Islam Darshan

पति-पत्नीचे अधिकार आणि त्यांचे उत्तरदायित्व

Published : Thursday, Feb 18, 2016

दाम्पत्य संबंध केवळ कामतृप्तिचे साधनच नाही आहे, तर यामुळे कुटूंबनिर्मीतीची सुरवात होत असते. यात पुरुष आणि स्त्री दोघांचे अधिकार आहेत. जे त्यांना प्राप्त होतील आणि दोघांचे उत्तरदायित्व सुद्धा आहेत. ज्यांचे ते दोन्हीही आचरणकार (पायबंद) राहतील. कुरआन ने मोठ्या स्पष्टतेने सांगितले आहे.

‘‘आणि स्त्रियांचा हक्क आहे (पुरुषांवर) जसा की पुरुषांचा त्यांच्यावर हक्क आहे.’’ (कुरआन २-२२८)

विवाह विच्छेद तलाकच्या आदेशा अंतर्गत आज्ञा आहे -

‘‘आईला या कारणास्तव त्रास दिला जाऊ नये की मूल तिचे आहे, आणि पित्याला सुद्धा या कारणास्तव त्रास दिला जाऊ नये की मूल त्याचे आहे.’’ (कुरआन २ - २३३)

पुरुषाचे उत्तरदायीत्व आहे की त्याने उपजिविकेसाठी धावपळ करावी. पत्नीच्या निर्वाह पोषणाच्या खर्चास सहन करावे, घर आणि त्याच्या आवश्यक वस्तु उपलब्ध कराव्यात. स्त्रीने घराची व्यवस्था सांभाळावी, त्याला एक उत्तम आणि पद्धतशीरतेचे घर बनवावे, आपली आणि पतिची इज्जत तसेच आबरू तसेच मान-सम्मानाची रक्षा करावी. मुलांची देखरेख आणि त्यांना उत्तम प्रशिक्षण व सभ्यतेने आभुषित करावे. अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स) यांचे कथन आहे-

‘‘पुरुष आपल्या घरच्यांचा संरक्षक (देखरेख करणारा) आहे आणि त्याला त्याच्या प्रजे (अर्थात परिजनां) विषयी कयामतीच्या दिवशी विचारले जाईल आणि स्त्री आपल्या पतिच्या घरचे आणि त्याच्या मुलांची संरक्षिका (देखरेख करणारी) आहे आणि तिच्याशी त्यांच्या बाबतीत कयामतीच्या दिवशी प्रश्न विचारला जाईल. (हदीस - बुखारी)

मतभेदांना दूर करण्याचे उपाय :

दाम्पत्य जीवनामध्ये सुद्धा मतभेद आणि विवाद उत्पन्न होऊ शकतात. आदेश आहे की त्या मतभेदांना आणि विवादांना पति-पत्नी स्वयंमच आपल्या सुझबुझ आणि विवेकाने दुर करण्याचा प्रयास करावा. पुरुषाने विशाल हृदयता आणि धैर्य तसेच सहनशिलतेचे प्रदर्शन करावे. पत्नीचे आचरण चुकीचे आणि अप्रिय असेल तर समजविण्याचे प्रयास करणे. परिस्थितीला ठिक करण्यासाठी तो नाराजीचे प्रदर्शन सुद्धा करू शकतो आणि शयनस्थळ अर्थात अंथरूणापासून वेगळा राहु शकतो, परंतु एका सिमेपेक्षा पुढे जाण्याचा त्याला अधिकार नाही. याच प्रकारे स्त्री, पुरुषात बेपरवाही (निष्काळजीपणा बेफीकरीपणा) पहात असेल तर आपल्या अधिकारांवर जिद्द करण्याचा स्थानी अधिकारांना सोडणे मान्य करूण घ्यावे. यामुळे सुद्धा संबंध ठिक झाले नाहीत तर दोघा पक्षांच्या दोन लोकांना पंच मानुन त्यांच्या निर्णयास स्वीकार करून घेतले जावे. याद्वारे सुद्धा संबंध ठिक (चांगले) होऊ शकले नाहीत, तर विवाह विच्छेद (तलाक) किवा खुलअ१ द्वारे पृथकता अंगिकारली जावी यासाठी की दोघेजण दाम्पत्य बंधनापासुन मुक्त होऊन आपल्या भविष्याचा फैसला (निर्णय) करू शकावेत.

केवळ वैध संततीना अधिकार आहेत :

मनुष्यामध्ये अपत्याची (सतंती) इच्छा स्वाभाविक रूपाने आढळली जाते. तो आपल्या अपत्याशी भावनात्मक संबंध ठेवीत असतो आणि त्याच्याशी अत्यंत प्रेम करतो. तो तिच्या पासुन आत्मसुख तसेच शांतिचा आभास करतो आणि त्यावर आपले धन-धान्य आणि पुंजी व्यय (खर्च) करून आनंदाची जाणीव प्राप्ती करतो. तो इच्छितो की त्याद्वारे त्याचे नाव बाकी रहावे. त्यांचा वंश चालत राहावा तो त्याला आपले धन व संपत्ती पैसा व मालमत्ता आणि संसाधनाचा वैध उत्तराधिकार मानतो. इस्लाम या भावनेला चुकीची समजत नाही. त्याने याला शेष ठेवले आहे आणि अपत्याची उत्प्रेरणा दिली आहे.

