Islam Darshan

इस्लाम धर्म तर्क करणे

Published : Friday, Mar 04, 2016

इस्लामी कायद्यानुसार हा एक असा घोर अपराध आहे, जो समाजासाठीही घातक आणि अन्याय आहे तसेच ना-ना स्वरुपांच्या उपद्रवांना जन्म देणारा असून ईश्वराप्रतिही घोर अपराध आहे. त्यामुळे या जगातही याची शिक्षा देण्यात येईल आणि परलोकातसुद्धा याची कठोर शिक्षा मिळेल. परलोकी असलेली शिक्षा किती आणि कशी मिळेल हे ईश्वराच्या हाती आहे, मात्र इस्लामी कायद्याने याची शिक्षा मृत्यूदंड तजवीज केली आहे. कुरआनामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे,

‘‘तुमच्यापैकी जी व्यक्ती इस्लामचा त्याग करील आणि ईशद्रोहाच्या अवस्थेत तिचा मृत्यू होईल, त्याचे समस्त पुण्यकर्म वाया जातील, ईहलोकी आणि परलोकीसुद्धा. अशा व्यक्ती नेहमीसाठी नरकाग्नीमध्ये जळत राहतील.‘‘(संदर्भ : सूरह-ए-बकरा - २१७)

ही तर झाली पारलौकिक शिक्षा मात्र या जगामध्ये याची शिक्षा काय आहे, हे प्रेषित मुहम्मद(स.) यांनी स्पष्ट करताना म्हटले आहे,

‘‘मुस्लिमांची हत्या करणे या तीन कारणांव्यतिरिक्त वैध नाही, ज्यांपैकी एक कारण हे इस्लाम धर्माचा त्याग करणे होय.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)

कारणही तसेच गंभीर आहे. एकदा माणूस इस्लामविमुख झाला की मग अपराध करायला मोकळा झाला. कारण गुन्हा केला काय, पाप केले काय आणि कोणावर अन्याय-अत्याचार केला काय! शेवटी ईश्वराला जाब देण्याचा प्रश्नच नाही. नैतिकता आणि अनैतिकता, न्याय व अन्याय, सत्य आणि असत्यामधील फरकच संपला. म्हणूनच अशा माणसाकडून शांती व बंधुभावाची आणि फायदा व सुरक्षेची आशाच ठेवता येत नाही. त्यामुळे असा माणूस समाजात उपद्रव माजविणार हे निश्चित.

गुन्हा सिद्ध होण्याच्या अटी व शर्ती

 1. गुन्हेगार व्यक्ती स्त्री असो की पुरुष वयात आलेली असावी.
 2. जर एखाद्या इस्लामेतर धर्माचा त्याग करून इस्लामेतर धर्म जर स्वीकारण्यात आला असेल तर त्या व्यक्तीस शिक्षा देण्यात येणार नाही. उदाहरणार्थ, ईसाई म्हणजेच ख्रिस्ती धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारणार्यास अथवा ज्यू धर्म सोडून ख्रिस्ती धर्म स्वीकारणार्यास शिक्षा देण्यात येणार नाही. केवळ इस्लाम धर्म त्यागून कोणत्याही इस्लामेतर विचारसरणीचा स्वीकार करणार्यास ही शिक्षा लागू आहे.
 3. गुन्हा सिद्ध होण्याचे काही संकेत आहेत. उदाहरणार्थ, माणसाने स्पष्टपणे घोषणा करणे की, मी इस्लामचा त्याग केला, इस्लामी शिकवणींची उघडपणे विभर्त्सना केली, अवैध आणि निषिद्ध ठरविण्यात आलेल्या आणि अन्यायी व अत्याचारी बाबींना वैध ठरविल्या, आपला व्यवहार इस्लामी कायद्याविरुद्ध निश्चित केला, इस्लामी श्रद्धांचा इन्कार केला तर अशा व्यक्तीस इस्लामचा इन्कार करणारी असल्याचे घोषित करून शिक्षा देण्यात येईल.
 4. इस्लाम तर्क करणारी व्यक्ती सबळ आणि मानसिकरित्या सुदृढ असेल, तरच शिक्षा देण्यात येईल.
 5. कोणाच्या दबावास बळी पडून इस्लामचा त्याग करणार्यास शिक्षा देता येणार नाही.
 6. इस्लामचा त्याग करणार्या व्यक्तीस तीन दिवसांच्या आत पश्चात्ताप झाला आणि परत जर त्याने इस्लामचा स्वीकार केला तर त्या व्यक्तीस शिक्षा होणार नाही.
 7. वरील अटी व शर्तीनुसार इस्लामचा त्याग करणार्यास मृत्यूदंडाची शिक्षा देऊन मानवजातीस उपद्रवापासून मुक्त करण्यात येईल.

संबंधित लेख

 • समस्यांचे समाधान आणि इस्लामी उपाय

  समस्या आणि सुटता-सुटता न सुटणार्या अडचणींना वैतागून, वैफल्यग्रस्त होऊन आज माणूस गुन्हेगारीच्या विळख्यात सापडला आणि येथेही त्याची आशा पूर्ण होत नसल्याने तो आत्महत्येसाठी परावृत्त झाला. म्हणूनच गुन्हेगारी संपवायची असेल तर मानवाभोवती आवळलेला हा जुलमी आणि अत्याचारी विळखा नष्ट करावाच लागेल आणि यासाठी इस्लामशिवाय पर्याय नाही. यासंबंधी इस्लामची भूमिका अशी आहे की या जगात इष्ट असो वा अनिष्ट असो सर्वकाही ईश्वराच्या मर्जीनेच घडते. यात इतर कोणाची किंचितही दखल नाही. ईश्वराने कुरआनात म्हटले आहे,
 • इस्लामी आंदोलनाचा विरोध

  इस्लाम धर्माच्या गुप्तप्रसार व प्रचाराच्या काळातसुद्धा जरी प्रेषित मुहम्मद(स) यांच्या आंदोलनाची कुनकुन विरोधकांना लागली असली तरी इस्लाम स्वीकारणार्यांच्या पंक्तीत एखादा मोठा नेता नसल्याने अथवा धार्मिक व राष्ट्रीय पदावर पीठासीन असलेला माणूस नसल्याने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले. त्यांना असे वाटत होते की, हे केवळ काही तरूण मंडळीचा पोरखेळच आहे. चार दिवसांत डोक्यात भरलेली हवा निघून जाईल
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]