Islam Darshan

अपयशी पती-पत्नी

Published : Thursday, Feb 18, 2016

क्षणभर आपण अशा पती-पत्नीसंबंधी थोडासा विचार करु जे एकामेकांवर जुलूम, अन्याय व अतिरेक करीत असतात. पुरुष हा कुटुंबाची देखभाल करणारा व कुटुंबाच्या सर्व गरजा भागविण्यास जबाबदार असतो, म्हणून त्याला असा अधिकार दिला गेला आहे की बंडखोर व वरचढ पत्नीला वठणीवर आणण्यासाठी प्रसंगोपात त्याने धाकदपटशाचा अवलंब करावा.

ही गोष्ट खालील आयतीवरुन स्पष्ट होते,

‘ज्या स्त्रिया घमेंडखोर व चिडक्या स्वभावाच्या असतील, त्यांना तोंडी उपदेश करा, त्यांना शयनगृहात एकट्या ठेवा, त्यांना मारहाण करा पण जर त्यांनी तुमचे आज्ञापालन करण्याचे सुरु केले तर त्यांच्या विरुद्ध (जुलूम व अत्याचार करण्यासाठी) निर्मित्त शोधू नका.’ (कुरआन ४:३४)

पत्नीची सुधारणा करण्याची पद्धत

या आयतीमध्ये वरचढ पत्नीच्या वर्तणुकीत सुधारणा घडवून आणण्यासाठी कृती करण्याचा एक ठराविक क्रम दिलेला आहे. शारीरिक शिक्षेचा क्रम यात सगळ्यात शेवटी आहे. काही पुरुष आपल्या या अधिकाराचा गैर वापर करतात. ही गोष्ट आम्ही जाणतो, पण ही अवस्था केवळ या अधिकारापुरती मर्यांदित नसून इतर आधिकारांच्या बाबतीतही ती निर्माण होऊ शकते. माणसामध्ये आध्यात्मिक तसेच नैतिक उंची निर्माण करणे व वाढविणे हाच त्यावर उपाय आहे. म्हणून वरील आयतीत जो कायदा केला गेला आहे, त्याचा हेतू कौटुंबिक जीवनाला सुदृढ करुन त्याचे रक्षण करण्याचा आहे. कारण ज्या कायद्याच्यापाठी मागे अमंलबजावणी करु शकणारी व त्याचा भंग करणाऱ्यास शिक्षा देऊ शकणारी शक्ती असते; असाच कोणताही कायदा हितकर व परिणामकारक होऊ शकतो. त्याच्या पाठीमागे अशी अंमलबजावणी करु शकणारी शक्ती नसेल तर त्याचे मूल्य रिकाम्या रक्तरंजित शब्दाहून काही अधिक नसते. असा कायदा जगात कसलाही परिणाम अगर चमत्कार करुन दाखवू शकत नाही.

या आदेशातील हितकर सल्ला

विवाहाचा उद्देश स्त्री व पुरुष या दोहोंचे हित व कल्याण करण्याचा असतो. त्याचा उद्देश असा आहे की घरात प्रेम व शांतता नांदावी, जेणेकरुन पती-पत्नीला कायद्याचा आधार घेतल्याशिवाय जास्तीतजास्त आध्यात्मिक व भौतिक लाभ व सुख मिळणे शक्य व्हावे. परंतु पती-पत्नीत मतभेद व भांडणे असतील तर त्याचा दुष्परिणाम केवळ त्यांच्या पुरताच मर्यादित राहत नसून, त्याची झळ त्यांच्या संततीला, अर्थांत भावी पिढीलाही लागल्याशिवाय राहू शकत नाही.

संबंधित लेख

  • मुस्लिमांची जबाबदारी - एक राष्ट्र या संदर्भात

    इस्लामचे श्रेष्ठत्व: इस्लामच्या विशेष अशा अग्रगण्य स्थानाबद्दल आता आपण विचार करू या. इस्लामचा हा दावा आहे की तोच एकमेव परिपूर्ण असा धर्म आहे. तो सर्व मानवांसाठी आहे. इस्लाम एकमेव धर्म आहे आणि मानवाच्या मुक्तीसाठी इस्लामचे अनुकरण अनिवार्य आहे. इस्लाम हा सर्वोत्कृष्ट धर्म असल्यामुळे त्याच्या काही विशेष गरजा असणे स्वाभाविक आहे. या विशेष गरजांपैकी एक महत्त्वाची गरज ही आहे की इस्लामचा प्रसार-प्रचार जगाच्या कानाकोपऱ्यात व्हावा. प्रत्येक राष्ट्रात इस्लामची शिकवण सर्वदूर पोहचवावी आणि जगातील प्रत्येक माणसाला इस्लामसंदेश प्राप्त होणे अत्यावश्यक आहे.
  • ईश्वरभक्तांचे विश्वबंधुत्व

    नमाजसाठी मुस्लिमांना हाक देण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. अशी पद्धत जगातील कोणत्याच धर्मीय वा निधर्मी समाजात प्रचलित नाही. नमाजसाठी हाक देण्याचा एकाच प्रकारचा शब्दसमूह (अजान) जगातील प्रत्येक मस्जिदीतून दिवसातून पाच वेळा पुकारला जातो. ‘अजान’ देणाऱ्याची व ज्यांना बोलाविण्यात येत आहे त्यांची मातृभाषा कोणतीही असो, ‘अजान’ अरबी भाषेतच पुकारली जाते. जगातील कोणत्याही भागातील मुस्लिमास ‘अजान’ ऐकताच नमाजकरिता हाक दिली जात आहे असे समजते. अजानने हेही लक्षात येते की, त्यांना (अर्थात सर्व इस्लाम धर्मियांना) कोठे बोलाविले जात आहे?
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]