Islam Darshan

समृद्धी आणि धर्म

Published : Monday, Feb 15, 2016

इस्लामने त्याच्या अनुयायींना भौतिक समृध्दी विपुल प्रमाणात दिली. परंतु ही समृध्दी कोणत्या मार्गाने आणि कशी आली हे पाहणे आवश्यक आहे. जर धर्म फक्त आणि फक्त पारलौकिक जीवनासाठीच प्रशिक्षित करीत असेल आणि या जगाशी संबंध तोडत असेल तर या जगात यशप्राप्ती कशी होणार? एक व्यक्ती धर्मांवर पूर्ण आचरण करतो आणि त्याच वेळी या जगाच्या सुखांचासुध्दा उपभोग घेतो हे कसे शक्य आहे? या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आणि या जटीलतेची उकल करण्यासाठी आपणास इस्लाम धर्माच्या मूलतत्त्वांचाच आधार घ्यावा लागेल.

१) धन संपत्ती, सत्ता, आदरसन्मान इ. या भौतिक जगाच्या समृध्दीचे द्योतक आहेत. हे सर्व अल्लाहच्या देणग्या आहेत. बनी इस्राईलनी जे भौतिक सुख उपभोगले होते तेसुध्दा अल्लाहच्या देणग्या होत्या. कुरआनोक्ती आहे,

‘‘आठवा तो प्रसंग जेव्हा मूसा (अ.) यांनी आपल्या लोकांना सांगितले होते की, हे माझ्या बांधवांनो! अल्लाहच्या त्या देणग्या ध्यानात घ्या जे त्याने तुम्हाला प्रदान केले. त्याने तुमच्यात नबी (प्रेषित) निर्माण केले. तुम्हाला सत्ताधारी बनविले आणि तुम्हाला ते सर्व काही दिले जे या जगात कोणालाच दिले नव्हते.’’ (कुरआन ५: २०-२१)

याचप्रमाणे जीवनाच्या साधनसामुग्रीला आणि समृध्दीला अल्लाहची कृपा म्हणून कुरआन संबोधन करीत आहे,

‘‘अल्लाह एका वस्तीचे (राष्ट्राचे) उदाहरण देत आहे. ती सुखासमाधानाचे जीवन व्यतीत करीत होती आणि चहुकडून तिला विपुल उपजीविका पोहचत होती की तिने अल्लाहच्या देणग्यांशी कृतघ्नता दर्शविण्यास प्रारंभ केला.’’ (कुरआन १६: ११२)

तसेच सुरह जुमा आणि इतर ठिकाणी या गोष्टींना कुरआन अल्लाहच्या देणग्या (कृपा) म्हणून संबोधत आहे,

‘‘मग जेव्हा नमाज पूर्ण होईल तेव्हा भूतलावर पसरले जा आणि अल्लाहच्या कृपा प्रसादाचा शोध घ्या. आणि अल्लाहचे मोठ्या प्रमाणात स्मरण करीत राहा कदाचित तुम्हाला सफलता प्राप्त होईल.’’ (कुरआन ६२: १०)

२) मनुष्याची निर्मिती ह्या भूतलावर अल्लाहचा प्रतिनिधी या रूपात झाली आहे. या जगाची व्यवस्था त्याने आपल्या हातात घेऊन अल्लाहच्या म्हणजेच अल्लाहच्या प्रतिनिधीचे कर्तव्य पार पाडूच शकत नाहीत. त्यांच्या जीवनाचे खरे ध्येय हे करमणूक नाही तर एक अनिवार्य असे कार्य आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तर स्पष्ट होते की मुस्लिम फक्त पारलौकिक जीवनातील कल्याणाचाच इच्छुक नाही. त्याला अधिकार आहे या जगातील समृध्दीला प्राप्त करण्याचा! याचमुळे एक मुस्लिम अल्लाहपुढे नेहमीच प्रार्थना करतो,

‘‘हे आमच्या पालनकर्त्या, आम्हाला या या जगातील सुद्धा चांगले फळ दे आणि पारलौकिक जीवनामध्ये सुद्धा चांगले फळ दे आणि नरकाग्नीच्या यातनांपासून आम्हाला वाचव.’’ (कुरआन २: २०१)

ही प्रार्थना अल्लाह जरूर स्वीकारतो जेव्हा मुस्लिम हे सिध्द करून दाखवितो की तो इस्लामची साक्ष देण्यास पात्र आहे.

