Islam Darshan

इस्लाम व संस्कृती

Published : Sunday, Feb 14, 2016

सर्वधर्म समभाव कल्पना - आजकाल ‘सर्व धर्म समभाव’ हा विचार फार लोकप्रिय झाला आहे. या विचारामागे एक तत्त्व कार्यरत आहे की सर्व धर्म खरे आहेत. सर्व धर्म देवाकडेच नेतात आणि सर्व धर्म मनुष्याचे कल्याण करण्यास आणि त्याला मुक्ती देण्यासाठी प्रयत्नशील असतात. या विचाराने पुढे ही धारणा निर्माण केली की प्रार्थनेचे स्वरुप वेगवेगळे असू शकते, तसेच मार्ग वेगवेगळे आहेत. ईश्वरावर श्रध्दा बाळगणाऱ्यांची पध्दत व मार्ग वेगवेगळे असले तरी ते सारखेच महत्त्वाचे आहेत. बाह्याकार भक्तीचा महत्त्वाचा नसून भाव महत्त्वाचा आहे. म्हणून भक्तीचे अनेकानेक मार्ग असू शकतात. भक्तीचा हेतु महत्त्वाचा आहे. भक्त हा कुणाच्या भक्तीत मग्न झाला आहे हे महत्त्वाचे आहे. जर हिदु, मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी, बुध्द सर्वजन ईश्वराचीच भक्ती आपापल्या पध्दतीने करतात तरी सर्वांचे अंतिम ध्येय अल्लाह आहे. त्यांच्यात फरक फक्त भक्तीच्या बाह्य स्वरुपाचाच आहे. परंतु सर्वजण अल्लाहचीच भक्ती करतात म्हणून सर्वांचा मार्ग सत्य आहे.

ही धारणा धर्माचे स्वरूप ठरविते तसेच इस्लामचेसुध्दा! इस्लाम धर्माला ते सत्य धर्म मानतात, परंतु ते इस्लाम धर्मालाच फक्त खरा धर्म मानण्यास तयार नाहीत. इतर धर्मसुध्दा इस्लामसारखेच सत्य धर्म आहेत. ही स्थिती इस्लामला मान्य आहे काय? या प्रश्नाचे उत्तर देणे अतिमहत्त्वाचे आहे. हा सामान्य प्रश्न मुळीच नाही, ज्याकडे दुर्लक्ष केले जाईल. कारण या प्रश्नाच्या उत्तराने इस्लामचे स्वरुप स्पष्ट होईल आणि त्याचे दूरगामी परिणाम होतील. इस्लामचे योग्य ज्ञान तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा आपण इस्लामचा दृष्टिकोन वरील संकल्पनेविषयी स्पष्ट जाणून घेऊ. हे ज्ञान प्राप्त करणे अत्यावश्यक आहे, कारण काही लोकांची धारणा आहे की प्रेषित मुहम्मद (स.) यांचा कुरआनमध्ये आलेला इतिहास हा वरील धारणाच स्पष्ट करतो. कुरआनला ही संकल्पना मान्य आहे असे या लोकांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार, अल्लाहने प्रत्येक युगात आणि देशात प्रेषित पाठविले आणि त्या सर्वांचे धर्म तेच होते जे अल्लाहने पाठविले. ते सर्व धर्म इस्लामच होते. अशा स्थितीत जो कोणी जो मार्ग (धर्म) स्वीकारेल आणि ज्या प्रेषितांचे अनुयायीत्व पत्करेल तर तो अल्लाहचीच भक्ती करतो आणि हेच त्याच्या मुक्तीसाठी पर्याप्त कारण आहे. म्हणून प्रत्येकाने इस्लाम आणि कुरआन बरहुकूम आचरण केलेच पाहिजे असे नाही. अशी या लोकांची धारणा आहे.

