Islam Darshan

इस्लाम धर्माने दारू आणि इतर सर्व मादक पदार्थांच्या सेवनास निषिद्ध ठरविले

Published : Sunday, Feb 14, 2016

इस्लाम धर्माने दारू आणि इतर सर्व मादक पदार्थांच्या सेवनास निषिद्ध ठरविले आहे. त्याचप्रमाणे या घोर अपराधावर ‘हद‘ जारी करण्याचा आदेश दिला आहे. ईश्वराने म्हटले आहे,

‘‘हे श्रद्धावंतांनो! ही दारू आणि जुगार व वेदी आणि शकून ही सर्व अमंगल सैतानी कामे होत, यांच्यापासून दूर राहा. सैतानाची हीच इच्छा आहे की, याद्वारे तुमच्यात शत्रुत्व व कपट निर्माण करावे आणि तुम्हास ईशस्मरण आणि नमाजपासून रोखावे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-माइदा - ९०)

प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे,
‘‘झिंग अगर नशा आणणारा प्रत्येक पदार्थ दारुच्या परिभाषेत मोडतो आणि अशा प्रकारचा प्रत्येक पदार्थ(अथवा दारू, मदिरा वगैरे) निषिद्ध आहे.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - तिर्मिजी)

मदिरापानाचा गुन्हा सिद्ध होण्याच्या अटी व शर्ती

 1. दारु पिणारी व्यक्ती वयात आलेली आणि विवेक न हरवलेली असावी.
 2. त्या व्यक्तीने कोणाच्याही दबावास बळी न पडता स्वतःच्या मर्जीने दारू पिलेली असावी.
 3. भुकेने आणि रोगाने ग्रस्त झालेला व या ग्रस्ततेमुळे विवेक हरवून दारू पिलेली नसावी.
 4. दारु पिणे हे निषिद्ध असल्याची कल्पना असावी.
 5. दारु पिण्याचा पुरावा असावा, कमीतकमी दोन सज्जन लोकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेले असावे अथवा गुन्हेगाराने स्वतः कबुली द्यावी अथवा त्याच्या तोंडून दारूचा वास यावा, दारूची उलटी व्हावी अथवा वैद्यकीय तपासणीतून दारू पिल्याचे निष्पन्न व्हावे.

मदिरापानाची शिक्षा

इस्लामी कायद्यामध्ये मदिरापानाची शिक्षा चाळीस कोरडे मारण्याची आहे. वरील अटी व शर्ती पूर्ण झाल्यावर अपराध्याला शिक्षा देण्यात येईल.

संबंधित लेख

 • ईश्वर आणि त्याची गुण वैशिष्ट्ये

  इस्लाममध्ये ईश्वराचे-अल्लाहचे स्वरुप अत्यंत स्पष्ट, पवित्र आणि बुद्धीला व आत्म्याला पटणारे आहे. त्यामध्ये कुठलीही अस्पष्टता, भेसळ, संदिग्धता किंवा बुद्धीविरुद्ध गोष्ट नाही. ईश्वर एक आणि एकमेव आहे. त्याच्या ईश्वरतत्वामध्ये कोणीही भागीदार नाही. तो या सृष्टीचा एकमेव निर्माता, पालनकर्ता, मालक, शासक, अन्नदाता आणि आदेश देणारा आहे. त्याच्या कोणत्याही गुणधर्मामध्ये कोणीही सहभागी नाही. तो स्वयंभू आहे, कायमस्वरुपी आहे आणि कायमस्वरुपी राहील. त्याला मृत्यु नाही, तो तहान-भूक, आसक्ती, सकल मानवी इच्छा, आकांक्षा आणि प्रत्येक प्रकारचे मानवी दोष आणि कमतरता यांपासून पवित्र आहे.
 • अपयशी पती-पत्नी

  क्षणभर आपण अशा पती-पत्नीसंबंधी थोडासा विचार करु जे एकामेकांवर जुलूम, अन्याय व अतिरेक करीत असतात. पुरुष हा कुटुंबाची देखभाल करणारा व कुटुंबाच्या सर्व गरजा भागविण्यास जबाबदार असतो, म्हणून त्याला असा अधिकार दिला गेला आहे की बंडखोर व वरचढ पत्नीला वठणीवर आणण्यासाठी प्रसंगोपात त्याने धाकदपटशाचा अवलंब करावा.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]