Islam Darshan

कुटूंबाचे धर्मात स्थान

Published : Thursday, Feb 18, 2016

याचा अर्थ असा आहे की, कुटूंब केवळ सामाजिक संस्थाच नाही तर तिला धार्मिक आणि नैतिक स्थान सुद्धा प्राप्त आहे. जी व्यक्ति कौटुंबिक जीवन व्यतीत करते. ती वास्तवात प्रेषितांच्या पद्धतीवर आचरण करते आणि आपल्या जीवन चरित्रास तसेच शिष्टाचारास कुटूंबाच्या माध्यमाने उच्च करीत असते.

इस्लाम ने सामाजिक जीवनात कुटूंबाला आधारभूत महत्व दिले आहे. तो ज्या प्रकारच्या कुटूंबाचे गठन इच्छितो, त्याची रूपरेखा स्पष्ट केलेली आहे. त्याने दाम्पत्य जीवन, त्याचे उत्तरदायीत्व, त्याच्या समस्यांना, कुटूंबाच्या सदस्यांशी संबंध, त्यांच्या अधिकारांना आणि त्यांच्याशी संबंधीत समस्त गोष्टीबद्दल विस्तृत मार्गदर्शन केलले आहे आणि आपल्या अनुयायींना त्यांचे पायबंद (आज्ञाधारक) बनविले आहे.

कुटूंब पुरुष आणि स्त्री च्या माध्यमाने अस्तित्वात येत असते

कुटूंब केवळ पुरुषांच्या किवा केवळ स्त्रियांच्या एकत्र होण्याचे नाव नाही, तर त्याच्या निर्माण आणि जडणघडणात पुरुष आणि स्त्री दोघांना आपली आपली भूमिका निभवायची असते. जर एखाद्या सोसायटीत काही पुरुष अथवा काही स्त्रिया परस्पर मिळून मिसळून जीवन व्यतीत करू लागल्या आणि अस्वाभाविक पद्धतीने आपली कामतृप्ती पूर्ण करू लागले तर त्याला कुटूंब/परिवार म्हणता येणार नाही. या काळात पाश्चात्य जगतात समलैंगिक संबंधाची (Homosexuality)जी प्रवृत्ती उन्नती पावत आहे, ती पारिवारीक व्यवस्थेची दुर्दशा आणि विनाशाची तीव्र प्रतिक्रिया आहे. यामध्ये एक पुरुष दुसर्या पुरुषासोबत आणि एक स्त्री दुसर्या स्त्रीच्या सोबत जीवन व्यतीत करू लागतात. हेच त्यांचे घर आणि कुटूंब असते आणि त्यात एकमेकांचे अधिकार सुद्धा निश्चित करून घेतले गेले आहेत. असे असुन सुद्धा की असा समलैंगीक शारीरिक संबंध केल्याने विभिन्न प्रकारचे रोग पसरत आहेत, हि जीवनशैली परिवाराच्या उद्देश्यांची पुर्तता कदापीही करू शकत नाही.

लैंगिक संबंधाचे महत्त्व

कुटूंबाची आरंभता पुरुष आणि स्त्रिच्या लैंगिक संबंधानी होते, यामुळे परिवाराच्या गठनात यास आधारभूत महत्त्व प्राप्त आहे. या संबंधाच्या बाबतीत दोन दृष्टीकोन आढळतात. एक दृष्टीकोन संन्यासचा१ आहे आणि दुसरा संसारवादिते२ चा आहे हे दोन्हीही दृष्टी कोन अनैसर्गिक आणि संतुलित मार्गापासून वेगळे आहेत.

संन्यास: लैंगिक संबंध विरोधी

संन्यास काम-भावनांना दाबण्या आणि कुचलण्याची शिकवण देतो आणि त्यास आध्यात्मिक उन्नत्तीचे साधन मानतो, परंतु हे मानवी स्वभावाविरुद्ध आहे. यावर हजारो आणि लाखो लोकांमधून केवळ दोन-एकच मुश्कीलीने अंमल करू शकतात. मनुष्यात कामुक भावना व इच्छा तीव्र आढळतात की तो अशा प्रकारच्या प्रतिबंधांना आणि बंदिशांना स्विकार, शकत नाही. त्याच्या समोर या इच्छेच्या पूर्तिचे योग्य आणि वैध मार्ग बंद असतील तर तो चुकीच्या (गलत) मार्गांवर चालू लागेल.