प्रेषित मुहम्मद (स.) यांचे विशेष महत्त्व: हे अगदी स्पष्ट आहे की आदरणीय मुहम्मद (स.) यांच्या प्रेषित्वाची सर्वोत्कृष्टता ही त्यांच्या प्रेषित्व विषयाचा एकभाग आहे. या प्रेषित्व योजने अंतर्गत इस्लामचा स्वतःचा निर्णय या प्रेषित्वासंबंधीचा आहे आणि तो प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या प्रेषित्वास लागू आहे. जर त्यांच्या प्रेषित्वाची स्थिती पूर्वीच्या प्रेषितांच्या अगदी सारखी आहे तर कुरआन ही सत्यता पुरावे देऊन स्पष्ट पटवून सांगतो. जर स्थिती वेगळी असेल तर कुरआनपूर्वीच्या धर्मांची आणि इस्लामची स्थिती सारखी समजत नाही. म्हणून त्याचा निर्णय याबाबत वेगळा असेल. म्हणून आपण प्रथमतः याबाबत इस्लामची स्थिती पाहू या. ती स्थिती इतर धर्मांसारखी आहे की वेगळी आहे? कुरआन आणि हदीसच्या अभ्यासांती कळते की इस्लामची स्थिती इतर धर्मांसारखी नाही. प्रेषित मुहम्मद (स.) अनेक गोष्टींत वैशिष्ट्यपूर्ण ठरतात.

१) प्रथम वैशिष्ट्य हे आहे की प्रेषित मुहम्मद (स.) यांचे प्रेषित्व वैश्विक आहे. त्यांना एका देशासाठी अथवा समुदायासाठीच फक्त पाठविले गेले नव्हते. संपूर्ण जगासाठी आणि समस्त मानवतेसाठी त्यांचे प्रेषित्व आहे. ज्या अल्लाहने इतर सर्व प्रेषित पाठविले आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांनासुध्दा नियुक्त केले आहे त्याची स्पष्टोक्ती आहे,

‘‘(हे पैगम्बर (स.)), आम्ही तुम्हाला अखिल मानवजातीसाठी शुभवार्ता देणारा आणि सावधान करणारा बनवून पाठविले आहे, परंतु बहुतेक लोक जाणत नाहीत.’’ (कुरआन ३४: २८)

‘‘हे मुहम्मद (स.) सांगा की, ‘‘हे मानवांनो, मी तुम्हा सर्वांकडे त्या अल्लाहचा प्रेषित आहे जो पृथ्वी व आकाशांच्या राज्यांचा स्वामी आहे.’’ (कुरआन ७: १५८)

मुहम्मद (स.) विषयी हे अतुलनीय आहे. त्यांच्या पूर्वीच्या प्रेषितांना हे वैशिष्ट्य प्राप्त नव्हते. त्यांच्यापैकी कोणीही संपूर्ण जगासाठी आणि समस्त मानवतेसाठी पाठविला गेला नव्हता. त्यांच्यापैकी प्रत्येकजण मर्यादित क्षेत्रापुरता होता. धर्मप्रचार जरी एखाद्याचा मोठ्या प्रमाणात नजिकच्या देशात झाला तरी तोसुध्दा इतर कारणांच्या आधारनेच! ते सर्व धर्म त्यांच्या अनुयायींसाठीच फक्त आहेत. परंतु प्रेषित मुहम्मद (स.) यांना अल्लाहने कुरआनमध्ये वरीलप्रमाणे स्पष्ट आदेश दिला आहे की ते सर्व जगासाठी आणि समस्त मानवतेचे प्रेषित आहेत. स्वतः प्रेषित मुहम्मद (स.) यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे,

‘‘प्रत्येक प्रेषित जो माझ्यापूर्वी होऊन गेला तो फक्त आपापल्या लोकांसाठीच विशेषतः होता. मला मात्र समस्त मानवतेसाठी प्रेषित म्हणून पाठविण्यात आले आहे.’’

२) दुसरे वैशिष्ट्य हे आहे की हे प्रेषित्व जसे वैश्विक आहे तसेच शाश्वतसुध्दा (बुखारी, मुस्लिम) आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर प्रेषित्वाची श्रृखंला आणि दिव्यप्रकटन या दोहोंचा शेवट झाला. आता दुसरा प्रेषित येणार नाही की दिव्यप्रकटन होणार नाही. अल्लाहने कुरआनमध्ये हे सत्य स्पष्ट केले आहे,

‘‘लोक हो, मुहम्मद (स.) तुमच्या पुरूषांपैकी कोणाचे पिता नाहीत परंतु ते अल्लाहचे प्रेषित आणि अंतिम प्रेषित आहेत आणि अल्लाह प्रत्येक वस्तूचे ज्ञान राखणारा आहे.’’ (कुरआन २२: ४०)

