Islam Darshan

मानवी जीवनात कोणत्या गोष्टीमुळे बिघाड उत्पन्न होतो

Published : Saturday, Feb 13, 2016

मानवी जीवनात ज्या गोष्टीमुळे बिघाड उत्पन्न होतो त्यांना आपण चार प्रमुख शीर्षकांखाली एकत्र करू शकतो.

 1. ईश्वराची भीती नसणे -
  ही गोष्ट स्वतःच जगात अन्याय, निर्दयता, अपहार व इतर सर्व नैतिक दोषांचे मूळ कारण आहे.

 2. ईश्वरी मार्गदर्शनाची उपेक्षा -
  या गोष्टीने कोणत्याही बाबतीत माणसासाठी कायमस्वरूपी असे नैतिक नियम बाकी ठेवले नाहीत. की ज्याचे नियमितपणे पालन केले जावे. यामुळेच लोकांची, जनसमूहांची आणि राष्ट्राची एकूण कार्यपध्दती लाभदृष्टी, सुखोपभोगदुष्टी आणि इच्छा आकांक्षेच्या दासत्वावर आधारलेली आहे. याचीच परिणती ही आहे की, ते आपल्या हेतूमध्ये वैध वा अवैध असा फरक करीत नाहीत. तसेच ते हेतू साध्य करण्यासाठी कसल्याही प्रकाराचे अगदी वाईटातले वाईट माध्यमसुध्दा अवलंबिण्यात त्यांना यत्किंचितही संकोच वाटत नाही

 3. स्वार्थीपणा -
  हा केवळ लोकांनाच एकमेकांचे हक्क मारण्यासाठी उद्युक्त करतो असे नाही, तर पुढे मोठ्या प्रमाणात जातीयवाद, राष्ट्रवाद आणि वर्गीय भेदभावाचा त्याला आकार येतो. त्यामुळे उपद्रवाची असंख्य रूपे उत्पन्न होतात.

 4. विषण्णता अथवा कुमार्गाचे अवलंबन -
  यामुळे मनुष्य एकतर ईश्वराने दिलेल्या शक्तीचा उपयोगच करीत नाही किवा त्याचा दुरूपयोग करतो. पहिल्या अवस्थेसंबंधी सर्वश्रेष्ठ ईश्वराचा कायदा असा की तो आळशी आणि नाकर्त्या लोकांचा जास्त काळापर्यंत आपल्या जमिनीवर ताबा राहू देत नाही. किबहुना त्यांच्या जागी अशा लोकांना आणतो जे काही ना काही प्रमाणात रचनात्मक कार्य करणारे आहेत. दुसर्या अवस्थेत जेव्हा कुमार्गी लोकसमूहाकडून होणारा विध्वंस त्यांच्या रचनात्मकापेक्षा जास्त होतो तेव्हा त्यांना हटवून दूर फेकले जाते. बहुतेक करून त्यांना त्यांच्याच विध्वंसक कारवायांचा घास बनविले जाते.

रचना

याउलट ज्या गोष्टीमुळे मानवी जीवनाची जडणघडण होते व तो सावरला जातो त्या गोष्टीचीसुध्दा चार शीर्षकाखाली विभागणी होते.

