Islam Darshan

नैतिक अवस्था भयंकर प्रमाणात खालावली आहे

Published : Saturday, Feb 13, 2016

एखादा गैरफायदा उचलताना, एखादे लाभदायक खोटे बोलताना आणि एखादी नफा देणारी बेइमानी करताना केवळ या जाणिवेने की, अशा प्रकारे कोणाचा हक्क मारणे नैतिक दृष्टीने वाईट आहे म्हणून संकोच बाळगणारे आमच्यात किती टक्के लोक आहेत? जेथे कायद्याच्या पकडीतून वाचण्याची आशा असते तेथे केवळ नैतिक संवेदनेपोटी एखाद्या अपराधापासून किवा दुष्कृत्य करण्यापासून परावृत्त राहणारे असे किती टक्के लोक आहेत? ज्या ठिकाणी आपल्या व्यक्तिगत फायद्याची आशा नसेल तेथे इतरांशी भलाई, सहानुभूती, हक्कपूर्तता आणि परोपकाराचे वर्तन करणारे असे किती लोक आहेत? आमच्या व्यापारीवर्गात जे फसवेगिरी, लबाडी, खोटेपणा आणि काळ्या नफेबाजीपासून अलिप्त असतील अशा व्यापार्यांचे सरासरी काय प्रमाण आहे? आमच्या उद्योगपतींपैकी जे आपल्या फायद्याबरोबरच ग्राहकाचा लाभ आणि आपले राष्ट्र व आपल्या देशाच्या हिताचाही काही विचार करीत असतील अशा लोकांचे प्रमाण किती आहे? आमच्या जमीनदारांपैकी जे धान्यसाठा करताना, अत्यंत महाग ते विकताना, आपल्या नफेबाजीमुळे लक्षावधी किबहुना कोट्यवधी माणसांना उपासमारीची यातना देत आहेत, असा विचार करणारे आहेत? आमच्या श्रीमंतांपैकी ज्याच्या श्रीमंतीत एखाद्याचा मारलेला हक्क नसावा आणि बेइमानीचा शिरकाव नसावा असे किती लोक आहेत? आमच्या कामगारांपैकी जे कर्तव्यनिष्ठतेने आपल्या मजुरी व पगाराचा हक्क अदा करीत असतील असे किती आहेत? आमच्या सरकारी नोकरवर्गापैकी जे लाचलुचपत आणि अपहारापासून अन्याय आणि सामान्यजनाला त्रास देण्यापासून, कामचुकारपणा आणि हरामखोरीपासून तसेच आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करण्यापासून अलिप्त असलेले असे किती लोक आहेत? आमचे वडील, आमचे डॉक्टर्स, आमचे वैद्य आणि हकीम, आमचे पत्रकार, आमचे लेखक व प्रकाशक आणि आमच्या ‘देशभक्तां’मध्ये असे किती लोक आहेत की, स्वार्थापोटी अत्यंत घृणास्पद पध्दतीचा अवलंब करीत असताना मानवजातीला मानसिक, नैतिक, आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या भयंकर हानी पोचवित असताना, ज्यांना थोडीदेखील लज्जा वाटत असावी?

मी जर असे म्हटले की, आमच्या लोकवस्तीपैकी केवळ पाच टक्के एवढेच काय ते लोक या अनैतिकतेच्या महारोगापासून कदाचित अलिप्त असतील, उरलेले ९५ टक्के लोक या संसर्गजन्य महारोगाने भयंकरपणे ग्रासले आहेत तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. याबाबतीत हिदू, मुस्लिम, शीख, ख्रिस्ती आणि हरिजन यांच्यात काहीच फरक नाही. सर्वचे सर्व सारखेच रोगी आहेत. सर्वाची नैतिक अवस्था भयंकर प्रमाणात खालावली आहे. कोणत्याही एखाद्या समूहाची अवस्था दुसर्यापेक्षा चांगली असेल असे मुळीच नाही.

