग पाडले गेले आहे.

मला आठवते की आजपासून सुमारे पाव शतकापूर्वी आम्ही प्रथम जेव्हा पंधराव्या हिजरी शतकाचे स्वागत करीत होतो, तेव्हा या विश्वासाने प्रफुल्लित होतो की आगामी शतक इस्लामचे शतक असेल आणि इस्लामचा दया घन शतकानुशतके पददलित व पीडित मानवतेवर वर्षाव करील. आजसुद्धा याच विश्वासाचा दीप आमच्या हृदयात तेवत आहे की इस्लाम लवकरच एक दया घन बनून संपूर्ण जगावर आच्छादित होईल. परंतु प्रश्न असा आहे की त्यावेळी नेतृत्व कोणाकडे असेल? पूर्वेकडे की पश्चिमेकडे? इतिहासात असे अनेकदा घडले आहे की खुद्द इस्लामचे शत्रूच इस्लामचे ध्वजवाहक बनून जगात म्होरके बनले आहेत. कदाचित एकविसाव्या शतकाच्या शुद्ध हरपविणार्या युगातसुद्धा ईशइच्छा याच जातीकडून इस्लामचा ध्वज फडकविण्याचे काम घेईल. जे आज त्याचे रक्त सांडू इच्छितात आणि कदाचित पश्चिमेत अमेरिका व पूर्वेत जपानलाच हा मान प्राप्त होईल की त्यांनी जगाच्या बाजारात कब्जा मिळविण्याऐवजी अत्याचारपीडित लोकांची हृदये इस्लामच्या कृपेच्या संदेशाद्वारे जिकण्यासाठी सर्वांसमोर यावे.

कदाचित अमेरिकन लोकांत काही असे सद्गुण आहेत की जे सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी असूनदेखील तेथील सर्वसाधारण लोकांच्या बाबतीत चांगल्या अपेक्षा ठेवण्यास आम्हाला उद्युक्त करतात. या लोकांचा सर्वांत मोठा सद्गुण असा आहे की ते विचार व कृतीच्या स्वातंत्र्याची कदर करणारे आहेत आणि खुल्या मनाने प्रत्येक योग्य गोष्ट मान्य करण्यास तत्पर असतात. आपले म्हणणे प्रस्तुत करण्यास, दुसर्याचे ऐकण्यास व मानवाचा वैयक्तीक सन्मान करण्यास मान्यता देतात. हे सत्य आहे की त्यांची प्रसारमाध्यमे, त्यांचे राजनीतिज्ञ व वरील धूर्त मंडळी आपली साधन सामुग्री व माध्यमांचा प्रयोग करुन एका विशिष्ट पद्धतीने विचार करण्यास व एका विशेष कार्यप्रणालीचा अवलंब करण्यास सामान्य लोकांना भाग पाडतात. परंतु सर्वसामान्य लोकांची ही योग्यता राजनीतिज्ञांच्या व्यवहाराने प्रभावित होत नाही. दुसरा गुण असा आहे की जे जडवादी असूनदेखील मानवी सहानुभूती आणि मानवाचे शुभचितन व सहाय्य करण्याची भावना त्यांच्यात दुसर्यापेक्षा अधिक आढळते. आश्चर्य या गोष्टीचे वाटते की परिस्थिती अनुकूल नसूनदेखील मन व चारित्र्याचे हे असामान्य गुण या जातीत कसे उत्पन्न झाले. या योग्यतेमुळे अशी आशा वाटते की ही जात आपल्या राजनीतिज्ञापासून वेगळी होऊन सत्याची कास धरील व कल्याणाचा स्वीकार करीत राहील आणि एका चारित्र्यसंपन्न क्रांतीच्या नेतृत्वाखाली स्वतः पाऊल उचलील. अफगाणिस्तानावर दारुगोळा व गोळ्यांचा वर्षाव करणारे हात आशा आहे की निष्प्रभ होतील. जगात अत्याचार व अतिरेकाची वादळे शांत होतील आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षा परास्त होतील, ज्या इस्लामच्या निर्मळ झर्याला विषारी सिद्ध करण्याचे प्रयत्न करीत आहेत.

संबंधित लेख

  • वर्तमान काळातील अपराध : महिलांवरील अत्याचार

    ‘मुले म्हणजे देवाघरची फुले!‘ असे आपण म्हणतो, ऐकतो. असो! मात्र अत्याचारांनी अंतिम कळस गाठलेला दिसतो. लहान-लहान आणि कोवळी मुलेसुद्धा या अमानुष अत्याचारांना बळी पडली. अल्पवयीन मुला-मुलींवर भयानक प्रकारचे लैंगिक अत्याचार होत असल्याचे आताच आपण पाहिले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालानुसार, जगातील अत्यंत प्रगत आणि न्याय, स्वातंत्र्याच्या गप्पा मारणार्या खुद्द अमेरिकेत तीन लाख अल्पवयीन मुली वेश्या व्यवसाय करीत आहेत. या अल्पवयीन मुलींपैकी बर्याच मुली अगदी १५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या आहेत.
  • इस्लाम पहिल्या चार खलीफांच्या कारकिर्दीबरोबरच समाप्त झाला नाही

    इस्लामी पद्धतीबाबत आणखी एक गैरसमज आढळून येतो, आरंभीच्या चार खलीफांच्या कारकिर्दीचा काळ व माननीय उमर बीन अब्दुल अजीज (र) यांच्या अल्पशा कारकिर्दीचा काळ सोडला तर इस्लामी पद्धत कधी पूर्णपणे स्थापन झालीच नाही, असही म्हटले जाते. पण असे म्हणणारे लोक ही गोष्ट विसरतात की पहिल्या चार खलीफानंतर व माननीय उमर बिन अब्दुल अजीज (र) यांच्या नंतर धर्म किवा जीवनपद्धतीच्या रुपाने इस्लामचा संपूर्ण लोप झाला नव्हता, उलट तो तशाचा तसाच होता. इस्लामी दृष्टिकोनातून पहिल्या चार खलीफांच्या कालानंतर त्या शासन पद्धतीत काही अंशाने अगर पूर्णपणे एक विमनस्क व रोगट परिवर्तन घडून आले होते.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]