Islam Darshan

इस्लाममध्ये अनाथ आणि विधवांचे अधिकार

Published : Sunday, Feb 14, 2016

अनाथ मुलांच्या पालनपोषण आणि शिक्षण-प्रशिक्षणाची सर्वस्वी जवाबदारी ही समाजावरच असते. इस्लामने त्यांच्याप्रति आपले काय कर्तव्य आहेत, ते कुरआनात अशाप्रकारे स्पष्ट केले आहेत.

1. ‘‘त्यांच्याशी चांगला व्यवहार करावा.‘‘(संदर्भ : सूरह-ए-निसा - ३६)
2. ‘‘त्यांच्या भल्यासाठी आपली संपत्ती खर्च करावी.‘‘(संदर्भ : सूरह-ए-बकरा - २१५)
3. ‘‘त्यांना कोणत्याही गोष्टीवर झिडकारु नये.‘‘(संदर्भ : सूरह-ए-जुहा - ९)
4. ‘‘त्यांच्या संपत्तीचे रक्षण करावे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-अनआम - १५२)
5. ‘‘त्यांच्याशी न्यायाचे वर्तन करावे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-निसा - १२७)
6. ‘‘त्यांच्याशी असा व्यवहार करावा, जसा आपण आपल्या पोटच्या मुलाशी करतो.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)

आज अख्ख्या जगामध्ये कोट्यवधी मुले अशी आहेत, जे आपल्या माता-पित्यांपासून दूर, बेवारशीप्रमाणे जीवन जगत आहेत, गलिच्छ वस्त्यांमध्ये खडतर जीवन कंठित आहेत, अपराधी वृत्तींना बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत इस्लामी शिकवणीचा अंगीकार केल्यास ही समस्या अगदी चुटकीसरशी सुटेल.

ज्याप्रमाणे अनाथ हा समाजाचा अत्यंत दुर्बल घटक असून समाजाच्या सहकार्य आणि स्नेह व प्रेमास पात्र आहे, त्याचप्रमाणे विधवा स्त्रियांसुद्धा समाजाचा अत्यंत दुर्बल घटक असून सर्व समाजाच्या मदतीस पात्र आहे. आजही आपण पाहतो की, इस्लामेतर विभिन्न समाज आणि धर्मांमध्ये विधवा स्त्रियांची कशी अवहेलना होते, तिला किती तुच्छ लेखण्यात येते, विधवा असल्याने तिच्या विवशतेचा गैरफायदा उचलून तिचे कसे आर्थिक, शारीरिक आणि लैंगिक शोषण करण्यात येते. बर्याच ठिकाणी तिचा जगण्याचा व आनंदी वातावरणात वावरण्याचा अधिकार हिरावून घेण्यात आला आहे, तिच्याविषयी अनिष्ट आणि शापित कल्पना व विचारसरणी समाजात पेरण्यात आल्या आहेत, तिला समाजजीवनापासून कलंकिनी व शापिनी म्हणून विभक्त करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर तिच्यावर अत्याचाराची यापेक्षा आणखीन गंभीर आणि दुर्दैवी अवस्था काय असू शकते की तिला पतीच्या चितेवर जीवंत जाळून टाकण्यात यावे. मात्र इस्लामने त्या सर्व जुलमी व अत्याचारी जोखडांतून तिला मुक्त केले आणि सन्मानाने जगण्याचा हक्क प्रदान केला. शिवाय तिच्यावर कृपाफळांचा आणि सहकार्य व सहानुभूतीचा वर्षाव करून तिला मान-सन्मान दिला. तिचा नितांत आदर केला. इतरांप्रमाणेच दुसरा विवाह करण्याचा, दांपत्यिक जीवन सुखासमाधानाने व्यतीत करण्याचा, पतीच्या वारसासंपत्तीत भागीदारी होण्याचा परिपूर्ण हक्क दिला आणि मानवजातीस इस्लामने सडेतोडपणे बजावले की, त्यांच्या अधिकारांत कुचराई करणे हा घोर आणि शिक्षापात्र अपराध आहे. शिवाय त्यांना सहकार्य करण्याबाबतीत प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे,

‘‘अनाथ आणि विधवांच्या कल्याणासाठी प्रयत्न करणे हे धर्मयुद्ध करण्यासम आणि दिवसभर रोजा(उपवास) ठेवून रात्रभर नमाज पढण्यासम पुण्य कर्म आहे.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)

संबंधित लेख

  • राजकीय सत्ता हेच स्वामित्व नाही

    या समयी भारत देश सैध्दान्तिक व व्यावहारिक गदारोळाच्या वावटळीत आहे. अशी अवस्था कोणत्याही देशात, एक निश्चित दिशा घेण्याआधी होत असते. एका बाजूला युरोपचे भौतिकवादी विचार व दृष्टिकोन आहेत, जे या देशावर लादले जात आहेत आणि याच विचारांवर आधारित व्यावहारिक पध्दती बनल्या आहेत. राजकीय सत्तेच्या बळावर या देशाला त्यांच्या मुशीत ओतले जात आहे. दुसर्या बाजूला देशाची प्राचीन, धार्मिक व नैतिक प्रकृती आहे. या प्रकृतीचे जठर अद्याप नास्तिकवादाची व भौतिकवादाची माशी पचवू शकण्यास पूर्णतः तयार नाही. नंतर धार्मिक स्वभाव असलेल्या जाती,
  • इस्लामची आध्यात्मिक व्यवस्था

    तत्वज्ञानाच्या व धर्माच्या जगामध्ये सामान्यपणे जी कल्पना अस्तित्वात आहे ती ही की आत्मा व शरीर परस्पर विरोधी आहेत, दोघांचे विश्व वेगळे आहे, दोघांच्या गरजा केवळ वेगळ्या नसून परस्पर विरोधी आहेत. या दोहोंची प्रगती एका वेळेस होणे शक्य नाही.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]