Islam Darshan

कुटुंबाचे महत्त्व आणि आवश्यकता

Published : Thursday, Feb 18, 2016

मनुष्य समाजप्रिय आहे

पृथ्वीवर जेव्हापासून मनुष्याचा जन्म झालेला आहे, तो मिळून-मिसळून राहत आहे आणि सामाजिक जीवन व्यतीत करीत आहे. हा त्याचा स्वभाव आहे. तो आपल्या स्वभावाच्या दृष्टीने समाजात राहणे पसंत करतो. आपल्या सहजातीय लोकांशी मिळून - जुळून राहू इच्छितो. याचसोबत तो त्यांच्या सहयोगचासुद्धा मोहताज आहे. त्याशिवाय तो आपल्या जीवनाच्या आवश्यकताच पूर्ण करू शकत नाही. तर त्याच्याशिवाय त्याचे अस्तित्व आणि जीवनसुद्धा मोठ्या संकटात पडून जाईल.

समाजाचा आरंभ कुटुंबाने

मानवाच्या सामाजिक जीवनाचा आरंभ त्याच्या निकटतम लोकांशी होतो. हेच त्याचे घराणे आणि कुटुंब आहे. या गोष्टीला या प्रकारेसुद्धा सांगितले जाऊ शकते की, ‘‘परिवार’’ ती सर्वप्रथम संस्था आहे जिच्यापासून मनुष्याने सामाजिकतेचा धडा घेतला. या जगतात आल्यानंतर मानवाला सर्वप्रथम ज्या सहाय्यतेची आवश्यकता असते ती त्याला कुटुंबापासूनच मिळते. कुटुंबाशिवाय त्याची आशाच केली जाऊ शकत नाही.

कुटुंबाचे महत्त्व आणि आवश्यकता

कुटुंबातील लोकांमध्ये एकमेकांच्या आवश्यकतांना पूर्ण करणे, त्यांच्या अपेक्षांवर पूर्ण उतरणे. तसेच त्यांच्यात संरक्षण व देखरेखीची भावना आढळून येते. परिवारामध्ये प्रत्येक व्यक्तीला हे समाधान असते की, त्याच्या आवश्यकता पूर्ण होत राहतील आणि कोणतीही गंभीर परिस्थिती आली तर त्याचे संरक्षण केले जाईल. हे सर्व काही स्वाभाविक रूपाने आणि कोणत्याही दडपणाशिवाय होत असते. परिवाराच्या अनेक समस्या असतात. कुटुंबाचे लोक मिळून मिसळून त्यांची सोडवणूक करत असतात. त्यांना ते ओझे नव्हे तर जबाबदारी समजत असतात.
या प्रकारे कुटुंब अथवा कुटुंबांचा एक मोठा लाभ हा आहे की, व्यक्तीच्या चारी बाजूंकडे त्यांचे शुभचितक आणि दुःखात सहभागी होणारे लोक हजर असतात. त्याच्यामध्ये तो स्वतःला सुरक्षित आणि शांतीत पाहतो आणि ही माणसे संकटांमध्ये आणि अडचणींमध्ये त्याच्या कामात येतात.

कुटुंबाशी मनुष्याचा भावनात्मक संबंधसुद्धा असतो. तो त्यांच्याशी जवळीक आणि आपलेपणाचा आभास करतो आणि दुःख व आरामात त्यांचा सहभाग इच्छितो. कुटुंब व परिवाराचे लोक त्यांच्या आनंदास द्विगुणित करत असतात. त्यांचे प्रेम आणि सहानुभूती त्यांची पीडा आणि कष्टांना कमी करते आणि समाधान देत असते. परिवार त्याची आवश्यकतासुद्धा आहे आणि त्याच्यासाठी समाधानाचे साधनसुद्धा.

कुटुंब समाजाचा पाया आहे

कुटुंब लहानसुद्धा असू शकते आणि मोठेसुद्धा अनेक कुटुंबांच्या एकत्रित येण्याने समाज अस्तित्वात येत असतो. कुटुंबाच्या मजबुती आणि कमजोरीशी समाजाची मजबुती आणि कमजोरी जुळलेली आहे. परिवाराचा पाया मजबूत (दणकट) असला तर समाजास मजबुती आणि स्थायित्व प्राप्त होईल. जर तो (कमजोर) अशक्त असेल तर संपूर्ण समाज अशक्तता आणि शिथिलतेला बळी पडतो. इमारतीची जर एक-एक वीट पक्की असेल तर तिच्याने पूर्ण इमारत दणकट (मजबूत) होत असते. कच्च्या आणि कमजोर वीटांनी दणकट इमारतीची कल्पना केली जाऊ शकत नाही. कुटुंब तो पायाचा दगड आहे की, आपल्या जागेवरून सरकला तर पूर्ण समाजाच्या चुली हादरून जातात आणि संबंधामध्ये बिघाड व गोंधळ निर्माण होऊ लागतो. कुटुंबाच्या तुटण्याने ते साखळदंड आणि सर्कल तुटून जातात ज्याच्याशी मनुष्याचा संबंध असतो. त्या व्यक्ती ज्यांना मानव आपले समजतो, जे त्याच्याशी अत्यंत निकट असतात, तेही दूर होत जातात आणि एक दुसर्यांच्या सहयोगासाठी तयार होत नाहीत. ते सर्व संबंध जे परिवारामुळे अस्तित्वात येतात आणि परिवारा टिकून राहीपर्यंत बाकी राहतात, त्या तुटताच संबंध नष्ट होऊन जातात आणि मनुष्य कुटुंबाच्या शांतीपासून वंचित होऊन जातो. कुटुंबाचे तुटने काही साधारण गोष्ट नाही. हा इतका मोठा तोटा आहे की कोणताही समाज त्याला अधिक दिवसांपर्यंत सहन करूच शकत नाही.

