Islam Darshan

इस्लाम व सामाजिक बिघाड

Published : Sunday, Feb 14, 2016

जुगार, मदिरापान व स्त्री पुरुषाने अनिर्बंध एकमेकांत मिसळणे, यासारख्या कथित प्रगतिवाद्यांच्या निरर्थक संकटापासून बाजूला होऊन इस्लाम या सर्व गोष्टींवर प्रतिबंध लावतो.

मदिरापानाची गोष्ट ही वास्तविकपणे कोणत्या ना कोणत्या वैयक्तिक अगर सामाजिक बिघाडाचेच लक्षण आहे. मदिरा व इतर नशेच्या वस्तूंची गरज केवळ बिघडलेल्या समाजालाच भासत असते. ही गरज काही निरनिराळ्या वर्गांत इतकी निकडीची असते की ते भोगविलासात पूर्णपणे डुंबून त्यांच्यातील सर्व मानवी संवेदना मरुन जातात. त्याच वेळी दुसरीकडे संपूर्ण देश निराधारपणाच्या, हलाखीच्या व अभावाच्या गर्तेत पडलेला असतो. म्हणून हा अभावग्रस्तांचा समूह वास्तवापासून पलायनाच्या वाटा शोधून आपले वेगळे जग बसवून टाकतो. जे दडपशाहीच्या व क्रूरपणाच्या जात्यात भरडलेले असतात तेथे मानवाच्या विचारावर बंधने घालून त्यांच्या भरारीला मर्यादा घातल्या जातात. जेथे लोक आपल्या पोटापाण्याच्या विवंचनेत इतके व्यग्र व हरवलेले असतात की त्यांना इतर कसलीही शुद्ध उरत नाही. अशाच समाजात या नशेच्या वस्तूंचा रिवाज सर्वसामान्यपणाने आढळतो. त्याचे हेच कारण आहे, त्याचप्रमाणे ज्या लोकांच्या कानावर सतत नवनव्या यंत्राचे कर्णकर्कश व नकोसे वाटणारे आवाज आढळत असतात, अशा लोकांच्या समाजातही हा दोष सर्वसामान्यपणे आढळून येतो.

हे सर्व सामाजिक रोग मदिरेला सनदशीर ठरविण्यासाठी कोणत्याही तऱ्हेने इष्ट अगर योग्य होऊ शकत नाहीत. मदिरापान हे सामाजिक रोगाचे लक्षण असल्यामुळे, मदिरेचा निषेध करण्यासाठी अगदी तशाच स्वाभाविक कार्यप्रणालीचा अवलंब केला आहे. त्याने सर्वप्रथम निषेधाला जबाबदार असणाऱ्या बिघाडांना, दोषांना व त्यांना उगम देणाऱ्या सर्व झऱ्यांना नष्ट करुन टाकले आणि त्या दिशेने समाधान झाले तेव्हा मदिरा अवैध व वर्ज्य असल्याचे घोषित करुन टाकले. इस्लामवर टीकास्त्र सोडण्याऐवजी, वर्तमान संस्कृतीच्या ध्वजवाहकांनी जर आपल्या सामाजिक, राजकीय, मानसिक व स्वाभाविक परिस्थितिमध्ये बदल घडवून आणून अशा रीतीने मानवतेच्या आध्यात्मिक रोगावरील उपायांची पद्धत शिकण्यावर आपले लक्ष केंद्रित केले तर ते त्यांना अधिक उपयुक्त होऊ शकेल अशारीतिने ते इस्लामपासून बरेच काही शिकू शकतील.

जुगाराच्या संदर्भात आम्ही सविस्तर चर्चां करु इच्छित नाही, कारण जे मूर्ख असतात, त्यांनाच जुगाराची आवड असते.

संबंधित लेख

  • दीन / जीवनधर्म व शरिअत

    इस्लाम धर्मानुसार तुम्ही अल्लाहच्या अस्तित्वावर व त्याच्या गुणवैशिष्ट्यांवर श्रद्धा बाळगावी, तसेच पारलौकिक जीवनात या जगातील सत्कर्माबद्दल मिळणारे इनाम व दुष्कर्माबद्दल मिळणारी शिक्षा या गोष्टीवर अल्लाहच्या सच्चा प्रेषितांनी जी शिकवण दिलेली आहे त्यानुसार तुम्ही ईमान धारण करावे. ईशग्रंथांना मान्य करून आपल्या स्वैर आवडीच्या व पसंतीच्या मार्गाचा परित्याग करावा. या ग्रंथांमध्ये जो मार्ग दाखवून देण्यात आला आहे त्या मार्गाचाच अवलंब करा. अल्लाहच्या प्रेषितांचेच अनुयायीत्व करा व इतर सर्व गोष्टी सोडून त्यांच्याच आज्ञांचे पालन करा. ‘इबादत’ (उपासना) मध्ये अल्लाहखेरीज इतर कोणाचाही समावेश करु नका. त्याच ‘ईमान’ व ‘इबादत’ चे नाव ‘दीन’ असे आहे.
  • इस्लामी उपासनांसंबंधी एक लक्षणीय बाब

    इस्लामी उपासनांसंबंधी एक बाब येथे लक्षणीय होय की ‘नमाज‘ ही अश्लीलता आणि दुष्कर्मांपासून रोखते, रोजासंबंधी म्हटले गेले की त्यामुळे ईशपरायणता येते व आत्मशुद्धी होते. जकात दिल्याने पावित्र्य तसेच हजमुळे मोक्ष प्राप्त होतो. अर्थात सर्व पाप धुतले जातात. यावरून स्पष्ट होते की या सर्वच बाबी गुन्हेगारीचे निर्मूलन करण्यास सहाय्यक ठरतात. येथे ही बाबसुद्धा लक्षणीय आहे की, नमाज ज्या बाबींपासून रोखते, इतर माध्यमांनी त्यापासून मानवास रोखता येत नाही, रोजामुळे जी ईशपरायणता येते, ती इतर कोणत्याही गोष्टीमुळे येत नाही. जकातमुळे जे पावित्र्य लाभते, ते इतर कशानेच शक्य नाही.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]