आता वरील प्रश्नाच्या उत्तरातील एक भाग येथे स्पष्ट करणे बाकी आहे. जर मुस्लिम पात्र आणि योग्यता सिध्द करून पारलौकिक जीवनातील आणि या जगातील कल्याणाची मागणी करतो तरी दिव्य कुरआन आणि हदीस या मागणीला वारंवार रद्द का करतो? मुस्लिमेतर आपले डोळे सतत पारलौकिक जीवनाकडे लावून बसतो आणि भौतिक सुखांना पारलौकिक जीवनाच्या तुलनेत तुच्छ समजतो.

ज्या जगाचा इस्लाम धिक्कार करतो ते जग अगदी वेगळे जग आहे आणि ज्या जगाच्या कल्याणाची एक मुस्लिम मागणी करतो ते जग वेगळे आहे. जे जग व्यक्तीला आपल्या निर्माणकर्त्याचा विसर पाडतो आणि त्याबद्दल निष्काळजी बनवतो अशा जगाचा इस्लाम धिक्कार करतो. कुरआन आणि हदीसमध्ये ज्या जगाचा धिक्कार केला आहे ते हे जग आहे ज्यात अल्लाहचा विसर पडतो आणि मनुष्य अल्लाह आणि त्याच्या धर्माबद्दल निष्काळजी बनून राहतो. ज्या विश्वात अल्लाहचा विसर पडला जात नाही आणि त्याला आणि त्याच्या धर्माबद्दल निष्काळजीपणा दाखविला जात नाही किबहुना या कामी मदतच केली जाते अशा विश्वाला रद्द करणे अथवा त्याचा धिक्कार इस्लाम मुळीच करत नाही. धर्मसुध्दा अशा विश्वाला अवैध ठरवत नाही. अशा प्रकारचे विश्व हे मान्यताप्राप्त (धर्मसंमत) आणि मुस्लिमांच्या प्रार्थनेत अपेक्षित असते. कुरआन अशा विश्वाला रद्द करत नाही तर ‘जगाचा चांगुलपणा’, ‘चांगले जीवन’ आणि ‘जगाचा मोबदला’ अशा उपाधी देऊन त्या विश्वाला अलंकृत करतो. जेव्हा मुस्लिमांसाठी ‘जगाचे कल्याण’ हा शब्दप्रयोग कुरआन करतो त्या वेळी वरीलप्रमाणे जग अपेक्षित असते. एखादा म्हणू शकतो की ‘अल्लाहचा विसर’ आणि ‘धर्मकर्तव्याबद्दल निष्काळजीपणा’ हे मनुष्यसापेक्ष आहे, त्यांचा भौतिकतेशी काही एक संबंध नाही. अल्लाहचा विसर एखाद्याला एखाद्या गोष्टीपासून झाला तर दुसऱ्या व्यक्तीला तसा परिणाम होणारसुध्दा नाही. सर्वसाधारण मनुष्य थोड्याशा धनसंपत्तीमुळे स्वतःचा तोल सोडतो परंतु उमर बिन अब्दुल अजीज (रजि.) यांच्यासारखी माणसे सर्वसत्ताधारी असूनसुध्दा एक क्षण अल्लाहचा विसर पडू देत नाही. म्हणून प्रत्यक्षात मनुष्यसापेक्षता सर्रास याविषयी लागू पडत नाही. वस्तूस्थिती अशी आहे की धनसंपत्ती, आदरसन्मान, सत्ता या गोष्टी मूलतः वाईट नाहीत तर व्यक्तीचे विचार आणि या गोष्टींचा वापर त्यांना मनुष्यासाठी हानिकारक बनवतात. इस्लामची ही धारणा आहे की मुस्लिम या गोष्टींचा गैरवापर करत नाही. कारण त्यांना अल्लाहने मनुष्यांसाठी प्रदान केले आहे आणि त्यांचा वापर अल्लाहच्या मर्जीप्रमाणे तो करतो. अशा स्थितीत या भौतिकतेचा अल्लाह धिक्कार करतो हा प्रश्नच उद्भवत नाही. या स्थितीत मुस्लिम या जगाला एक सुंदर जग बनवतो.

दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर हे आहे की पारलौकिक जीवनास या नश्वर जगावर प्राधान्य देणे म्हणजे हे भौतिक जग सोडून देणे असा होत नाही. याचा वास्तविक अर्थ हा होतो की भौतिक लाभप्राप्तीमागे लागून एखाद्याने धर्माबाबत निष्काळजी बनू नये आणि पारलौकिक जीवन नष्ट करू नये. पारलौकिक जीवाचे कल्याण प्राप्त करण्यासाठी मनुष्याला आपल्या आशा-आकांक्षांना लगाम लावून भौतिक सुखाचा त्यागसुध्दा करावा लागतो. याचा अर्थ भौतिक जीवनाचाच त्याग हा होत नाही. उदा. एका घोड्याला कसून बांधणे की त्याला हालचालसुध्दा करता येऊ नये आणि दुसऱ्या घोड्याला बांधून ठेवले तर असा घोडा घास खाऊ शकतो आणि आजूबाजूला जाऊन फिरून घास खाऊ शकतो. परंतु पहिल्या प्रकारचा घोडा यापासून वंचित राहतो. या उदाहरणावरून हे स्पष्ट होईल की दुसऱ्या प्रकारच्या घोड्याला जसे सीमित स्वातंत्र्य आहे त्याचप्रमाणे एक मुस्लिम पारलौकिक जीवनाला या भौतिक जीवनावर प्राधान्य देतो. जगातील सीमित सुख-समाधान, धनसंपत्ती त्याच्यासाठी वैध असते. पारलौकिक जीवनाच्या कल्याणासाठी भौतिक जीवनाचा त्याग इस्लामला अपेक्षित नाही. वरील ‘सुरे आले इमरान’ची आयत आपण गांभीर्याने विचारात घेतली तर लक्षात येईल की जे खरे श्रध्दावंत आहेत आणि सदाचारी आहेत त्यांना पारलौकिक जीवनातच फक्त मोबदला दिला जातो असे नाही तर या जगातसुध्दा त्यांना अल्लाहचा कृपाप्रसाद प्राप्त होतो. जो मनुष्य अल्लाहचा दास आहे आणि तो पारलौकिक जीवनाला या जगावर प्राधान्य देतो अशा माणसाला या जगात मोबदला मिळाला तर ते एक प्रमाण आहे अल्लाहच्या ईष्टवचनाचे म्हणजेच पारलौकिक जीवनाला या जगावर प्राधान्य देणे म्हणजे या जगाचे कल्याण साधणे होय. या जगाच्या कल्याणापासून वंचित मग तो मनुष्य राहणार नाही.

भौतिक समृध्दीसाठी अटी: श्रध्दाशीलता आणि सदाचरण हे फक्त पारलौकिक जीवनाच्या कल्याणासाठीच आवश्यक आहेत असे नाही तर या जगातील कल्याण साधण्यासाठीसुध्दा तितकेच आवश्यक आहेत. याचाच अर्थ असा आहे की या जगाच्या कल्याणाचे द्वार हे श्रध्दाशील आणि सदाचरणी माणसासाठी खुले आहेत. या सत्याला पुराव्याची गरज नाही. म्हणून राष्ट्रांच्या भलाई आणि कल्याणासाठीसुध्दा हीच अट आहे आणि होती. जेव्हा मुस्लिमांना अनेकेश्वरवादींवर विजय प्राप्त होत असे तेव्हा ‘‘तुम्ही खरे श्रध्दाशील आहात’’ आणि त्यांना राजसत्तेचे आश्वासन दिले जात, ते याच अटीवर की ते मुस्लिम राष्ट्र एक श्रध्दाशील आणि सदाचारी राष्ट्र आहे. कुरआनोक्ती आहे,

