Islam Darshan

इस्लामी न्याय व्यवस्थेची मूलतत्त्वे

Published : Saturday, Mar 05, 2016

जी गोष्ट सुरुवातीलाच समजून घेणे आवश्यक आहे ती ही की, जी व्यक्ती, ‘‘इस्लाममध्ये न्याय आहे’’ म्हणते, ती वास्तवात अल्प-स्वल्प मत मांडत असते. वस्तुस्थिती अशी आहे की न्याय हेच इस्लामचे उद्दीष्ट/साध्य आहे. आणि न्यायाची प्रस्थापना करण्यासाठीच इस्लाम अवतरला आहे. अल्लाह कुरआन मध्ये सांगतो,

‘‘आम्ही आमच्या प्रेषितांना स्पष्ट संकेतासह पाठविले आणि त्यांचे सोबत ग्रंथ आणि तुला अवतरित केली, की ज्यामुळे माणसाने न्यायावर अढळ रहावे आणि लोह उतरविले ज्यात फार शक्ती आणि लोकांसाठी फायदा आहे, ज्यामुळे अल्लाहने हे जाणावे की कोण पाहिल्याशिवाय त्याची आणि त्याच्या प्रेषिताची मदत करतो. खचितच अल्लाह मोठा शक्तीशाली आणि प्रभुत्वसंपन्न आहे." (कुरआन ५७: २५)

या दोन बाबी आहेत ज्यापासून जर एक मुस्लिम अनभिज्ञ नसेल, तर तो सामाजिक न्यायाच्या शोधात अल्लाह आणि त्याच्या प्रेषित (स.) यांना सोडून कुण्या दुसऱ्या स्त्रोताकडे लक्ष देण्याची चूक कदापि करणार नाही. ज्या क्षणी त्याला न्यायाच्या आवश्यकतेची जाणीव होईल तत्क्षणी त्याला माहीत होईल की अल्लाह आणि त्याचे प्रेषित मुहम्मद (स.) यांचे व्यतिरिक्त ना कुणाजवळ न्याय आहे ना असू शकतो. आणि तो हे ही जाणून घेईल की न्याय स्थापित करण्यासाठी दुसरे काही करावयाची गरज नाही फक्त इस्लाम, कसल्याही प्रकारे त्यामध्ये कमी-अधिक न करता संपूर्णपणे स्थापित केला जावा. न्याय, इस्लामपेक्षा वेगळा काहीही नाही. इस्लाम स्वतःच न्याय आहे. त्याची प्रस्थापना होणे किवा न्यायाची प्रस्थापना होणे एकच आहे.

सामाजिक न्याय

सर्वप्रथम आम्हास जरा सामाजिक न्याय काय आहे व तो कोणत्या प्रकारे लागू केला जाऊ शकतो? हे पाहणे आवश्यक आहे.

मानवी व्यक्तिमत्वाचा विकास

प्रत्येक मानवी समाज हजारो, लाखो आणि करोडो लोकांचा मिळून बनत असतो. या संयुक्त समुहातील प्रत्येक व्यक्ती आत्मा, बुद्धि आणि विवेक बाळगत असतो. प्रत्येक व्यक्ती स्वतःचं एक वेगळं व्यक्तिमत्व बाळगून असते ज्याच्या भरभराटीसाठी व विकसित होण्यास योग्य संधीची आवश्यकता असते. प्रत्येकास आपला वैयक्तिक छंद आहे, ज्याला आपल्या इच्छा-आकांक्षा आणि आवडी निवडी आहेत. त्याच्या स्वतःच्या शरीर व आत्म्याच्या काही गरजा आहेत. हे लोक म्हणजे काही मशिनीचे निर्जीव सुटे भाग नाहीत की मुख्य भाग मशीन असून हे सुटे भाग केवळ मशीनसाठी आवश्यक असावेत आणि ह्या सुटया भागाचं आपलं स्वतःचं अस्तित्व नसावं. तथापि मानवी समाज हा जिवंत लोकांचा एक समूह आहे. हा व्यक्ती समूहासाठी नसून समूह व्यक्तीसाठी आहे, आणि अनेक लोक मिळून समूह यासाठी बनवित असतात की, एकमेकांच्या मदतीने त्यांना आपल्या गरजांच्या पूर्तता व आपल्या मन व शरीराच्या गरजा आणि अपेक्षांची पूर्ती करण्यास संधी प्राप्त व्हाव्यात.

