Islam Darshan

सत्याच्या आवरणात असत्य

Published : Friday, Mar 04, 2016

अल्लाहने मनुष्याची निर्मिती इतक्या उत्तमरीत्या केली आहे की त्याला ईश चमत्कारच मानायला हवे. म्हणूनच तो सैतानाच्या उघड उघड बहकावण्याच्या प्रयत्नाला सहज बळी पडत नाही. सैतान नाईलाजास्तव उपद्रव निर्माण करण्याच्या दुष्ट हेतूने कल्याणकारी स्वरुप धारण करून मानवाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो. स्वर्गात(जन्नतमध्ये) असताना आदम(अ.) यांना ‘‘स्वर्गातून बाहेर पडण्याकरिता अल्लाहची अवज्ञा करा.’’ असा उघड सल्ला न देता ‘‘चला मी तुम्हाला असा वृक्ष दाखवितो ज्यास अमरत्व व अंतहीन शाहीवैभव प्राप्त आहे.’’ असे सांगून फसविले.

मानवी स्वभावात आजही हाच कमकुवतपणा दिसून येतो. आजही मानवाच्या हातून ज्या चुका व अपराध घडत आहेत ते सर्व असत्य व फसव्या प्रलोभनाद्वारे घडविले जात आहेत.

पहिले प्रलोभन : भांडवलदारी व धर्मनिरपेक्ष लोकशाही

वर्तमानकाळात सामाजिक न्यायाचे निमित्त दाखवून मानव समाजाची भयंकर दिशाभूल करण्यात येत आहे. दुराचारी(सैतानी) प्रवृत्तीच्या लोकांनी समाजाला सर्वप्रथम व्यक्तीस्वातंत्र्य व उदारमतवादाच्या प्रलोभनात गुंतवून ठेवले. अठराव्या शतकात भांडवलदारी व धर्मनिरपेक्ष लोकशाहीची स्थापना करण्यात आली. या समाजव्यवस्थेचे एवढे जबरदस्त प्रस्थ होते की त्यास मानवी जीवनाच्या उन्नतीचे शिखर समजले जात होते. स्वतःस प्रगत म्हणवून घेणारी प्रत्येक व्यक्ती स्वतःस व्यक्तीस्वातंत्र्य व उदारमतवादाचा पुरस्कर्ता मानत होती. मानवी जीवनाकरिता योग्य अशी कोणती समाजव्यवस्था असेल तर ती म्हणजे पाश्चात्य देशांत अस्तित्वात असलेली भांडवलदारी व धर्मानिरपेक्ष लोकाशाही होय, असा लोकांचा समज झाला होता.

मात्र अल्पकाळातच लोकांच्या लक्षात आले की या समाजविधातक व्यवस्थेने संपूर्ण जगात अराजकता निर्माण केली आहे. लवकरच या दुष्ट समाजव्यवस्थेचा अंत झाला.

दुसरे प्रलोभन : सामाजिक न्याय व साम्यवाद

काही काळानंतर सामाजिक न्याय व साम्यवादाच्या नावाने लोकांची दिशाभूल करण्यासाठी नव्या समाजव्यवस्थेची स्थापना करण्यात आली. या नव्या शासनव्यवस्थेने जगातील विविध देशांत अत्याचार व दडपशाहीचे इतके भयंकर वातावरण निमार्ण केले की ज्याचे इतिहासातील कुठल्याही समाजव्यवस्थेशी साम्य दर्शविता येणार नाही. ही दृष्ट समाजव्यवस्था आजही बर्याचशा देशांत अस्तित्वात आहे, कारण तिचे खरे विनाशक स्वरुप अद्याप तेथील लोकांच्या लक्षात आलेले नाही.

संबंधित लेख

  • आर्थिक शोषण

    हत्या करणे, प्राणांचा बळी घेणे, या अपराधानंतर आर्थिक शोषण करण्याच्या घोर अपराधाचा उल्लेख करावा लागेल. आजच्या आधुनिक काळात संपत्ती आणि पैसा अडका इतका महत्त्वाचा झाला की, याच्यासमोर कशाचीही किंमत राहिली नाही. पैशासाठी वाटेल ते करण्याची आज लोकांची मानसिकता बनली आहे. व्यत्तिगत जीवनापासून ते राज्य आणि देशपातळीपर्यंत संरक्षणाची भिस्त ही आर्थिक स्थैर्यावर आहे. म्हणूनच जगातील मोठमोठ्या क्रांती पैशांसाठीच घडल्या आणि मोठमोठ्या शासकांचे धाबे दणाणले, नव्हे सत्ताधार्यांची सत्ता पालट झाली. आजही पैशांच्याच बळावर सरकार बनते आणि पडते. प्रत्येक देशाचा संबंध आर्थिक स्तरावर एकदुसर्यांशी अशा प्रकारे जुळलेला आहे की, आज हे संबंध तोडणे अशक्य होऊन बसले आहे. दुसरीकडे संपत्तीच्या या असामान्य महत्त्वामुळे असंख्य लोकांचे अतोनात शोषण होत आहे. लोकांना आणि विशेषतः मजुरांना गुलामीच्या बेड्यांत जखडण्यात येत आहे. या मजुरांमध्ये केवळ पुरुषच नसून स्त्रिया आणि मुलांचादेखील समावेश आहे. राजकारण करण्यासाठी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण करणे, जीवनावश्यक वस्तुंचा कृत्रिम तुटवडा करून त्यांच्या किंमतीत भरमसाठ वाढ करून सार्या
  • जातीय दंगली व आपली जबाबदारी

    देशात जातीय दंगलींचे जे चक्र चालू आहे, ते तत्कालिक आहे असे वाटत होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या प्रयत्नात ज्या जाती परस्पराविरुध्द उभ्या टाकल्या होत्या, त्यांच्या भावनांचा तो तात्कालिक उद्रेक आहे आणि काळ लोटल्याबरोबरच तो उद्रेकही थंड होईल, असे वाटत होते. तसे घडले नाही. ही एक दुःखद गोष्ट आहे. जातीय दंगलींचे चक्र सतत चालू राहिले. आता या दंगलींचे स्वरुप असे झाले आहे, की पोलीस बळ आणि पुढार्यांची आवाहने, त्यांचे निवारण करण्यास अपुरे पडत आहेत, किबहुना ही समस्या इतकी संवेदनशील व गांभीर्याची बनली आहे की, ज्या लोकांना त्यांची कटुता व असहनीयता जाणवते, त्यांच्यासाठी हे आवश्यक झाले आहे की त्यांनी केवळ आवाहने करण्यापुरते व आवाहने ऐकण्यापुरते मर्यादित राहू नये.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]