नैतिक अधोगतीच्या साथीने जेव्हा एका मोठ्या बहुसंख्येला ग्रासून टाकले तेव्हा विस्तृत प्रमाणात सामुदायिक स्वरूपात ते प्रकट व्हावे हे अगदी स्वाभाविकच होते. त्या चालून येणार्या भयंकर वादळाचे पहिले लक्षण आम्हाला त्या वेळी दिसले जेव्हा महायुध्दामुळे रेलगाड्यांत प्रवाशांची झुंबड उडू लागली. त्या प्रसंगी एकाच राष्ट्राच्या व एकाच देशाच्या लोकांनी आपासातच एकदुसर्याशी स्वार्थीपणा, निर्दयता आणि कठोरपणाचा व्यवहार केला. सर्वसाधारणपणे आमची नैतिकता किती शीघ्रतेने खालावली जात आहे त्याची प्रचिती येत होती. मग गरजेच्या वस्तूची टंचाई व महागाई त्याचबरोबर साठेबाजी आणि चोरबाजारीही विस्तृत प्रमाणात सुरू झाली. नंतर बंगालचा तो कुत्रिम दुष्काळ प्रकट झाला ज्यात आमच्याच एका वर्गाने आपल्या नफ्यासाठी आपल्याच देशाच्या लाखो माणसांना भुकेने तडफडून जीव देण्यास भाग पाडले. ही सर्व प्राथमिक लक्षणे होती. त्यानंतर दीर्घकाळापासून आमच्या आतल्या आतच धुमसत असलेल्या दुष्टता, नीचता, हिस्त्रपणा आणि क्रूरतेच्या ज्वालामुखीचा अकस्मात उद्रेक झाला. आता तो जातीय दंग्याच्या रूपात हिदुस्तानाला एका टोकापासून ते दुसर्या टोकापर्यंत भस्मसात करून टाकीत आहे.

कलकत्त्याच्या जातीय दंग्यानंतर हिदु, मुस्लिम आणि शीख लोकांच्या दरम्यान संघर्षाचे नवे पर्व सुरू झाले. त्यात हे तिन्ही लोक अत्यंत नीच गुणांचे प्रदर्शन करीत होते. जे एखाद्या मनुष्याकरवी घडण्याची कधी कल्पनासुध्दा केली जाऊ शकत नव्हती, अशी कृत्ये आमच्या वस्तीत राहणार्या लोकांकरवी जाहिरपणे केली जात आहेत. मोठमोठ्या प्रदेशातील संपूर्ण वस्त्याच्या वस्त्या गुंड बनल्या आहेत. ते अशी कृत्ये करीत आहेत की, कोणा गुंड माणसाच्याही कल्पनेत ती आली नसती. दूधपित्या मुलांना आईच्या छातीवर ठेवून कापले गेले आहे. जिवंत माणसांना अग्नीत जाळून ठार केले. कुलीन स्त्रियांना सर्वांसमक्ष नग्न केले गेले. हजारोंच्या जमावासमक्ष त्यांचे शील लुटले गेले. पिता, पती आणि भावासमोर त्यांच्या मुलींना, पत्नीला आणि बहिणींना बेअब्रू केले गेले. उपासनास्थळे आणि धार्मिक ग्रंथांवर क्रोध काढण्याच्या अत्यंत घृणास्पद पध्दती अवलंबिल्या गेल्या आहेत. रुग्ण, जखमी आणि वृध्दांना अत्यंत निर्घृणपणे ठार केले गेले. प्रवाशांना चालत्या रेलगाडीतून फेकले गेले आहे. जिवंत माणसाचे शरीराचे अवयव तोडून ठार केले आहेत. असहाय आणि निःशस्त्र माणसांची श्वापदांप्रमाणे शिकार केली गेली. शेजार्यांनी शेजार्यांस लुटले. मित्रांनी मित्राचा घात केला. अभय देणार्यांनी स्वतः आपले अभय मोडले. शांतता व सुरक्षितेतच्या रक्षकांनी (पोलीस, फौज आणि मॅजिस्ट्रेट यांनीच) उघडपणे दंगलीत भाग घेतला आणि आपल्या देखरेखीत व मदतीने दंगली घडविल्या आहेत.

