Islam Darshan

आक्रमक हल्लेखोरी आणि याची शिक्षा

Published : Friday, Mar 04, 2016

इस्लामने ज्याप्रमाणे इतरांचे प्राण घेण्याची शिक्षा तजवीज केली आहे, त्याचप्रमाणे शारीरिक क्षती पोचविण्याची, अवयव कापण्याची वा इतर प्रकारची शारीरिक पीडा देण्याचीसुद्धा शिक्षा लागू केली आहे. अर्थातच या शिक्षेस ‘किसास‘(बदला घेण्याची) शिक्षा, ‘दैयत‘(खून वा क्षतीभरपाईची) शिक्षा म्हटले गेले आहे. ईश्वराने कुरआनात म्हटले आहे,‘‘आणि तौरातमध्ये यहुद्यांवर हा आदेश लिहिण्यात आला होता की, प्राणाच्या बदल्यात प्राण, डोळ्याच्या बदल्यात डोळा, नाकाच्या बदल्यात नाक, कानाच्या बदल्यात कान, दाताच्या बदल्यात दात आणि सर्वच जखमांसाठी बरोबरीचा बदला होय. मग जो ‘किसास‘चा सदका करील. ते त्याच्याकरीता प्रायश्चित्त आहे आणि जे ईश्वराच्या कायद्यानुसार निवाडा करीत नाहीत, तेच अत्याचारी आहेत.”(संदर्भ : सूरह-ए-माइदा - ४५)

जखम व तिचे प्रकार

इस्लामी कायद्यात जखमांचे विविध प्रकार वर्णन करण्यात आलेले असून त्यांचा दर्जा ठरविण्यात आला आहे.

 1. एखादा अवयव शरीरापासून विभक्त करणे, उदाहरणार्थ, हात कापणे, डोळा फोडणे वगैरे.
 2. शरीराचा एखादा अवयव निकामी करणे. उदाहरणार्थ, एखाद्या अवयवास अशाप्रकारे क्षती पोचविणे की, तो निकामी व्हावा. म्हणजेच ऐकू न येणे, हाताने पकडता न येणे, पायाने चालता न येणे, डोळ्याने न दिसणे, कानाने ऐकू न येणे, समागम करता न येणे, बोटांनी पकडता न येणे वगैरे.
 3. शरीराच्या वरच्या भागावर अथवा चेहर्यावर जखम करणे. यात रक्त वाहणे, मांसाचा लचका तोडणे वगैरे सामील आहे.
 4. डोक्याच्या खाली जखम करणे. उदाहरणार्थ छाती व पोट फाडणे, क्षती पोचविणे वगैरे.
 5. मामुली चोप देणे वगैरे.

शारीरिक जखमांवर लागू करण्यात आलेली शिक्षाहत्येप्रमाणेच शारीरिक क्षती पोचविण्याच्या शिक्षेसाठी अटी व शर्ती लागू आहेत. यामध्येसुद्धा जाणूनबुजून, चुकून व नकळत होणार्या हत्येच्या अपराधांप्रमाणेच शिक्षा लागू करण्यात आली आहे.
जखम पोचविण्याची शिक्षा ‘किसास‘ होय

अर्थातच ‘किसास‘ म्हणजे बदला आणि तोही तंतोतंत. जेवढ्या प्रमाणात जखम करण्यात आली असेल, अगदी त्याच प्रमाणात अपराध्यास जखम करून शिक्षा देण्यात येईल, किंवा क्षतीग्रस्ताने संमती दिल्यास ‘दैयत‘ म्हणजेच जखमेची आर्थिक भरपाई देण्यात येईल अथवा क्षतीग्रस्ताने माफ केल्यास अपराध्यास माफ करण्यात येईल.

संबंधित लेख

 • सदाचाराचा अर्थ व्यापक आहे

  प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितली आहे की, धर्मावरील दृढश्रद्धा व सदाचारच श्रेष्ठत्वाचा मूळपाया आहे. महान अल्लाह तेच पाहतो. सदाचाराचा अर्थ फार व्यापक आहे. त्यात अल्लाहचा खरा परिचय, त्याच्या आज्ञांचे पालन, त्याच्या सेवकांचे हक्क देणे, चांगल्या गोष्टी रूजविणे व वाईट गोष्टींचा नायनाट करणेविषयी प्रयत्न करण्याचा सुद्धा समावेश आहे.
 • इस्लामी समाजाची काही खास वैशिष्ट्ये

  इस्लाम हा सर्वव्यापी आणि कर्मसिद्ध धर्म आहे. तसेच त्याने समाजात कमालीचा समतोल साधला आहे. यामुळेच इस्लामी तत्त्वांवर उभा करण्यात आलेला समाज हा एक आदर्श समाज असल्याचे इतिहासाने गौरविले आहे. पुढे आपण याची काही खास वैशिष्ट्ये थोडक्यात अभ्यासणार आहोत, जेणेकरून या गोष्टींचा अनुमान येईल की, समाजात नैतिक मूल्ये जोपासण्यासाठी इस्लामी कायद्यांनी कोणत्या गोष्टी तर्क करण्याचा आणि कोणत्या गोष्टी आत्मसात करण्याचा आदेश दिला आहे.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]