Islam Darshan

सुशिक्षित मुस्लिमांची बौध्दिक गुलामगिरी

Published : Friday, Mar 04, 2016

 

ईश ग्रंथ ‘कुरआन’ व प्रेषित मुहम्मद(स.) यांचे उपदेश(अहादीस) मानवाच्या मार्गदर्शनासाठी जगाच्या अंता(कयामत) पर्यंत ईश्वर सुरक्षित ठेवणार आहे. त्यांच्याद्वारे मानवास दुष्कर्मापासून(सैतानी प्रवृत्तीपासून) दूर ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या आधारे जीवनाच्या सर्वच क्षेत्रांतील अडीअडचणीत मानवाचे मार्गदर्शन होत राहणार आहे. परंतु ही दुर्दैवी माणसे आपल्या धर्माच्या तत्त्वांचा अज्ञानामुळे विघातक नवविचारांनी अत्यंत प्रभावित होत आहेत. त्यामुळे जगातील सबळ प्रगत देशांकडून दिल्या गेलेल्या घोषणांचा प्रतिध्वनी लगेच येथेही ऐकू येत आहे. फ्रान्समधील वैचारिक क्रांतीने मुस्लिम देशातील सुशिक्षित लोक प्रभावित होऊन तशाच विचारांचा उहापोह करू लागले व त्याच प्रकारच्या विचारांचा अवलंबही करण्याची सुरुवात केली. त्यांना वाटे की जर आपण तसे वागलो नाही तर लोक आपणास मागासलेले व पुरातनवादी समजतील. ही विचारसरणीसुध्दा कालांतराने संपुष्टात आली.

तद्नंतर आधुनिक विचारांचे सुशिक्षित लोक एका वेगळ्याच दिशेला वळू लागले. या नव्या युगाच्या आरंभाने मुस्लिमांमध्ये सामाजिक न्याय व साम्यवादाचे विचार वाढू लागले. इथपर्यंत तर ठीक होते, परंतु स्वतः मुस्लिमांमध्ये एक गट असा निर्माण झाला जो इस्लामी तत्त्वज्ञानात परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करू लागला. इस्लामच्या कक्षेबाहेर न जाता इस्लामचे अंतरंग बदलून आधुनिक विचारांचा त्यात समावेश करू पाहत होते. असे परिवर्तन करून इस्लामला ‘कालबाह्य धर्मा’च्या आरोपातून मुक्त करू पाहत होते. त्यांनी व्यक्तीस्वातंत्र्य, उदारमतवाद तसेच भांडवलदारी व धर्मनिरपेक्ष लोकशाहीची पाश्चात्य जीवनशैलीसुध्दा इस्लामी तत्त्वप्रणालीत सुदृढ आहे असे सिध्द करण्याचे प्रयत्न सुरु केले. या विचारधारेच्या आधारे हे सिध्द करण्याचे प्रयत्न होऊ लागले की इस्लाममध्येसुद्धा साम्यवादी सामाजिक न्यायव्यवस्था अस्तित्वात आहे. अशा विचारधारेचे सुशिक्षित मुस्लिम बौध्दिक गुलामी व अज्ञानाच्या शिगेला पोहचले आहे.

संबंधित लेख

  • मुसलमानांनी विचार करण्यासारखा मुद्दा

    मुसलमानांची वास्तवता अशी आहे की विभिन्न ऐतिहासिक आणि भौगोलिक परिस्थितींच्या कारणास्तव याच समुदायाला परिस्थितीचा ताणतणाव व दंगलींचे चटके सर्वांपेक्षा अधिक बसले आहेत. त्याची बाह्य कारणे आहेत. तशी अंतर्गत कारणेही आहेत. दुसर्यांचा आततायीपणा त्याला कारण आहे, तर स्वतःच्या काही उणिवांही त्याला कारणीभूत आहेत.
  • प्रेषित मुहम्मद (स) एक संक्षिप्त परिचय

    मानवी जीवनाचा मुख्य उद्देश कोणता? त्याची वास्तविक मागणी कोणती? ते सुशोभित व यशस्वी करण्यासाठी उपाययोजना कोणत्या? कोणकोणत्या गोष्टींचा अवलंब केल्याने जीवनात बहर येऊ शकतो? याचा आपण कधी विचार केला आहे काय? ईश्वराने जग निर्माण केले आणि त्यात मानवास सर्व प्राणीमात्रांत श्रेष्ठ बनविले, हे उघड सत्य आहे. मानवास इतर जीवांच्या तुलनेत विशिष्ट शक्ती व योग्यता प्रदान करून त्याने मानवांवर कृपा केली आहे. त्याने बुद्धीबरोबरच विचार करण्याची व निर्णय घेण्याची शक्तीदेखील प्रदान केली.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]