संन्यास वास्तवात मानवीय प्रकृतिच्या अपेक्षांपासून दुर पळण्याचे एक रुप आहे. ज्यास धर्माचे नाव दिले गेले आहे. यावर एखाद्या समाजाचे निर्माण (निर्मिती) होऊ शकत नाही.

संसारवादीता (बंधन मुक्त चंगळवाद) चे तोटे

दुसरा दृष्टीकोन संसारवादीता (बंधन मुक्त चंगळवाद) आहे. हा कामतृप्तीसाठी पूर्ण स्वच्छंदता इच्छितो आणि कोणत्याही मर्यादेचा आणि प्रतिबंधाचा अभिलाषी नाही. हे आचरण व्यक्ति आणि समाज दोघांसाठीही अत्यंत हानीकारक आहे. यामुळे मानवाच्या शारिरीक आणि मानसिक शक्त्या वाईट प्रकारे प्रभावित होतात आणि अनेकजण अशा प्रकारांच्या रोगांचा शिकार व्हायला आणि विनाशाकडे जायला लागतो. हा दृष्टिकोन समाजास लैंगिक विक्षिप्तता आणि आवरागर्दीकडे घेऊन जातो. यात व्यक्ति लैंगिक सुख तर प्राप्त करतो, परंतु त्याच्या प्रतिफळाच्या रूपात होणार्या अपत्यास स्त्रीच्या माथ्यावर टाकून वेगळा जबाबदारीपासून होऊन जातो. किवा दोघेही त्यापासून जबाबदार्या टाकून मुलाला एखाद्या जनसेवीसंस्था अर्थात अनाथालयात वा राज्याच्या हवाली करून टाकतात. या संस्था मुलाच्या भौतिक आवश्यकतांना तर काही सीमेपर्यंत पूर्ण करू शकतात, पण त्या प्रेमापासून शून्य असतात ज्या माता-पित्यांच्या हृदयात उंचबळत असतात आणि मुलांमध्ये स्थानांतरीत होत असतात. अपत्याच्या उत्तरदायीत्वापासून वाचण्यासाठी पश्चिमी जगतात, ‘‘संतानहीन परिवार’’ (उहळश्रवश्रशीी ऋराळश्रू) हि प्रवृत्ती सार्वत्रिक होत चालली आहे. याचे दोन तोटे अत्यंत स्पष्ट आहेत. एक हा की माणसांमध्ये जबाबदार्यांपासून वाचणे आणि वैयक्तिक सुख आणि स्वादाच्या प्राप्तीची प्रवृत्ति उत्पन्न (निर्माण) होते आणि तो कोणत्याही सामाजिक आणि नागरिक उत्तरदायीत्वाला स्विकारायला तयार होत नाही. दुसरे हे की जर अपत्याशिवाय जीवन जगण्याची प्रवृत्ती सार्वजनिक राहीली तर जनसंख्येत अनिवार्यतः कमी होईल, समाज मानव शक्ती ने वंचित होत जाईल आणि आपल्या आवश्यकतांची (गरजांची) पूर्ति करण्यासाठी त्यास बाहेरच्या लोकांची सहायता घ्यावी लागेल.

विवाहकामतृप्तीची वैध पद्धत:

इस्लाम संन्यास आणि संसारवादिता (बंधनमुक्त चगंळवाद) दोघांच्या विरुद्ध आहे. काम-भावना त्याच्या दृष्टीत एक स्वाभाविक भावना आहे आणि त्याची पूर्तता चुकीची नाही. परंतु इस्लाम या गोष्टीला अनिवार्य ठरवतो की हि पुर्तता वैध पद्धतीने व्हायला पाहीजे यासाठी अवैध पद्धत अवलंबविण्यास हराम ठरवतो. अशा अवैध पद्धतीने कामतृप्तिला तो व्यभिचार म्हणतो आणि त्याची कठोर शिक्षा प्रस्तावित करतो. तो समाजाला व्यभिचार आणि त्यावर उभारणार्या गोष्टींपासून पवित्र ठेवू इच्छितो. तो श्रद्धावंतांची (ईमानधारक) ची एक विशेषता कथन करतो की,

