Islam Darshan

सामाजिक न्याय प्राप्त करण्यासाठी इस्लामच एकमेव साधन आहे

Published : Sunday, Feb 14, 2016

इस्लामने आम्हाला जे उद्दिष्ट व लक्ष्य दिले आहे, ते साध्य करण्याची पद्धत कोणती आहे? इस्लाम एक सर्वांत श्रेष्ठ जीवनपद्धत आहे व आमची ऐतिहासिक, भौगोलिक व आंतरराष्ट्रीय स्थिती पाहता, आम्हा मुस्लिमांना, आदर, प्रतिष्ठा, नेतृत्व व सामाजिक न्याय प्राप्त करण्यासाठी इस्लामच एकमेव साधन आहे. प्रश्न असा उद्भवतो की वर्तमान परिस्थितीमध्ये आम्ही त्यानुसार अमल कशा प्रकारे करु शकतो ? आज सारे जग त्याच्या विरोधात आहे व खुद्द मुस्लिम देशांत अशा हुकुमशहांचा अमल आहे, की जे परक्यापेक्षा जास्त तीव्रतेने इस्लामचा विरोध करण्यात कार्यशील आहेत?

होय, पुढे जाण्याचा मार्ग कोणता आहे? आम्ही काय करावयास हवे? कोणतेही आंदोलन यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारा व अवलंब केला जाणारा श्रद्धा व विश्वासाचा मार्गच आहे. तो इस्लामी ध्येय व उद्दिष्टाप्रत पोचण्याचा मार्ग आहे, हे त्याचे उत्तर आहे.

आरंभीच्या काळातील मुस्लिमांच्या शांततेचे उगमस्थान या श्रद्धेतच (ईमान) होते. आजच्या मुस्लिमांच्या मुक्तीचे रहस्य यातच दडलेले आहे. मुस्लिमांच्या दर्जाने आम्ही ज्या प्रकारच्या परिस्थितींनी वेढलेले आहोत, ती आरंभीच्या काळातील मुस्लिमांच्या परिस्थितीहून काही वेगळी नाही. ते मूठभर लोक होते. त्यांनी संख्येने भौतिक साधनसामग्रीने व शस्त्राने, तसेच कला व राजकीय शक्ती, या सर्व बाबतीत त्यांच्यापेक्षा कितीतरी वरचढ व भारी असलेल्या व त्या काळी सर्वशक्तिमान असलेल्या रोमन व इराणी साम्राज्याविरुद्ध युद्ध आघाडी उभी केली होती. संख्येने व शक्तीने यांचा गर्व व अहंकार धुळीस मिळविला व तांबड्या समुद्रापासून ते भूमध्य समुद्रापर्यंत सर्व भागावर कब्जा केला. हे त्यांचे यश इतिहासातील एक महान चमत्कार आहे.

इतिहासातील भौतिक स्पष्टीकरणाने व विश्लेषणाने या ऐतिहासिक चमत्काराची वास्तविकता नीट समजली जाऊ शकत नाही. ती केवळ श्रद्धा व विश्वासाच्या आधारानेच समजली जाऊ शकते. हीच दृढ श्रद्धेची भावना होती ज्यामुळे मुस्लिम मुजाहिद (अल्लाहखातर धर्मयुद्ध करणारा) रणभूमीवर शत्रूसैन्य पाहिल्यावर अशी आरोळी ठोकीत,

‘मी तेथे जाऊन त्या व्यक्तीला सत्य नाकारणाऱ्याला ठार करावे अथवा त्याच्या हातून स्वतः धारातीर्थी पडावे एवढीच एक गोष्ट माझ्या व स्वर्गाच्या दरम्यान अडसर आहे.’

अशी गर्जना करून ते रणभूमीत असे आनंदाने झेपावत असत जसा एखादा वर आपल्या नवविवाहित वधूच्या खोलीत प्रवेश करतो. शत्रूसैन्य पाहिल्यावर त्यांच्या तोंडून नकळतच असे उद्गार बाहेर पडत,

‘तुम्ही आमच्या बाबतीत दोन चांगुलपणापैंकी व लाभापैकी एकाची प्रतिक्षा करता आहात काय?’ अर्थात विजय अगर शहादत (हौतात्म्य).

हा तो मार्ग आहे, ज्यावर चालून आम्ही आपले ध्येय साध्य करु शकतो. या मार्गाने गेल्याखेरीज कोणतेही आंदोलन आपल्या यशाच्या स्थानापर्यंत पोहोचू शकत नाही.

