Islam Darshan

इस्लाम संस्कृती व आध्यात्मिक तसेच व्यावहारिक जीवन

Published : Sunday, Feb 14, 2016

मानवी आत्म्याचे पावित्र्य एक पवित्र ध्येय आहे. सर्व मानवी प्रयत्नाचे तेच लक्ष्य आहे व मानव संस्कृतीचे प्रमुख ध्येय तेच आहे. इस्लाम आत्म्याच्या पावित्र्यालाच पुरेसे मानत नसून ज्याला वर्तमान युगातील खरा आनंद मानले जाते त्या सर्व जाहीर बाबींनाही त्याबरोबरीने शिल्लक ठेवतो. म्हणूनच पराजित देशातील एकेश्वरवादाच्या विरुद्ध नसणाऱ्या व लोकांना भल्या व चांगुलपणाच्या कामापासून न रोखणाऱ्या सर्व संस्कृतीना, आपल्या अंमलाच्या कृपाछत्राखाली इस्लामने वाढ केली.

प्राचीन ग्रीस व इस्लाम

ग्रीसपासून प्राप्त केलेले औषधांचे शास्त्र, ज्योतिषशास्त्र, गणितशास्त्र, सृष्टीशास्त्र व पदार्थविज्ञान शास्त्र, रसायनशास्त्र वगैरे शास्त्रीय विद्याधनाचे रक्षण करुन त्यांची जोपासना केली. इस्लामने या ज्ञान भांडाराचे फक्त रक्षणच केले नाही तर त्यात वाढही केली. यावरून विज्ञान व वैज्ञानिक संशोधनाबद्दल मुस्लिमांना किती गाढ प्रेम होते हे स्पष्ट होते. म्हणूनच उंदुलुस (सध्याचा स्पेन) ने लावलेल्या शोधांच्या पायावरच, युरोपातील विज्ञान पुनरुज्जीवन आंदोलन व त्यांची वर्तमान सफलता उभारलेली आहे. इस्लामने आपल्या इतिहासातील कोणत्याही काळात, मानवतेची सेवा करणाऱ्या कोणत्याही खऱ्या संस्कृतीला कधीही विरोध केला नाही, हेच सत्य आहे.

या आधी इतर संस्कृतीशी वागण्याची इस्लामची जशी पद्धत होती तशीच पद्धत वर्तमान पाश्चिमात्य संस्कृतीशी वागताना आहे. इस्लाम तिच्या कोणत्याही गुणाचा इन्कार करीत नाही; पण त्यांच्यापासून निर्मांण होणारे दोष व बिघाड यांना मान्य करीत नाही. इस्लामने आपल्या अनुयायांना भौतिक व वैज्ञानिक क्षेत्रापासून वेगळे होण्याची शिकवण कधीही दिली नाही. इतर संस्कृतीशी संघर्ष करताना खोलवर कसलाही वैयक्तिक अगर वांशिक संकुचितपणा कार्यान्वित नसतो. कारण इस्लाम मानव एकजुटीचा ध्वजवाहक आहे व माणसाच्या भिन्न भिन्न वंशामध्ये व वर्गांमध्ये बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित व्हावेत अशी त्याची इच्छा आहे.

संबंधित लेख

  • इस्लामी कायद्याने प्रदान केलेले दंडविधान आणि त्याचे नियम व पद्धती

    इस्लामने गुन्हेगारीचे निर्मूलन करण्यासाठी ‘हद‘, मृत्यूदंड व देहदंड अर्थात ‘किसास‘ चे कलम लागू केले आहे. मात्र हे लागू करण्यासाठी ज्या अटी व शर्ती लावण्यात आल्या आहेत, त्या कधीकधी पूर्ण होत नाहीत. मग अशा परिस्थितीत गुन्हेगारास मुक्त सोडावे की अपराधानुसार शिक्षा द्यावी? शरीअत अर्थात इस्लामी कायद्यामध्ये गुन्हेगारास निश्चितच शिक्षा मिळावी, अशी भूमिका आहे. अन्यथा समाज हा उपद्रवमुक्त होणार नाही. याकरिता त्यावर दंडविधान लागू करण्यात आले आहे.
  • ‘‘लोकांनो! हिशोबाची वेळ जवळ आली आहे.’’

    ‘‘अत्यंत जवळ येऊन ठेपली आहे लोकांच्या हिशोबाची घटिका आणि तरीसुध्दा ते गाफीलच आहेत. त्यांच्याजवळ जो उपदेश त्यांच्या पालनकर्त्याकडून येतो, त्याला संकोचाने ऐकतात आणि दुर्लक्ष करतात. त्यांचे मन जगाच्या खेळ-तमाशात दंग आहे. अत्याचारी आपापसात कानगोष्टी करतात की, ‘हा इसम खरे तुमच्यासारखाच एक मनुष्य तर आहे. मग तुम्ही डोळ्यादेखत जादूच्या फंद्यात अडकणार काय?’ प्रेषितांनी उत्तरादाखल सांगितले, माझा पालनकर्ता ती प्रत्येक गोष्ट जाणतो जी आकाश आणि पृथ्वीत आहे. तो ऐकणारा व जाणणारा आहे.’’(कुरआन २१:१-४)
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]