Islam Darshan

जातीय दंगली व आपली जबाबदारी

Published : Thursday, Mar 03, 2016

देशात जातीय दंगलींचे जे चक्र चालू आहे, ते तत्कालिक आहे असे वाटत होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या प्रयत्नात ज्या जाती परस्पराविरुध्द उभ्या टाकल्या होत्या, त्यांच्या भावनांचा तो तात्कालिक उद्रेक आहे आणि काळ लोटल्याबरोबरच तो उद्रेकही थंड होईल, असे वाटत होते. तसे घडले नाही. ही एक दुःखद गोष्ट आहे. जातीय दंगलींचे चक्र सतत चालू राहिले. आता या दंगलींचे स्वरुप असे झाले आहे, की पोलीस बळ आणि पुढार्यांची आवाहने, त्यांचे निवारण करण्यास अपुरे पडत आहेत, किबहुना ही समस्या इतकी संवेदनशील व गांभीर्याची बनली आहे की, ज्या लोकांना त्यांची कटुता व असहनीयता जाणवते, त्यांच्यासाठी हे आवश्यक झाले आहे की त्यांनी केवळ आवाहने करण्यापुरते व आवाहने ऐकण्यापुरते मर्यादित राहू नये. तर ज्या कारणांनी ही अवस्था निर्माण केली आहे, त्या कारणांचा गंभीरतेने शोध घ्यायला हवा. पुढे त्या कारणांवर केवळ टीका व निर्भर्त्सना करुनच थांबू नये. तर सहृदयपणे त्यांचे निवारण करण्याची काळजी घ्यावी आणि दंगल भडकावण्यात दंगलखोर समाजकंटक जो उत्साह दाखवितात, त्यापेक्षा अधिक उत्साहाने व आस्थेने त्यांनी पुढे यावे.

वर्तमान अवस्थेचे कारण केवळ ऐतिहासिक नाही किवा केवळ सामायिक नसून, त्यात दोन्ही प्रकार आहेत. हे थोडासा विचार केल्यास समजून येते. दंगलींची काही कारणे ऐतिहासिक सैध्दान्तिक आहेत. ती एका क्रमाने निर्माण होत असतात व वाढत वाढत ती इतकी विस्फोटक बनली आहेत की सामायिक किवा आकस्मिक कारणांची एक लहानशा ठिणगीनेही भडका होऊ शकतो. सर्वदूर क्षेत्रापर्यंत तो पोचून जनतेचे जीवित - वित्त व अब्रू आणि राष्ट्रीय हितांच्या अनेक बाबींनाही भस्म करून टाकतो. ही परिस्थिती बदलून शांती व सद्भावनेचे वातावरण निर्माण करायचे असेल तर, देशाच्या शरीरावर उठणार्या या वैरभावी गळूंवर मलमपट्टी करायलाच हवी. शिवाय ज्या विषारी घटकांमुळे राष्ट्ररुपी शरीरातील रक्त दूषित होऊन हे गळू उठत आहेत आणि अन्य रोग निर्माण होत आहेत, त्यावरही उपचार केल्याविना याला दुसरा कोणताही मार्ग नाही.

ऐतिहासिक कारण

पाश्चात्य शिक्षण आणि सभ्यता यांच्या प्रभावानेच देशात राजकीय जागृतीचा आरंभ झाला, ही गोष्ट सर्व लोक जाणतात. या पाश्चात्य शिक्षणाने आणि सभ्यतेने ज्या देणग्या आपल्या देशाला दिल्या आहेत, त्यापैकी दोन अशा आहेत, ज्यांनी आपल्या देशाचे वास्तविक चारित्र्य निर्माण केले आहे. एक म्हणजे उग्र राष्ट्रवादी भावना आणि दुसरी म्हणजे भौतिकवादावर आधारलेली नैतिकता.