वैयक्तिक जबाबदारी

आणि मग एक-एक करुन सर्व सदस्य ईश्वरासमोर उत्तरदायी आहेत. प्रत्येकास या ऐहिक जगातील परीक्षेचा विशिष्ट कालावधी (जो प्रत्येकास वेगवेगळा निश्चित केला गेला आहे) व्यतित केल्यानंतर आपल्या ईश्वरासमोर उपस्थित राहून हिशोब द्यावयाचा आहे, की जे बळ आणि जे गुण त्याला जगातील वास्तव्यात दिले गेले होते त्यांच्या साह्याने व जी साधने त्याला दिली गेली होती त्यांच्या मदतीने त्याने आपले व्यक्तिमत्व कसे घडवून आणले आहे. ईश्वरासमक्ष माणसाचे हे उत्तरदायित्व सामूहिक स्वरुपात नसून वैयक्तिक असेल. त्या ठिकाणी वंश, समुदाय आणि जाती उभ्या राहून हिशोब देणार नाहीत तर, जगातील सर्व संबंधांचा विच्छेद करुन ईश्वर प्रत्येकाला आपल्या न्यायासनासमोर हाजिर करील आणि प्रत्येकास तू काय करुन आलास आणि काय बनून आलास याचा वेगवेगळा हिशोब घेईल.

व्यक्ती स्वातंत्र्य

या दोन्ही बाबी अर्थात ऐहिक जगातील मानवी व्यक्तिमत्व विकास आणि पारलौकीक जीवनातील माणसाचे उत्तरदायी असणे, ह्या गोष्टीची गरज प्रतिपादित करतात की जगात माणसाला स्वातंत्र्य असले पाहिजे. कुठल्याही समाजात जर मनुष्यास आपल्या पसंतीनुसार आपल्या व्यक्तिमत्व विकासाची संधी प्राप्त होत नसेल तर त्याच्यातील माणुसकी गोठून जाते. त्याला अस्वस्थता जाणवते, त्याच्यातील बळ आणि गुण उपेक्षित राहतात आणि आपली चोहोबाजूने कोंडी झाल्याच्या व बंधनात बांधल्या गेल्याच्या जाणीवेने मनुष्य शिथिल आणि निरुपयोगी बनून जातो. मग पारलौकिक जीवनात या बंधनात अडकलेल्या लोकांच्या दोषांकरिता अशा प्रकारची सामाजिक व्यवस्था निर्माण करणारे व चालवणारे त्यांच्यावर अधिकतर जबाबदाऱ्या निश्चित केल्या जातील. त्यांच्याकडून केवळ त्यांच्या वैयक्तिक कर्मांचाच हिशोब घेतला जाणार नाही तर याही गोष्टीचा हिशोब घेतला जाईल की त्यांनी एक अत्याचारी व्यवस्था निर्माण करुन ते दुसऱ्या असंख्य लोकांचे त्यांच्या इच्छेविरुद्ध आणि आपल्या मर्जीनुसार अर्धवट व्यक्तित्व घडण्यास कारणीभूत ठरेल. पारलौकीक जीवनावर दृढविश्वास असणारी कोणतीही व्यक्ती हे अवघड ओझे घेऊन ईश्वरा समोर जाण्याची कल्पनाही करु शकत नाही, ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे. तो जर ईशभय बाळगणारा असेल तर नक्कीच लोकांना जास्तीत जास्त व्यक्तिस्वातंत्र्य देण्याकडे त्याचा कल राहील, ज्यामुळे प्रत्येक व्यक्ती ज्या प्रकारची घडेल ती स्वतःच्या जबाबदारीच्या आधारावर घडेल त्यामुळे तिचे चुकीचे व्यक्तिमत्व घडण्याची जबाबदारी सामाजिक व्यवस्था चालवणाऱ्यावर येणार नाही.

