Islam Darshan

सामाजिक जीवनात आर्थिक स्पर्धा सर्वांसाठी खुली व निःपक्षपाती असावी

Published : Sunday, Mar 06, 2016

इस्लामची इच्छा केवळ एवढीच नाही की सामाजिक जीवनात आर्थिक स्पर्धा सर्वांसाठी खुली व निःपक्षपाती असावी. या व्यतिरिक्त इस्लाम इच्छितो की, या स्पर्धेतील स्पर्धक एक दुसऱ्या प्रती निष्ठूर व निर्दयी नसावेत. ते आपसांमध्ये दयाशील आणि एक दुसऱ्यांना सहकार्य करणारे असावेत. इस्लाम एकीकडे तर आपल्या नैतिक शिक्षणाद्वारे लोकांमध्ये ही भावना जागृत करतो की, आपल्या शोषित आणि मागासलेल्या बांधवांना मदत व सहाय्य करावे. तर दुसरी कडे इस्लाम या गोष्टीची मागणी करतो की समाजामध्ये अपंग, दुर्बल, निराश्रीत लोकांच्या मदती करीता सहाय्य करणारी एक कायम स्वरूपी संस्था अस्तित्वात असावी. जे लोक आर्थिक स्पर्धेत भाग घेण्यायोग्य नाहीत त्यांना या संस्थेद्वारे त्यांचा वैध अधिकार प्राप्त व्हावा. जे लोक परिस्थितीस बळी पडून किवा संयोगवश या स्पर्धेत मागे पडलेत, त्यांना मदतीचा हात देऊन परत स्पर्धेत टिकण्या योग्य बनवावे. व ज्या लोकांना संघर्षात उतरण्यासाठी मदतीची गरज असेल त्यांना या संस्थेकडून मदत मिळावी. या उद्देशपुर्तीसाठी इस्लामने कायद्याच्या आधारावर ही गोष्ट निश्चित केली की देशाच्या संपत्तीच्या एकूण जमा राशीवर किवा संपूर्ण व्यापारिक भांडवलावर अडीच टक्के वार्षिक जकात (Poordue) वसूल केली जावी. संपूर्ण कृषी-भुमीच्या उत्पन्नाच्या पाच ते दहा टक्के काही खनिज पदार्थांच्या उत्पन्नाचा वीस टक्के भाग वसूल केला जावा. पाळीव प्राण्यांच्या एका निश्चित संख्येतून मिळणाऱ्या एका निश्चित उत्पादनातून वार्षिक जकात काढून त्यातून मिळणारे सर्व धन निर्धनांना, अनाथांना किवा असंपन्न लोकांना मदतीच्या स्वरुपात वापरण्यास देण्यात यावे. हा एक असा सामुहिक बिमा आहे की यामुळे इस्लामी समाजात कोणतीही व्यक्ती जीवनावश्यक गरजांपासून वंचित राहू शकणार नाही. कोणताही श्रमिक एवढा लाचार व विवश होणार नाही की उपासमारीच्या भिती पोटी मजूरीच्या त्या सर्व लादलेल्या अटी मान्य करण्याची त्याच्यावर पाळी यावी. ह्या अटी जकातीच्या या व्यवस्थेमुळे कोणत्याही व्यक्तीची शक्ती आर्थिक स्पर्धेत आवश्यक असलेल्या किमान स्तरापेक्षा कमी पडणार नाही.

