Islam Darshan

इस्लामी राज्याच्या कल्याणकारी जबाबदाऱ्या

Published : Wednesday, Mar 02, 2016

इस्लामी शासनाच्या खालील जबाबदाऱ्यावर प्रकार पडतो.

  1. इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स) यांना (अर्थांत इस्लामी शासनातील प्रधानमंत्री) ही जाणीव होती की बेकारांना उद्योग उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
  2. त्या काळच्या परिस्थितीनुरुप प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्या माणसाला उद्योग उपलब्ध करुन दिला.
  3. प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्या माणसाला पुन्हा एकदा येवून आपल्या स्थितीची खबर देण्यास सांगितले, ही गोष्टसुद्धा याच जबाबदारीच्या जाणिवेची सूचक आहे.

राज्याच्या प्रधानमंत्र्यांना असलेल्या जबाबदारीच्या जाणिवेची जी झलक इस्लामी जगताला आजपासून तेराशे वर्षापूर्वी दिसली ती वर्तमान काळातील सर्वात आधुनिक अर्थशास्त्रीय व राजनैतिक तत्त्वाशी व सिद्धान्ताशी पूर्णपणे एकरुप आहे.
राज्यातील बेकारांना उद्योग उपलब्ध करुन देता आला नाही तर त्यांची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत त्यांच्या उदरनिर्वाहाचा भार शासनाच्या खजिन्यावर असे. कारण मुस्लिम तर त्यांचा स्वतःचा प्रश्न असो अथवा राज्य व इतर नागरिकांचा, सर्वाशी औदार्यपूर्ण वर्तन करीत आले आहेत.

 खऱ्या इस्लामी राज्याची गरज

पुरुषांची समस्या असो की स्त्रियांची असो, इस्लाम व केवळ इस्लामच तिची सोडवणूक करु शकतो. म्हणून आम्हा पुरुषांचे, स्त्रियांचे वडीलधाऱ्यांचे, नवयुवकांचे सर्वांत पहिले कर्तव्य असे की सर्वांनी एकजुटीने, खरेखुरे इस्लामी राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न करावा व आपल्या जीवनास इस्लामी नियमानुसार आकार द्यावा. हे काम जेव्हा आम्ही करू तव्हाच आपल्या विचारांना व आस्थांना, कृतीचा विश्वास आम्ही यशस्वी करु शकू. जीवनात समतोल व एकजिनसीपणा प्राप्त करण्यास हाच एकमेव मार्ग आहे. हा मार्ग सर्व प्रकारच्या अन्याय, अत्याचार, जुलूम व जबरदस्तीपासून पूर्णपणे निर्मळ व स्वच्छ आहे.

 

 

संबंधित लेख

  • रोजा- ईशपरायणता द्योतक

    रोजा हे अनेक कारणामुळे इस्लामच्या खऱ्या स्वरुपाचे द्योतक आहे. कुरआनने धर्माची स्पष्ट केलेली कल्पना ही रोजा मध्ये सर्वांगांने स्पष्ट होते. कारण रोजा मनुष्याला फक्त सदाचरणींच बनवत नाही तर त्याच्या आत्म्याला आणि विचाराला एक दिशा देते. बहिरंग आणि अंतरंग दोन्ही ईशपरायण बनतात. याबद्दलचे स्पष्टीकरण खालील प्रेषितकथनाने अधिक स्पष्ट होते. ‘‘जी व्यक्ती आयुष्यभर रोजे ठेवते अशा व्यक्तीचे रोजे निरर्थक आहेत.’’ (बुखारी) ‘‘तुम्हाला दोन किवा त्यापेक्षा जास्त दिवसांचे सततचे रोजे ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.’’ (मुस्लिम)
  • दंडविधानाची काही इतर स्वरुपे

    शरीअतमध्ये दंडविधानाच्या स्वरुपात शारीरिक आणि आर्थिक शिक्षांव्यतिरिक्त काही हलक्याफुलक्या स्वरुपाच्या शिक्षासुद्धा लागू करण्यात आल्या आहेत. त्या आपण थोडक्यात अभ्यासू. विचारपूस करणे इस्लामी शासक अथवा न्यायाधीशाला या गोष्टीचा अधिकार आहे की गुन्हेगारास न्यायालयात हजर राहण्याची नोटिस बजावावी अगर त्याची कसून विचारपूस करावी.(संदर्भ : बदायुन नसाया)
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]