Islam Darshan

तर या पापांना आता वाईट सुद्धा समजले जात नाही.

Published : Thursday, Mar 03, 2016

ज्या नैतिक वाईट गोष्टींना व्यक्तिगत जीवनात लोक वाईट समजतात, त्यांना सामुहिक बाबतीत अवलंबण्यास संकोच करीत नाहीत, तर या पापांना आता वाईटसुद्धा समजले जात नाही. उदा. विजेची चोरी आता शहरांत सर्वत्र आहे. टॅक्सच्या चोरीसाठी अगणित कारणे प्रचलित झालेले आहेत. सरकारच्या विभिन्न योजनांसाठी ज्या रकमा मंजूर करण्यात येतात, त्यांचा मोठा भाग नोकरशाहीच्या खिशात जातो.

माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांनी आपल्या एका भाषणात सांगितले होते की सरकार जर एक रुपया मंजूर करीत असेल तर १५ पैसेच जनतेपर्यंत पोहचतात. देशाच्या सेवेचे दावेदार नेता तर देशाच्या धनावर आपला अधिकार समजतात.

जिथपर्यंत नैतिकमूल्यांचा संबंध आहे, त्यांची परिस्थिती आणखीही वाईट आहे. व्यवहारात धोका आणि फसवणूक, खाद्य पदार्थांमध्ये भेसळ, कमी मोजणे आणि तोलणे, उत्तरदायित्वाच्या जाणीवेपासून आणि कर्तव्य पालनापासून वाचणे, खोटे, धोकेबाजी वर्तमान भारतीय समाजात वाईट प्रकारे प्रचलित आहे. हे सर्व पाप मानव समाजात उपद्रव निर्माण करतात. यामुळे जनता आणि विशिष्टजन सर्वच त्रस्त आहेत.

कायद्याचे उल्लंघन

या नैतिक संकटाने असे वातावरण उत्पन्न करून टाकले आहे की ज्यामध्ये नैतिक गुणांचा अवलंब करणे खूप कठीण झालेले आहे. ईमानदारीवर चालणे कठीण झालेले आहे आणि खोटारडेपणा अर्थात बेईमानी सोपे झाले आहे. परिणामजनक कायद्याचे पालन सुरक्षा प्रदान करीत नाही. तर त्याच्या उल्लंघनात सुरक्षितता आहे. शांतीप्रिय नागरिक महत्त्वहीन आहे आणि बाहूबल आणि अपराधिक प्रवृत्तीची व्यक्ती सन्माननीय! जर तुम्ही धोखाधडी करण्यात तरबेज आहात तर संपत्ती आणि सत्ता तुमचे पाय चाटतील, परंतु जर तुम्ही सरळ आणि स्वच्छ पद्धतीने व्यापार करु इच्छित असाल तर पूर्ण जीवन अभावग्रस्त राहाल.

नैतिक बिघाडाचा उपाय

या नैतिक बिघाडाने प्रत्येक निष्ठावान भारतीय त्रस्त आहे. यांच्या प्रभावी उपायाचे विभिन्न प्रकार सांगितले जातात, ज्यांच्यामध्ये सर्वांत जास्त दोन प्रकार खूप प्रसिद्ध आहेत. एक हा की मानव स्वभावाच्या दृष्टीने लालची आणि स्वार्थी आहे. त्याच्या नष्टतेपासून वाचण्यासाठी कायद्याची सहाय्यता पाहिजे आणि असा उपाय अवलंबीला पाहीजे ज्याच्या भयाने तो बिघाडापासून वाचून राहील. या पध्दतीची सर्वांत मोठी कमतरता ही आहे की स्वतः कायदा लागू करणारे तर माणसे असतात ज्यांची विचासरणी वाईट असेल तर त्यांच्यावर तो कायदा लागू केला जातो, त्याचा वाईट परिणाम त्यांच्यावर होतो. अशा नैतिक दोषांचा उपाय त्याच वेळेस आणि त्याच स्थितीमध्ये संभव आहे जेव्हा हृदय आणि बुध्दी यांचा सुधार केला जाऊ शकेल. हृदय व मन परिवर्तन केले जाईल.

दुसरे प्रचलित समाधान आहे धर्म आणि धर्माच्या नैतिक शिकवणुकी, परंतु बरेच धर्म आध्यात्मिकता आणि सामूहिक व व्यक्तिगत नैतिक गुणांना एकमेकांपासून अगदी वेगळे ठेवतात. काही धर्म असे आहेत, ज्यांच्यात आध्यात्मिकता आणि आत्मिक शुध्दीचे एकमात्र साधन संन्यास आहे. जितके अधिक आध्यात्मिक चरणांना आपण पार करत जाल, तितके अधिक आपण सामान्य आणि जीवनाच्या बाबींपासून वेगळे होत जाल. यांच्यामध्ये काही असे आहेत जे नैतिकतेला सीमित अर्थांमध्ये घेतात. जसे ख्रिस्तीजवळ दया, सहिष्णुता आणि स्नेहच मूलतः नैतिक मूल्य आहेत. सामाजिक नैतिकतेच्या शिकवणीला कोणतेही स्थान नाही. यासाठी ती सामाजिक जीवनाच्या बाबतीत कोणतेही निर्देश देत नाही. अहिसेची शिक्षा देणारे धर्म बौध्दमत आणि जैनमत सामाजिक नैतिकतेला आध्यात्मिक जीवनापासून पृथक ठेवत असतात. याचे कारण हे आहे की यांच्याजवळसुद्धा आध्यात्मिक पराकाष्ठा सांसारिक जीवनाचा त्याग आहे.

