Islam Darshan

मानवी स्वभाव निकृष्ठ दर्जाचा नाही

Published : Monday, Feb 15, 2016

इस्लामसमोर मानवी स्वभाव खाजगी संपत्तीचे फल निश्चितपणे अन्याय व अत्याचाराच्या रुपानेच मिळावे इतका निकृष्ठ दर्जाचा नाही. माणसांच्या शिक्षणाच्या व संस्कृतीच्या संदर्भात इस्लामला अपूर्व सफलता प्राप्त झालेली आहे. म्हणून धन व संपत्तीचे मालक असतानाही मुस्लिमांची अशी अवस्था होती की -

‘स्थलांतर (हिजरत) करुन त्यांच्याकडे आलेल्या लोकांवर हे लोक प्रेम करतात व त्यांना जे काही द्यावे लागते त्याची गरजसुद्धा हे लोक आपल्या मनात बाळगत नाहीत व स्वतः वर हलाखी जरी आली तरी स्वतःपेक्षा दुसऱ्यांनाच प्राधान्य देतात.’

आपल्या संपत्तीत इतरांना वाटेकरी करुन त्यांना आनंद होत असे परंतु असे करण्यात त्यांचा कुठलाही उद्देश इहलोकांतील लाभ प्राप्त करण्याचा नव्हता उलट त्याचा मोबदला ते फक्त अल्लाहकडून मिळण्याचे व त्याची क्षमा प्राप्त करण्याचे ते इच्छुक होते.

ही श्रेष्ठ व पवित्र उदाहरणे आम्हाला सतत डोळ्यांसमोर ठेवली पाहिजेत. अशी उदाहरणे सामान्यपणे इतिहासात आढळत नाहीत. ही उदाहरणे आम्हाला असा प्रकाश दाखवितात की ज्यामध्ये आमचे भविष्य उज्वल होऊ शकते. तसेच मानवाचे पद व त्याचे स्थान किती उच्च आहे याचीही कल्पना येते.

एक स्वास्थपूर्ण समाज

येथे आम्हाला ही गोष्टही चांगल्यारितीने समजून घेतली पाहिजे की माणसांनी केवळ काल्पनिक जगातच दंग राहावे असा इस्लामचा कदापिही मानस नाही. म्हणून इस्लाम सार्वजनिक हिताला केवळ सदिच्छावर व तिच्या दयेकृपेवर सोडून देत नाही. इस्लाममध्ये प्राप्त होणाऱ्या आत्म्याच्या पावित्र्याला सर्व प्रकारे महत्त्व असूनही इस्लाम जीवनातील व्यवहारी व प्रत्यक्ष समस्याकडे कधी डोळेझाक करीत नाही. कायद्याद्वारे संपत्तीचे वाटप सर्व समाजामध्ये न्यायतत्त्वाप्रमाणे व्हावे याची इस्लाम व्यवस्था करतो. आत्मिक पावित्र्य एकत्र करतानाच तो आम्हाला न्यायोचित कायदाही देतो. अशातऱ्हेने एका कल्याणकारी मानवी समाजाची वेल मांडवावर चढवितो. इस्लामचे तिसरे खलीफा माननीय उस्मान बीन अफ्फान (र) यांनी आपल्या कथनात स्पष्ट केल्याप्रमाणे कदाचित हेच ते सत्य होते की,

‘कुरआनद्वारा या गोष्टींना अवरोध शक्य होत नाही, बेशक त्या गोष्टींचा अवरोध अल्लाह बलाने करीत असतो.’

खाजगी संपत्तीच्या संदर्भात कोणत्याही परिस्थितीत असे म्हणणे खरे नाही की तिच्यापासून नक्कीच अन्यायाचा जन्म होतो. कारण काही काळ असाही आढळतो की ज्यामध्ये तिचे अस्तित्व कोणालाही अन्यायास कारणीभूत झाले नाही. या संकटास थोपविण्यासाठी इस्लामने असे आर्थिक व सामाजिक कायदे केले की ज्यामुळे जहागिरदारी पद्धतीची वाढ होऊ शकली नाही. ज्या लोकांची मुळातच कोणती जमीन नव्हती असे लोकसुद्धा सन्मानजनक दर्जाचे आयुष्य जगू शकत होते. हेच ते संरक्षण होते ज्यामुळे इस्लामी पद्धतीत सुस्थितीतील संपन्न लोकांना गरीबावर कोणताही अत्याचार करण्याची शक्यता नव्हती.

संबंधित लेख

  • गरिबी व दारिद्र्यावर इस्लामी उपाय

    गरिबी आणि दारिद्र्याच्या जाचास कंटाळून एक सत्यवान आणि निरपराधी वृत्तीचा माणूससुद्धा आपले चारित्र्य, शालीनता व ईमानदारी दोन पैशात विकून आपल्या निष्पाप परिवारजनांच्या पोटापाण्याची व्यवस्था करतो, त्याचे पाय कशाप्रकारे गुन्हेगारीकडे वळतात. तेव्हा गुन्हेगारी संपवायची असेल तर गरिबी आणि दारिद्र्याचे समूळ उच्चाटन व्हावयास हवे, असे इस्लामचे प्रांजळ मत आणि स्पष्ट भूमिका असून यावर इस्लामने अत्यंत ठोस व यशस्वी उपाययोजना केली आहे. या उपाययोजनेमुळे मानवास निश्चितच प्रतिष्ठेची भाकरी, परिपूर्ण पोषाख आणि तनावमुक्त जीवनाचा निवारा लाभून अवघे आयुष्य सार्थक होईल. गरिबी-श्रीमंतीतील वैरभाव आणि इर्श्या व द्वेषाचे धगधगणारे निखारे थंड होतील आणि सर्वत्र स्नेह, प्रेम व बंधुभावाची शीतल छाया आणि मंजूळ वारे वाहतील. आता आपण गरिबी व दारिद्र्य निर्मूलताकरिता इस्लामने योजलेली ठोस उपाय योजना कोणती आणि कशी आहे, ते पाहू या.
  • इस्लाममध्ये वृद्धी व व्याज यापैकी कोणती बाब निषिद्ध आहे?

    नेहमीच हा प्रश्न समोर येत असतो की, खरोखरच इस्लामने व्याजास निषिद्ध ठरविले आहे काय? कारण काही लोक असा दावा करतात की, इस्लामने निषिद्ध ठरविलेली बाब ही ‘व्याज’ नसून ‘रिबा’ अर्थात अर्थवृद्धी होय. तसेच ‘व्याज’ आणि अर्थवृद्धी या दोन्ही बाबी अगदी भिन्न आहेत.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]