Islam Darshan

इस्लामचे ऐहिक लाभ

Published : Monday, Feb 15, 2016

फक्त मुस्लिम तोच आहे जो पारलौकिक जीवाकडे टक लावून असतो आणि भौतिक जीवनाला पारलौकिक जीवनावर कधीच प्राधान्य देत नाही. तर प्रश्न उभा राहतो की पूर्णतः धर्माच्या अधीन राहून जीवन जगण्यासाठी कोणत्या प्रकारचे जीवन त्याने जगावे? काय जगाचा त्याने त्याग करावा? वैयक्तिकरित्या तो समृध्दी प्राप्त करू शकतो आणि आदरसन्मान आणि सत्ता एक समुदाय म्हणून मिळवू शकतो काय? हा एक सर्वसाधारण प्रश्न आहे आणि फक्त इस्लामच्यासाठीच निर्माण होत नाही. तो इतर ईशधर्माबद्दलसुध्दा निर्माण होतो. इस्लामप्रमाणेच इतर धर्मसुध्दा अल्लाहची आज्ञाधारकता आणि पारलौकिक जीवनावर विश्वास या बाबींना धर्माचा केंद्रबिदू मानतात. म्हणून आपण इतर धर्मांच्या उत्तराबद्दल विचार करू या.

आपण जर इतर धर्मांचा अभ्यास केला तर आपणास वरील प्रश्नाची उत्तरे मिळत नाहीत. त्यांच्या प्रेषितांनी त्या लोकांना ईशधर्माकडे निमंत्रण दिले आणि त्या लोकांना आश्वस्त केले की माझे (प्रेषिताचे) अनुयायित्व पत्करून तुम्हा लोकांना पारलौकिक जीवनातच फक्त सफलता मिळणार नाही तर या जगातसुध्दा तुम्ही सफल व्हाल.

प्रेषित नूह (अ.) त्यांच्या लोकांना म्हणाले, ‘‘आपल्या पालनकर्त्याची क्षमा मागा, निःसंदेह तो मोठा क्षमाशील आहे. तो तुमच्यावर आकाशातून खूप पावसाचा वर्षाव करील. तुम्हाला मालमत्ता आणि संततीने उफत करील. तुमच्यासाठी बागा निर्माण करील आणि तुमच्यासाठी कालवे प्रवाहित करील.’’ (कुरआन ७१: १०-१२)

प्रेषित हूद (अ.) यांनी दिलेले निमंत्रण खालीलप्रमाणे, ‘‘हे माझ्या देशबंधुंनो, आपल्या पालनकर्त्याकडे माफी मागा, नंतर त्याच्याकडेच परतणार आहोत. तो तुमच्यावर आकाशाची दारे उघडी करील आणि तुमच्या शक्तीमध्ये अधिक शक्तीची वाढ करील, गुन्हेगार बनून (भक्तीपासून) तोंड फिरवू नका.’’ (कुरआन ११: ५२)

ईशआश्वासनांचा तपशील आणि त्याबद्दलचे पुरावे आपण बनीइस्राईलच्या इतिहासात पाहू शकता ज्याचा कार्यकाळ प्रेषित मूसा (अ.) यांच्या जन्माच्या किचित अगोदर सुरू होतो. तेव्हापासून तर प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आगमनापर्यंतचे त्यांचे जीवन किंव करणारे होते. जेव्हा ते आपल्या निर्माणकर्त्याकडे झुकले तेव्हा त्यांचे जीवन सावरले गेले कुरआनोक्ती आहे,

‘‘आणि त्यांच्या जागी आम्ही त्या लोकांना ज्यांना दुबळे करून सोडले गेले होते, त्या भूमीच्या पूर्व व पश्चिमेचे वारस बनविले जिला आम्ही समृध्दीने संपन्न केले होते. अशा प्रकारे बनी-इस्राईलच्या बाबतीत तुझ्या पालनकर्त्यांचे इष्ट वचन पूर्ण झाले कारण त्यांनी संयमाची कास धरली होती आणि आम्ही फिरऔन व त्याच्या लोकांचे ते सर्वकाही नष्ट करून टाकले जे ते बनवीत होते व उभारीत होते.’’ (कुरआन ७: १३७)