पहिली गोष्ट घेऊन आपल्या नीतीनिर्मात्यांनी भारतीय राष्ट्रीयता साकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यासाठी काही ठोस आधार नसल्याने राष्ट्रीयता जागृत करण्याचे काही प्रयत्न केले गेले. त्यांच्या परिणामस्वरुप, ज्यांच्यात जातीयतेची विचारधारणा मुळातच होती, अशा भिन्न जातींच्या समूहांमध्ये आपली वेगळी अस्मिता जपण्याचा विचार जागृत झाला. राजकीय स्वातंत्र्यप्राप्तीच्या संघर्षात ब्रिटीश सत्तेविरुध्द लढा जितका तीव्र होत गेला, त्याचबरोबर ती अधिक कटू बनत गेली. त्यानंतर जेव्हा स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा शासन सत्ताप्राप्तीसाठी प्रचंड अहमहमिका सुरु झाली. धर्मनिरपेक्ष लोकतांत्रिक पद्धतीचा आत्माच असा आहे की मतांच्या प्राप्तीखातर नवनवे द्वेष - तिरस्कार व वैरभाव निर्माण केला जातो. अशा प्रकारे देशात एकाऐवजी अनेक लहानमोठ्या राष्ट्रीयता निर्माण झाल्या. त्यापैकी काही साकार होऊन आपले खेळ खेळत राहिल्या आहेत आणि शेष काही प्रांतीय अथवा भाषिक राष्ट्रीयता अद्याप निर्माणावस्थेतच आहेत. त्यापैकी एका जातीसमूहाचा दुसर्या जातीसमूहाच्या जातीय अगर धार्मिक आशा-आकांक्षांविरुद्ध कटुता व विरोध वाढीस लागतो. त्याचप्रमाणात जातीयतेची आग भडकत जाते आणि त्यांच्यामध्ये वैरभाव व आकस वाढत जातो.

ब्रिटिशांची दुसरी देणगी अशी की पाश्चात्यांच्या शिक्षणाने आणि त्यांच्या संस्कृतीने भौतिकवादी नैतिकतेचे जे धडे आम्हाला दिले आहेत, ते एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्याच्या विषाप्रमाणे संपूर्ण देशाच्या नसानसात पूर्णपणे भिनून अभिसरण करीत आहे. त्या विषाने माणसांच्या मन-मस्तकातून ईशभयआणि सत्यप्रियता, यांचे उच्चाटन केले आहे, सज्जनतेची आणि मानवतेची पाळेमुळे उखडून टाकली आहेत. आपल्या प्राचीन धर्मापासून जी नीतिमूल्ये मान्यता पावून देशवासियांनी आपल्या आचरणात आणली होती, त्या नैतिक सदाचरणांची वाट लावून टाकली. या नव्या नैतिकतेच्या फलस्वरुपच विभिन्न जातीसमूह नीचतेच्या अधिकाधिक खालच्या पातळीवर जात आहेत. प्रामाणिकपणा व श्रध्दा कोळून पिऊन मोठमोठे पुढारी स्वहितासाठी, आपले घर भरण्यासाठी, लाज सोडून अधिकाधिक खालच्या पातळीवर उतरु लागले आहेत. मोठमोठे जबाबदार राजकीय पक्ष सत्यतेकडे व न्यायप्रियतेकडे पूर्णपणे डोळेझाक करुन, एकमेकांविरुध्द फोडाफोडी करण्यात गढलेले आहेत. मोठमोठे मार्गदर्शक अत्यंत निर्लज्जपणे शिवराळ भाषा व निखालस खोटारडेपणाचे वादंग माजवीत, लोक वैर-वैमनस्याची झिग आणून आपल्या जातीसमूहाला अनावर करुन सोडत आहेत. शासकीय कारभारात, बाजारात आणि जीवनांच्या प्रत्येक अंगात अन्याय आणि अप्रमाणिकपणा ठकबाजी होत आहे. व्यक्तिगत अथवा आपल्या समूहाचा स्वार्थ, हाच प्रत्येक व्यक्तीचा ईश्वर बनला आहे, त्यामुळेच देशाच्या सर्व योजना आणि देशाचे साहस नष्ट करुन टाकले आहेत. नैतिकता व मानवतेचे उगमस्थान असणारी पूजा व प्रार्थनास्थळे व धर्म, यांनाही आपल्या स्वार्थाचे साधन बनवून तेथेही अमंगल घाण पसरवून अपवित्र करीत आहेत. ही सर्व त्याच भौतिकवादी नैतिकतेची फळे आहेत.