‘‘अल्लाहने वचन दिले आहे तुमच्यापैकी त्या लोकांना जे श्रध्दा ठेवतील आणि सत्कृत्ये करतील. तो त्यांना पृथ्वीतलावर त्याचप्रमाणे खलीफा (आपला नायब) बनवील ज्याप्रमाणे त्यांच्या पूर्वी होऊन गेलेल्या लोकांना बनविलेले आहे.’’ (२४: ५५)

थोडक्यात अल्लाहचा हा सर्वसाधारण वचन देण्याचा शिरस्ता आहे की तो श्रध्दावंतांना या जगात सुखसमृध्दी देतो. तेसुध्दा या सर्वसाधारण अटींवर की तो मनुष्य अथवा राष्ट्र हे श्रध्दाशील आणि सदाचारी असणे आवश्यक आहे. दोन्ही जगाचे यश या अटीवर अवलंबून आहे. मनुष्य अशा स्थितीत मानसिक स्वास्थ्य, आदरसन्मान, प्रसिध्न्व धनसंपत्ती या जगात प्राप्त करतो आणि तो तसतसा अल्लाहकडे जास्त आकृष्ठ होतो व पारलौकिक जीवनास या नश्वर जगावर प्राधान्य देऊ लागतो. हदीसमध्ये आहे,

‘‘जो आपल्या सर्व चिता काळजी एका चितेत परिवर्तीत करतो ती चिता म्हणजे पारलौकिक जीवनाचा ध्यास होय. मग अशा व्यक्तीच्या नश्वर जगाची काळजी अल्लाह घेतो. आणि ज्याचे मन निरनिराळ्या चितेमुळे भरलेले असते. तत्वज्ञानाची आणि ह्या जगाची चिता मग अशा व्यक्तीची हत्त्या कोठे होईल याची अल्लाहला पर्वा नाही.’’ (इब्ने माजा)

दुसऱ्या एका हदीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे,

‘‘जो कोणी पारलौकिक जीवाला आपल्या या आयुष्याचे ध्येय मानतो. अल्लाह त्याचे कार्य सिध्दीला नेतो आणि त्याचे मन उदार बनवितो आणि हे जग त्याच्यापुढे मग लोटांगण घेऊ लागते.’’ (इब्ने माजा)

याच तत्त्वावर राष्ट्र जीवनात कल्याण प्राप्त होते. स्वातंत्र्य, धनसंपत्ती, आदरसन्मान, आंतरराष्ट्रीय पत इ. प्राप्त होते जर ते राष्ट्र श्रध्दाशील राष्ट्र असेल. एकीकडे श्रध्दावंत आणि सदाचारी लोक आणि दुसरीकडे एक सशक्त संस्थात्मक समुदाय अल्लाह आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आज्ञांकित असलेला. ही अट सर्व राष्ट्रांना एक सारखी लागू होते असे म्हणणे चुकीचे आहे. कोणी द्रोही राष्ट्रसुध्दा सत्ताप्राप्तीच्या उच्च शिखरावर आरूढ असेल, परंतु त्यासाठी मुस्लिम (श्रध्दावंताला) सूट देता येत नाही. त्यांच्यासाठी एकमेव मार्ग सत्ताप्राप्तीचा आहे तो म्हणजे इस्लामचा मार्ग आहे. हा अल्लाहला समर्पित होण्याचा मार्ग आहे. सरळमार्ग जो सत्याची साक्ष देण्याकडे नेतो. हा फरक यासाठी आहे की मुस्लिम राष्ट्राचे (आज्ञाधारक राष्ट्र) म्हणजेच इस्लामी राष्ट्राचा उदय आणि अस्तासाठी इतरांसारखा नियम अल्लाहने निश्चित केलेला नाही. इतरांसाठी त्यांनी जर काही नैतिक गुणांना आत्मसात करून त्या द्वारे भौतिक प्रगतीच्या उच्च शिखरावर पोहचणे शक्य आहे. परंतु मुस्लिमांसाठी मात्र असे नाही. ते अल्लाहच्या धर्माचे ध्वजवाहक आहेत आणि सत्याची साक्ष इतरांसमोर देण्यासाठी बाध्य आहेत. इतर कोणतेच राष्ट्र या भूमिकेत असत नाही. परिस्थितीतील हा फरक नंतर कर्तव्य आणि जबाबदारीतसुध्दा फरक निर्माण करतो. त्यांच्या कर्तव्य आणि जबाबदारीतील फरकामुळे स्वभावतः त्यांच्यासाठी वेगळे विधी नियम लागू होतात. जर इतर राष्ट्र सत्य मार्गापासून दूर गेले तर त्यांचा हा अपराध इतका गंभीर आणि यातनादायक समजला जात नाही जितका की हाच अपराध एका मुस्लिम (श्रध्दाशील) राष्ट्राकडून घडला जातो. म्हणून अल्लाहची आज्ञाधारकता न स्वीकारता इतर राष्ट्रांना प्रगती आणि समृध्दी प्राप्त होत जाते तर या शॉर्टकटसाठी मुस्लिमांना परवानगी दिली जात नाही. आज्ञाधारक राष्ट्राला जर अल्लाहचा मोबदला मिळाला नाही, तर त्याने त्याची कदर केली नाही हे सिध्द होते आणि ते राष्ट्र अल्लाहच्या कोपला सामोरे जाते. याबद्दलचे कुरआनमध्ये अनेक ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत.