‘‘जे आपल्या गुप्तांगाचे रक्षण करतात. शिवाय आपल्या पत्नी आणि त्या स्त्रियांखेरीज ज्या त्यांच्या अधिकारात आहेत. ज्यांच्यापासून (सुरक्षित न ठेवण्यात) ते निदनीय नाहीत. जे लोक याशिवाय काही आणखी अन्य पद्धत इच्छित असतील तर असेच लोक सीमोल्लंघन करणारे आहेत.’’ (कुरआन २३, ५-७)

पवित्र कुरआनच्या उपरोक्त आयतींमध्ये कामतृप्तीच्या दोन वैध पद्धती कथीत झालेल्या आहेत. त्या आहेत पत्नी आणि दासींद्वारा कामतृप्ति प्राप्त करणे. वर्तमान काळात व्यवहारतः दासींचे अस्तित्व नाही. जरी कुणी व्यक्ति दासी ठेवू इच्छित असला तरी सुद्धा ठेवू शकत नाही, म्हणुन आता पत्नीशीच संबंध ठेवणे एक वैध मार्ग राहुन गेलेला आहे.

विवाहचे प्रयोजन स्त्रीला दाम्पत्यात आणण्याची पद्धत आहे. विवाह एक वचन तसेच प्रतिज्ञा आहे. जो पुरुष आणि स्त्रीच्या स्वतंत्र इच्छेने अस्तित्वात येतो. यात कुणासोबत बळ आणि अत्याचाराचा सहभाग लेशमात्र सुद्धा नसतो. पुरुष स्वतःहुन याचा निर्णय घेतो आणि स्त्रीची अनुमती सुद्धा यासाठी अनिवार्य आहे. जर एखाद्या नासमज (अजान) आणि नाबालिग (लहान) मुलींचा विवाह झाला तर तरूण झाल्यावर ती आपल्या विचाराचा आणि अधिकाराचा फेरविचार करू शकते.


१. सन्यास - या जीवन प्रणालित लोक संपुर्ण आयुष्य अविवाहीत राहतात. उत्तम अन्नपान त्यागतात. स्त्रीयांपासून दूर राहतात. कामवासनेपासून मुक्त राहण्यासाठी लिग कापून टाकतात, पहा हिन्दुतील चतुर्थ आश्रम.

२. मूळ अरबी शब्द इबाहीयन आहे. हा सप्रदाय ईश्वर आणि परलोक दोन्ही मानत नाही. भौतिक सुख लोलुपता व भौतिक उपभोग आस्था असते. कोणत्याही मार्गाने सुखलोलुपता प्राप्त करतात. त्यांची धारणा आहे की मनुष्य दुष्कर्मापासून दूर राहू शकत नाही.


संबंधित लेख

  • इस्लामचे ध्येय अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करून शाश्वत पारलौकिक जीवन साफल्य आहे.

    इस्लामचे ध्येय फक्त आपल्या अनुयायीं आणि समस्त मानवजातीच्या लौकिक कल्याणापुरताच मर्यादित नाही तर अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करून शाश्वत पारलौकिक जीवन साफल्य आहे. पारलौकिक जीवनातील शाश्वत शिक्षेपासून बचाव करण्यासाठी मुक्ती मार्ग म्हणजे इस्लाम आहे. आम्हा सर्वांना कधी न कधी मरावयाचे आहे आणि मेल्यानंतर त्या अल्लाहसमोर हजर व्हायचे आहे ज्याने आम्हाला जगात पाठविले आहे. सर्व मानव अशा प्रकारे मृत्यु पावणार आहेत आणि एके दिवशी ही सृष्टी नष्ट होणार आहे. नंतर पुन्हा अल्लाह नष्ट झालेल्या सृष्टीचे पुर्ननिर्माण करेल.
  • एक सर्वश्रेष्ठ क्रांतिकारी

    मानवी इतिहासातील प्रत्येक महान व्यक्तिमत्त्व हे तात्कालीन सामाजिक वातावरणाने व परिस्थितीने प्रभावित झालेले असतात. परंतु या व्यक्तीची शान काही औरच आहे. त्याला घडविण्यात तात्कालीन परिस्थितीचा काहीच वाटा नाही. कोणत्याही ऐतिहासिक पुराव्याने हे सिद्ध होऊ शकत नाही की अरबाची तात्कालीन स्थिती त्या वेळी ऐतिहासिक रूपात अशा व्यक्तीच्या जन्माची मागणी करीत होती. ओढून ताणून तुम्ही असे म्हणू शकता की ऐतिहासिक कारण अशा नेत्याची मागणी करीत होते
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]