सामाजिक संस्था आणि त्यांची सत्ता

हा मामला तर व्यक्तीस्वातंत्र्याशी संबंधित आहे. दुसऱ्या बाजूला समाजाकडे पहा जो कुटुंब, नातेसमुह, जातीसंस्था आणि संपूर्ण मानवी समूहाच्या रुपात पूर्वापार क्रमाने व्यवस्थित असतो. याची सुरुवात एक पुरुष आणि एक स्त्री आणि त्यांच्या प्रतोत्पत्तीने होते, ज्याचे कुटुंब बनते. या कुटुंबापासून नातेसमूह आणि भाऊबंदकी तयार होतात, त्यापासून एका समाजाची निर्मिती होते आणि समाज आपल्या सामूहिक हेतूच्या पूर्णत्वासाठी एक शासन व्यवस्था निर्माण करतो. वेगवेगळ्या रुपातील ह्या सामाजिक संस्था ज्या मुलभुत उद्देशासाठी आवश्यक आहेत तो हा की, यांचे संरक्षणाने व सहाय्याने लोकांना व्यक्तीमत्व विकासाच्या संधी प्राप्त होतात. ज्या तो वैयक्तिक बळावर प्राप्त करु शकत नाही. परंतु जोपर्यंत प्रत्येक संस्थेला व्यक्तीवर, आणि मोठ्या संस्थेला छोटया संस्थेवर अधिकार प्राप्त होत नाही तोपर्यंत या मुलभुत उद्देशाची प्राप्ती अशक्य आहे, ज्यामुळे या संस्था लोकांना आपसात हस्तक्षेप करण्यास प्रतिबंध करतील व लोकांकडून अशी सेवा उपलब्ध करुन घेतील जी सारासार सर्व समाजाच्या सर्व घटकांच्या कल्याणासाठी व प्रगतिसाठी आवश्यक असेल.

या स्थानावर पोहोचल्यानंतर सामाजिक न्यायाचा प्रश्न उद्भवतो व वैयक्तिक आणि सार्वजनिक पातळीवर परस्पर विरोधी गरजा एका गुंत्याचे स्वरुप धारण करतात. एकीकडे मानवी कल्याण व्यक्तीला समाजात स्वातंत्र्याची गरज प्रतिपादित करते ज्यामुळे तो आपली योग्यता व पसंतीनुसार आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करु शकेल आणि याच प्रकारे कुटुंब, सामाजिक संस्था आणि वेगवेगळ्या समूहांना सुद्धा आपल्या वर्तुळात राहून या स्वातंत्र्याचा लाभ घेणे शक्य होईल. ह्याची त्यांना आपापल्या क्षेत्रात गरज आहे.

परंतु दुसरीकडे मानवी कल्याणाचीच ही गरज आहे की, व्यक्तीवर कुटुंबाचे कुटुंबावर भाउबंदकी व सामाजिक संस्थेचे आणि सर्वावर आणि छोटया संस्थांवर सरकारचे नियंत्रण असावे जेणेकरुन कुणीही आपल्या मर्यादांचे उल्लंघन करुन दुसऱ्यावर अन्याय व अत्याचार करणार नाही. हाच प्रश्न पुढे संपूर्ण मानवी समुहाबाबत अशासाठी उद्भवतो की, एकीकडे प्रत्येक सामाजिक संस्था व सरकार स्वतंत्र व प्रभावशाली असणेही आवश्यक आहे तर दुसरीकडे कुणा सर्वोच्च शक्तीचे अस्तित्वही आवश्यक आहे. ज्यामुळे या शक्ती आणि शासनव्यवस्था आपल्या मर्यादांचे उल्लंघन करणार नाहीत.