तात्पर्य असे की, जुलूम व अत्याचार, कठोरता, निर्दयता आणि नीचता व गुंडगिरीचा असा एकही प्रकार उरलेला नाही जो या काही वर्षांत आमच्या देशवासीयांनी सामुदायिकपणे केलेला नसेल. अद्यापही मनातील द्वेष पूर्णपणे नष्ट झालेला नाही. आतापर्यंत जे काही घडले त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आणि कित्येक पटींनी जास्त वाईट रीतीने अजून घडणार आहे अशी चिन्हे दिसत आहेत.

हे सर्व काही एखाद्या आकस्मिक प्रक्षोभाचा परिणाम आहे असे आपण समजता का? जर असाच आपला कयास असेल तर अत्यंत चुकीचा आपला समज झाला आहे. आताच मी आपणास सांगितले आहे की, या देशाच्या एकूण लोकवस्तीचे ९५ टक्के लोक नैतिक दृष्टीने रूग्ण बनले आहेत. जर लोकांची इतकी मोठी संख्या दुराचारी बनली तर त्या लोकसमूहाचे सामूहिक वर्तन कसे नीट राहू शकते! हेच कारण आहे की, हिदू, मुस्लिम आणि शीख वगैरे लोकांत सचोटी, न्याय आणि सत्त्यनिष्ठेतेचे कोणतेही महत्त्व आणि मूल्य उरलेले नाही. सत्यप्रिय, प्रामाणिक आणि सज्जन माणसे त्यांच्या दरम्यान फटफजित बनून राहिले आहेत. वाईट गोष्टींपासून रोखणे आणि चांगल्या गोष्टींचा उपदेश करणे त्यांच्या समाजात एक असहाय अपराध बनले आहे. सत्य आणि न्यायाची गोष्ट ऐकण्यासाठी ते तयार नाहीत. यांच्यापैकी प्रत्येक लोकसमूहाला केवळ असेच लोक पसंत आहेत जे त्यांच्या इच्छा-आकांक्षा व उद्दिष्टांसाठी वकिली करीत असतात. इतरांविरुध्द त्यांच्या जातीयवादाला अधिक भडकवीत असतात आणि त्यांचा योग्य व अयोग्य उद्दिष्टांसाठी लढण्यास तयार असतात. म्हणूनच या लोकसमूहांनी वेचून वेचून आपल्यातील सर्वाधिक वाईट माणसांना निवडले व त्यांना आपले लोक प्रतिनिधी बनविले आहे. त्यांनी आपल्या मोठ्या व्यक्तींपैकी अपराध्यांना हुडकून काढले व त्यांना आपले शासक बनविले. त्यांच्या समाजात जे लोक सर्वाधिक नीतीहिन, सद्सद्विवेक बुध्दीरहित आणि सत्वशून्य होते, ते त्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उभे राहिले व पत्रकारितेच्या मैदानात तेच सर्वांत जास्त लोकप्रिय बनले. मग हे सर्व बिघाडाच्या मार्गावर आपापल्या बिघडलेल्या लोकसमूहाला घेऊन भरधाव पळत सुटले. त्यांनी परस्परांविरुध्द असलेल्या लोकेच्छांना एकाच्या न्यायबिदूवर एकत्र आणून सलोखा निर्माण करण्याऐवजी त्यांना इतके ताणून धरले की, सरतेशेवटी त्यांनी संघर्षबिदू गाठला. त्यांनी आर्थिक आणि राजनैतिक उद्दिष्टांच्या ओढाताणीत क्रोध, द्वेष आणि शत्रुत्वाचे विष कालवले व त्यात दिन प्रतिदिन वाढ करीत गेले. त्यांनी वर्षानुवर्षे आपल्या प्रभावाखाली असलेल्या लोकसमूहांना प्रक्षोभक भाषणे व लिखाणाचे इंजक्शन देऊन इथपावेतो भडकविले की, भावनेच्या आहारी जाऊन ते कुत्र्या व लांडग्याप्रमाणे लढण्यासाठी परस्परांविरुध्द उभे ठाकले. त्यांनी सामान्य व असामान्यजनांच्या मनांना घाण भावनेचे संडास व अंधशत्रुत्वाचे अग्निकुंड बनवून टाकले.

