Islam Darshan

इस्लामविषयी एक गैरसमज

Published : Wednesday, Feb 03, 2016

जे लोक इस्लामला गतकाळाची गोष्ट समजतात व वर्तमानकाळातील त्याची उपयुक्तता, तसेच आवश्यकता यांचा इन्कार करतात ते वास्तवात इस्लामचे खरे स्वरुप जाणत नाहीत व जीवनातील त्याच्या खऱ्या संदेशासी व ध्येयाशी अनभिज्ञ आहेत. लहानपणी साम्राज्यवाद्यांच्या एजंटांनी नेमलेल्या पाठ्यपुस्तकातून त्यांना जे काही शिकविले गेले तोच शिकविलेला धडा ते आजही गिरवीत आहेत. त्यांच्यामते इस्लामच्या उदयाचा हेतू मानवाला मूर्तीपूजेपासून मुक्त करण्याचा होता. तसेच परस्पराशी वैरभाव बाळगणाऱ्या अरबी टोळ्यांची एकजूट करुन त्यांच्यात बंधुत्व निर्माण करण्याचा होता. तसेच दारु पिणे, जुगार खेळणे, मुलींना जिवंत पुरणे व याप्रकारच्या अनेक नैतिक दोषांपासून मुक्त करण्याचा होता. म्हणून इस्लामने अरबांमधील आपापसातील झगडे व लढाया समाप्त करुन त्यांची शक्ती नष्ट होण्यापासून वाचवली व नंतर जगामध्ये आपल्या संदेशाचा प्रचार करण्याकरिता या शक्तीचा उपयोग केला. या ध्येयासाठी मुस्लिमांना इतर जातीशी अनेक युद्धे करावी लागली. परिणामस्वरुप इस्लामी जग आपल्या वर्तमान मर्यादांसह या विश्वपटला वर उभे राहिले. हा एक असा ऐतिहासिक संदेश व ध्येय आहे ज्याचे कार्य आता पूर्ण झाले आहे. जगात मूर्तिपूजा संपली आहे. अरब टोळ्यांनी आता मोठमोठ्या राष्ट्रांचे रुप धारण केले आहे, म्हणून आता इस्लामची काही गरज उरली नाही. कारण जेथपर्यंत जुगार खेळण्याचा व मदिरा प्राशन करण्याचा संबंध आहे, त्यावर आजच्या संस्कृतीच्या व संस्काराच्या युगात कोणताही पायबंद घालणे शक्य नाही. याचा अर्थ असा की या लोकांमध्ये इस्लाम एका विशेष काळापुरता अतिउचित जीवनव्यवस्था देणारा धर्म होता. पण आज जग इतके पुढे गेले आहे की आज इस्लामच्या मार्गदर्शनाची काही गरज उरली नाही. म्हणून मार्गदर्शन व प्रकाशाकरिता आम्ही त्याच्याकडे पाहू नये. उलट सिद्धान्त व जीवनदर्शनापासून हा प्रकाश व उपदेश घ्यावयास पाहिजे. यातच आमची मुक्ती होऊ शकते व यातच आमचे कल्याण सामावलेले आहे.

पाश्चिमात्यांचे हे पौर्वात्य चेले आपल्या गुरुंच्या वाक्यांचा पुनरुच्चार करुन अनिच्छेने व अज्ञानाने आपल्या संकुचितपणाची जाणीव करुन देतात. हे बिचारे इस्लामला जाणतही नाहीत, तसेच जीवनातील त्याचे वास्तविक उद्देशही त्यांना ठाऊक नाहीत. म्हणून पुढे जाण्यापूर्वी ‘इस्लाम’, त्याचा अर्थ व उद्देश यावर थोडीशी चर्चा आवश्यक आहे.

संबंधित लेख

  • इस्लाममध्ये शेजार्याचे अधिकार

    माणसाला जगण्यासाठी समाजाची नितांत गरज आहे, एक दुसर्याच्या सहकार्याशिवाय माणसाचे जगणे अशक्य होऊन बसते. याच सहकार्याच्या भावनेतून समाज, गल्ली, वसती आणि शहरे व देश उदयास आले, जेणेकरून गरज पडल्यास माणसाला इतरांचे सहकार्य लाभावे. इस्लामी कायद्याने अशा दोन व्यक्ती, ज्या एकदुसर्यांच्या जवळ राहतात, त्यांना शेजारी म्हटले आहे आणि याबरोबरच त्यांचे अधिकार आणि कर्तव्य ठरवून दिले आहेत. याविषयी कुरआन आणि प्रेषितवचन संग्रहात शेजार्यांचे जे अधिकार निश्चित करून देण्यात आले आहेत, त्यांपैकी आपण केवळ प्रेषित वचनांचा संदर्भ घेऊ या.
  • इस्लाम व त्याचा अर्थ

    मुहम्मद(स.) मार्फत इस्लाम आम्हापर्यंत पोहोचला आहे, ‘इस्लाम’ हा अरबी भाषेचा शब्द आहे. त्याचा एक अर्थ ‘आज्ञापालन’ व दुसरा ‘शांति’ असा आहे. मुस्लिम आज्ञाधारकाला संबोधले जाते. अर्थात अल्लाहचा आज्ञाधारक, त्याचे आदेश मानणारा, त्याच्यासमोर नतमस्तक होणारा. अल्लाहने जितके पैगंबर धाडले. त्या सर्वांनी एकेश्वरवादाचीच शिकवण दिली. कोणीही पैगंबराने त्यांची स्वतःची उपासना करण्याचा आदेश दिला नाही. कोणीही स्वतःला ईश्वर अथवा त्याचा अवतार म्हटले नाही. ही गोष्ट अत्यंत विस्मयकारक ठरली की अधिकांश माणसांनी त्या पैगंबरांनाच खोटे ठरविले, त्यांचे म्हणणे ऐकले नाही. उलट त्यांचा छळ केला. त्यांना क्लेश-यातना दिल्या आणि त्यांचे निधन झाल्यावर त्यांना पूज्य म्हणून घोषणा केली. त्यांच्या मूर्ती घडवू लागले आणि त्यांच्या मूर्तीशीच सहाय्यांच्या याचना भाकू लागले व त्या मूर्तींची पूजा करु लागले. वास्तवतः सर्व पैगंबरांचा एकच धर्म होता- इस्लाम, माणसांना ईश्वराचा आज्ञाधारक असणे, हाच सर्वांचा परम हेतू होता. ही गोष्टही उल्लेखनीय आहे की सर्व जगाचा धर्म इस्लामच आहे.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]