येथे ‘खातिम’ हा अरबी शब्द वापरला आहे. याचा अर्थ होतो शिक्कामोर्तब करणे. जेव्हा पाकीट सील (मोहरबंद) केले जाते, तेव्हा त्यात काही कमी जास्त होऊ शकत नाही. म्हणून अल्लाहने जेव्हा प्रेषित मुहम्मद (स.) यांना ‘अंतिम प्रेषित’ (प्रेषित्वाचा शेवट (सील)) म्हणून घोषित केले म्हणजेच प्रेषित्वाचा हा शेवट आहे. आता प्रेषित मुहम्मद (स.) हे प्रेषित्वाची अंतिम कडी आहे, ज्यांना दिव्यप्रकटन देऊन पाठविले आहे. प्रलयापर्यंत आता दुसरा प्रेषित येणार नाही. ही माहिती स्वतः प्रेषित मुहम्मद (स.) यांनीसुध्दा अनेकदा स्पष्ट शब्दांत दिली आहे.

‘‘प्रेषित्वाची ही भव्य इमारत आता माझ्यामुळे पूर्णत्वास आली आहे. प्रेषित्वाचा श्रृंखलेचा मी अंतिम दुवा आहे (शेवटचे टोक)’’ (बुखारी)

‘‘निःसंशय, आता माझ्यानंतर कोणी दुसरा प्रेषित येणार नाही.’’ (बुखारी, मुस्लिम)

वरील विवेचनावरून कळते की प्रेषित मुहम्मद (स.) यांची स्थिती इतर प्रेषितांपासून कशी वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे अगदी स्पष्ट आहे की आणखी काही खुलासा करणे व्यर्थ आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या पूर्वीच्या प्रेषितानंतर इतर दुसरे प्रेषित येत गेले, परंतु प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यानंतर दुसरा कोणीही प्रेषित येणार नाही. म्हणजेच इतर प्रेषितांचे कार्य स्थान व काल मर्यादित होते. आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांचे कार्य संपूर्ण जगासाठी आणि समस्त मानवतेसाठी अंतिम दिनापर्यंतचे शाश्वत असे आहे.

३) मुहम्मद (स.) यांच्या प्रेषित्वाचे तिसरे वैशिष्ट्य आहे की त्यांच्याकरवी झालेला दिव्यसंदेश (इस्लाम) हा सर्व दृष्टीने परिपूर्ण आहे. त्यांच्या पूर्वीच्या प्रेषितांद्वारे दिलेले दिव्य संदेश आणि धर्माच्या बाबतीत असे नाही. प्रत्येक ईशधर्म अल्लाहकडूनच होता. परंतु त्यांचे दिव्यप्रकटन अल्लाहने स्पष्टपणे केले आहे,

‘‘आज रोजी मी तुमचा धर्म तुमच्याकरिता परिपूर्ण केला आहे आणि आपली कृपा तुम्हावर परिपूर्ण केली आहे. आणि तुमच्यासाठी इस्लाम तुमचा धर्म म्हणून संमत केला आहे.’’ (कुरआन ५: ३)

हे वैशिष्ट्य फक्त इस्लामचेच आहे. याचा अर्थ असा होत नाही की इतर धर्म हे अपूर्ण समजावेत अथवा त्यांच्या अनुयायींना मार्गदर्शन करण्यास ते अयोग्य आहेत. हा चुकीचा समज आहे. तसे पाहता प्रत्येक ईशधर्म समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि समाजाचे भले करण्यासाठी सक्षम होता. वरील दिव्यप्रकटनाचा हेतु हा आहे की जे दिव्य मार्गदर्शन मानवनिर्मितीच्या प्रारंभापासून म्हणजे आदम (अ.) यांच्या काळापासून सुरू झाले त्यात युगायुगात सुधारणा होत गेल्या आणि शेवटी त्या दिवशी अल्लाहने मानवी धर्म (इस्लाम) मानवांसाठी परिपूर्ण केला.

४) मुहम्मद (स.) यांच्या प्रेषित्वाचे चौथे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे की त्यांना जो ईशग्रंथ- कुरआन देण्यात आला तो सुरक्षित आहे आणि तो ग्रंथ अंतिम दिनापर्यंत सुरक्षित राहील. त्यात कानामात्र्याचासुध्दा बदल होऊ शकणार नाही. अल्लाहने याबाबत आश्वासित केले आहे,

‘‘उरले हे स्मरण (ग्रंथ) तर हे आम्ही अवतरले आहे आणि आम्ही स्वतः याचे संरक्षक आहोत.’’ (कुरआन १५: ९)

कुरआन प्रत्येक मानवी ढवळाढवळीपासून सुरक्षित आहे, असे म्हणणे अंधश्रध्दा नाही. हे एक ऐतिहासिक सत्य आहे. फक्त पूर्ण कुरआन मुखोद्गत असणे किवा त्याला अतिप्रमाणात वाचत राहाणे हे काही कुरआन सुरक्षित राहण्यासाठी एकमेव उपाय मात्र नाहीत. कुरआन एका जिवंत अशा अरबी भाषेत आहे जी भाषा जगभर बोलली, लिहिली आणि समजली जाते.