शस्त्रासंबंधीही आम्हाला प्रश्न करण्यात येतो. आमच्याजवळ सध्या शस्त्रे नाहीत व इतर आवश्यक साधनसामग्री नाही. मग त्यांच्या विना आम्ही इस्लामी पद्धत स्थापण्यासाठी करावे लागणारे युद्ध कसे जिकू शकू, असेही म्हटले जाते. असे म्हणणाऱ्यात काही निष्ठावान लोकही आहेत आणि काही निष्कृष्ठ व हीन विचारांचे आहेत. शस्त्रे व भौतिक साधनसामग्री आवश्यक आहे, हे खरे आहे. तसेच सध्या यापैकी कोणतीही वस्तू आमच्याकडे नाही, यात शंका नाही. पण आमची प्राथमिक गरज शस्त्रे नाहीत, ही गोष्ट आम्ही विसरता कामा नये. केवळ शस्त्रबळावर कोणतेही राष्ट्र आजवर कसलाही चमत्कार दाखवू शकलेले नाही. गेल्या जागतिक महायुद्धात इटलीचे सैन्य सर्व आधुनिक शस्त्रांनिशी सज्ज होते; पण असे असूनही त्यांना काही घवघवीत यश मिळू शकले नाही. त्यांचे सैनिक अतिशय भित्रे व पळपुटे सिद्ध झाले व पळताना आपली सर्व शस्त्रे ते शत्रूसाठी टाकून पळाले. त्यांच्याकडे शस्त्रे कमी नव्हती, पण श्रद्धा व विश्वास यांची उणीव होती.

या उलट, अंतःकरणात श्रद्धेची भावना ओतप्रोत भरलेल्या एका छोट्याशा समूहाने, ज्यांची संख्या जेमतेम शंभरापर्यंत होती व ज्यांच्या गनिमी तुकडीत सहा-सात व्यक्तींपेक्षा अधिक संख्या नसे. अशा छोट्या समूहाने, त्या बलाढ्य पण आतून पोकळ असलेल्या इटली राज्याच्या शासकांना असे गडबडून सोडले की त्यांनी तो देश सोडण्यातच आपले हित आहे हे जाणले. दृढश्रद्धा असलेल्या या लोकांजवळ कोणतीही संहारक शस्त्रे नव्हती. त्यांच्याकडे भारी तोफखाना नव्हता, जेट विमाने नव्हती की चिलखती तुकड्या नव्हत्या. ही लढाई त्यांनी प्रत्यक्षात मामुली पिस्तूल व बंदुकींनी केली होती. पण शत्रूच्या शस्त्रापेक्षा अनेक पटीने परिणामकारक व भयानक शस्त्र त्यांचेकडे होते व ते म्हणजे त्यांच्या दृढ श्रद्धेचे व भावनांचे शस्त्र. प्रारंभीच्या काळातील मुस्लिमांप्रमाणेच अल्लाहच्या मार्गात लढतांना ते त्यांच्या प्रमाणेंच दृढ श्रद्धेच्या भावनेने ओथंबलेले होते. त्यांनी मनात असा संकल्प केला होता की एकतर ते अल्लाहच्या मार्गात शत्रूंना ठार करतील अथवा त्यांच्या हातून शहीद होतील. अत्यंत कठीण व प्रतिकूल परिस्थितीत त्यांच्या यशाचे रहस्य त्यांची हीच अढळ श्रद्धा व दृढ निश्चय होता.

संबंधित लेख

  • धर्माबाबत कट्टरपणाला कोण बळी पडले आहेत मुस्लिम की मुस्लिमेत्तर

    ख्रिश्चन लोक मुस्लिमांच्या धर्मांच्या बाबतीतील कट्टरपणाला भ्याले असणे शक्य आहे. हे जर खरे असेल, तर धार्मिक कट्टरपणाचा खरा अर्थ त्यांना समजला नाही, असे वाटते. जर त्यांना त्याचा खरा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर तो खालील उदाहरणात सापडेल.
  • रोजा (उपवास)

    सर्वच प्रेषितांच्या काळात ‘रोजा’ अनिवार्य स्वरुपात होता आणि प्रेषित मुहम्मद (स) यांच्यावरसुद्धा ही उपासना अनिवार्य करण्यात आली. दिव्य कुरआनात म्हटले आहे की, ‘‘रोजा तुमच्यावर अनिवार्य करण्यात आला, जसा तुमच्या पूर्वीच्या लोकांवर करण्यात आला होता.’’ (संदर्भ : दिव्य कुरआन)
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]