अल्लाहकडे त्यांचा (बनीइस्राईल) झुकाव असल्याने आणि सत्यमार्गातील धैर्यशीलतेमुळे त्यांच्या दुर्दशेला समृध्दीमध्ये परिवर्तित करण्यात आले. एवढेच नव्हे तर त्यांच्या आज्ञाधारकतेमुळे त्यांना आणखीन ईश मोबदला मिळेल अशी ग्वाही देण्यात आली होती. कुरआन स्पष्टोक्ती आहे,

‘‘स्मरण करा जेव्हा मूसा (अ.) ने आपल्या लोकांना सांगितले, अल्लाहच्या त्या उपकाराचे स्मरण ठेवा जे त्याने तुम्हावर केलेले आहे. त्याने तुम्हाला फिरऔन समर्थकपासून सोडविले जे तुम्हाला कठोर यातना देत होते. ते तुमच्या मुलांची हत्या करीत असत आणि तुमच्या मुलींना जिवंत ठेवीत असत, यात तुमच्या पालनकर्त्याकडून तुमची मोठी परीक्षा होती. आणि स्मरण ठेवा, तुमच्या पालनकर्त्याने सावध केले होते की जर कृतज्ञ बनाल तर मी तुम्हाला आणखीन जास्त उफत करीन आणि जर कृतघ्नता दर्शवाल तर माझी शिक्षा फारच कठोर आहे.’’ (कुरआन १४: ६-७)

जोपर्यंत ते (बनीइस्राईल) अल्लाहशी कृतज्ञ होते जगाने पाहिले की इष्ट वचन पूर्ण होत गेले. त्यांनी प्रगतीचे शिखर गाठले आणि त्यांचे राष्ट्र एक समृध्दशाली राष्ट्र म्हणून जगासमोर आले होते. संपूर्ण जग त्यांच्याकडे आदराने आणि प्रतिष्ठितपणे पाहात होते. त्यांच्या त्या समृध्दशाली काळाचे स्मरण देऊन अल्लाह त्यांना सावध करीत आहे,

‘‘हे इस्राईलच्या संततीनो, आठवण करा माझ्या अनुग्रहाची ज्याने मी तुम्हाला उफत केले होते. आणि जगातील सर्व जनसमूहावर श्रेष्ठत्व प्रदान केले होते. आणि त्या दिवसाचे भय बाळगा जेव्हा कुणीही कुणाच्या यत्किंचितही उपयोगी पडणार नाही.’’ (कुरआन २: ४७)

जेव्हा कृतघ्नता ते करू लागले आणि धर्माकडे दुर्लक्ष केले तर अल्लाहने त्यांना दिलेले मोबदले त्यांच्यापासून काढून घेतले. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आगमनापर्यंत बनीइस्राईलची स्थिती अत्यंत बिकट बनली होती. कुरआन स्पष्टोक्ती आहे,

‘‘तोराह आणि इंजिल तसेच त्यांच्या निर्माणकर्त्याने त्यांच्यावर अवतरित केलेले दिव्य प्रकटनांचा त्यांनी जर स्वीकार केला असता तर त्यांना जमिनीखालून तसेच आकाशातून उपजीविका मुबलक प्रमाणात उपलब्ध झाली असती.’’ (कुरआन ५:९६)

वरील आयतींमध्ये एका खास समूहाला उद्देशून दिव्य प्रकटने आलेली आहेत. किवा विशिष्ट राष्ट्राला उद्देशून दिव्योक्ती झालेली आहे. आता आपण पाहू या की समस्त राष्ट्रांना उद्देशून काय दिव्य प्रकटने कुरआनमध्ये आलेली आहेत.

‘‘जर राष्ट्रांतील लोकांनी श्रध्दा ठेवली असती व त्यांनी ईशपरायणतेचे वर्तन अंगिकारले असते तर आम्ही त्यांच्यावर आकाश व पृथ्वीतील समृध्दीची दारे उघडले असती.’’ (कुरआन ७: ९६)

हे त्यांच्यासाठी स्मरण आहे ज्यांनी सत्याचा मार्ग सोडलेला होता. त्यांनी ईशपरायणतेचे वर्तन अंगिकारले नव्हते अन्यथा अल्लाहच्या इष्टवचनाला ते पात्र ठरले असते ज्यानी सत्यमार्ग अवलंबिला त्यांना अल्लाहने विपुल मोबदला दिला कुरआनोक्ती आहे,