हे सत्य आहे की मुस्लिम (आज्ञाधारक) राष्ट्र या जगात सत्ता आणि वैभव प्राप्त करते जेव्हा ते आपल्या निर्माणकर्त्याचे पूर्ण अधिन होतात. त्याची आज्ञाधारकता स्वीकारून सदाचारी बनतात. हे ऐतिहासिक सत्य आजपासून पंधराशे वर्षांपूर्वीचे आहे. मुस्लिमांनी खऱ्या मुस्लिमांसारखी वागणूक ठेवली तेव्हा त्यांना राजसत्ता आणि वैभव संपन्नता प्राप्त झाली होती जी आज अमेरिकासुध्दा उपभोगू शकत नाही. जेव्हा मुस्लिम ‘आज्ञाधारक राष्ट्र’च्या स्थितीपासून दूर जाऊन एक सर्वसामान्य राष्ट्र बनून राहिले तेव्हा त्यांना या खास हक्कापासून अल्लाहने वंचित ठेवले. आता तर त्यांची स्थिती नगण्य झाली आहे. मुस्लिमांच्या सद्यस्थितीचे द्योतक आहे की त्यांचा तो ‘‘सुवर्ण काळ’’ ते स्वतः सुधारल्याशिवाय पुन्हा प्राप्त होणार नाही. ग्रंथधारकांबाबत अल्लाहने घेतलेला निर्णय कुरआनमध्ये सुरक्षित आहे.

‘‘हे ग्रंथधारकांनो, तुम्ही कदापि कोणत्याच मुलाधारावर नाही जोपर्यंत तौरात व इंजील आणि त्या इतर ग्रंथावर तुम्ही दृढ राहात नाही. जे तुमच्याकडे तुमच्या पालनकर्त्यांकडून अवतरित केले गेले आहेत.’’ (कुरआन ५: ६८)

वरील कुरआनोक्ती मुस्लिम (आज्ञाधारक) राष्ट्राच्या भविष्याकडे निर्देश करत आहे. जर ते कुरआनबरहुकूम धर्म प्रस्थापना करण्यात अयशस्वी झाले तर ते सरळ आणि सत्य मार्गावर नाहीत. हे वरील दिव्योक्ती सिध्द करत आहे. आणि ते त्या आदर सन्मानास, वैभवसंपन्नतेस आणि राज्यसत्तेसाठी पात्र ठरूच शकत नाहीत.

मुस्लिमांचे भविष्य हे त्यांच्या वर्तमानापासून वेगळे तेव्हाच होऊ शकते जेव्हा ते त्यांच्या भूतकाळात प्रवेस करतील. त्यांच्यावर अल्लाहच्या कृपाप्रसादाचा वर्षाव तेव्हाच होणार जेव्हा त्यांच्या जीवनात अल्लाहचा धर्म प्रभावशाली बनेल. जेव्हा त्यांच्या मशिदीतील धर्म आणि त्यांच्या शासनव्यवस्थेचा धर्म एक असेल. जेव्हा मुस्लिमांची ही उत्कट इच्छा बनेल तेव्हाच अल्लाह त्यांची इच्छापूर्ती करेल.