कुरआनची तुलना इतर धार्मिक ग्रंथांशी केली तर कळून येते की जगात दुसरा असा कुरआनसारखा एखादा ग्रंथ नाही ज्याची ही वैशिष्ट्ये आहेत आणि जो अशा भाषेत अवतरित आहे जी आजसुध्दा जिवंत आहे. इतर ईशग्रंथाची अवस्था तर अशी आहे की त्यांचा कोणताच भाग आज मूळ स्वरूपात उपलब्ध नाही. आज त्यांचे विकृत स्वरुप उपलब्ध आहेत. त्यांच्यात सतत बदल केला गेला. त्यांच्या अनुयायींनी त्या ग्रंथांची मूळ भाषासुध्दा बदलून टाकली कुरआन स्पष्टोक्ती आहे,

‘‘आता त्यांची दशा आहे की शब्दांत फेरफार करून गोष्ट कोठल्या कोठे नेतात. जी शिकवण (ग्रंथ) त्यांना दिली गेली होती त्याचा मोठा भाग ते विसरले आहेत.’’ (कुरआन ५: १३)

प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या श्रेष्ठत्वाचे परिणाम: आपण मुहम्मद (स.) यांच्या प्रेषित्वाचे सर्वश्रेष्ठत्व लक्षात घेतले आणि त्यांची इतरांशी तुलना केली तर इस्लामच्या या स्थितीचे स्वाभाविक परिणाम आपणास कळून येतील. इस्लामला इतर धर्मासारखे समजावे काय? दुसऱ्या धर्मांना जसे विशेष हक्क आहेत तसे इस्लामला आहेत काय? बुध्दीविवेकाने आणि कुरआन व हदीसनुसार या प्रश्नांचे उत्तर नकारार्थी आहे. मुहम्मद (स.) यांचे प्रेषित्व अग्रणी असल्याचे स्वाभाविक परिणाम खालीलप्रमाणे आहेत.

संबंधित लेख

  • ‘मदीना’ इस्लामी आंदोलनाचे केंद्र

    ‘मेराज’च्या दिव्य प्रवासात प्रेषित मुहम्मद(स) यांना परोक्षातील ज्या गोष्टींचे दर्शन घडविण्यात आले, त्यामुळे प्रेषित आणि त्यांच्यावर जीव ओवाळणार्या सर्वच अनुयायांत नवीन साहस आणि संकल्प निर्माण झाले. या प्रसंगी प्रेषितांना जी ईश्वरी वाणी ऐकविण्यात आली. त्यामुळे भविष्यातील वाटचालीचे मार्गदर्शन घडले. चांगुलपणा आणि सत्याच्या आंदोलनात नवीन प्रेरणा व गती निर्माण झाली.
  • कुरआन आणि प्रेषित मुहम्मद (स.)

    कुरआन मुस्लिमांचा धर्मग्रंथ मानला जातो. वास्तविकपणे अखिल मानवजातीसाठी त्यांच्या निर्माणकर्त्या स्वामीने पाठविलेला तो संदेश आहे. ईशग्रंथापैकी ती परिपूर्ण आणि शेवटचे संकलन आहे. पवित्र कुरआननंतर कोणताही ईशग्रंथ जगात अवतरल्याचे आढळून येत नाही. हा ग्रंथ सर्व माणसांच्या मार्गदर्शनासाठी अवतरला असून जीवनाच्या प्रत्येक अंगात तो मागदर्शक आहे. जगाकडे पाहाण्याचा माणसाचा दृष्टिकोन तो स्पष्ट करतो, त्याला जीवन व्यतीत करण्याची पद्धत शिकवितो, त्याला त्याच्या कर्तव्यांचे स्मरण करून देतो, त्याला सत्कर्मांची फळे दाखवून देतो व दुष्कर्मांच्या वाईट परिणामांची भयसूचना देतो.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]