Islam Darshan

पूर्व आशियातील आर्थिक अस्थैर्य

Published : Sunday, Mar 06, 2016

पूर्व आशियातील काही राष्ट्रांनी जबरदस्त आर्थिक प्रगती केली असल्याने त्यांना पौर्वात्य वाघ(Eastern Tigers) म्हटले जाते. परंतु इ. स. १९९७ मध्ये त्यांच्यावर आर्थिक अस्थैर्याचे संकट आले. त्यांच्या शासनाची अर्थनीती अतिशय पोकळ नसूनसुद्धा या परिस्थितीचे काय कारण आहे? एवढेच नव्हे तर तेथील बजेटमध्ये सामान्यतः कोणतीच घसरण(Deficit) नसून उलट बचतच(Surplus) होती. शिवाय या देशातील एकूण बचती राष्ट्रीय उत्पन्नाच्या पस्तीस टक्के होती. ही बाब बर्याच प्रगत देशांसाठी अभिमानास्पद होती.

परंतु एवढे सर्वकाही असूनही असे का घडले? याचे एक मोठे कारण तज्ञांनी सर्वसहमतीने हे समोर ठेवले की, अल्पमुदतींच्या विदेशी कर्जांचा या देशातील प्रवाह(Inflow) बाहेरून येणार्या एकूण भांडवलाच्या साठ टक्क्यापेक्षाही जास्त होता. यामुळे तेथील स्थानिक बँकांनी अल्प मुदतींच्या कर्जासाठी आपल्या तिजोरींची दारे उघडली होती. वर उल्लेख केल्याप्रमाणे की, अशा कर्जांच्या वृद्धीमुळे जुगारात भयंकर वाढ होत असते. या अल्प मुदतीच्या कर्जांमुळे ‘स्टॉक आणि प्रॉपर्टी मार्केट’ मध्ये जुगार व्यवसाय फोफावला व परिणामी किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाली. बँकांनी नेहमीप्रमाणेच जामिनांवर विश्वास करण्याची घोडचूक केली होती आणि कर्जामागील सामान्य जोखीम(Risk) चा अनुमान लावला नव्हता. परिस्थिती बदलताच बिदेशी बँका आपापल्या अल्प मुदतींवर दिलेल्या कर्जंफेडीचा तगादा लावू लागल्या आणि कर्ज घेणार्यांना आपापल्या वस्तु बेभाव विकण्याची नामुष्की पत्करावी लागली. ‘स्टॉक’ आणि ‘प्रॉपर्टी’ मार्केटमधील दरांत कमालीची घसरण आली आणि परिणामी कर्ज फेडणे अशक्य होऊन बसले. बँकिग व्यवस्थेत जबरदस्त अस्थैर्य निर्माण झाले आणि आंतरराष्ट्रीय बँकांत स्थैर्य निर्माण करण्यासाठी(Bailout) आणखीन मोठे कर्ज घेणे भाग पडले. अशा प्रकारे विदेशी बँकांवरील संकट तर टळले खरे, परंतु देशी बँकांवर जे कर्ज होते, त्या कर्जाचे ओझे तेथील शासनावर आले. आता शासन कर्जबाजारी झाल्याने शासनाचे हे कर्ज कोण फेडणार? तर हे कर्ज फेडण्यासाठी शासनाने जनतेवर कर लादते.

या ठिकाणी जर इस्लामी व्याजमुक्त अर्थव्यवस्था असती तर बँक नफा व तोटा या दोन्हींत सहभागी झाली असती आणि संकटमय परिस्थितीचा योग्य अनुमान लावून जामिनावर(Collateral) फाजील विश्वास ठेवला नसता. अशाप्रकारे एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज देण्यात आले नसते. परिणामी ‘स्टॉक’ आणि ‘प्रॉपर्टी मार्केट’ मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरण न येता उलट दरवाढतच झाली असती. नफा आणि तोट्यांतील सहभागामुळे बँकिग व्यवस्थेत एक प्रकारे शिस्त(Discipline) निर्माण होऊन अस्थैर्य येत नाही. ही बाब तर आता आंतरराष्ट्रीय तज्ञसुद्धा स्वीकारत आहेत.

