Islam Darshan

वर्तमानकाळातील अपराध : लैंगिकअपराध

Published : Saturday, Mar 05, 2016

वर्तमान काळातील गुन्हेगारीचे भीषण तांडव पाहून केवळ नागरिक, विचारवंत, पोलीस यंत्रणा व न्यायसंस्थांच्या झोपा उडाल्या, असे नव्हे तर या भयानक परीस्थितीची जाणीव स्वतः गुन्हेगारांना आणि गुन्हेगारी जगताशी धागेदारे असणार्यांनासुद्धा बर्याच प्रमाणात आहे. गुन्हेगारीचे भरपूर चेहरे आहेत. समस्त समाजावर हिचा क्रूर विळखा पडलेला आहे. वैयत्तिक जीवनापासून सामाजिक जीवनापर्यंतची सर्वच क्षेत्रे यामुळे ढवळून निघाली आहेत. नैतिकता, अर्थकारण, राजकारण असो की युद्धभूमी असो, सर्वच ठिकाणी हिचे भयानक सावट पडलेले आहे. शिक्षित, अशिक्षित, मुले, मुली, तरुण, म्हातारे, स्त्री, पुरुष, सर्वच या गुन्हेगारीच्या कचाट्यात सापडले आहेत. एवढेच नव्हे तर शासन व शासकवर्ग तर यामध्ये सर्वांत जास्त बरबटलेले दिसते, नव्हे शासन स्वतः गुन्हेगारीच्या फोफावलेल्या विषारी जंगलास खतपाणी घालीत आहे.

काळजी वाढविणारी दुसरी विशेष बाब अशी की, गुन्हेगारी करण्याच्या नवनवीन पद्धतींचा शोध लावण्यात येत आहे. उदाहरणार्थ, व्यभिचार करणे एक लैंगिक अपराध आहे. मात्र वर्तमानकाळात हा अपराध नवीन पद्धतीने करण्यात येतो, बलात्कार, सामूहिक बलात्कार, लग्नाचे आमिष देऊन महीनोन् महिने आणि वर्षानुवर्षे करण्यात येणारा पाशवी बलात्कार, अल्पवयीन मुलींचा आणि मुलांचा क्रूर लैंगिक छळ, या स्वरुपाचे अपराध राजरोसपणे होत आहेत. मागच्या काळात एखाद्याची हत्या करून जास्तीतजास्त त्याचे शिर धडावेगळे करण्यात येत असे. मात्र आज क्रौर्याने इतके भयानक आणि उग्र स्वरुप धारण केले आहे की, खुन्याचे समाधान केवळ शिर धडावेगळे केल्याने होत नसून तो मृताच्या शवाचे तुकडे तुकडे करून त्याच्या प्रत्येक तुकड्याशी खेळून आपल्या अघोरी भावना थंड करतो. विविध प्रकारे हत्या करून मृतांचे शव आगीत जाळतो. एवढेच नव्हे तर हत्या करण्याच्या अशा विचित्र आणि विक्षिप्त पद्धती आपल्यासमोर येत आहेत की, यापूर्वी अशा प्रकारची कोणी कल्पनासुद्धा करू शकत नसे, शिवाय आजही या भयानक पद्धतीं पाहून मनाचा थरकाप उडतो.

संबंधित लेख

  • जगात एखादे कार्य विकास पावत असल्यास विरोधकांचा विरोध तीव्र होत जातो

    या जगात एखादे कार्य विकास पावत असल्यास जळफळाट करून घेणार्यांचा विरोध आणखीनच तीव्र होत जातो. मक्कामध्येदेखील असेच घडले. एकीकडे दोन प्रमुख व्यक्ती क्रांतिदूत आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या आंदोलनात सहभागी झाल्याने इस्लामी आंदोलनास बळ प्राप्त झाले, तर दुसरीकडे विरोधकांचा जळफळाट होऊन त्यांच्या विरोधाच्या ज्वाला अधिक तीव्र झाल्या.
  • इस्लामी राज्याच्या कल्याणकारी जबाबदाऱ्या

    वर ज्या हदीसचा आधार दिला गेला आहे, त्यावरुन इस्लामी शासनाच्या खालील जबाबदाऱ्यावर प्रकार पडतो. इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स) यांना (अर्थांत इस्लामी शासनातील प्रधानमंत्री) ही जाणीव होती की बेकारांना उद्योग उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्या काळच्या परिस्थितीनुरुप प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्या माणसाला उद्योग उपलब्ध करुन दिला. प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्या माणसाला पुन्हा एकदा येवून आपल्या स्थितीची खबर देण्यास सांगितले, ही गोष्टसुद्धा याच जबाबदारीच्या जाणिवेची सूचक आहे. राज्याच्या प्रधानमंत्र्यांना असलेल्या जबाबदारीच्या जाणिवेची जी झलक इस्लामी जगताला आजपासून तेराशे वर्षापूर्वी दिसली ती वर्तमान काळातील सर्वात आधुनिक अर्थशास्त्रीय व राजनैतिक तत्त्वाशी व सिद्धान्ताशी पूर्णपणे एकरुप आहे. राज्यातील बेकारांना उद्योग उपलब्ध करुन देता आला नाही तर त्यांची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत त्यांच्या उदरनिर्वाहाचा भार शासनाच्या खजिन्यावर असे. कारण मुस्लिम तर त्यांचा स्वतःचा प्रश्न असो अथवा राज्य व इतर नागरिकांचा, सर्वाशी औदार्यपूर्ण वर्तन करीत आले आहेत.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]