व्यक्ती व समाजामध्ये इस्लाम असे संतूलन स्थापन करतो की ज्यामध्ये व्यक्तीचे व्यक्तित्व आणि त्याचे स्वातंत्र्य अबाधित राहाते. त्याच प्रमाणे समाजहितासाठी हे स्वातंत्र्य घातक असणारे नसून फायदेशीर असते. इस्लाम अशा प्रत्येक राजनितिक किवा आर्थिक व्यवस्थेस झुगारून देतो की जी व्यवस्था ‘व्यक्ती’ ला ‘समाजात’ लुप्त करते व त्या व्यक्तीसाठी त्याच्या व्यक्तित्व विकासासाठी आवश्यक असलेले स्वातंत्र्य संपुष्टात आणते. कोणत्याही देशाच्या उत्पादनाच्या सर्व साधनांच्या राष्ट्रीयकरणाचा हा अवश्य परिणाम होतो की देशाच्या सर्व ‘व्यक्ती’ ‘समाजा’ च्या बंधनात जखडल्या जातात. अशा स्थितीत त्यांच्या वैयक्तिकतेचे (Individuality)चे संरक्षण कठीणच नव्हे तर अशक्य आहे. माणसाच्या वैयक्तिततेसाठी राजनितिक व सामाजिक स्वातंत्र्य जेवढे आवश्यक आहे तेवढेच आर्थिक स्वातंत्र्य पण आवश्यक आहे. मानवतेचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी सामुहिक जीवनात किमान एवढी संधी तर अवश्य असावी की कोणत्याही व्यक्तीस आपली उपजिवीका स्वतंत्ररित्या प्राप्त करून आपला आत्माभिमान व विवेक अबाधित ठेवता यावा. व आपल्या मानसिक व नैतिक क्षमतांचा आपल्या आवडीनुसार विकास करता यावा. दुसऱ्यांच्या हाती नियंत्रण असलेल्या धान्य-पुरवठ्यातून गरजेपेक्षा जास्त धान्य मिळाल्यामुळे कोणी समाधानी होत नसतो. कारण व्यक्तीच्या विकासात येणारे अडसर केवळ शारिरीक विकासामुळे दूर होत नसतात. ज्या प्रमाणे इस्लाम अशा प्रकारच्या दुर्व्यवस्थांना पसंत करीत नाही, त्याच प्रमाणे तो अशा सामुहिका दुर्व्यवस्थांना पण तिरस्कृत करतो की ज्या मध्ये व्यक्तींना सामाजिक व आर्थिक क्षेत्रात स्वैराचाराचे स्वातंत्र्य दिले जाते. व त्यांना त्यांच्या इच्छेपूर्तीसाठी व स्वार्थहितासाठी समाजाचा बळी घेण्याची उघड सूट दिली जाते. या दोन्ही अतिरेकांच्या दरम्यान इस्लाम ने जो मार्ग निश्चित केला आहे तो हा आहे की, व्यक्तीने प्रथमतः समाजाच्या काही नियमांचे व कर्तव्याचे पालन करावयास पात्र व्हावे व नंतर तिने तिच्या व्यवहारात स्वतंत्ररित्या वागावे. अशा नियमांचे व कर्तव्यांचे तपशील प्रस्तूत करण्याची येथे संधी नाही. तरी पण न्यायी एक संक्षिप्त रुपरेषा येथे प्रस्तुत आहे.

प्रथम उपजिवीकेचा विषय घेऊया. धनसंपत्ती कमविण्याच्या साधनांचे इस्लामने जेवढ्या सूक्ष्मरितीने योग्य अयोग्याचे वर्गीकरण केलेले आहे. तेवढे जगाच्या कोणत्याच कायद्याने केले नाही. इस्लाम अगदी निवडून व वेचून आणि नेमकेपणाने अशा सर्व साधन प्रणालींना अवैध घोषित करतो

की ज्यामुळे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीस किवा एकूण सर्व समाजाला नैतिक व नैसर्गिक हानी पोहोचवून आपली उपजिवीका भागवितो. दारू व मादक पदार्थांचे उत्पादन व विक्री, अश्लिलता, नृत्य गायन व्यवसाय, जुगार, सट्टा, लॉटरी, व्याजांचे व्यवहार, दगाबाजी आणि कुरापतीचे धंदे अशा सर्वच व्यवसायिक प्रणाली ज्या मध्ये एका पक्षाचा लाभ व फायदा असतो व दुसऱ्यांचे नुकसान मात्र निश्चित असते. जीवनावश्यक वस्तूंची विक्री बंद करून व कृत्रीम टंचाई निर्माण करून वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढविणे व अशा प्रकारचे सर्वच व्यवहार जे समाज हितास घातक आहेत, इस्लामी कायद्याने सर्वस्वी अवैध घोषित केले आहेत. या बाबतीत आपण इस्लामच्या आर्थिक नियमांचे निरीक्षण केल्यास अवैध प्रणालींची एक लांबलचक यादी आपल्या समोर येईल. व बहुतेक अशा प्रणाली निदर्शनास येतील
ज्यांना स्वीकारून व अंगीकारूनच वर्तमान भांडवलवादी व्यवस्थेत लोक कोट्याधिष होत आहेत. इस्लाम अशा सर्वच प्रणालींवर कायद्याने बंदी घालतो व मानवास केवळ मात्र अशारितीने धन-संपत्ती कमविण्याची परवानगी देतो, ज्यांपासून त्याने दुसऱ्यांची वास्तविक आणि लाभदायक सेवा करून, न्यायास अनुसरून त्याची किमत प्राप्त करावी.

वैध साधन प्रणालीस अनुसरून कमविलेल्या धन-संपत्तीवर इस्लाम व्यक्तींच्या मालकी अधिकारांना मान्यता देतो. परंतु हे अधिकार मात्र अमर्यादित नाहीत. तो मानवास नियमबद्ध करतो की त्याने आपली वैध मिळकत योग्य कामांतच खर्च करावी. खर्चावर इस्लामने अशा प्रकारचे नियम लागू केलेत की या नियमांच्या फलस्वरूप मानवाने चांगले स्वच्छ जीवन अवश्य जगावे परंतु व्यभिचारात संपत्तीचा शिमगा खेळू नये. तसेच आपल्या समृद्धीच्या प्रदर्शनात आखून दिलेल्या मर्यांदाबाहेर जाऊ नये की ज्यामुळे इतरावर त्याचे हकनाक प्रभुत्व गाजत रहावे. अपंगाच्या काही बाबतीत तर इस्लामी कायद्याने स्पष्ट स्वरूपात बंदी घातली आहे. व इतर काही प्रकारांचा स्पष्ट उल्लेख नसला तरी इस्लामी शासनास हा अधिकार प्राप्त आहे की, संपत्तीची अयोग्य रितीने विल्हेवाट लावणाऱ्यांना बळाचा वापर करून रोखावे.