 1. ईश्वराचे भय (ईशपरायणता) -
  हे माणसाला वाईट गोष्टींपासून रोखण्यासाठी व त्याला सरळपणे चालविण्यासाठी खात्रीलायक अशी एकमेव शाश्वती आहे. सत्यनिष्ठता, न्याय, प्रामाणिकता, सत्यावलोकन, आत्मनियंत्रण आणि इतर सर्व गुणांवर एका शांतताप्रिय आणि प्रगतीशील संस्कृतीची निर्मिती अवलंबून असते. ते त्याच एका बियापासून उत्पन्न होत असतात. इतर काही श्रध्देच्या आधारेसुध्दा ते गुण काही ना काही प्रमाणात उत्पन्न केले जाऊ शकतात आणि ते पाश्चिमात्य लोकांनी काही ना काही अंशी आपल्यात निर्माण केले आहेत. परंतु त्याआधारे उत्पन्न केलेल्या गुणांची वाढ केवळ एका मर्यादेपर्यंत होऊन खुंटते. त्या मर्यादेतही त्यांचा पाया डळमळीतच असतो. केवळ ईशभिरुता (ईशपरायणता) हाच एक असा भक्कम व टिकाऊ स्वरूपाचा पाया आहे. त्यामुळे माणसामध्ये दृष्टाईपासून दूर राहण्याचा व भलाईवर चालण्याचा गुण दृढपणे भिनला जातो. तोही मर्यादित स्वरूपात नव्हे, तर अत्यंत व्यापक स्वरुपात. सर्वच मानवी व्यवहारात तो आपला प्रभाव दर्शवित असतो.

 2. ईश मार्गदर्शनाचे अनुसरण -
  हेच माणसाच्या व्यक्तिगत सामूहिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वर्तनाला नैतिकतेच्या कायमस्वरूपी नियमांचे पायबंद घालणारे एकमेव साधन आहे. जोपर्यंत माणूस आपल्या नैतिक नियमांचा स्वतःच विधाता व रचनाकार बनतो, त्यांच्याजवळ बाता मारण्यासाठी काही अन्य नियम असतात तर अंमलात आणण्यासाठी काही वेगळे! पुस्तकात सुवर्ण अक्षरांनी तो एका प्रकारचे नियम लिहितो आणि व्यवहारात मात्र आपल्या फायद्यानुसार दुसर्याच प्रकारचे नियम अनुसरतो. इतराकडे मागणी करतांना त्याचे नियम काही वेगळे असतात आणि स्वतः व्यवहार करताना काही वेगळे. वेळ, प्रसंग, हित, इच्छा व गरजेच्या दबावाखाली त्याचे नियम क्षणोक्षणी बदलत असतात. नैतिक आचरणाचा मूळ केंद्रबिदू तो ‘सत्या’ ला नव्हे तर ‘स्वहिता’ला बनवितो. त्याचे आचार सत्यानुसार घडले पाहिजे ही गोष्ट तो मान्यच करीत नाही. त्याऐवजी तो इच्छितो की, सत्यानेच त्याच्या हितानुसार आकार घ्यावे. हीच ती गोष्ट आहे जेणेकरून व्यक्तीपासून ते राष्ट्रापर्यत सर्वांचेच वर्तन चुकीचे बनते. त्यामुळेच जगात उपद्रव माजतो.

  याउलट शांती, समृद्धी यश व मांगल्य प्रदान करणारे नियम म्हणजे फायद्यानुसार नव्हे तर सत्यानुसार रचलेले नैतिक नियम आहेत. त्या नियमांना अटळ मानून सर्व व्यवहारात त्यांचे पालन केले जाते. मग ते व्यवहार व्यक्तिगत स्वरूपाचे असोत की राष्ट्रीय स्वरूपाचे. मग त्यांचा संबंध व्यापाराशी असो किवा राजकारण आणि तह व युध्दाशी असो. असले नियम आम्हाला ईश मार्गदर्शनातच मिळू शकतात हे उघड आहे. त्या नियमांच्या अंमलबजावणीचा केवळ एकच मार्ग आहे तो म्हणजे त्यांच्यात फेरफार करण्यात सर्व अधिकार वर्ज्य माणून माणसाने त्याचे काटेकोर पालन केले जाणे अनिवार्य मानावे.