नैतिक बिघाडाच्या या सर्वांगीण संकटात आज प्रत्येक नागरिक जो परंपरागत विद्वेष तथा अज्ञानतेच्या दुराग्रहात लिप्त नाही तो एक अशा वैचारिक आणि व्यावहारिक व्यवस्थेच्या शोधात आहे जी यांचे समाधान करू शकेल आणि संसारवाद आणि स्वार्थवादाचे मानसिकतेवर नियंत्रण आणण्यास मानवाची सहाय्यता करू शकेल. सत्य आणि न्यायाचे केवळ भ्रामक शब्द आणि घोषणांना प्राधान्य नाही तर या बाबतीत व्यापक मार्गदर्शनसुद्धा द्यावे. तो धर्म आणि आध्यात्मिकतेला विचित्र कर्मकांडांचा आणि विचारांचा संग्रह न मानो, तर त्यांना वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाच्या सुधाराचा माध्यम बनवावे. नैतिक मूल्यांना मात्र व्यक्तिगत आणि खाजगी जीवनापर्यंत न राहाता, तो समाज निर्माणाचा आधार बनावा.

इस्लामची शिकवण

इस्लाम एक अशीच वैचारिक आणि व्यावहारिक व्यवस्था आहे. इथपावेतो की उपासनेलासुद्धा नैतिकतेशी जोडतो. जास्त सत्य गोष्ट ही आहे की याच्या निकट ईशप्रसन्नतेचा मार्गसुध्दा नैतिक मूल्यांच्या निष्ठापूर्ण आचरणावरुन जवळून जात असतो.

तो चरित्र आणि आचरणाला मोमिन(अल्लाहचा अतिशय आज्ञाधारक व ईशभिरू दास) च्या जीवनात केंद्रीय दर्जा देत असतो. तो संसारत्यागाऐवजी सामाजिक जीवन निर्माण आणि सुधाराला सत्य धर्मउद्देश घोषित करीत असतो. त्याने ईशदूत प्रेषित मुहम्मद(स.) यांचे सद्गुण ज्या प्रकारे कथित केले आहेत, ते फार महत्त्वपूर्ण आहेत. कुरआन स्पष्टोक्ती आहे,

‘‘निसंशय तुम्ही नैतिकतेच्या उच्च स्तरावर आहात.’’(कुरआन ६८/४)

एका दुसर्या ठिकाणी म्हटले गेले आहे,
‘‘हे पैगम्बर(स.) ही अल्लाहची मोठी कृपा आहे की तुम्ही या लोकांसाठी फार कोमल स्वभावी ठरला आहात. एरवी जर तुम्ही एखादे वेळी तापट स्वभावी व पाषाणहृदयी असता तर हे सर्वजण तुमच्यापासून दूर गेले. यांचे अपराध माफ करा, यांच्यासाठी क्षमेची प्रार्थना करा, आणि धर्मकार्यात यांनासुद्धा सल्लामसलतीत सहभागी ठेवा. मग जेव्हा एखाद्यामतावर तुमचा निश्चय दृढ होईल तेव्हा अल्लाहवर भरोसा करा, अल्लाहला ते लोक प्रिय आहेत जे त्याच्या भरोशावरच काम करतात.’’(कुरआन ३/१५९)

या आयतमध्ये प्रेषित मुहम्मद(स.) अल्लाहची त्यावर दया व कृपा असो यांच्या ईशदुतत्वाच्या दर्जास कशा प्रकारे जोडले गेले आहे, हे विशेष लक्ष देण्यायोग्य आहे. एका अन्य ठिकाणी प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या नैतिक गुणांना या प्रकारे कथन गेले आहे,

‘‘तुम्हा लोकांजवळ एक पैगंबर आला आहे. जो खुद्द तुम्हापैकीच आहे. तुम्हाला नुकसान पोहचणे त्याला जड वाटते. तुमच्या कल्याणाचा तो लोभी आहे. ईमानवाल्यांसाठी तो प्रेमळ आणि दयाळू आहे.’’(कुरआन १२८)

संबंधित लेख

  • इस्लाम व विचारस्वातंत्र्य

    युरोपवासी लोकांसमोर चर्चने ख्रिश्चन धर्माचे जे विचार मांडले, वैज्ञानिक तथ्यांना खोटे ठरविण्याचा जो प्रयत्न केला व विज्ञान शास्त्राचा जो छळ केला; तसेच खोट्या व अंधविश्वासरुपी अंधकाराला ईशधर्म म्हणून जे नाव दिले, या सर्व गोष्टीचा एकंदर परिणाम असा झाला की स्वतंत्र विचारांचे युरोपतील विचारवंत निरीश्वरवादाच्या ओढ्यात जाऊन पडले. कारण त्यांच्या पुढे परस्परांविरुद्ध असलेले जे दोन दृष्टिकोन होते. त्यापैकी एकाचा स्वीकार करण्याखेरीज त्यांना कसलाही मार्ग उरला नव्हता.
  • इस्लामी न्याय व्यवस्था

    न्याय म्हणजे काय हे सर्वांनाच माहीत आहे. अन्यायग्रस्ताला वस्तुतः न्यायाची खरी व्याख्या ताबडतोब समजते. परिभाषा करायची असेल तर दोन वस्तु अगदी तंतोतंत समान प्रमाणात वाटणे म्हणजे न्याय, अर्थात अफरातफरीमध्ये समतोल कायम करणे म्हणजेच कायद्याच्या भाषेत न्याय होय. दुसर्या भाषेत असे की एखाद्या प्रकरणात सत्यानुसार निवाडा करण्यात यावा.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]