वैध आणि योग्य खर्चा नंतर जी संपत्ती माणसाजवळ शिल्लक राहते ती संपत्ती तो जमा करू शकतो. आणि परत त्या संपत्तीचा धनोपार्जनासाठी वापर सुद्धा करू शकतो. मात्र या दोन्ही अधिकारावर पण नियम लागू आहेत. संपत्ती जमा करावयाची असल्यास हा नियम लागू आहे की, जमा राशी एका निश्चित मर्यादेपेक्षा वाढल्यास अडीच टक्के वार्षिक जकात द्यावी लागेल. संपत्तीची व्यवसायात गुतंवणूक करावयाची असल्यास केवळ वैध व्यवसायातच तिची गुतंवणूक करता येईल. मग तो वैध व्यवसाय स्वतःहून केलेला असो, अथवा दुसऱ्याला आपले भांडवल, नगदी राशी, जमीन किवा यंत्र सामग्रीच्या स्वरूपात देऊन नफ्यातोट्यामध्ये वाटेकरी होऊन करायचा असो. हे दोन्ही प्रकार वैध व नैतिक आहेत. या मर्यादा व नियमांचे पालन करून जर कोणी कोट्याधिष अब्जाधिष होत असेल तर इस्लाम ही बाब मान्य करतो. व या बाबीस ईश्वराचे वरदान समजतो. परंतु सामाजिक हिताकरिता इस्लाम यावर दोन नियम लागू करतो. प्रथम हे की व्यवसायीकाने आपल्या व्यापारिक स्टॉक आणि कृषी उत्पादनावर जकात द्यावी. द्वितीय हे की, त्याने आपल्या व्यवसायात, उद्योगात किवा कृषी कार्यात ज्या लोकांबरोबर भागिदारीचा अथवा मजूरीचा व्यवहार केलेला असेल त्यांच्याशी न्याय पूर्ण व्यवहार करावा. यदाकदाचित व्यवसायिक स्वतः योग्य न्याय करू शकत नसेल तर इस्लामी शासन त्याला न्याय करण्यास विवश करील.

तसेच वैध प्रणाली द्वारे गोळा झालेल्या संप्ततीला सुद्धा इस्लाम जास्त मुदतीपर्यंत एककेंद्रीत राहू देत नाही. या उलट वारसा हक्काच्या कायद्यानुसार, तिला पिढी दर पिढी हस्तांतरीत करीत असतो. या बाबतीत इस्लामी कायद्याचा कल जगातील इतर कायद्यापेक्षा भिन्न आहे. इस्लामेतर कायदे असा प्रयत्न करतात की जी संपत्ती एकदा गोळा झाली की ती पिढी दर पिढी एकाच ठिकाणी जमा असावी. या उलट इस्लामचा हा कायदा आहे की, जी संपत्ती एखाद्या व्यक्तीने आपल्या हयातीत (आयुष्यात) गोळा केली असेल त्याच्या मृत्यूनंतर ती संपत्ती तात्काळ त्याच्या सग्यासोयऱ्यात व नातलगात वाटली जावी. जवळचे नातलग नसल्यास दूरच्या सग्या सोयऱ्यात त्यांच्या निश्चित व नियमित वाट्यानुसार ती संपत्ती वाटली जाईल. ते सुद्धा नसतील तर मग मुस्लिम समाजाचा त्यावर अधिकार असणारा कायदा व नियम एखाद्या मोठ्या भांडवलदारीला आणि जमिनदारीला सुरक्षित व कायम स्वरुपी राहू देत नाही. वरील सर्व आर्थिक नियमांचे पालन केल्यानंतर सुद्धा संप्ततीच्या केंद्रीकरणामुळे एखादी त्रुटी जर निर्माण झालीच तर वारसा हक्क संबंधीचा हा शेवटचा व अंतीम घाव त्या त्रूटीस समाप्त करतो.

संबंधित लेख

  • रोजाचे महत्त्वाचे फायदे

    ईशपरायणता रोजामुळे मनुष्यात निर्माण होते हे कळल्यानंतर इतर महत्त्वाचे काही विचार करण्यासाठी उरत नाहीत, कारण जो ईशपरायणता धारण करतो तो अल्लाह आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांनी घालून दिलेल्या मर्यादांचे तंतोतंत पालन करीत राहतो. यामध्ये संपूर्ण धर्माचरण समाविष्ट आहे. तरी आणखी काही फायदे रोजामुळे होतात त्यांना आपण येथे पाहू या, जेणेकरून आपणास रोजाचे अनन्यसाधारण महत्त्व कळून येईल.
  • ...आणि भूतलावर उपद्रव माजवू नका

    न्यायाचे तीन पैलू आहेत वैधानिक न्याय, सामूहिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय न्याय.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]