‘‘सरतेशेवटी अल्लाहने त्यांना जगातील लाभ देखील दिले व त्याहून श्रेष्ठतर पारलौकिक जीवनातील लाभदेखील प्रदान केले. अल्लाहला असेच सत्कर्मी लोक पसंत आहेत.’’ (कुरआन ३: १४८)

प्रेषित्वाचे कार्य आज जगापुढे आहे, त्यांनी अल्लाहचा आदेश आणि त्याच्या मार्गदर्शनाचे स्पष्ट प्रमाण जगाला घालून दिले. अल्लाहच्या आज्ञाधारकतेत पारलौकिक जीवनाचीच सफलता प्राप्त होते असे नाही तर या इहलोकात आदर, सन्मान, समृध्दी, सत्ता प्राप्त होते. जेव्हा जेव्हा राष्ट्रांनी अल्लाहची आज्ञाधारकता स्वीकारली होती तेव्हा अल्लाहने आपले वचन पाळले होते. त्यांचे पारलौकिक जीवन फक्त सफल झाले नाही तर या जगातसुध्दा त्यांची सर्वांगीण प्रगती झाली होती. हे ऐतिहासिक सत्य आहे.

संबंधित लेख

  • ईश्वरासंबंधीची कर्तव्ये

    ईश्वरासंबंधीचे माणसाचे सर्वप्रथम कर्तव्य असे आहे की माणसाने केवळ त्यालाच ईश्वर मानावे व त्या ईशत्वात अन्य कोणासही सहभागी करू नये. आम्ही मागे सांगितल्याप्रमाणे ‘ला इलाहा इल्लल्लाह’ म्हणजे ‘अल्लाहखेरीज अन्य कोणीही ईश्वर नाही’, या ईशवचनावर ईमान धारण केल्याने या कर्तव्याची पूर्तता होते. ईश्वरासंबंधीचे माणसाचे दुसरे कर्तव्य असे आहे की, ईश्वराकडून जे आदेश येतील त्या सर्वांचा मनःपूर्वक स्वीकार केला जावा. हे कर्तव्य, अल्लाहचे प्रेषित (स.) वर ईमानधारण केल्याने पूरे होते. हे हक्क ‘‘मुहम्मदुर्रसूल्लल्लाह’’ (मुहम्मद ईश्वराचे प्रेषित आहे) यावर ईमान धारण केल्याने अदा होते. याबाबतीत मागे आम्ही तपशीलाने विवरण केलेलेच आहे. ईश्वरासंबंधीचे तिसरे कर्तव्य असे की त्याच्या आज्ञांचे पालन केले जावे. ईशग्रंथ पवित्र ‘कुरआन’ व प्रेषित मुहम्मद (स.) यांचा उक्ती व आचरण (सुन्नत) संग्रह व नियमांचे पालन केल्याने, हे कर्तव्य पार पडते. याकडेही आम्ही मागे निर्देश केलेला आहे. ईश्वरासंबंधी चौथे कर्तव्य हे की, त्याची उपासना केली जावी. मागील प्रकरणात निर्देश केल्याप्रमाणे या कर्तव्याची पूर्तता होण्यासाठी काह
  • कुरआन आणि प्रेषित मुहम्मद (स.)

    कुरआन मुस्लिमांचा धर्मग्रंथ मानला जातो. वास्तविकपणे अखिल मानवजातीसाठी त्यांच्या निर्माणकर्त्या स्वामीने पाठविलेला तो संदेश आहे. ईशग्रंथापैकी ती परिपूर्ण आणि शेवटचे संकलन आहे. पवित्र कुरआननंतर कोणताही ईशग्रंथ जगात अवतरल्याचे आढळून येत नाही. हा ग्रंथ सर्व माणसांच्या मार्गदर्शनासाठी अवतरला असून जीवनाच्या प्रत्येक अंगात तो मागदर्शक आहे. जगाकडे पाहाण्याचा माणसाचा दृष्टिकोन तो स्पष्ट करतो, त्याला जीवन व्यतीत करण्याची पद्धत शिकवितो, त्याला त्याच्या कर्तव्यांचे स्मरण करून देतो, त्याला सत्कर्मांची फळे दाखवून देतो व दुष्कर्मांच्या वाईट परिणामांची भयसूचना देतो.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]