‘‘(दाम्पत्य संबंधाच्या द्वारा) अल्लाहने जी संतान तुमच्या हिश्यात (भाग्यात) ठेवून दिली आहे. तिची इच्छा करा.’’ (कुरआन २-१८७)

विवाहाच्या माध्यमाने जी संतान होईल तीच वैध संतान असेल आणि तिलाच वैधानिक अधिकार प्राप्त होतील. अवैध लैंगिक परिणामाच्या स्वरूप जे मुल जन्माला येईल, त्याचा वैधानिक रूपाने कोणताही अधिकार नाही. स्वयंम त्या मुलावर त्याचा कोणताही अधिकार स्वीकार केला जाणार नाही. दोघांमधुन कुणीही दुसऱ्याचा उत्तराधिकारी (वारिस) असणार नाही.

अपत्या (संततीचे) वैधानिक आणि नैतिक अधिकार आहेत. त्या अधिकारांना पार पाडणे आई-वडिलांसाठी अनिवार्य आहे. त्यांना आर्थिक किवा सामाजिक ओझे समजुन समाप्त केले जाऊ शकत नाही. त्यांचे भोजन, वस्त्र आणि अन्य आवश्यकतांची पुर्ती केली जाईल. त्यांच्याशी प्रेम आणि दयेचा व्यवहार केला जाईल. त्यांना उत्तम शिक्षा व प्रशिक्षण दिले जाईल. देवाण-घेवाणात त्यांच्याशी भेदभावाचा व्यवहार अवलंबीला जाणार नाही. मूले आणि मूली यांच्याशी समान व्यवहार अवलंबीला जाईल.

कुटूंब ईश्वराची देणगी आहे.

दाम्पत्य संबंधामुळे पूर्ण कुटूंब अस्तित्वात येते. संतान, आई, वडील, भाऊ, बहीण, आणि त्यांच्या संबांधानी खुप असे अन्य संबंध स्थापित होत असतात. कुटूंबाचे अस्तित्व ईश्वाराचा अनुग्रह आणि उपकार आहे. सामाजिक जीवनात याचे फार असे महत्त्व आहे. हिच गोष्ट या शब्दांत उल्लेखीत झालेली आहे.

‘‘आणि तो अल्लाहच आहे ज्याने तुमच्यासाठी तुमच्या सहचारिणी पत्नी बनविल्या आणि त्यानेच या पत्नींपासून तुम्हाला पुत्रपौत्र प्रदान केले आणि चांगल्या चांगल्या वस्तू तुम्हाला खावयास दिल्या. मग काय हे लोक (हे सर्वकाही पाहत व जाणत असतांना देखील) असत्याला मानतात आणि अल्लाहचे उपकार नाकारतात.’’ (कुरआन १६-७२)

परिवार तथा कुटूंबातील लोकांशी व्यक्तीचे संबंध दुरचे व जवळचे असतात. कोणाशी त्यांचे रक्ताचे नाते आणि कोणाशी माध्यमी असते. याच दृष्टीने जीवनात त्याचे हक्क व अधिकार आणि जबाबदार्या निहीत (निर्धारित) होतात आणि मेल्यानंतर ते एक-दुसर्याचे वैधानिक वारिस असतात. वारसा संबंधी आदेश आहे.

‘‘तुम्हाला माहीत नाही की तुमचे आई-वडिल व तुमच्या संततीपैकी कोण लाभाच्या दृष्टीने तुमच्या अधिक जवळ आहे.’’ (कुरआन ४-११)


१. खुलअ - त्या विवाह विच्छेदनाला म्हणतात ज्यात स्त्रीने स्वतः विवाह विच्छेदनाची मागणी करावी.

संबंधित लेख

  • इस्लाम व संस्कृती

    हजारो वर्षापूर्वी राहुट्यांत भटक्या लोकांसारखे आज आम्ही जीवन जगावे अशी तुमची इच्छा आहे काय? जंगलात राहणाऱ्या रानटी व अशिष्ट बुद्दू लोकांकरिता इस्लाम उपयुक्त होता व त्यांच्या गरजांना अनुकूल होता. त्यांच्या साधेपणाला साजेसा साधेपणा इस्लाममध्येही होता. पण ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने जाणाऱ्या विमानांच्या, हायड्रोजन बाँबच्या व चित्रपटांच्या या वर्तमान युगात, ईश्वराच्या अस्तित्वावर श्रद्धा व ईमान यावर आधारलेल्या व वर्तमान प्रगतिशील संस्कृतीच्या दर्जावर पूर्णपणे न उतरणाऱ्या व स्थिर गतीहीन व काळाबरोबर जाण्याची क्षमता नसणाऱ्या संस्कृतीला या युगात काही वाव असू शकतो?
  • हजयात्रेचे सर्वसमावेशक गुण

    हजयात्रेच्या गुणाबद्दल विचार करताना आपण वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास लक्षात येते की हजयात्रा एक उत्तम उपासनापध्दती आहे कारण, १) हजयात्रेत प्रार्थनेचा (नमाजचा) समावेश आहे. प्रार्थना (नमाज) दुसरे तिसरे काही नसून अल्लाहचे स्मरण आहे. आपण हे पाहिले आहे की हजयात्रेच्या काळात हाजी लोक अल्लाहचे पूर्ण स्मरण करीत असतात. नमाजमध्ये मग्न राहतात. २) हजयात्री आपल्या बलिदान दिलेल्या पशुचे मांस गरिबांमध्ये वाटतो. गरिबांचा हिस्सा देणे प्रत्येक हजयात्रीवर बंधनकारक आहे.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]