‘एल.टी. सी.एम.’ मधील अस्थैर्य:

"LTCM' (Long Term Capital Management) हे अमेरिकेतील एक ‘हेज फंड’(Hedge Fund) असून याचा मूळ उद्देश ‘स्टॉक’, ‘प्रॉपर्टी’, ‘वस्तु’ आणि विदेशी चलन बदलाच्या(Stock Exchange) बाजारात जुगार व्यवसाय करणे होय. अशा प्रकारच्या ‘हेज फेड’मध्ये स्वतःचे भांडवल(Equity) कमी आणि कर्जावर जास्त विश्वास असतो. अशा प्रकारे यांचा ‘लेव्हरेज’(Leverage) इतरांच्या तुलनेत जास्त असतो. अशा प्रकारच्या फंड्समुळे ‘आंतरराष्ट्रीय स्टॉक, प्रॉपर्टी आणि विदेशी चलन बदलात’(Stock Exchange Market) कमालीचे अस्थैर्य निर्माण झाले आहे. ‘एल.टी.सी.एम.’ चे स्वतःचे भांडवल अस्थैर्यापूर्वी चार बिलियन डॉलर्सपेक्षा थोडेस जास्त होते. परंतु लेव्हरेज(Leverage) मात्र पंचवीस डॉलर्सचे कर्ज घेतलेले होते. जेव्हा विविध कारणांमुळे तेथील स्थिर भांडवलाचे दर खाली येऊ लागले, तेव्हा आणखीन कर्ज घेणे भाग पडले आणि ‘लेव्हेरेज’ पन्नास डॉलर्स एवढे झाले. कर्ज देण्याच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे ‘लेव्हरेज’ १६७ वर जाऊन ठेपले. अमेरिकेची ‘फेडरल रिझर्व्ह बँक’ जर वेळीच मदतीस धावून आली नसती, तर याचे संकट जगातील पूर्व बँकांवर आले असते आणि संपूर्ण जगालाच याचे दुष्परिणाम भोगावे लागले असते व गरीब देशांना तर याची जास्तच झळ पोचली असती.

विदेशी चलन बदलाच्या(Foreign Exchange)बाजारातील अस्थैर्य :

अल्पमुदतीच्या कर्जांवर जास्त अवलंबून असल्यामुळे आंतरराष्ट्रीय चलनबदलाच्या(Foreign Exchange) बाजारांत मोठ्या प्रमाणात अस्थिरता निर्माण झाली. एप्रिल १९९८ मधील दररोजची खरेदी-विक्रीची उलाढाल(Turnover) १९४० बिलियन डॉलर्स होती. याच्या तुलनेत वस्तुंच्या व्यापाराची दररोजीच आवकजावक ही केवळ ३० बिलियन डॉलर्सच्या आसपास होती. अशा प्रकारे या दोन्हीतील प्रमाण जगभरात १:४९ एवढे होते. यावरून हेच स्पष्ट होते की, विदेशी चलनबदलाच्या खरेदी-विक्रीचा बराच भाग हा जुगारावर खर्च होत असल्याने चलनबदलाच्या दरात असामान्य चढ-उतार झाला. म्हणूनच BIS(बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स -Bank for International Settlements) च्या महाव्यवस्थापक ‘अॅन्ड्रयू क्रोकेट(Andrew Crocket) यांनी अगदी बरोबर सांगितले की, आपली वित्तव्यवस्था परतफेड व्यवस्थेची कंबर मोड झाल्याने असुरक्षित होत आहे.

अल्पमुदतीच्या कर्जांवर जास्त भिस्त असणे योग्य नसल्यास दीर्घ मुदतीच्या नफा व तोट्यातील सहभागावर आधारित असलेली भांडवल-गुंतवणूक(Equity) वाढीस लावावी. कारण गुंतवणुकदार योग्य योजनेचा अभ्यास व शहानिशा करूनच त्यात गुंतवणूक करील. यामुळे भांडवल गुंतवणुकीत शिस्त निर्माण होऊन आर्थिक प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. म्हणूनच जी.एल.बॅच(G.L.Bach), जोअॅन रॉबिनसन(Joan Robinson), किडलबर्गर चार्ल्स(Kindleberger Charls), हायमॅन मिन्स्की(Hyman Minsky), आणि केनिथ रोगॉफ(Kenneth Rogoff) यासारखे आंतरराष्ट्रीय अर्थतज्ञ या निष्कर्षावर पोचले की, वैयक्तिक भांडवलावर जास्त अवलंबून असलेल्या भांडवल गुंतवणुकी या मुळात कर्जांवर जास्त विश्वास टाकण्यात आलेल्या वित्ताच्या तुलनेत अधिक स्थिर असेल.