 3. समानतेवर आधारित मानवी व्यवस्था -
  ती वैयक्तिक, जातीय व पारंपरिक आणि वर्गीय स्वार्थावर आधारित न राहता सर्व माणसांना समान दर्जा आणि समसमान हक्कावर आधारित असेल. त्यात अयोग्य भेदभावांना स्थान नसेल. त्या व्यवस्थेत उच्चनीचता, अस्पृश्यता आणि कृत्रिम पूर्वग्रहदोष नसतील. तिच्यात काही लोकांसाठी विशेष राखलेले हक्क आणि काहींसाठी कृत्रिम बंधने आणि अडथळे नसतील. त्या व्यवस्थेत सर्वांना प्रगतीची समसमान संधी मिळेल. तिच्यात माणसाच्या गुणाच्या आधारावर त्याची नीचता व उच्चता ठरेल. त्या व्यवस्थेत इतकी व्यापकता असेल की भूतलाची सर्वच माणसे तिच्यात बरोबरीने सामील होऊ शकतील.

 4. सत्कृत्ये -
  अर्थात ईश्वराने दिलेल्या शक्ती आणि त्याने प्रदान केलेल्या साधनांना पूर्णपणे उपयोगात आणणे व तेही यथायोग्यप्रकारे आणणे.

बंधुनो! याच त्या चार गोष्टी आहेत ज्यांच्या संग्रहाचे नाव ‘रचना आणि सुधारणा’ असे आहे. आमच्यात सत्यनिष्ठ लोकांची एक अशी संघटना विद्यमान असणे आवश्यक आहे जेणेकरून बिघाडाच्या कारणांना प्रतिबंध आणि रचनेच्या सदरहू गोष्टींना अमलात आणण्यासाठी निरंतरपणे प्रयत्नांची पराकाष्ठा होईल. यातच आम्हा सर्वांचे भले आहे. या देशाच्या रहिवाशांना सरळमार्गावर आणण्यात अशा प्रकारचे प्रयत्न यशस्वी ठरले तरी विनाकारणच आपल्या भूमिची व्यवस्था भूमिपुत्रांकडून हिरावून अन्य कोणाला सुपूर्द करण्याइतपत ईश्वर अन्यायी नाही. परंतु ईश्वर न करो जर प्रयत्नांची पराकाष्ठा अयशस्वी ठरली तर आमचा, आपणा सर्वांचा तसेच या हिदुस्तानाच्या सर्व रहिवाशांचा शेवट काय होईल, हे आम्ही सांगू शकत नाही.

संबंधित लेख

 • इस्लाम व वसाहतवादी पद्धत

  वसाहतवादी पद्धत, युद्धे इतर जातींचे शोषण व भांडवलशाही पद्धतीने निर्माण केलेले आणि जगभर पसरलेल्या दोषांच्या संबंधी इस्लाम या सर्वांच्या विरुद्ध आहे. आपल्या वसाहती स्थापन करण्यासाठी अथवा इतरांना आपल्या स्वार्थाचे साधन बनविण्याच्या त्यांच्या उद्देशाशी त्यांच्याविरुद्ध युद्ध करणेसुद्धा इस्लामला पसंत नाही.
 • विश्वस्वामी

  याच्या अगदी टोकावर आपण सर्वजण उभे आहोत इतिहासाच्या अशा महत्त्वपूर्ण प्रसंगापैकी आहे. पृथ्वीचा खरा स्वामी एखाद्या देशात एखादी व्यवस्था संपुष्टात आणून दुसर्या व्यवस्थेचा निर्णय घेत असतो. सकृद्दर्शनी ज्याप्रकारे अधिकारसूत्राच्या हस्तांतरणाची बाब पूर्ण होत असल्याचे दिसत आहे, परंतु देशाची व्यवस्था खुद्द देशवासीयांच्या स्वाधीन केली जाण्याचे हे निर्णायक पाऊल आहे, अशी कुणाची फसगत होऊ नये. परकीय लोक जे बाहेरून राज्य करीत होते ते परत जात आहेत म्हणून देशव्यवस्था खुद्द देशवासीयांच्या हातात आली पाहिजे हे अगदी स्वाभाविक आहे.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]