उग्र राष्ट्रवाद आणि भौतिकवादी नैतिकतेची जी देणगी आम्ही पाश्चिमात्यांकडून मिळविली आहे आणि त्यांने आपला देश नरक करुन टाकला आहे. त्यांच्या घटनाक्रमाने हे कळून चुकले की हे नैतिक अधःपतन देशाला अधोगतीच्या भयानक गर्तेत लोटल्याशिवाय राहणार नाही. त्यावर जर गंभीरपणे विचार करुन प्रतिबंधक ठोस कृती झाली नाही, तर काळ्या दगडावरच्या रेषेइतकी ती गोष्ट अटळ आहे. यावर खरा उपाय म्हणजे विभिन्न संस्कृतींना एक ठिकाणी वाटून व ते मिश्रण एकजीव करुन त्याला ‘राष्ट्रीय एकतेचे’ गोंडस नाव देऊनही होणार नाही किवा जीवनमानाचा स्तर उंचावण्याचा नारा दिल्यानेही होणार नाही. त्यावर खराखुरा उपाय तर असा आहे की जातीसमूहाच्या भक्तीऐवजी ईशभक्ती आणि मानवतेच्या श्रध्देचा स्वीकार केला जावा. भौतिकवादी नैतिकतेच्या जागी ईश्वरवादी नैतिकतेचा अंगिकार केला जावा.

वर जे काही सांगितले गेले आहे. त्याखेरीज अन्य काही कारणे आणि प्रेरक शक्ती समजून घेणे गरजेचे आहे. ते स्थानिक बिघाडांशी मिसळून, जातीय तणावाची वादळे उभी करीत असतात.

संबंधित लेख

  • मुस्लिम पर्सनल लॉशी संबंधित प्रमाणित तथ्ये

    सर्वात पहिली वस्तुस्थिती ही आहे की मुस्लिमांचे कौंटुबिक जीवन आणि दुसर्या व्यक्तिगत बाबीसंबंधी पवित्र कुरआन व हदीस मध्ये उपदेश, मार्गदर्शन आणि आदेश अस्तित्वात आहेत, इतकेच नव्हे तर ते परिपूर्ण व्याख्यानिशी उपलब्ध आहेत म्हणून पवित्र कुरआन आणि हदीस यांची पृष्ठे उलटत जावीत आणि या उपदेश, मार्गदर्शन आणि आदेशांचे व्यवस्थित अध्ययन करित जावे. निकाह(विवाह) महर(नवर्या मुलाकडून नवरी मुलीला दिली जाणारी रक्कम किवा वस्तू), नफका(पत्नी व मुलासाठी अन्नवस्त्र), तलाक(पतीने पत्नीला दिलेला घटस्फोट), खुलअ(पत्नीने पतीला दिलेला घटस्फोट), इद्दत(घटस्फोटा आधीची मुदत), विरासत(वारसा), वसीअत(वारसापत्र, मृत्यूपत्र), इला, नसब, वक्फ, हिबा इत्यादि समस्यांपैकी एकही समस्या अशी नाही ज्यासंबंधी चर्चा केली नाही, आदेश दिले नाहीत, मूल्ये आणि कायदा निश्चित केला नाही.
  • पारलौकिक जीवनावर श्रध्दा

    पारलौकिक जीवनावर श्रध्दा ठेवणाऱ्या व्यक्तीला खालील गोष्टींना अंतःकरणाने स्वीकारावे लागते. १) मनुष्याची निर्मिती विशिष्ट हेतुसाठी (सकारण) केली गेली आहे. माणूस एक जबाबदार व्यक्तिमत्त्व आहे. त्याच्या निर्माणकर्त्याने (अल्लाहने) त्याला एक परिपूर्ण जीवनसिध्दान्त (मार्गदर्शन) दिला आहे. या मार्गदर्शनानुसार जीवन कंठने सदाचार आहे, पुण्य आहे. परंतु एखाद्याचा मनपसंत मार्ग स्वीकारणे की ज्याचा दिव्य प्रकटनाशी (मार्गदर्शनाशी) काहीएक संबंध नाही आणि असे जीवन कंठने हे दुराचार आणि पाप आहे.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]