निष्कर्ष

यावरून हेच स्पष्ट होते की, वैयक्तिक रोख्यांच्या भांडवल गुंतवणुकीवर आधारित असलेली व्यवस्था ही निश्चितच मानवकल्याणासाठी मोठी फायदेशीर आहे. अशा व्यवस्थेत समस्तजणांच्या जीवनावश्यक गरजा अतिशय चांगल्या प्रकारे पूर्ण होतील. सर्वांनाच प्रतिष्ठित रोजगार उपलब्ध होईल. कारण संपत्तीचे वाटप समान स्वरूपात असेल व वित्तीय आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त झालेले असेल. भांडवलशाही व्यवस्थेमध्ये या हेतुंची पूर्तता प्रभावीपणे होणे शक्यच नाही. या अपयशाचे कारण ही व्यवस्था चालविणार्यांचा अप्रामाणिकपणा नसून या अपयशाचे खरे आणि वास्तविक कारण हे या व्यवस्थेतील मूळ उद्देश आणि नीतीमधील विषमता होय. कारण या(भांडवलशाही समर्थक) देशांचा घोषित मूळ उद्देश हा मानवकल्याण असून मूळ स्त्रोत हा या राष्ट्रांचे धार्मिक शासन आहे. तरीसुद्धा याच्या अगदी विरुद्ध त्यांच्या नीतीचा पाया हा धार्मिक शासनावर आधारित नसून ‘सोशल डाव्र्हिनिज्म’ या निधर्मी विचारधारणेवर आधारित आहे. ही विचारधाराच मुळात सशक्त आणि सबळजणांचे रक्षण व स्थैर्य आणि दुर्बलांच्या शोषणावर आधारित आहे. ही अर्थनीती भांडवलाच्या विभिन्न वापरांदरम्यान होणार्या वाटणीसाठी(Allocation of Resources) व्याजालाच प्रमुख महत्त्व देते. यामुळे श्रीमंतवर्गास साधनप्राप्तीमध्ये वरिष्ठत्व मिळते. एवढेच नव्हे तर श्रीमंत आणखीनच श्रीमंत होत जातात आणि मग व्यभिचार, जुगार व सट्टेबाजी यासारखा अपव्यय व पैशांची उधळपट्टी होत असते. परिणामस्वरूप मानवकल्याण हे केवळ दिवास्वप्नच होऊन बसते आणि आंतरराष्ट्रीय बाजारात भूकंपसदृश्य अस्थैर्य निर्माण होते. म्हणूनच ‘मिल्स’(Mills) आणि ‘प्रेसले’(Presley) यांनी म्हटले की,

‘‘आपण जर इतिहासात सिहावलोकण केले तर या गोष्टीवर विश्वास करण्यासाठी आपल्याला बरेच पुरावे सापडतील की, सोळाव्या शतकात युरोपमध्ये व्याजाच्या निषिद्धतेचा विरोध केला गेला नसता तर किती उत्तम झाले असते. व्याज निषिद्धतेच्या नैतिक भूमिकेमागे जे तात्त्विक कारण आहे, त्याचे त्यावेळी खरे आकलन झालेच नाही.’’(संदर्भ:Mills and Presley, 1999 P. 120)

संबंधित लेख

  • ‘उहुद’चे ऐतिहासिक युद्ध

    ‘सवीक’च्या युद्धानंतर मक्का सरदार ‘अबू सुफियान’ची मुस्लिमांचा वचपा काढण्याची शपथदेखील वरवर पूर्ण होताना दिसत असली तरी ‘माननीय जैद बिन हारिसा(र)’ यांच्या हातून व्यापारी काफिल्याशी लढाई होऊन एक लाख दिरहमचे जे नुकसान झालेले होते आणि ‘बद्र’च्या युद्धात कैदी सोडविण्यासाठी जे अडीच लाख दिरहम मोजावे लागले होते, त्यामुळे मक्का शहरात प्रेषित मुहम्मद(स) आणि मुस्लिमांविरुद्ध संताप धुमसत होता. अबू सुफियानवर मदीनावर हल्ला करण्यासाठी सतत दबाव येत होता. त्यामुळे अबू सुफियानने मदीनावर हल्ला करण्याची घोषणा केली.
  • सुरक्षाबलांची अमानवीयता

    ही प्रवृत्ती फक्त सर्वसामान्यांमध्ये आढळली जात नाही, तर प्रशासनाच्या त्या लोकांमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहे जे शांती स्थापनेसाठी जबाबदार आहेत. यातना आणि कैदेतील मृत्यु आता रोजच्या घटना बनलेल्या आहेत. मानवाधिकारांच्या आंतरराष्ट्रीय सिम्पोजीयमच्या प्रबंध समितीचे अध्यक्ष जस्टीस वी. एस. मलमैध आपल्या एका भाषणात म्हणतात की देशातील पोलीस स्टेशनांमध्येसुध्दा यातना देण्याच्या घटना होत आहेत.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]