विषारी पीक

आता जे वादळ आपल्या डोळ्यांसमोर तांडव करीत आहे, काही तात्पुरत्या आणि हंगामी स्वरूपाचे नाही. ते अकस्मात प्रकट झाले नाही, तर हे आमच्यात प्रदीर्घकाळापासून बिघाडाची जी अगणित कारणे कार्यरत होती त्याचीच परिणती आहे. केवळ एकदाच ही परिणती प्रकट होऊन प्रकरण संपेल असे मुळीच नाही, तर जोपर्यत ती कारणे निष्फळ ठरत नाहीत तोपर्यत ती दिवसेंदिवस वाढत्या स्वरूपातच प्रकट होत जाणार आहेत. वर्षानुवर्षे बी-बियाणे व खतपाणी दिल्यानंतर आता परिपक्व होऊन तयार झालेले असे हे एक विषारी पीक आहे. आपणास व आपल्या भावी पिढ्यांना ते किती काळापर्यंत कापत जावे लागणार आहे कोण जाणे.

उपस्थित बंधुनो! शांतचित्ताने थोडा विचार करा, ऐन अशा वेळी जेव्हा की, ईश्वरीय कायद्यानुसार या देशाच्या भाग्याची नवीन व्यवस्था दृष्टीक्षेपात आहे. अशा स्थितीत आम्ही सृष्टीनिर्मात्यासमोर आपल्या कोणत्या प्रकारच्या लायकी व पात्रतेचा पुरावा प्रस्तुत करीत आहोत? अपेक्षित होते की, देशाची व्यवस्था त्याने आमच्या सुपूर्द केली तर आम्ही तिच्यात न्याय प्रस्थापित करू. तिला सहानुभूती, सहकार्य आणि कृपेचे माहेरघर बनवू. तिची साधने आणि संपत्ती स्वतःच्या तसेच मानवजातीच्या कल्याणासाठी खर्च करू आणि वाईट गोष्टीना दाबून टाकू. हे सर्व आम्ही आपल्या आचरणाने सिध्द करून दाखविले असते.

परंतु याउलट आम्ही ईश्वराला दाखवित आहोत की, आम्ही इतके विध्वंसक, उपद्रवकारी आणि अत्याचारी आहोत. ही जमीन तू आमच्या सुपूर्द केली, तिला आम्ही भस्मसात करू, मानवी जिवाची किमत माशी व डासापेक्षाही कमी करू, स्त्रियांची अब्रू घेऊ, लहान लहान मुलांची शिकार करू, वयोवृध्द, रूग्ण आणि जखमीवरसुध्दा दया करणार नाही. उपासनास्थळांना आणि धार्मिक ग्रंथांनासुध्दा आपल्या मनोवासनेच्या घाणीने लिप्त करू. ज्या जमिनीला मानवजातीद्वारे तू आबाद केले आहेस, आम्ही मृतदेह आणि जळालेल्या इमारतींनी तिची शोभा वाढवू. आपली ही सेवा, हे गुण आणि या कारवाया आपण ईश्वरापुढे प्रस्तुत केल्या आहेत. यावर ईश्वराच्या दृष्टीत त्याच्या जमिनीच्या व्यवस्थेसाठी सर्वाधिक पात्र आपण ठरू? खरोखरच आपली सद्सद्विवेक बुध्दी अशी ग्वाही देते का? अशा प्रकारचे कुकृत्यें पाहून ईश्वर असेच म्हणेल का की शब्बास! हे माझ्या पूर्वीच्या माळ्याच्या वंशजांनो! तुम्हीच सर्वापेक्षा जास्त माझ्या बागेची राखण करण्यासाठी पात्र आहात! अशाच प्रकारच्या विनाशासाठी असेच उजाडण्यासाठी व बिघाडासाठी, अशाच प्रकारच्या नासाडी व विध्वंसासाठी. अशीच घाण व दुर्गंधी माजविण्यासाठी तर मी ही बाग लावली होती. आता घ्या ह्या बागेला आपल्या हातात आणि करा तीचे खूप वाटोळे!!