आणि ज्याला सामाजिक न्याय म्हणतात ते हे की, व्यक्ती, कुटुंब, कुळ, बिरादारी आणि सामाजिक संस्थेमध्ये प्रत्येकास योग्य ते स्वातंत्र्यही हवे आणि त्याचबरोबर अन्याय व अत्याचाराच्या प्रतिबंधासाठी विविध सामाजिक संस्थांचे लोकांवर आणि एकमेकींवर नियंत्रणही हवे; आणि वेगवेगळ्या व्यक्ती आणि समूहाकडून त्या सेवाही प्राप्त केल्या जाऊ शकतील ज्या सामाजिक कल्याणासाठी आवश्यक आहेत.

 

 

 

इस्लामी न्याय

इस्लाममध्ये ज्या गोष्टीला न्याय म्हटलं जातं ती नेमकी काय आहे? कोणत्याही व्यक्तीने अथवा लोकसमूहाने मानवी जीवनात न्यायाची कोणतीही तत्वे अथवा त्याच्या लागू करण्यासंबंधीचे कायदे स्वतः बसून निश्चित करावेत आणि त्यांना लोकांवर बलपूर्वक लागू करावेत. तसेच बोलणाराच्या जिभेवर नियंत्रण आणावे. या गोष्टींना इस्लाममध्ये मुळीच स्थान नाही. इस्लाममध्ये कुणी हुकूमशहाचे कुठलेही स्थान नाही. माणसाने ज्याच्या आदेशासमोर निसंकोच डोके झुकवावे ते स्थान केवळ अल्लाह (ईश्वर) चेच आहे.

ईश्वराचे प्रेषित मुहम्मद (स) स्वतः सुद्धा ईश्वरी आदेशाच्या अंकित असत आणि प्रेषित मुहम्मद (स) यांच्या आदेशांचे पालन करणे यासाठी अनिवार्य आहे की, ते स्वतःच्या अंगच्या तत्वानुसार कुठलाही आदेश न देता ईश्वराच्या वतीने आदेश देत असत.

प्रेषित मुहम्मद (स) आणि त्यांच्या साथिदारांच्या शासन व्यवस्थेत केवळ अल्लाहचेच कायदे टीकामुक्त प्रमाण होते. त्यानंतर प्रत्येक व्यक्तीस प्रत्येक वेळी प्रत्येक बाबतीत बोलण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असे.

संबंधित लेख

  • मानवाचे मौलिक अधिकार

    आम्हा मुसलमानांसाठी मानवाच्या मौलिक अधिकारांची कल्पना काही नवी कल्पना नाही. हे शक्य आहे की दुसर्या लोकांच्या दृष्टीने या हक्कांचा इतिहास युनोच्या चार्टरपासून सुरू होत असेल अथवा इंग्लंडच्या मॅग्राकार्टापासून प्रारंभ झाला असेल. परंतु आमच्यासाठी या कल्पनेचा आरंभ फार पूर्वीच झाला आहे. या प्रसंगी मानवाच्या मौलिक अधिकारांवर प्रकाश टाकण्यापूर्वी संक्षेपात मी हे सांगणे आवश्यक समजतो की मानवी हक्कांच्या कल्पनेचा आरंभ कसा झाला.
  • परिवाराचे धार्मिक आणि नैतिक प्रशिक्षण

    पत्नी-मुलंबाळ आणि कुटूंबावाल्यांच्या भौतिक आणि आर्थिक आवश्यकताच्या पुर्तिच्या सोबतच त्यांची धार्मिक आणि नैतिक परिस्थिती चांगले करणे आणि त्यास उत्तोम-उत्तम बनविण्याचा प्रयत्न करायला हवा. ही मनुष्याच्या आपल्या धर्म आणि आस्था आणि कुटूंबावाल्यांशी शुभ-चितनाची अपराहार्य अपेक्षा आहे. यापासून निष्काळजीपणा (बेपरवाही) संसार आणि परलोक यांच्या विनाशाचे कारण बनेल कुरआनने स्पष्ट शब्दांमध्ये म्हटले आहे
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]