Islam Darshan

जगाच्या बाबतीत इस्लामचा दृष्टिकोन

Published : Monday, Feb 15, 2016

इस्लामने जरी इच्छा लालसेच्या दास्यत्वातून मुक्तीवर याचकरिता बराच भर दिला आहे, तरी त्या उद्देशाकरिता तो आपल्या अनुयायांना संन्यास घेण्याची परवानगी देत नाही. तसेच चांगल्या व पवित्र वस्तुंचा उपयोग करुन त्यांचा लाभ घेण्यासही रोखीत नाही. या दोन टोकांच्या गोष्टी सोडून तो मधल्या समतोल मार्गाचा अंगीकार करतो. त्याच्या दृष्टीने जे काही आढळते ते सर्व मानवाकरिता निर्माण केले गेले आहे. इस्लाम माणसाला दाखवितो की ‘‘जग तुझ्यासाठी आहे, तू जगासाठी नाही.’’ म्हणून आस्वादप्रियता व इच्छा लालसांच्या दास्यत्वाला तो मानवाच्या स्थानापासून खालच्या दर्जाचे मानतो. जगातील ही सामुग्री माणसाला फक्त याचकरिता उपलब्ध केली गेली आहे. ज्याद्वारा तो आपल्या श्रेष्ठ रचना, उद्देशांना प्राप्त करु शकेल. माणसाचा जीवनउद्देश अल्लाहच्या धर्मांचा प्रचार होय व मानवतेची परिपूर्ती करण्याचा तोच एकमात्र मार्ग आहे.

इस्लामचे दोन स्पष्ट उद्देश

जीवनात इस्लामसमोर दोन महत्त्वाचे व ठळक उद्देश आहेत. व्यक्तिगत जीवनक्षेत्रात तो प्रत्येक व्यक्तीला इतकी जीवनसामुग्री व साधनसंपत्ती गोळा करू देऊ इच्छितो की ज्यामुळे तो एक निर्मळ व पवित्र जीवन जगू शकेल. सामूहिक जीवनक्षेत्रात त्याचा असा प्रयत्न असतो की असा एक समाज आस्तित्वात यावा, ज्याची संपूर्ण शक्ती मानवाच्या सामूहिक प्रगतीमध्ये खर्च व्हावी. सभ्यता संस्कृतीचा हा कारखाना इस्लामी दृष्टिकोनातून पुढे पुढे जावा, तसेच तो अंश व एकूण व्यक्ती व समाज यामध्ये ‘समतोल’ बनून राहावा ज्यामध्ये कोणाच्याही अधिकारावर आघात होऊ नये.

माणसाला विचारस्वातंत्र्य प्रदान करण्यात इस्लामला एक महत्त्वपूर्ण व प्रभावशाली शक्तीचा दर्जा प्राप्त आहे. इस्लाम अंधविश्वासाच्या, बिनबुडाच्या व बेबंद विचारांचा सदैव विरोध करीत आला आहे. इतिहासात मानवतेला आचारविचारांना मार्गभ्रष्ट करणाऱ्या व त्यात वक्रगती निर्माण करणाऱ्या गोष्टीशी सामना करावा लागत आला आहे. त्यापैकी काही मानवाच्या सुपीक डोक्यातील उपज होती व त्या काळातील लोक त्यांचा हा दर्जा चांगल्यारितीने जाणून होते. परंतु मार्गभ्रष्ट करणाऱ्या काही अशाही शृंखला अस्तित्वात होत्या की ज्यांचे दुवे माणूस आपल्या कपोलकल्पित देवतांच्या मूर्खपणाच्या दुव्यांशी जोडत होते. तात्पर्य असे की इस्लामच्या उदयापूर्वी मानवी विचार असेच अंधकारात चाचपडत होते. इस्लामने येऊन त्याला तर्कसिद्धता व दृढता दिली. इस्लाम उदयापूर्वी प्रचलित असलेल्या कपोलकल्पित अवतारांची मालीका, इस्त्रायली दंतकथा, ख्रिस्ती धर्माचे अर्धेकच्चे व चुकीचे विचार पृथ्वीवर आढळून येत, अशा सर्व प्रकारच्या अंधश्रद्धापासून मानवाला इस्लामने मुक्त केले. त्याला पुन्हा एकदा आपल्या खऱ्या धर्माकडे नेवून आपल्या खऱ्या स्वामीच्या दरबारात नेवून उभे केले.