आशेचा किरण

आपण स्वतः व स्वदेशाच्या भविष्यासंबंधी निराश व्हावेत म्हणून मी या गोष्टी सांगत आहे असे मुळीच नाही. मी स्वतःही निराश नाही व इतरांनाही निराश करू इच्छित नाही. माझ्या सांगण्याचा मूळ उद्देश असा की, कित्येक शतकांनंतर एखाद्या देशाचे भाग्य बदलण्याची संधी त्या देशवासीयांना विश्वाचा स्वामी देत असतो. हिदुस्तानवासी अशी सुवर्णसंधी अज्ञान आणि आपल्या मूर्खतेपायी वाया घालवीत आहेत. ही वेळ तर अशी होती की, आपले उच्च गुण आणि अधिक चांगली योग्यता सिध्द करणारे पुरावे प्रस्तुत करण्यात आम्ही चढाओढ केली असती. ईश्वराच्या दृष्टीत देशाच्या व्यवस्थेसाठी पात्र ठरलो असतो. परंतु आमच्यादरम्यान चढाओढ याबाबतीत लागली आहे की, कोण जास्त विध्वंसक, जास्त क्रूर आणि अधिक अत्याचारी आहे, जेणेकरून ईश्वराच्या धिक्काराला सर्वांत जास्त तोच पात्र ठरावा. ही लक्षणे स्वातंत्र्य, प्रगती आणि मान उंच करणारी नाहीत. अशाने तर पुन्हा एका प्रदीर्घ कालावधीसाठी गुलामी आणि अपमानतेचा निर्णय एखाद्या वेळेस आमच्या वाट्यात लिहिला जाऊ शकतो अशी भीती आहे. म्हणून बुध्दी व विवेक असलेल्या लोकांनी विद्यमान परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्याची ही काळाची गरज आहे.

याप्रसंगी आपल्या मनात असा प्रश्न उद्भवणे साहजिकच आहे की, सुधारणा घडवून आणण्याचा मार्ग कोणता? याचे उत्तर देण्यासाठी मी हजर आहे. या अंधकारात आमच्यासाठी आशेचा एकच किरण आहे. तो म्हणजे आमची संपूर्ण लोकवस्ती बिघडली आहे असे नाही तर त्यापैकी ४ ते ५ टक्के लोक जरूर असे आहेत जे सर्वत्र माजलेल्या अनैतिकतेपासून सुरक्षित आहेत. हेच ते भांडवल आहे ज्याला सुधारणेच्या प्रारंभासाठी उपयोगात आणले जाऊ शकते. सुधारणा घडवून आणण्याच्या मार्गातील पहिले काम म्हणजे सदरहू सदाचारी अंशाला वेगळे करून संघटित केले जावे. आमच्या येथे दुराचारी संघटित असून पध्दतशीरपणे आपले काम करीत आहेत. परंतु सदाचारी मात्र संघटित नाही. खरे तर हेच आमच्या दुर्दैवाचे मोठे कारण आहे.
चांगली माणसे आहेत खरी, परंतु ती असंघटित आहेत. त्यांच्या परस्परात कोणत्याही प्रकारचे साहाय्य आणि सहकार्य नाही. त्यांचा कोणताही ठरलेला कार्यक्रम नाही, त्यांच्यात एकवाक्यता नाही. याच गोष्टीमुळे ते प्रभावहीन ठरले आहेत. आपल्या सभोवती चाललेल्या वाईट गोष्टी पाहून ईश्वराच्या एखाद्या दासाची कधी किकाळीही फुटते, परंतु तेव्हा कोणाकडूनही त्याच्या समर्थनार्थ कोणताही आवाज उठत नाही, तेव्हा तो निराश होऊन बसतो. कधी एखाद्या व्यक्तीकडून सत्य आणि न्यायाची गोष्ट जाहीरपणे उच्चारली जाते, परंतु संघटित दुराचारी जबरदस्तीने त्या व्यक्तीचे तोंड बंद करतात व सत्यप्रिय लोक केवळ जागच्या जागी गुपचुपपणे त्यांची प्रशंसा करीत राहतात. कधी एखाद्या व्यक्तीला मानवतेचा खून होताना पाहून राहवले जात नसल्याने तो निषेध व्यक्त करतो, परंतु अत्याचारी संघटितपणे तिला दाबून टाकतात. त्या व्यक्तीचा असा शेवट पाहून ज्यांची सद्सद्विवेकबुध्दी अद्याप काही अंशी जिवंत आहे अशा लोकांचेदेखील धैर्य खचते. ही परिस्थिती आता संपुष्टात आली पाहिजे.

