Islam Darshan

इस्लामी शासन आणि मुस्लिम शासन

Published : Sunday, Feb 28, 2016

इस्लाम काही जीवित प्राणी नाही की जो आपल्या प्रयत्नाने राज्यसत्ता हस्तगत करील आणि त्यास टिकून ठेवेल. इस्लाम तर त्याच्या अनुयायींच्या माध्यमातूनच सत्ता प्राप्त करू शकतो. इस्लामचे अनुयायी (मुस्लिम) आपल्या अथक प्रयत्नांनीच राजकीय सत्तेला आपलेसे करू शकतात. म्हणूनच इस्लामचे खरे अनुयायी ते आहेत ज्यांच्या हातात शासनाधिकार (सत्ता) आहे किवा जे राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील राहतात. इस्लामच्या या सच्च्या अनुयायींचा राजकीय सत्ता हस्तगत करण्याचा उद्देश मात्र फक्त इस्लामला वैभवशाली बनविण्याचा असतो. काहींचा उद्देश मात्र स्वतःला प्रभुत्वशाली बनविण्याचा असतो. अशा प्रकारे इस्लामसाठी सत्ता प्राप्त करणे हे ‘इस्लामी शासना’चे उदाहरण आहे तर स्वतःसाठी सत्ता प्राप्त करणे हे ‘मुस्लिम शासना’चे उदाहरण आहे. ईशआदेशानुसार पहिले उदाहरण धार्मिक तर दुसरे ऐहिक आहे. पहिली शासनव्यवस्था (इस्लामी) सदाचारी आहे तर दुसरी (ऐहिक) दुराचारी आहे. पहिल्या इस्लामी शासनव्यवस्थेने जगात शांती आणि समृध्दी नांदते तर दुसऱ्या ऐहिक शासनव्यवस्थेमुळे (मुस्लिम शासन) जगात अनर्थ ओढवतो. याच एकमेव कारणासाठी कुरआनने यास न्यायाचे प्रमाण ठरविले आहे. श्रध्दावंताची (मुस्लिम) व्याख्या करताना कुरआन स्पष्टोक्ती आहे,

‘‘ते मरणोत्तर जीवनाचे घर तर आम्ही त्या लोकांसाठी खास करू जे पृथ्वीवर आपली शेखी मिरवू इच्छित नाहीत आणि उपद्रवदेखील माजवू इच्छित नाहीत आणि शेवटी भले ईशपरायणांसाठीच आहे. जो कोणी भलेपणा घेऊन येईल त्याच्यासाठी त्यापेक्षा श्रेष्ठ भलाई आहे आणि जो वाईट घेऊन येईल तर अफत्ये करणाऱ्यांना तसाच मोबदला मिळेल जसे कृत्य ते करीत आहेत.’’ (कुरआन २८: ८३-८४)

दुसऱ्या बाजूला कुरआन श्रध्दावंतांना (मुस्लिमांना) खुशखबर (शुभवार्ता) देत आहे,

‘‘वैफल्यग्रस्त होऊ नका, दुःखी होऊ नका, तुम्हीच प्रभावी ठराल जर तुम्ही मुस्लिम असाल.’’ (कुरआन ३: १३९)

याचाच अर्थ असा की सत्ता आणि प्रभुत्व एखाद्याच्या व्यक्तिगत फायद्यासाठी आहे तर ते वास्तविकपणे उपद्रव, अत्याचार आणि द्रोह आहे. जगाला ही व्यवस्था उपद्रव, अत्याचारामुळे गळीतगात्र करून सोडते, याची श्रध्दावंत कल्पनासुध्दा करू शकत नाही. पण हीच सत्ता (राज्यसत्ता) इस्लामच्या सेवेसाठी आहे तर ती उदात्त, सद्गुणी आणि चांगली आहे. या राज्यसत्तेला आपलेसे करण्यासाठी श्रध्दावंत (मुस्लिम) मनोमन इच्छुक आणि प्रयत्नशील राहातो. अशा प्रकारे या दोन प्रकारच्या राज्यसत्ता एकमेकांपासून त्यांच्या मूळतत्वात आणि परिणामात वेगवेगळ्या आहेत. दृष्यस्वरुपात दोन्ही शासन व्यवस्था आहेत आणि दोन्ही मुस्लिमांसाठी आहेत, परंतु एक पवित्र विश्वास आणि जबाबदारीवर आधारित आहे तर दुसरी व्यक्तीगत फायद्यासाठी आहे. ज्यांना समज आहे, आणि जे आत्मज्ञानी आहेत असे लोक दोन पक्षी हवेत उडताना पाहतात परंतु त्यांना कळून चुकते की बहिरा ससाणा आणि गिधाडे या दोघांची विश्वे वेगवेगळी आहेत.

