Islam Darshan

नातेवाईकांशी सद्व्यवहाराची आज्ञा

Published : Sunday, Feb 14, 2016

पवित्र कुरआनात वारं-वार आदेश दिला गेला आहे की, नातेवाईकांचे अधिकार आणि हक्क अदा केले जावेत. सांगितेल गेले,

‘‘आणि नातेवाईकांचे हक्क अदा करा.’’ (कुरआन १७-२६)

हिच गोष्ट सूरह १६ (नहल) आयत ९० मध्ये आहे.

अर्थात अल्लाहचा आदेश आहे की, नातेवाईकांचा हक्क अदा करा. हे हक्क व अधिकार परिस्थितीच्या दृष्टीने वैधानिक आणि नैतिक दोन्ही प्रकारांचे आहेत.

आप्तसंबंधी (नातेवाईक) आणि कुटंबातील लोक लांबचे असोत अथवा जवळचे, त्यांच्याशी सद्व्यवहार, सहानुभूती आणि शुभचितनाचा व्यवहार अवलंबविला जाईल आणि त्यांच्या सुख-दुःखात सहभाग घेतला जाईल. अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स) यांनी ज्या गोष्टींची शिकवण दिली त्या गोष्टींमध्ये ही गोष्ट सुद्धा सम्मिल्लीत (सामील) आहे.

‘‘आई-वडिलांशी चांगला व्यवहार करा आणि नातेवाईकांशी......’’ (कुरआन २-८३)

आप्तस्वकियांशी (नातेवाईकांशी) केला जाणारा हा ‘सद्व्यवहार’ यास इस्लामी परिभाषेत ‘‘सिलारहमी’’ शब्दाने अभिव्यक्त केले जात असते.

आप्तस्वकीयांशी (नातेवाईकांशी) अत्यंत चांगला व्यवहार करणार्यांची प्रशंसा केली गेली आहे.

पवित्र कुरआनत आहे,

‘‘ते जोडतात त्या संबंधांना (नात्यांना) ज्यांना जोडण्याचा अल्लाहने आदेश दिला आहे आणि आपल्या पालनहार अल्लाहचे भय बाळगतात.’’ (कुरआन १३-२१)

वास्तवात इस्लाम हे इच्छितो की समाजाचा प्रत्येक तो व्यक्ति ज्याची भौतिक दृष्टया व आर्थिक दृष्टीने चांगली परिस्थिती आहे तो कुटूंबाचा तथा परिवाराच्या त्या लोकांची सहायता करेल जे गरजू (मोहताज) आहेत आणि त्यांना या योग्य बनवावे की जीवनाच्या व्यवहारात (व्यापार-विनिमयात) ते आपले कर्तव्य पूर्ण करू शकावेत.

संबंधित लेख

  • धर्म आणि राजकारण (आजचा ज्वलंत प्रश्न)

    इस्लाम ही एक सर्वसमावेशक अशी परिपूर्ण जीवनपध्दती आहे. याबद्दलचा खुलासा आपण मागील प्रकरणांतून पाहिला आहे. राजकारण हा धर्मकारणाचा एक भाग कसा आहे? तसेच धर्मव्यवस्थेचे राजकीय व्यवस्था एक महत्त्वाचे अंग कसे आहे? याचे अद्याप स्पष्टीकरण पूर्णतः न झाल्यामुळे लोकमनात संभ्रम आहे. या दोघांच्या संबंधाचा येथे स्पष्ट खुलासा होणे गरजेचे आहे. राजकारणाला आपण क्षुद्र समजून त्याची अवहेलना करू शकत नाही. आधुनिक जगात तर त्याचे महत्त्व इतके वाढले आहे की अतिमहत्त्वाची खाजगी कामेसुध्दा आज राजकारणाच्या कक्षेत मोडतात. त्यामुळे मनुष्यजीवनावर राजकारणाचा स्वाभाविकपणे दूरगामी परिणाम होत आहे. डोळे उघडून पाहिल्यास कळून येते की सर्व तत्त्वज्ञान, आदर्श आणि श्रध्दा राजकारणाच्या एका फटक्यात नाहीसे होतात.
  • उपासना / इबादत चा अर्थ

    आदरणीय मुहम्मद (स.) यांनी पाच बाबींवर ईमान धारण करण्याची शिकवण दिलेली आहे. १) एकेश्वरत्वावर दृढ विश्वास. २) ईशदूतांवर दृढ विश्वास. ३) ईशग्रंथांवर विशेषकरून पवित्र कुरआनवर दृढ विश्वास. ४) ईश्वराच्या सर्व प्रेषितांवर आणि विशेषकरून अंतिम प्रेषित आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) वर दृढ विश्वास. ५) पारलौकिक जीवनावर दृढ विश्वास.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]