आमचा देश प्रकोपात सापडावा व त्या प्रकोपात भले आणि वाईट सर्वच लोक भरडले जावेत, असे जर आम्ही इच्छित नसलो तर आमच्यातील जे सदाचरणी घटक आहेत त्यांनी आता एकत्र आलेच पाहिजे, ते संघटित व्हावेत आणि संघटित शक्तीनिशी देशाला विनाशाकडे शीघ्रतेने नेत असलेल्या उपद्रवाचा मुकाबला करण्याचा प्रयत्न संघटितपणे व प्रभावीपणे केला गेला पाहिजे.

सकृद्दर्शनी सध्या हा सदाचरणी घटक अत्यंत निराशजनक अल्पसंख्येत आहे म्हणून घाबरण्याचे काहीच कारण नाही. हेच अल्पसे लोक संघटित होऊन, पूर्णपणे सचोटी, न्याय, सत्यनिष्ठता, बुद्धिमत्ता आणि प्रामाणिकपणावर भक्कमपणे त्यांचे व्यक्तिगत आणि सामूहिक वर्तन टिकून राहील. जीवनाच्या समस्येवर अधिक चांगला उपाय आणि जगाचे व्यवहार योग्य पध्दतीने चालविण्यासाठी अधिक चांगला कार्यक्रमही त्यांच्याजवळ असेल. तर विश्वास बाळगा की अशा संघटित सदाचारींच्या तुलनेत संघटित दुराचारी पराभूत झाल्याशिवाय राहणार नाही. मानवी स्वभाव दुष्टाईप्रिय नाही. त्याची फसवणूक जरूर केली जाऊ शकते आणि मोठ्या प्रमाणात मानवी स्वभावाला विकृतही केले जाऊ शकते. परंतु सृजनकर्त्याने भलाईची कदर करण्याचा जो गुणधर्म मनुष्यात ठेवला आहे तो नष्ट केला जाऊ शकत नाही. मानवजातीत असे लोक थोडेच असतात ज्यांना दुराचाराचीच आवड असते आणि तिचे ध्वजवाहक बनून ते उभे राहतात. तसेच असले लोकही थोडेच असतात ज्यांना सदाचाराची आसक्ती असते व तिच्या प्रस्थापनेसाठी ते झटत असतात.

या दोन्ही प्रकारच्या गटांदरम्यान सामान्यजन सदाचारी व दुराचारी दोन्हीची संमिश्र प्रवृत्ती बाळगतात. ते दुराचाराचे लोभीही नसतात आणि सदाचाराची त्यांना असामान्य गोडीही नसते. त्यांचा कौल कोणाकडे जातो हे पूर्णपणे या गोष्टीवर अवलंबून असते की, सदाचारी व दुराचारींच्या ध्वजवाहकांपैकी कोण पुढाकार घेऊन त्यांना आपल्या मार्गावर ओढून आणतो. सदाचारीचे ध्वजवाहक जर मैदानात आले नाहीत व सामान्यजनांना सदाचारीच्या मार्गावर नेण्याचा त्यांनी प्रयत्नच केला नाही, तर अपरिहार्यपणे मैदान दुराचारीच्या ध्वजवाहकांच्या हाती येईल. ते सामान्यजनांना आपल्या मार्गावर ओढून नेतील.

