Islam Darshan

लैंगिक समस्येबाबत इस्लामचा दृष्टिकोन

Published : Monday, Feb 15, 2016

इस्लाम लैंगिक व वैषयिक समस्येचे महत्त्वही नजरेआड करीत नाही. उलट त्याची गरज भागविण्यासाठी सनदशीर व कायदेशीर पद्धतीचा ‘निकाह’ (विवाह) मार्ग मोकळा करुन ठेवतो. म्हणूनच इस्लाम लहान वयात विवाह होण्याचे समर्थन करतो व इच्छा असतानाही विवाह करण्याची कुवत नसलेल्यांना राज्य कोषातून सहाय्य देतो. पण त्याचबरोबर इस्लाम समाजाला भावना उद्दीपित करणाऱ्या व वासनांचा उद्रेक घडवून आणणाऱ्या प्रेरक तत्त्वापासून अलिप्त ठेवू इच्छितो. इस्लाम माणसापुढे एक श्रेष्ठ व पवित्र उद्देश ठेवतो ज्याचा प्रतिकार केल्यास त्याची सर्व शक्ती सामाजिक व सार्वजनिक कल्याणाच्या कार्यात लागून राहते. तो माणसाला आपला वेळ अल्लाहचे सान्निध्य प्राप्त करण्यासाठी व्यतीत करण्यास शिकवतो. गुन्ह्यांमध्ये वाढ होण्यास कारणीभूत होणाऱ्यास व प्रेरक गोष्टींचा, इस्लाम अशा रितीने शेवट करुन टाकतो. पण असे असूनही सर्व नैतिक मूल्यें धाब्यावर बसवून व अधःपतनात पशूवत बनून उघडउघड व्यभिचाराचे दुष्कर्म करताना चार साक्षीदारांनी डोळ्यांनी पाहिले नाही तोपर्यंत त्यालाही इस्लाम शिक्षा सुनावत नाही.

वर्तमान आर्थिक, सामाजिक व नैतिक परिस्थितीमुळे नवयुवक विवाह करु शकणे सोपे राहिलेले नाही व म्हणून ते व्यभिचार करीत असतात असे म्हटले जाऊ शकते, ही वास्तवता आम्ही मानतो. परंतु ज्या वेळी आम्ही इस्लामवर खऱ्या अर्थाने आचरण करु लागू त्या वेळी समाजात हलक्या पाशवी वासनांना उद्दीपित करणारे व नवयुवकांचे चारित्र्य बिघडविणारे नागडे व घाणेरडे चित्रपट, वर्तमानपत्रे, निर्लज्ज गाणी हीसुद्धा नसतील. तरुणांच्या वासना चेतवणारी सर्व साधने नष्ट केली जातील, त्यामुळे इच्छा असतानाही विवाह करता येऊ शकत नाही, असा दारिद्रयरुपी शापही समाजात उरणार नाही. अशा रितीने समाज जेव्हा सर्व दुष्कर्माला बळी पडतात तेव्हा त्यांना तो शिक्षा करतो. कारण त्यांना गुन्हा करण्याला कोणतीही उचित सबब उरलेली नसते व त्यांना गुन्हा करण्यास विवश करणारी व भाग पाडणारी निकडीची परिस्थितीही उरलेली नसते.

इस्लामी दंडविधानाचे प्रमुख वैशिष्ट्य

इस्लाम शिक्षा लागू करण्याआधी, गुन्ह्यांची सर्व संभवनीय कारणे नाहीशी करतो. एवढेच नाही तर कारणे नाहीशी झाल्यावरही एखाद्या गुन्हेगाराच्या बाबतीत परिस्थितीला विवश होऊन त्याच्या हातून गुन्हा घडण्याचा संशय जरी असला तरी त्याला शिक्षा देत नाही. हीच गोष्ट इस्लामला इतर जीवनपद्धतीहून वेगळी करते. जगातील कोणती जीवनपद्धत, शेवटी इस्लामच्या या न्यायोचित विधानाचा सामना करु शकते?