इस्लामचे आवाहन आणि शासन

संपूर्ण जगाला माहीत आहे की इस्लाम एक यशस्वी कार्यप्रणाली आहे. याचमुळे इस्लामचे धार्मिक कायद्यांमध्ये राजनीती आणि शासनाच्या तत्त्वांचा खुलासेवार तपशील आलेला आहे. इस्लामचे प्रेषित आदरणीय मुहम्मद (स.) यांनी फक्त सत्ता प्राप्त केली नाही आणि शासनव्यवस्थेबाबत नियम फक्त घालून दिले नाहीत तर त्यांनी राजसत्तेचे नेतृत्वसुध्दा केले आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी शासनव्यवस्थेचे कार्य हे धार्मिक कार्य मानून या कार्याला महत्त्व दिले होते. म्हणून इस्लामचा विचार केला तर आपण असे म्हणूच शकत नाही की ईशकायद्याचे राज्य (इस्लाम) स्थापन करण्याचा आदेश व मूळ दिव्य प्रकटन ‘‘तुम्ही अल्लाहचीच भक्ती करा’’ वेगळे आहेत. तसेच राजकारण हा धर्माचा भाग नाही. हे विधान इस्लामविरोधी आहे. अनेक कारणांपैकी हे एक कारण महत्त्वाचे आहे ज्यामुळे इस्लाम हा एक परिपूर्ण आणि खरा धर्म सिध्द झाला आहे. शाह वली उल्लाह (र.) इस्लाम या ईश्वरी धर्माबाबत म्हणतात,

‘‘हे माहीत असू द्या की सर्वांत परिपूर्ण धार्मिक कायदा आणि ईशमार्गदर्शन अल्लाहच्या मार्गात जिहाद होय (धर्माची पूर्णतः स्थिती)’’ (अल बलग)

‘‘अल्लाहच्या मार्गात जिहाद करणे’’ याचाच अर्थ असा होतो की इस्लामचे हे असे धार्मिक कायदे (धर्मयुध्दाचे) आणि त्यासंबंधीचे दिव्य मार्गदर्शन हे राजनीती आणि राज्यशासनासाठीच आहेत, कारण अल्लाहच्या मार्गात युध्द म्हणजेच धर्मयुध्द (जिहाद) हे राज्यशासनाशिवाय शक्य नाही.
इस्लाम फक्त याच ईशकायद्याचे नाव नाही की अल्लाहच्या मार्गात युध्द करा. हे अनेक दिव्य प्रकटनांपैकी (ईशकायदे) एक आहे ज्यांना इस्लामचे आदर्श मानले आहे. धर्माच्या अनेक परिमाणांपैकी ते एक परिमाण आहे. इस्लाम एक शाश्वत धर्म आहे. तसेच अल्लाहच्या मार्गात युध्द हेसुध्दा एक शाश्वत कार्य आहे. जिहाद (धर्मयुध्द) हे अल्लाहच्या भक्तीचा परमोच्च बिदू आहे. हे एक अटळ सत्य आहे की राजनीती आणि शासन हे इस्लामच्या संकल्पनेपासून वेगळे नाहीत. जर इस्लामपासून राजनीती आणि शासनव्यवस्थेला वेगळे केले तर बाकी राहते ते लुळे-पांगळे इस्लामचे रूप! असा हा लुळा-पांगळा इस्लाम म्हणजे कुरआनमध्ये उल्लेखित परिपूर्ण धर्म (परिपूर्ण जीवनव्यवस्था) मुळीच नाही. याबाबत कुरआन स्पष्टोक्ती करीत आहे,

‘‘आज रोजी मी तुमचा धर्म तुमच्याकरिता परिपूर्ण केला आहे आणि आपली कृपा तुम्हांवर परिपूर्ण केली आहे. आणि तुमच्यासाठी इस्लाम तुमचा धर्म म्हणून संमत केला आहे.’’ (कुरआन ५: ३)

संबंधित लेख

  • विवाहाचे वैधानिक महत्त्व

    विवाहास इस्लामी धर्मशास्त्रींनी वैध म्हटले आहे. काहींच्या जवळ तो चांगला आणि प्रिय (मुस्तहब) आहे, काहींनी याला प्रेषितांची ती निती जिचे अवलंबविणे अनिवार्य असावे. अर्थात सुन्नत म्हटले आणि यास अपरीहार्य (वाजीब) दाखविल आहे. परंतु जर व्यक्ति अशा परिस्थितीत घेरला जावा की व्यभिचार आणि दुष्कर्मात लिप्त होऊन जाण्याचा भयंकर धोका असावा आणि तो आर्थिक दृष्टीने दाम्पत्य उत्तरदायीत्वांना पूर्ण करू शकत असावा तर विवाह त्यासाठी वाजीब (अपरिहार्य) होऊन जातो.
  • इस्लामचे प्रमुख संदेश

    एका अल्लाह वर ईमान (श्रद्धा) इस्लामच्या प्रमुख संदेशपैकी महत्त्वाचे संदेश म्हणजे एका अल्लाह वर ईमान (श्रद्धा) आणणे हे आहे. फक्त अल्लाह आहे व तो एक आहे या गोष्टीवरच नव्हे तर तर तो एकटा या सृष्टीचा निर्माता, स्वामी, शासक व व्यवस्थापक आहे या वस्तुस्थितीवर देखील ईमान आणणे आवश्यक आहे. त्याच्याचमुळे ही सृष्टी अस्तित्वात आहे. आणि सृष्टीमधील प्रत्येक वस्तू अस्तित्वात ठेवण्यासाठी या उपजीविकेची (Subsistence) वा शक्तीची (Energy) आवश्यकता आहे ती उपलब्ध करून देणारा अल्लाह आहे. सार्वभौमत्वाचे सर्व गुण फक्त त्याच्याच ठायी आहेत आणि याबाबतीत दुसरा कोणीही त्याचा थोडा सुद्धा भागीदार नाही. ईशत्वाच्या सर्व गुणांनी फक्त तोच संपन्न आहे. आणि त्यापैकी कोणताही गुण इतरांजवळ नाही.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]