Islam Darshan

सदाचाराचा अर्थ व्यापक आहे

Published : Saturday, Feb 13, 2016

प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितली आहे की, धर्मावरील दृढश्रद्धा व सदाचारच श्रेष्ठत्वाचा मूळपाया आहे. महान अल्लाह तेच पाहतो. सदाचाराचा अर्थ फार व्यापक आहे. त्यात अल्लाहचा खरा परिचय, त्याच्या आज्ञांचे पालन, त्याच्या सेवकांचे हक्क देणे, चांगल्या गोष्टी रूजविणे व वाईट गोष्टींचा नायनाट करणेविषयी प्रयत्न करण्याचा सुद्धा समावेश आहे.

काही हदीस (पैगंबरांचे वचन) मध्ये हे सर्व पैलू उघड करून स्पष्ट केले आहेत. दुर्रत बिन्ते अबी लहब म्हणतात की प्रेषित मुहम्मद (स) मिबर (धार्मिक आसन) वर होते की एका व्यक्तीने त्यांना विचारले, की सर्वात चांगला मनुष्य कोण आहे? ते म्हणाले,

‘‘माणसात सर्वात अधिक चांगला तो आहे, जो त्यांच्यापैकी सर्वात जास्त अल्लाहचा ग्रंथ वाचणारा, सर्वात जास्त आदरणीय व अल्लाहला भिणारा, सर्वात जास्त चांगल्या गोष्टींची आज्ञा करणारा आणि वाईट गोष्टींची मनाई करणारा आणि सर्वात जास्त संबंध जोडणारा असेल.’’ (मसनद, अहमद)

हे आहेत ते उच्चकोटीचे गुण, जे माणसाला सन्मान व प्रतिष्ठेचा अधिकारी बनवितात. प्रेषित मुहम्मद (स) जवळ त्यांचाच मान व किमत होती. माननीय आयेशा (र) म्हणतात की सदाचारा व्यतिरिक्त जगातील कोणतीच गोष्ट त्यांच्या (प्रेषित मुहम्मद (स) यांच्या नजरेला पसंत पडत नव्हती.

‘‘प्रेषित मुहम्मद (स) कधीही जगाची एखादी वस्तू अथवा एखाद्या माणसाला पाहून आश्चर्य व्यक्त करीत नसत. अपवाद असा की तो मनुष्य सदाचारी असावा.’’ (मसनद अहमद)

अंततः
अशा प्रकारे इस्लाम माणसात हा विश्वास निर्माण करतो की सर्वच्या सर्व माणसे अल्लाहचे सेवक आणि त्याचे गुलाम आहेत. ते एका कुटूंबाचे सदस्य आहेत. त्यांनी मिळून मिसळून अल्लाहची उपासना करण्याचे कर्तव्य पार पाडावयाचे आहे. ते एक आहेत आणि एकाच कामासाठी निर्माण केले गेले आहेत. अल्लाहच्या दृष्टीने कोणीही नीच अथवा उच्चकुलीन नाही. सर्वांची स्थिती एकसमान आहे. माणसांच्या दरम्यान भाषा, रंग जात व देशाचे जे भेद आढळतात ते अवास्तविक भेद आहेत जे काही लहान लहान कारणांमुळे उद्भवतात. अंतिम दिनी सम्मानित तो असेल जो अल्लाहची आज्ञा पाळणार आहे. ज्यात सदाचार आढळतो आणि ज्याची कृत्ये चांगली आहेत. जो या गुणांपासून वंचित असेल त्याला अल्लाहच्या कोपापासून नात्याचा कोणता हुद्दा व पद वाचवू शकेल आणि ना उच्चकुलीनता. त्याच्यासाठी अपमानच अपमान असेल. हा विश्वास उन्नती व अवनतीच्या सर्व खोट्या भेदांना उखडून टाकतो आणि सर्व माणसे आपला फरक विसरून एका रांगेत उभे राहतात. जगातील विभिन्न आणि आपापसात युद्ध करणाऱ्या जाती व जमातींना केवळ याच आधारावर एकत्र आणले जाऊ शकते. याशिवाय त्याच्या ऐक्याचा अन्य कोणताही मार्ग नाही. काय जग यासाठी तयार आहे? भविष्यच या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल.

संबंधित लेख

  • मुस्लिम पर्सनल लॉशी संबंधित प्रमाणित तथ्ये

    सर्वात पहिली वस्तुस्थिती ही आहे की मुस्लिमांचे कौंटुबिक जीवन आणि दुसर्या व्यक्तिगत बाबीसंबंधी पवित्र कुरआन व हदीस मध्ये उपदेश, मार्गदर्शन आणि आदेश अस्तित्वात आहेत, इतकेच नव्हे तर ते परिपूर्ण व्याख्यानिशी उपलब्ध आहेत म्हणून पवित्र कुरआन आणि हदीस यांची पृष्ठे उलटत जावीत आणि या उपदेश, मार्गदर्शन आणि आदेशांचे व्यवस्थित अध्ययन करित जावे. निकाह(विवाह) महर(नवर्या मुलाकडून नवरी मुलीला दिली जाणारी रक्कम किवा वस्तू), नफका(पत्नी व मुलासाठी अन्नवस्त्र), तलाक(पतीने पत्नीला दिलेला घटस्फोट), खुलअ(पत्नीने पतीला दिलेला घटस्फोट), इद्दत(घटस्फोटा आधीची मुदत), विरासत(वारसा), वसीअत(वारसापत्र, मृत्यूपत्र), इला, नसब, वक्फ, हिबा इत्यादि समस्यांपैकी एकही समस्या अशी नाही ज्यासंबंधी चर्चा केली नाही, आदेश दिले नाहीत, मूल्ये आणि कायदा निश्चित केला नाही.
  • इस्लामी शक्तीचा मक्केवर विजय

    हुदैबियाच्या समझोत्यामुळे निर्माण झालेल्या अनुकूल वातावरणाचा पूर्णतः लाभ उचलत प्रेषित मुहम्मद (स) यांनी ‘मदीना’ या इस्लामी सत्ताकेंद्रास अत्याचार्यांच्या उपद्रवापासून मुक्त केले, तर दुसरीकडे उत्तरेत ज्युडिशियांच्या कटकारस्थानांची सर्व केंद्रे उद्ध्वस्त केली. तिसरे कार्य असे केले की, छोट्याछोट्या कबिल्यांच्या उपद्रवी आणि आंतकवादी कारवायांवर अंकुश ठेवून इस्लामी शासनाची दूरपर्यंत धाक पसरली आणि खंदकच्या युद्धानंतर इस्लामी शासनाचे अगदी निर्विवाद वर्चस्व स्थापन झाले. सर्वांना हे कळून चुकले की, सत्य आणि न्यायाची ही नवीन शक्ती क्षणभंगुर नसून स्थायी स्वरुपाची आहे.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]