येथे अल्लाहच्या दुसऱ्या आदेशावर विचार करणे उचित ठरेल. त्यात म्हटले आहे की राष्ट्रीय स्वातंत्र्य, आदर आणि वैभवसंपन्नता हे सर्व राष्ट्रासाठी आहे. त्यांचा मुस्लिमांवर वर्षाव होणार नाही. याच कारणामुळे अल्लाहचे इष्टवचन हे लोक समुदायासाठी (राष्ट्र) आहे व्यक्तीसाठी वैयक्तिक नव्हे. जर मुस्लिम अशा प्रकारचा लोक समुदाय (राष्ट्र) आहे की जो अल्लाह आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांना अभिप्रेत आहे. म्हणजे तो लोक समुदाय (राष्ट्र) श्रध्दाशील, सदाचारी आणि सत्याची साक्ष देणारा आहे तर असा मुस्लिम (आज्ञाधारक) लोकसमुदाय (राष्ट्र) आदरसन्मान आणि वैभव संपन्नतेला पात्र आहे. जर ते असे नसतील तर ते इस्लामच्या ऐहिक सुखसमृध्दीला पात्र ठरणार नाहीत. मग संख्येत ते कितीही मोठे असोत. काहींच्या धर्मनिष्ठेमुळे मुस्लिम लोकसमुदायास काही एक फायदा होणार नाही. चांगले आणि वाईट, आळसी आणि कार्यशील अशा सर्वांनाचा ही कटुफळ चाखावी लागतील.

शक्य आहे की धर्मनिष्ठ आणि सदाचारी लोकांना व्यक्तीशः सांसारिक फायदे प्राप्त होत राहतील जरी ते दुष्कृत्यें सामुदायिकरित्या करीत राहिलेत. परंतु काहींच्या धर्मनिष्ठेने आणि सदाचारामुळे लोकसमुदायाचा फायदा न होता लोकसमुदायाच्या सामुदायिक दुष्कृत्यांमुळे संपूर्ण समुदाय (राष्ट्र) लयास जाईल.

संबंधित लेख

  • इस्लाम व संस्कृती

    सर्वधर्म समभाव कल्पना - आजकाल ‘सर्व धर्म समभाव’ हा विचार फार लोकप्रिय झाला आहे. या विचारामागे एक तत्त्व कार्यरत आहे की सर्व धर्म खरे आहेत. सर्व धर्म देवाकडेच नेतात आणि सर्व धर्म मनुष्याचे कल्याण करण्यास आणि त्याला मुक्ती देण्यासाठी प्रयत्नशील असतात. या विचाराने पुढे ही धारणा निर्माण केली की प्रार्थनेचे स्वरुप वेगवेगळे असू शकते, तसेच मार्ग वेगवेगळे आहेत. ईश्वरावर श्रध्दा बाळगणाऱ्यांची पध्दत व मार्ग वेगवेगळे असले तरी ते सारखेच महत्त्वाचे आहेत. बाह्याकार भक्तीचा महत्त्वाचा नसून भाव महत्त्वाचा आहे. म्हणून भक्तीचे अनेकानेक मार्ग असू शकतात. भक्तीचा हेतु महत्त्वाचा आहे.
  • ‘उहुद’ युद्धाच्या काही महत्त्वाच्या बाजू

    ‘बद्र’ चे युद्ध सत्य-असत्यातील फरक स्पष्ट करणारे आणि ईश्वराच्या मदतीमुळे कमी सैन्यसंख्या, कमी हत्यार व शस्त्रे असूनही सशस्त्र आणि बहुसंख्य असलेल्या शत्रूवर विजय प्राप्त करून देणारे असल्यामुळे इस्लामी इतिहासात यास अत्यंत महत्त्व आहे. त्याचा प्रभाव मुस्लिमांच्या संपूर्ण सामरिक इतिहासावर पडलेला आहे.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]