Islam Darshan

इस्लाम व संस्कृती

Published : Sunday, Feb 14, 2016

इस्लामवर आरोप करणारे हे लोक

हजारो वर्षापूर्वी राहुट्यांत भटक्या लोकांसारखे आज आम्ही जीवन जगावे अशी तुमची इच्छा आहे काय? जंगलात राहणाऱ्या रानटी व अशिष्ट बुद्दू लोकांकरिता इस्लाम उपयुक्त होता व त्यांच्या गरजांना अनुकूल होता. त्यांच्या साधेपणाला साजेसा साधेपणा इस्लाममध्येही होता. पण ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने जाणाऱ्या विमानांच्या, हायड्रोजन बाँबच्या व चित्रपटांच्या या वर्तमान युगात, ईश्वराच्या अस्तित्वावर श्रद्धा व ईमान यावर आधारलेल्या व वर्तमान प्रगतिशील संस्कृतीच्या दर्जावर पूर्णपणे न उतरणाऱ्या व स्थिर गतीहीन व काळाबरोबर जाण्याची क्षमता नसणाऱ्या संस्कृतीला या युगात काही वाव असू शकतो? म्हणून जोपर्यंत आम्ही त्याच्यापासून सुटका करुन घेत नाही तोपर्यंत सुसंस्कृत व प्रगत राष्ट्राच्या मालिकेत आम्ही दाखल होऊ शकत नाही.

काही दिवसांपूर्वी माझी एका इंग्रज विद्वानाशी भेट झाली, तेव्हा इस्लामवरचे हे सारे आरोप व शंकाकुशंका माझ्या मनात घोळू लागले. गेल्या दोन वर्षांपासून इजिप्तमध्ये मुक्कामास असलेल्या राष्ट्रसंघाच्या तज्ञ मंडळींशी या सद्गृहस्थाचा संबंध आला होता. इजिप्शियन शेतकऱ्याचे जीवनमान व राहणीचा दर्जा उंचावण्याचा व त्याकरिता इजिप्शियन सरकारला सहाय्य व मार्गदर्शन करण्याचा या तज्ञ मंडळाचा उद्देश होता. असा उद्देश असून व इजिप्शियन लोकाबद्दल गाढ प्रेम असूनही शिष्टमंडळातील कोणाही सदस्याला त्यांची भाषा येत नव्हती व त्यांच्यापैकी कोणालाही ही भाषा शिकण्याची आवश्यकता वाटली नव्हती. म्हणून इजिप्शियन सरकारकडून मला शिष्टमंडळाच्या व स्थानिक शेतकऱ्याच्या दरम्यान दुभाष्याचे काम करण्यास नियुक्त केले गेले. अशा रीतीने माझी भेट त्या इंग्रज विद्वानांशी झाली.

इजिप्शियन लोक इंग्रजाचा तिरस्कार करतात ही गोष्ट मी पहिल्या भेटीतच त्या इंग्रज साहेबाला सांगितली व पूर्वेतील कोणत्याही देशावर इंग्रजांचे दडपशाहीचे धोरण जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत ते तिरस्कार करीत राहतील हेही सांगितले. मी त्याला हेही दाखवून दिले की अमेरिकेसारख्या त्यांच्या मित्रापासूनही आम्ही त्रस्त आहोत कारण इजिप्त, पॅलेस्टाइन व आमच्या इतर समस्येच्या बाबतीत आमच्याशी वागण्याची त्यांची रीत अन्यायकारक होती. माझे बोलणे ऐकूण त्याला आश्चर्य वाटले. क्षणभर थांबून त्याने मला म्हटले, ‘तुम्ही कम्युनिस्ट आहात काय?’

यावर मी उत्तर दिले की मी कम्युनिस्ट नसून मुस्लिम आहे व इस्लामच्या रुपाने माझ्याजवळ एक अशी संस्कृती व जीवनपद्धत आहे जी कम्युनिस्ट व भांडवलवाद या दोन्हींपेक्षा कितीतरी उत्तम व श्रेष्ठ आहे. कारण ती संपूर्ण जीवनाशी निगडीत आहे व तिच्यामुळे जीवनातील विविध अंगात एकजिनशीपणा निर्माण होतो.

