Islam Darshan

‘उमरा’साठी रवानगी

Published : Saturday, Feb 13, 2016

.

यानुसार समझोत्याच्या तीन वर्षानंतर म्हणजे हि. स. ९ च्या ‘जीकादा’ महिन्यात आदरणीय प्रेषित मुहम्मद (स) रवाना झाले. ‘हुदैबिया’ समझोत्यात सामील असेलल्या सर्व जणांना घेऊन आणि ८० उंट कुरबानीसाठी घेऊन ‘उमरा’ (काबादर्शन) साठी रवाना झालेत.

समझोत्यामध्ये एक ठराव असादेखील होता की, मुस्लिमांनी कोणत्याही प्रकारचे सामरिक हत्यार सोबत बाळगू नयेत. या अटीची पूर्तता करताना प्रेषित व त्यांच्या सहकार्यांनी मक्का शहरापासून आठ मैलाच्या अंतरावर ‘बत्ने याजज’ या ठिकाणी दोनशे स्वारांच्या देखरेखीखाली सामरिक हत्यारे ठेवली आणि मग स्वयं प्रेषितांच्या नेतृत्वात काबादर्शनास्तव निघालेला हा काफिला मक्केस रवाना झाला. माननीय अब्दुल्लाह बिन रूबाहा(र) हे प्रेषितांच्या स्वारीची लगाम पकडून चालत होते आणि म्हणत होते,

‘‘केवळ त्याच एकमेव शक्तिशाली ईश्वराचे नाव घेऊन आम्ही काबागृहात दाखल होत आहोत. त्यानेच प्रदान केलेल्या धर्ममार्गाशिवाय कोणताही धर्ममार्ग नाही, जो धर्ममार्ग प्रेषित मुहम्मद (स) घेऊन आले आहेत. हे शत्रूंनो! आमच्या मार्गात अडसर बनू नका. आम्हास स्वयं ईश्वराने शिकवण दिली की, सर्वोत्तम युद्ध हे ईश्वराच्या मार्गातील युद्ध आहे. हे ईश्वरा! आम्ही तुझ्या ग्रंथाच्या आदेशावर श्रद्धा बाळगतो!’’

कवितेच्या या पदांवरून हे देखील स्पष्ट होते की, मागील वर्षाच्या तहाच्या घटनांमुळे त्यांच्यात खूप जोश होता. मक्का शहरात ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती की, मदीनाच्या वातावरणात मुस्लिम खूप दुर्बल झाले. हाच गैरसमज दूर करण्यासाठी प्रेषित मुहम्मद(स) यांनी आपल्या सोबत्यांना आदेश दिला होता की, काबाप्रदक्षिणेच्या पहिल्या तीन फेर्यांमध्ये ताठ बाण्याने चालावे.

आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचे आपल्या सोबत्यांसह ‘उमरा’करिता मक्केत दाखल होणे खपण्यासारखे नव्हते. त्यामुळे ते मक्का शहराबाहेर गेले आणि तीन दिवस संपल्यावर आपल्या दूतांकरवी प्रेषितांना संदेश पाठविला की, मुदत संपताच मक्का शहर सोडून निघावे. प्रेषितांनीही मुदत संपताच मक्का शहर सोडले.

या घटनेच्या काही महत्त्वाच्या पैलूंवर आपण दृष्टिक्षेप टाकू या.

  1. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी मक्का प्रवेशावेळीच आपल्या समूहास आदेश दिला की, ताठबाण्याने काबास प्रदक्षिणा घालाव्यात. या आदेशाचा एक उद्देश असा असू शकतो की, मुस्लिम सैन्याने शत्रूसमोरून जाताना ताठ बाण्याने आणि निर्भयपणे चालावे. दुसरा हेतू असा असू शकतो की, शत्रूंनी केलेल्या चुकीच्या त्या प्रोपगंड्याचे खंडन व्हावे की, मदीना शहराच्या वातावरमात मुस्लिम शारीरिकदृष्ट्या कमकुवत झाले. यावरून हे स्पष्ट होते की, मुस्लिमांनी शत्रूसमोर कधीच आपल्या कमजोरीचे प्रदर्शन करू नये. उलट आपल्या शक्तीचे प्रदर्शन करावे. अशा प्रसंगी निर्भयपणे वागणे आणि ताठ बाण्याने चालणे हे पुण्य कर्म होय.
  2. त्या प्रसंगाची कल्पना जर केली की, सर्व मुस्लिमजण काबागृहाची प्रदक्षिणा करीत आहेत आणि मक्का शहरातील बिगर मुस्लिमजण आपापल्या घरांच्या छतावरून हे दृष्य पाहात आहेत. तर यावरून इतिहासातील मागील प्रसंगसुद्धा आठवल्याशिवाय राहात नाही की, हीच ती शक्ती होती की, जिचे निर्मूलन करण्यासाठी याच काबागृहात, याच मक्का शहराच्या गल्लीबोळात हर प्रकारचे अन्याय व अत्याचार करण्यात आले होते. याच इस्लामी शक्तीचा बिभोड करण्यासाठी याच मक्का शहराच्या वातावरणात मुस्लिमांवर अन्यायाची अमानुष शृंखला चालू होती आणि आजचे दृष्य मात्र अगदीच वेगळे होते की, काबागृहाच्या प्रवेशापासून त्यांना कोणीच रोखू शकत नव्हते. कारण मुस्लिमांची शक्ती आता अफाट वाढली होती.
  3. मुस्लिमांची एवढी मोठी संख्या मक्का शहरात तीन दिवस मुक्कामास होती आणि या काळात त्यांच्याकडून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. त्यांनी आपल्या नैतिकतेचे उत्तम प्रकारे प्रदर्शन केले.
  4. या नैतिकवर्तनाची मक्का शहराच्या संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा झाली आणि बर्याच विद्वांनानी भाकित केले की, ‘‘भविष्यात इस्लामी शक्तीचाच विजय होणार!’’

संबंधित लेख

  • इस्लामची आर्थिक व्यवस्था

    मानवाच्या आर्थिक जीवनात न्याय व्यवस्था कायम राखण्यासाठी ‘इस्लाम’ ने काही सिद्धांत आणि मर्यादा घालून दिल्या आहेत. जेणेकरून संपत्तिची निर्मिती, उपयोग व वितरणाची (Circulation)संपूर्ण व्यवस्था त्याने नेमून दिलेल्या मर्यादेच्या आत चालावी.
  • इस्लाममध्ये माता-पित्यांचे अधिकार

    या जगामध्ये ईश्वरानंतर सर्वांत जास्त उपकार आपल्यावर आपल्या जन्मदात्याचेच आहेत. जन्मापासून तारुण्याच्या उंबरठ्यावर पोहचेपर्यंत माता-पिताच हर-प्रकारे देखभाल करतात. आपली प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी ते तन-मन-धनाची बाजी लावतात. याबाबतीतही पित्यापेक्षा मातेचा दर्जा जास्तच आहे. कारण ती नऊ महिन्यापर्यंत आपल्या पोटात मूल वाढविते आणि खरे पाहता जगातील कोणतीही लेखणी अशी नाही, जी मातेचे उपकार वर्णन करू शकेल.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]