काही युरोपियन साहित्यिक इस्लामच्या गुन्हे व शिक्षा यांच्या धारणेबद्दल अपरिचित असल्यामुळे त्याने निर्धारित केलेल्या शिक्षा अमानुष, रानटी व मानवतेचा अनादर असल्याचे समजतात. कारण त्यांच्या युरोपियन दंडविधानाप्रमाणे दररोज अशी शिक्षा लोकांना होत राहील; अशी चुकीची समजूत ते करून बसले आहेत. त्यांना असे वाटते की इस्लामी समाजात पूर्ण हात तोडण्याची व दगडांनी ठेचून ठार करण्याची शिक्षा अगदी सामान्यपणे दिली जाते. पण सत्य असे आहे की अशा तऱ्हेच्या धडा शिकविणाऱ्या शिक्षा इस्लामी समाजात अत्यंत अल्प प्रमाणात बघायला मिळतात. इस्लामी इतिहासाच्या चारशे वर्षांच्या दीर्घ अवधीत चोरीच्या गुन्ह्याकरिता हात तोडण्याची शिक्षा केवळ सहा वेळा दिली गेली. इस्लामचा मूळ उद्देश चोरीच्या गुन्ह्याचा अवरोध करण्याचा होता, चोराचे हात तोडण्याचा नव्हता. हे या सत्याचे उघड प्रमाण आहे. याचकरिता शिक्षा देण्यापूर्वी इस्लाम स्वतः गुन्ह्यांची कारणे नाहीशी करण्याचा प्रयत्न करतो. इस्लामी शिक्षेची अंमलबजावणी केल्याची जी चार दोन उदाहरणे आढळतात ती निश्चितपणें सत्य व न्यायावर आधारलेली होती.

काही युरोपियन साहित्यिक इस्लामी कायदा लागू होण्यास इतके का घाबरतात, हे कळत नाही. जर कोणत्याही विवशतेविना घडणाऱ्या गुन्हांची व त्या गुन्हेगाराचे समर्थन करण्याचा आग्रह धरत असतील, त्यांच्या भयाचे उचित कारण समजू शकते.

काही लोकांची अशी समजूत आहे की अशा प्रकारच्या शिक्षांची कसलीही व्यावहारिक उपयुक्तता नाही; पण हा विचार चुकीचा आहे. जे लोक कसलीही विवशता नसतांना अनुचितपणें गुन्हा करण्याची तीव्र प्रवृत्ती असते त्यांना घाबरविण्यासाठी वास्तविकपणे या इस्लामी शिक्षांची तरतूद आहे. अशा लोकांमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टिने या शिक्षा फार परिणाम कारक सिद्ध होऊ शकतात. कारण गुन्हा करण्याची प्रवृत्ती कितीही तीव्र व प्रबळ असली तरी कडक शिक्षेचे भय गुन्हेगाराला, प्रत्यक्ष गुन्हा करण्यापूर्वी अनेक वेळा विचार करण्यास भाग पाडते. काही तरुणांची कामवासना अतृप्त राहते, पण जो समाज आपल्यातील सर्व व्यक्तींच्या हितासाठी व कल्याणासाठी कार्यशील असतो त्या समाजाला आपल्या सर्व लोकांच्या प्राणाचे तसेच त्यांच्या संपत्तीचे रक्षण करण्याचाही अधिकार असतो. कोणीही इतरांच्या प्राणास व संपत्तीस हानी पोहोचवू नये याची तो काळजी घेत असतो. या उलट जे खास कारणाशिवाय गुन्हा करतात, इस्लाम त्यांना परिस्थितीच्या निमित्तावर सोडून न देता सर्व प्रकारे त्यांचा उपाय करतो व त्यांनी समतोल व यथोचित जीवनाकडे परतून यावे असा प्रयत्न करतो.

संबंधित लेख

  • रोजा (उपवास)

    सर्वच प्रेषितांच्या काळात ‘रोजा’ अनिवार्य स्वरुपात होता आणि प्रेषित मुहम्मद (स) यांच्यावरसुद्धा ही उपासना अनिवार्य करण्यात आली. दिव्य कुरआनात म्हटले आहे की, ‘‘रोजा तुमच्यावर अनिवार्य करण्यात आला, जसा तुमच्या पूर्वीच्या लोकांवर करण्यात आला होता.’’ (संदर्भ : दिव्य कुरआन)
  • ईश्वरभक्तांचे विश्वबंधुत्व

    नमाजसाठी मुस्लिमांना हाक देण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. अशी पद्धत जगातील कोणत्याच धर्मीय वा निधर्मी समाजात प्रचलित नाही. नमाजसाठी हाक देण्याचा एकाच प्रकारचा शब्दसमूह (अजान) जगातील प्रत्येक मस्जिदीतून दिवसातून पाच वेळा पुकारला जातो. ‘अजान’ देणाऱ्याची व ज्यांना बोलाविण्यात येत आहे त्यांची मातृभाषा कोणतीही असो, ‘अजान’ अरबी भाषेतच पुकारली जाते. जगातील कोणत्याही भागातील मुस्लिमास ‘अजान’ ऐकताच नमाजकरिता हाक दिली जात आहे असे समजते. अजानने हेही लक्षात येते की, त्यांना (अर्थात सर्व इस्लाम धर्मियांना) कोठे बोलाविले जात आहे?
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]