Islam Darshan

कुटुंबप्रमुख

Published : Thursday, Feb 18, 2016

कुटुंबप्रमुखाची नियुक्ती करण्याची समस्या निर्माण झाली, तर कुटुंबप्रमुख अशी व्यक्तीच होऊ शकते जिच्यात प्रशासकीय क्षमता आहे. व जी कुटुंबाची, सर्व व्यवहारांची काळजी वाहू शकते व तिची व्यवस्था करु शकते. कुटुंबाच्या संज्ञेत एक पुरुष, स्त्री व मुले आणि त्याच्यापासून उद्भवणाऱ्या एकूण सर्व जबाबदाऱ्यांचा समावेश आहे. इतर सामाजिक संस्थांप्रमाणेच कुटुंबालाही एका जबाबदार कुटुंबप्रमुखाची गरज असते. त्याविना कुटुंब इतस्ततः विखुरले जाऊन, नाशाला बळी पडू शकते. कुटुंबप्रमुखाच्या बाबतीत तीन प्रकार असू शकतात.

  1. पुरुष कुटुंबप्रमुख असतो.
  2. स्त्री कुटुंबप्रमुख असते.
  3. पुरुष व स्त्री एकाच वेळी कुटुंबप्रमुख असू शकतात.

कुटुंबाचा तिसरा प्रकार, विषयापलीकडचा आहे, कारण अनुभव आम्हाला हे दर्शवितो, की जेथे दोन कुटुंबप्रमुख असतील, तेथे मुळातच जास्त अव्यवस्था व अडचणी निर्माण होतात. जमीन व आकाश यांच्या रचनेकडे इशारा करुन कुरआनमध्ये असे सांगितले आहे,

‘‘जमिनीवर व आकाशाखाली अल्लाहखेरीज अन्य कोणी उपासना करण्यायोग्य असता तर जमीन व आकाश दोन्हीही नष्ट झाले असते, तेव्हा प्रत्येक ईश्वराने आपली रचना वेगळी केली असती व त्यांनी परस्परांवर चढाई केली असती.’ (कुरआन, अल-अं-बिया, २१)

‘तर प्रत्येक ईश्वराने आपण निर्माण केलेल्या वस्तू व जीव वेगळे केले असते व एकमेकांवर चढाई केली असती.’ (अल-मूमिनून, ९१)

जर या काल्पनिक ईश्वरांची ही स्थिती आहे, तर माणसाची स्थिती तर जुलमी व अन्यायी झाली आहे तेव्हा काय अवस्था होईल; याचा विचार करा.

अशा रीतीने आमच्यासमोर दोनच पर्याय उरतात. त्यावर चर्चा करण्यापूर्वी आम्ही वाचकांसमोर एक प्रश्न मांडतो, की क्षमतेच्या दृष्टीने कुटुंब प्रमुख होण्यास स्त्री व पुरुषामध्ये कोण अधिक उपयुक्त आहे? बौद्धिक कुवत व क्षमतेचा धनी असलेला पुरुष आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या रीतीने पार पाडू शकतो की भावनाविवशतेचे वैशिष्ट्य असलेली स्त्री? आपली बौद्धिक क्षमता व बलशाली शरीरामुळे पुरुषच कुटुंबप्रमुख होण्यायोग्य आहे आणि तोच कुटुंबप्रमुख असावा व स्त्री ही आपल्या स्वभावधर्मानुसार भावनाशील व प्रक्षोभशील असते व तिच्यात पुरुषाप्रमाणे पाऊल उचलण्याची धमक नसते. हा विचार या समस्येवर जेव्हा आम्ही करतो तेव्हा आम्हाला त्याचे उत्तर सापडते. कमकुवत व ज्याच्यावर सहज दडपण आणता येईल अशा पुरुषाला स्वतः स्त्रीच पसंत करत नाही. अशा पुरुषाचा ती तिरस्कार करते व त्याच्यावर कधीही विश्वास ठेवत नाही. गेली कित्येक शतके स्त्रीला जी शिकवण व वारसापरंपरा मिळालेली आहे, तिच्या अवशेषांच्या परिणामस्वरुप स्त्रीचा असा कार्यविधी व मानसिक पद्धत आहे. परंतु आजसुद्धा शारीरिक दृष्टीने बलशाली असलेल्या पुरुषाकडेच ती आकर्षली जाते, ही गोष्ट कोणत्याही अवस्थेत सत्य आहे. हे सत्य अमेरिकन स्त्रीच्या जीवनात पूर्णपणे दिसून येते. अमेरिकन स्त्रीला पुरुषासमान हक्क प्राप्त आहेत व तिचा स्वतंत्र दर्जाही तेथे मान्यता पावला आहे. पण असे असूनही पुरुषाकडून पराजित होण्यात तिला आनंद वाटतो. ती अशा पुरुषाशीच प्रेम करते व त्याचे मन जिकण्याचा प्रयत्न करते. ती पुरुषाची बलदंड देहयष्टी व त्याची रुंद छाती पाहून प्रभावित होते आणि शारीरिक बलात तिला तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ व भक्कम वाटतो तेव्हा ती स्वतःला त्याच्या स्वाधीन करते.