कुटुंबाची खरी निर्मिती प्रेषिताद्वारे होत असते

ही सुद्धा एक वास्तविकता आहे की, प्रत्येक परिवार उदाहरणीय नसतो. अनेक परिवारांमध्ये मतभेद आढळले जातात. त्यांच्यात मधुर संबंध आढळले जात नाहीत. ते एकमेकांचे अधिकार जाणत नाहीत. याचे कारण पारिवारिक व्यवस्थेचे बिघाड नाही, तर हा वैयक्तिक स्वार्थांचा आणि हितांचा संघर्ष आहे. जेव्हा कधी मनुष्याचे व्यक्तिगत हित परिवाराच्या हितांवर प्रभावी होतात आणि त्याला नुकसानीस सामोरे जावे लागते. याचा इलाज हा आहे की, मनुष्याने कुटुंबाची आवश्यकता आणि त्याच्या महत्त्वाची जाणीव करून घ्यावी आणि त्याला क्षति न पोहचू द्यावी. ईश्वराच्या प्रेषितांच्या उपकारामधून एक उपकार हासुद्धा होता की, कुटुंबात जे बिघाड आणि गोंधळ निर्माण होतात ते त्यांचा सुधार करत आणि योग्य पद्धतीने त्याच्या निर्मितीचे कर्तव्य पार पाडत. त्यांचा प्रयास असे की, परिवार शांती आणि समाधानाचे निवासस्थान आणि एक आदर्श संस्था बनून जावी.

प्रेषितांनी कौटुंबिक जीवन व्यतीत केले

ईश्वराचे प्रेषित जे त्याचे निवडलेले आणि त्याचे सर्वांत अधिक प्रिय दास असतात. पारिवारिक अथवा कौटुंबिक जीवन व्यतीत केलेले आहे आणि त्याच्या अपेक्षांना पूर्ण केले आहे. पवित्र कुरआनने याचे स्पष्टीकरण या शब्दांत केले आहे,

‘‘तुमच्यापूर्वीदेखील आम्ही अनेक प्रेषित पाठविले आहेत आणि आम्ही त्यांना पत्नि व मुले बाळे (संतान) असलेलेच बनविले होते.’’ (कुरआन १३: ३८)

पवित्र कुरआनने अनेक प्रेषितांच्या पत्नींचा, मुलाबाळांचा आणि परिजनांचा उल्लेख केलेला आहे. यावरून त्या प्रेषितांचा आपल्या कुटुंबीयांशी संबंध, त्यांचे प्रेम, सहानुभूती, निष्ठा आणि शुभेच्छा आणि कुटूंबीयांचा त्यांच्याशी व्यवहार आणि त्यांचे समर्थन करण्याचे विवरण आपल्या डोळ्यांसमोर येऊन जाते. या समस्त बाजुंनी स्वयं अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स) आणि त्यांच्या पत्नींचा आणि मुलाबाळांचा उल्लेख सुद्धा पवित्र कुरआन मध्ये आहे.

येथे एक प्रश्न उद्भवतो, तो हा की ईश्वराच्या संदेष्टांनी (प्रेषितांनी) पारिवारीक जीवन व्यतीत केले आणि त्याच्या समस्या आणि गुंतार्यांपासून

अलिप्त राहून फक्त ईश्वराच्या उपासनेतच का लागुन गेले नाहीत? याचे उत्तर हे आहे की कौटुंबिक जीवनाने धर्म एवंम नैतीकतेस जी उन्नती मिळते आणि सहानुभूती, सहयोग आणि शुभचितनाच्या पुनीत (पुण्याच्या) भावना पाळल्या व वाढल्या जातात आणि आत्मनियंत्रण आणि सुधार तसेच प्रशिक्षणाच्या ज्या संधी मिळतात, त्या इतर कोणत्याही साधना द्वारे प्राप्त होत नाहीत.

संबंधित लेख

  • माननीय खालिद बिन वलीद(र.) ‘सैफुल्लाह’

    माननीय खालिद बिन वलीद(र.)इस्लामचे असे महान लढवय्ये, सरसेनापती आणि ध्वजवाहक आहेत की त्यांचे नाव ऐकताच छाती गर्वाने फुलते आणि नवचैतन्य निर्माण होते. खालिद बिन वलीद(र.)यांच्याकरीता स्वयं आदरणीय प्रेषितांनी ईश्वर दरबारी प्रार्थना केली होती की, ‘हे ईश्वरा! ‘खालिद’ यांना इस्लाम धर्माच्या स्वीकृतीचे भाग्य लाभू दे!’
  • इस्लाम द्रोहयांशी प्रेषित मुहम्मद(स) यांच्या काही लष्करी कारवाया

    ‘खंदक’ (खाई) च्या युद्धप्रसंगीच ‘ज्यू’ समाजाच्या ‘कुरैज’ कबिल्याने ‘मदीना समझोता’चा करार मोडून ज्याप्रमाणे इस्लामद्रोही ‘कुरैश’जणांसह केलेला साटेलोटे जर अमलात आला असता तर आदरणीय प्रेषितांचा इस्लामी समूह, कृपा आणि न्यायाचे आंदोलन आणि ‘मदीना’ येथील एकेश्वरवादी व्यवस्था नष्ट झाली असती. अर्थातच ‘ज्यू’ समाजाने ‘मदीना समझोता’ करार मोडून शत्रूची साथ देणे ही मोठीच गद्दारी होय आणि ही गद्दारी खपवून घेण्यासारखी मुळीच नव्हती.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]