परंतु जर सदाचाराचे ध्वजवाहकदेखील मैदानात असतील व सुधारणा घडवून आणण्याचा यथायोग्य आणि पुरेपूर प्रयत्नही करतील तर दुराचाराच्या ध्वजवाहकांचा प्रभाव सामान्यजनांवर जास्त काळ टिकू शकत नाही. कारण उभय पक्षांची लढत सरतेशेवटी नैतिकतेच्या मैदानात होईल. त्या मैदानात दुष्ट लोक कधीही भल्या लोकांचा पराभव करू शकत नाहीत.

सत्याविरुध्द असत्याने, ईमानदारीच्या विरुध्द बेईमानीने आणि सदाचाराविरुध्द दुराचाराने कितीही जोर लावले तरी कोणत्याही परिस्थितीत अंतिम विजय सत्य ईमानदारी आणि सदाचाराचाच होईल. सदाचाराची गोडी आणि दुराचाराची कटुता चाखल्यानंतरसुध्दा गोडीपेक्षा कटुता अधिक चांगली आहे, असा निर्णय देण्याइतपत जग संवेदनाशून्य नाही.

सुधारणा घडवून आणण्यासाठी सत्यनिष्ठ माणसांच्या संघटनेबरोबरच दुसरी आवश्यक गोष्ट म्हणजे रचना आणि बिघाडासंबंधीची अगदी स्पष्ट कल्पना आमच्या दृष्टीसमोर असणे जरूरीचे होय. आम्हाला चांगल्या प्रकारे हे माहीत असावे की, बिघाड काय आहे, जेणेकरून ते दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि रचना काय आहे, जेणेकरून ती अमलात आणण्यासाठी पूर्णपणे जोर लावता येईल. सविस्तरपणे सांगणे या वेळी शक्य नाही, अत्यंत थोडक्यात मी आपल्या दृष्टीसमोर या दोन्हीचे एक चित्र उभे करतो.

संबंधित लेख

  • जातीय उपद्रवाची तत्कालीक कारणे

    जनसामान्यांच्या मानसिकतेचा विचार केल्यास त्यांच्यात दंगल करण्याची किवा रक्तपात करण्याची इच्छा आढळून येत नाही. त्यांचा स्थायीभावच अशा प्रकारच्या पाशवीपणाला नकार देत असतो. उपद्रव निर्माण करण्यात त्यांना गोडी वाटत नाही. उलट उपद्रवाबद्दल त्यांच्या मनात भयाची भावना आढळते. दुसरीकडे उच्च व समंजस वर्गालाही जातीय उपद्रवाबद्दल घृणा वाटत असते. जनसाधारण अतिउच्च समंजस वर्ग, या दोन्ही प्रकारच्या माणसांना जातीय उपद्रवाची इच्छा नसते,
  • इस्लामचा प्रथम स्तंभ एकेश्वरत्व आणि प्रेषित्व

    एकेश्वरत्वाला आणि प्रेषित्वाला मान्यता तोंडी स्वरूपात दिली जाते. ते त्यांच्या शाब्दिक अर्थापेक्षा जास्त काही सूचित करते. ते तोंडी एकेश्वरत्वाचे आणि प्रेषित्वाचे अभिवचन सर्व प्रेषितांना, ईशग्रंथांना, दूतांना तसेच पारलौकिक जीवन आणि नशीब या सर्वांना मान्यता देते. थोडक्यात, हे इस्लामच्या संपूर्ण श्रध्देलाच मान्यता आहे. कारण जो प्रेषित मुहम्मद (स) यांचे प्रेषित्व मान्य करतो त्याच क्षणी तो या सर्व अदृश्य सत्यतेलासुध्दा मान्य करतो की ज्यांना प्रेषितांनी सर्वांपर्यंत पोहचविले आहेत.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]