स्त्रीला संतती नसेपर्यंत व त्यांच्या शिक्षणाची चिता नसेपर्यंतच कुटुंबप्रमुख होण्यात गोडी वाटू शकते. संतती झाल्यानंतर या वाढलेल्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये पार पाडण्यासाठी तिला वेळ उरत नाही. कारण मातेच्या भूमिकेतून तिची जी कर्तव्ये असतात ती काही कमी कठीण असत नाहीत व त्यांना काही कमी वेळ लागत नाही.

कौटुंबिक जीवनातील एक गोष्ट

घरामध्ये स्त्री ही पुरुषाची गुलाम व्हावी व तो तिचा जुलमी मालक व्हावा, असा याचा अर्थ कसल्याही परिस्थितीत होत नाही. कारण कुटुंबप्रमुखाची कर्तव्ये व जबाबदाऱ्यांचे स्वरुप असे असते, की पती-पत्नीमध्ये प्रेमाची व सहकार्याची भावना निर्मांण झाल्याखेरीज त्या पार पाडल्या जाऊ शकत नाहीत. कौटुंबिक जीवनाच्या सफलतेसाठी परस्परांना समजून घेणे तसेच सतत सहकार्य असणे, हा एक आवश्यक गुण आहे. इस्लाम आपापसातील संघर्ष व झगड्याऐवजी स्त्री-पुरुषाच्या दरम्यान प्रेम, परस्पर सामंजस्य, चिरकाल सहकार्य व सहानुभूतीला कौटुंबिक जीवनाचा मूलभूत पाया बनू इच्छितो. कुरआन स्पष्टोक्ती आहे,

‘व या स्त्रीबरोबर चांगुलपणाने जीवन व्यतीत करा.’ (कुरआन, अल निसा : १९)

प्रेषित मुहम्मद (स) यांचे कथन आहे की,

‘आपल्या कुटुंबीयांशी जो चांगला वागतो, तो तुम्हा सर्वापैकी अधिक चांगला आहे.’ (तिर्मिजी)

आपल्या पत्नीशी केले जाणारे वर्तन व व्यवहार हेच जणू माणसाचे चारित्र्य मोजण्याचे माप व प्रमाण प्रेषित मुहम्मद (स) यांनी ठरवून टाकले आहे. खरे तर हेच अतिशय योग्य प्रमाण आहे कारण जोवर माणूस आध्यात्मिक दृष्टीने रोगी नसतो आणि त्याच्यात चांगुलपणा व भलेपणाची कसलीही भावना शिल्लक नसते अथवा त्यांच्यात एखादी मानसिक व्यग्रता अथवा विघ्न निर्माण झालेले नसते, तोवर तो पत्नीशी दुर्वर्तन व दुर्व्यवहार करु शकत नाही.

कौटुंबिक जीवनात पति-पत्नींच्या संबंधातील रुढीबाबत बरेच गैरसमज पसरलेले आहेत. हे कसल्याही परिस्थितीत मान्य करुन त्यातील तथ्य व सत्य समजून घेण्याची गरज आहे. यातील काही गैरसमजुतीचा संबंध पतीने पत्नीवर टाकलेल्या कर्तव्याशी येतो व काही गैरसमज तलाक (घटस्फोट) व बहुपत्नित्व विवाह पद्धतीशी संबंधित आहेत.

संबंधित लेख

  • धर्म आणि राजकारण (आजचा ज्वलंत प्रश्न)

    इस्लाम ही एक सर्वसमावेशक अशी परिपूर्ण जीवनपध्दती आहे. याबद्दलचा खुलासा आपण मागील प्रकरणांतून पाहिला आहे. राजकारण हा धर्मकारणाचा एक भाग कसा आहे? तसेच धर्मव्यवस्थेचे राजकीय व्यवस्था एक महत्त्वाचे अंग कसे आहे? याचे अद्याप स्पष्टीकरण पूर्णतः न झाल्यामुळे लोकमनात संभ्रम आहे. या दोघांच्या संबंधाचा येथे स्पष्ट खुलासा होणे गरजेचे आहे. राजकारणाला आपण क्षुद्र समजून त्याची अवहेलना करू शकत नाही. आधुनिक जगात तर त्याचे महत्त्व इतके वाढले आहे की अतिमहत्त्वाची खाजगी कामेसुध्दा आज राजकारणाच्या कक्षेत मोडतात. त्यामुळे मनुष्यजीवनावर राजकारणाचा स्वाभाविकपणे दूरगामी परिणाम होत आहे. डोळे उघडून पाहिल्यास कळून येते की सर्व तत्त्वज्ञान, आदर्श आणि श्रध्दा राजकारणाच्या एका फटक्यात नाहीसे होतात.
  • इस्लामची आध्यात्मिक व्यवस्था

    तत्वज्ञानाच्या व धर्माच्या जगामध्ये सामान्यपणे जी कल्पना अस्तित्वात आहे ती ही की आत्मा व शरीर परस्पर विरोधी आहेत, दोघांचे विश्व वेगळे आहे, दोघांच्या गरजा केवळ वेगळ्या नसून परस्पर विरोधी आहेत. या दोहोंची प्रगती एका वेळेस होणे शक्य नाही.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]