Islam Darshan

इस्लाममध्ये नातलगांचे अधिकार

Published : Thursday, Feb 18, 2016

कुरआन आणि प्रेषितवचन संग्रहात वारंवार नातलगांचे अधिकार जोपासण्याची ताकीद करण्यात आली आहे. त्यांच्याशी संबंधविच्छेद करण्याची मनाई करण्यात आली आहे. ईश्वराने कुरआनात स्पष्टपणे म्हटले आहे,

‘‘निश्चितच ईश्वर न्याय आणि भलाई तसेच नातलगांचे हक्क अदा करण्याची आज्ञा देतो.‘‘(संदर्भ : सूरह-ए-नहल - ९०)

कुरआनात नातलगांशी स्नेहपूर्ण संबंध ठेवण्याबरोबरच त्यांची आर्थिक मदत करण्याच्या स्वरुपात भलाई करण्याचा स्पष्टपणे आदेश देण्यात आला आहे. कुरआनात ईश्वराचा आदेश आहे,

‘‘लोक(प्रेषित मुहम्मद(स.)) यांना विचारतात की, आम्ही काय खर्च करावा? तर(हे प्रेषित!) तुम्ही सांगा की, जे काही तुम्ही खर्च कराल, तो आपल्या माता-पित्यांवर, नातेवाईकांवर, अनाथ आणि गोरगरिबांवर आणि वाटसरूंवर(प्रवासात अडचणीत सापडलेल्यांवर) खर्च करा आणि जे काही भले तुम्ही कराल ते ईश्वरास माहीत असेल.‘‘(संदर्भ : सूरह-ए-बकरा - २१५)

प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे, ‘‘ज्याने तुमच्याशी स्नेहपूर्ण संबंध जोडले, केवळ त्यांच्याशीच संबंध जोडून चालणार नाही, तर ज्याने तुमच्याशी संबंध तोडले, त्यांच्याशी तुम्ही स्नेहपूर्ण संबंध जोडावे.”(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)

संबंधित लेख

  • व्याजमुक्त बँकिग व्यवस्था शक्य आहे काय?

    या आधुनिक काळात व्याजमुक्त बँकिग व्यवस्था स्थापन होऊ शकते काय? या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर केवळ मुस्लिमच नव्हे तर बरेच पाश्चात्य तज्ञसुद्धा देतात. काहीजण या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीसुद्धा देतात. या नकारार्थी उत्तराच्या पुराव्यादाखल ते म्हणतात की, व्याजदर ही एक किमत असून इतर संपूर्ण वस्तुंच्या किमतीप्रमाणे अर्थव्यवस्थेत संपत्ती-साधनांच्या मागणी व रसदींदरम्यान संतुलन प्रस्थापित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका निभावते. व्याज संपविल्यास संपत्तीसाधने मिळविणे आणि वापरणे शक्य होणार नाही. म्हणून त्यांना वाटते की, व्याज व्यवहारात बरेच दुर्गुण असूनसुद्धा ते आपण सहन करावयास हवे.
  • रेषित मुहम्मद (स.) एक महान समाजसुधारक

    खरे पाहता जगाची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत हजारो प्रेषित आणि सुधारक येऊन गेले आहेत. सर्वांनीच समाजसुधारणेचे खूप कार्य केले मात्र अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याद्वारे जी क्रांती जेवढ्या अल्प काळात घडली, त्याचे उदाहरण या जगाच्या इतिहासात सापडणे अशक्य आहे.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]