तीन तास आम्ही आपसात हेच बोलत होतो. शेवटी तो म्हणाला, इस्लामबद्दल तुम्ही जे काही सांगता ते खरे असणे शक्य आहे, अगदी खरे आहे. पण मी स्वतः वर्तमान संस्कृतीच्या फळांपासून वंचित होणे पसंत करीत नाही. मी विमानाने प्रवास करण्याचे सोडून देऊ शकत नाही तसेच रेडिओवरील मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीतापासूनही तोंड फिरवू शकत नाही. सुखचैनीची ही साधने मी सोडू शकत नाही.’

मी काही क्षण स्तब्ध राहिलो व नंतर म्हटले, ‘पण तुमच्या या सर्व अभिरुचीवर बंदी कोण घालतो?’

‘मग इस्लामचा स्वीकार करण्याचा अर्थ रानटी व भटक्या युगाकडे परत जाणे असा होत नाही काय?’

वर उल्लेख केलेल्या शंकेप्रमाणेच, इस्लामवर आरोप करणारे लोक सामान्यतः अशाच प्रकारचे आरोप करताना दिसतात. ज्या लोकांनी धर्माचा अभ्यास केलेला आहे ते जाणतात की या शंकाकुशंकांमध्ये कसलीही वास्तवता नाही. कारण इस्लामी कारकिर्दीत एक क्षणही असा झाला नाही की जेव्हा इस्लाम प्रगतीच्या अगर सभ्यतेच्या मार्गात अडसर बनून राहिला.
अधिकांश बुद्दू लोकांचा भरणा असलेल्या राष्ट्रास इस्लामने पहिल्यांदा संबोधित केले. ते इतके रानटी व क्रूर अंतःकरणाचे होते,
की खुद्द कुरआनमध्ये त्यांच्या बाबतीत असे सांगितले आहे,

‘हे बुद्दू, अरब सत्यधर्माचा इन्कार करण्यात तसेच वैर व वैमनस्यात अत्यंत कठीण आहेत.’ (अत तौबा, ९७)

त्या रानटी व अशिष्ट बुद्दू लोकांचे एका सुसंस्कृत समाजात व राष्ट्रात रुपांतर घडवून आणून इस्लामने एक महान चमत्कार करुन दाखविला आहे. त्याने केवळ त्यांना सन्मार्ग दाखविला व पशुवत दर्जांपासून वर काढून मानवतेच्या श्रेष्ठ मूल्यांशी व अल्लाहच्या धर्माचे आवाहन करणारे बनवून सोडले. इस्लाम मानवाच्या सभ्यपणाची व मानव आत्म्याच्या पावित्र्याची आश्चर्यजनक क्षमता बाळगतो. या गोष्टीचे हे कर्तव्य अतिस्पष्ट व उज्वल उदाहरण आहे.

संबंधित लेख

  • इस्लाम व कम्युनिझम

    निस्संशय इस्लाम जीवनातील सर्व प्रकारच्या चांगुलपणाचा, सद्गुणांचा संयोग तसेच निकोप जीवनमूल्यांचे नाव आहे. हा एक शाश्वत धर्म असून मानवी पिढ्यांच्या सुधारणेसाठी कायदा पद्धत आहे. गेली चार शतके इस्लामी समाज ज्या प्रकारच्या कठीण तणावात व असंतोषात गुरफटलेला आहे. त्यामुळे आर्थिक समस्यांशी निगडित असलेला इस्लामी कायद्याचा भाग तुंबला गेला आहे व स्थगित झाल्यासारखा आहे; तसेच आपले निरंतर विकास कार्य पुढे चालू ठेवू शकत नाही.
  • इस्लामचे आवाहन वैश्विक आहे

    इस्लाम हे अशा एखाद्या जीवन पद्धतीचे नाव नव्हे जी प्रेषित मुहम्मद (स) यांनी प्रथम सादर केली. म्हणूनच त्यांना इस्लामचे संस्थापक समजणे योग्य नाही. पवित्र कुरआन या सत्याचे स्पष्टीकरण करीत आहे की, ईश्वराने मानवजातीसाठी नेहमी एकच जीवन पद्धती पाठविली आणि ती म्हणजे इस्लाम! अल्लाहसमोर आज्ञाधारकता स्वीकारुन नतमस्तक होणे म्हणजे इस्लाम.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]