इस्लाम व वैज्ञानिक शोध

इस्लामचे आणखी एक वैशिष्ठ असे की त्याची भाषा व त्याचे शिक्षण अतिशय सरळ, साधे व सोपे आहे. त्यामध्ये काही खाचाखोचा नाहीत, तसेच त्या भाषेला समजणे, त्यातून विचार करणे व त्यावर श्रद्धा ठेवणेही कठीण नाही. इस्लामची अशी इच्छा आहे की निसर्गाने मानवाला दिलेल्या नैसर्गिक क्षमतांचा भरपूर उपयोग करून आपल्या सभोवती पसरलेल्या ब्रह्मांडातील अगणित जिवांचे तसेच प्रकृतीचे दडलेले रहस्य जाणून घ्यावे. कारण इस्लाम बुद्धी व धर्म किवा दुसऱ्या शब्दात सांगावयाचे विज्ञान व धर्म यांच्या दरम्यान वैमनस्य अथवा मोठा विरोध मानत नाहीत. ख्रिश्चन धर्माप्रमाणे इस्लाम न समजणाऱ्या कठीण श्रद्धावर व सिद्धान्तावर विश्वास ठेवण्याचे हुकूम लादत नाही, अथवा त्यांच्यावरील विश्वासाला ईश्वरावरील विश्वासाची एक अनिवार्य अट मानत नाही. त्याचप्रमाणे तो माणसाला अशा संदिग्ध स्थितीत घालीत नाही जेथे वैज्ञानिक सत्यांना ईश्वराचे अस्तित्वाचा इन्कार केल्याशिवाय मानूच शकत नाही. एवढेच नव्हे तर इस्लाम मानवाला स्पष्टपणे हे दाखवून देतो की या जगतात जी सामुग्री प्राप्त आहे आणि ज्याप्रकारे येथील अगणित उघड व दडलेल्या शक्ती रात्रंदिवस त्याची सेवा करीत आहेत, हे सर्व त्याच्या अतिदयाशील व कृपशील पालनकर्त्यांच्या दयेची व कृपेची देणगी आहे. त्याचप्रमाणे आपल्या वैज्ञानिक शोधानंतर ज्या नवनवीन ज्ञानरुपी खजिन्यांचा शोध करीत असत, तेही वास्तवात त्याच्या परमकृपाळू स्वामीच्या अपार कृपेचेच एक प्रदर्शन होय. म्हणून त्याचा कृतज्ञदास बनून राहणे हे त्याचे कर्त्यव्य ठरते व त्याने जास्तीतजास्त निष्ठेने, कटाक्षाने व एकाग्रतेने त्याची भक्ती करावी. इस्लाम वैज्ञानिक ज्ञानाला श्रद्धेच्या अथवा अश्रद्धेच्या प्रतिकूल मानत नाही. या उलट तो ईश्वरावरील श्रद्धेचा अनिवार्य भाग मानतो.

इस्लामची गरज

या समस्या अशा आहेत की ज्यांना सोडविण्याकरिता मानव आजसुद्धा बेचैन आहे. मानसाला उच्च व वास्तविक उद्देशाची प्राप्ती आजपर्यंत असंभवनीय झाली आहे. माणूस आजसुद्धा नानाप्रकारच्या फसगतीचे व मूर्खपणाचे लक्ष्य आहे. हुकूमशहा व जुलमी शासकांना आज रान मोकळे आहे आणि मानवता आजसुद्धा त्यांच्या जुलूम, अत्याचार व दबाव-दडपणाखाली अडकलेली आहे. प्रत्येक ठिकाणी मानवतेवर पाशवी शक्तींचा प्रभाव आहे. अशा वस्तुंचा सर्रास आढळ याच गोष्टीचा पुरावा देत नाही काय की जगाला इस्लामची गरज आहे. इस्लामला माणसाच्या मार्गदर्शनाकरिता अजून प्रकाश देण्याचे कार्य करणे आहे.

संबंधित लेख

  • स्त्रीचे अधिकार कोणते व तिच्या जबाबदाऱ्या काय आहेत

    वर्तमान काळातील हा एक बिकट, कीचकट व नाजुक प्रश्न आहे. या प्रश्नावर एवढी चर्चा झाली व होत आहे की, त्यांना गोळा केल्यास एक मोठे ग्रंथालयच तयार होईल. परंतु असल्या चर्चा मधून हा प्रश्न सुटला नाही. उलट या चर्चांमुळे हा प्रश्न अधिकच बिकट, कीचकट आणि नाजुक होत गेला. या प्रश्नाच्या उत्तराच्या स्वरुपात इस्लाम धर्माची सुद्धा एक स्पष्ट भूमिका आहे.
  • सुरक्षाबलांची अमानवीयता

    ही प्रवृत्ती फक्त सर्वसामान्यांमध्ये आढळली जात नाही, तर प्रशासनाच्या त्या लोकांमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहे जे शांती स्थापनेसाठी जबाबदार आहेत. यातना आणि कैदेतील मृत्यु आता रोजच्या घटना बनलेल्या आहेत. मानवाधिकारांच्या आंतरराष्ट्रीय सिम्पोजीयमच्या प्रबंध समितीचे अध्यक्ष जस्टीस वी. एस. मलमैध आपल्या एका भाषणात म्हणतात की देशातील पोलीस स्टेशनांमध्येसुध्दा यातना देण्याच्या घटना होत आहेत.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]