Islam Darshan

सामाजिक नैतिकता

Published : Saturday, Feb 13, 2016

सामाजिक नैतिकतेला विभिन्न रूपांमध्ये धार्मिक जीवनाची ओळख आणि उपासनेचा एक उद्देश सांगितले गेले आहे. याला मोमिन व्यक्तींची विशिष्टता सांगून कुरआनने हे स्पष्ट करून टाकले आहे की ईश्वराने सत्य धर्म(इस्लाम) अवतरित केला आहे की मनुष्याने त्यावर आचरण करून एकीकडे उपासनेचा हक्क अदा करावा आणि दुसरीकडे मानवाच्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनास सुधारले जाऊ शकेल. काही ठिकाणांवर तर मानवांमध्ये सत्य व न्यायाची स्थापना आणि सद्व्यवहाराला या धर्मास अवतरित करण्याचा उद्देश घोषित केला गेला आहे.

कुरआन अवतरणाच्या प्रारंभिक काळात प्रेषित मुहम्मद(स.) यांना आदेश दिला की आपल्या पालनकर्त्यांच्या कृतज्ञतेचा हक्क अदा करा. कुरआनमध्ये आहे.

‘‘अनाथावर सक्ती करू नका आणि याचकाला(मागणार्याला झिडकारू नका.)(कुरआन ९३/९)

ईशदूतत्वाच्या मिशनपूर्तीसाठी जो आदेश दिला गेला आहे, त्यामध्ये विशुद्ध ईशपरायणतापूर्ण सामाजिक नैतिकतेचे सामंजस्य या प्रकारे स्थापित केले गेले आहे की यापेक्षा उत्कृष्ट पध्दत शक्य नव्हती. कुरआनमध्ये आहे,
‘‘हे वेष्टून पहुडणार्या, उठा आणि खबरदार करा आणि आपल्या रबच्या महत्तेची घोषणा करा आणि आपले कपडे शुचिर्भूत ठेवा आणि घाणीपासून दूर राहा. आणि उपकार दाखवू नका. अधिक प्राप्त करण्यासाठी आणि आपल्या रबसाठी धैर्य राखा.’’(कुरआन ७४/१ ते ६)

परंतु यापासून बाह्य स्वच्छता नीटनेटकेपणासुद्धा अपेक्षित आहे. उपकार जतविण्याससुध्दा इन्कार केला गेला आहे. यासाठी की हा एक दोष आहे. नैतिक पावनता आणि नैतिक अशुध्दतेला ईशदूत(प्रेषितां) च्या खर्या मिशनास अशा प्रकारे जोडले गेले आहे की जणू ते एकमेकांचे अतुट अंग आहेत.

सत्य धर्माचा उद्देश न्याय स्थापना सांगितला गेला आहे. सांगितलेले आहे की आध्यात्मिकता लौकिक जीवनत्यागाचे नाव नाही. तर हे आहे की ईशप्रसन्नतेसाठी न्याय स्थापनेचा अथक प्रयत्न केला जावा.

‘‘आम्ही आपल्या प्रेषितांना अगदी स्पष्ट निशाण्या व सूचनेसहित पाठविले, आणि त्यांच्याबरोबर ग्रंथ आणि संतुलन उतरविले जेणेकरून लोकांनी न्यायाधिष्ठित व्हावे.’’(कुरआन ५७/२५)

एका सारगर्भित आयतीत केवळ न्यायच नाही, तर अन्य नैतिक गुणांचासुद्धा आदेश दिला गेला आहे.
‘‘आणि अल्लाह न्याय आणि भलाईची, नातेवाईकांचे हक्क अदा करण्याची आज्ञा देतो, आणि दुष्कर्म व अश्लीलता आणि जुलूम व अत्याचाराची मनाई करतो, तो तुम्हाला उपदेश करतो. जेणेकरून तुम्ही बोध घ्यावा.’’(कुरआन १६/९०)

एका अन्य वचनात ईशपरायणता आणि न्यायाचे प्रत्यक्ष रूपाने नाते जोडले गेले आहे.
‘‘आणि पहा एका गटाने तुम्हाला इतके भडकवू नये की तुम्हीदेखील त्यांच्या मुकाबल्यात अनुचित अत्याचार करावे. न्यायाने काम घ्या हे ईशपरायणतेहून जास्त उत्कृष्ठ ठरते.’’(कुरआन ५/२)

मोमिन व्यक्तिचे गुण कथन करतेवेळी ईश्वराने कुरआनात अनेक स्थानांवर सामाजिक गुणांना नमाज आणि पालकर्त्यांच्या उपासनेसोबत कथन फर्माविले आहे,

‘‘त्या व्यक्ती आपल्या अमानती आणि आपल्या वचनांचा व करारांचा मान राखतात.’’(कुरआन २३/८)
एका अन्य ठिकाणी हे सांगितले गेले आहे,
‘‘मोमिन तर ते आहेत ज्यांच्या धनामध्ये(संपत्तीत) असहाय्य व वंचित लोकांचा हक्क राहात असतो.’’(कुरआन ५१/१९)

एका ठिकाणी विस्तारपूर्वक ईश्वराने प्रामाणिक दासांचे सद्गुण कथन केले आहेत,
‘‘जो खर्च करतात* तो न फाजील खर्च करतात न कंजुषपणा, जे अल्लाहशिवाय इतर कोणत्याही देवाचा धावा करीत नाही. अल्लाहने निषिध्द ठरविलेल्या कोणत्याही जीवाला हकनाक ठार करीत नाहीत आणि व्यभिचारही करीत नाहीत, हे कृत्य जो कोणी करील तो आपल्या गुन्ह्याचे फळ भोगेल. आणि जे असत्याचे साक्षी बनत नाहीत आणि एखाद्या वायफळ गोष्टीजवळून गेल्यास ते सज्जानाप्रमाणे निघून जातात.’’(कुरआन २५/६७ ते ७२)

सामाजिक नैतिकतेला धर्मपरायण जीवनाचा अभिष्ट गुण ठरवून देण्यासाठी प्रेषित मुहम्मद(स.) यांचे अनेक कथन आहेत. प्रेषितांनी सांगितले,
‘विधवा आणि गरजुंसाठी धावपळ करणारा व्यक्ती त्या व्यक्तीसारखा आहे जो अल्लाहच्या मार्गात जिहाद(धर्मयुध्द) करीत असतो. उल्लेखकर्ता म्हणतो की मला असे आठवते की नबी(स.) यांनी हेसुद्धा फर्माविले होते की तो असा आहे. जो रात्री नमाजमध्ये उभा राहतो आणि ढिला होत नाही, आणि तो त्या व्यक्तीसमान आहे, जो दिवसाचे उपवास(रोजे) सतत ठेवतो.’’(हदीस बुखारी)

इस्लामने अशा प्रकारे धर्मपरायणतेला सामाजिक आणि समष्टीय नैतिकतेचे अंग बनविले आहे म्हणून ईसपरायणता आणि ईश्वराचे भय, स्वर्गाची अपेक्षा शेवटच्या(कयामतीच्या) प्रकोपापासून वाचण्याची अभिलाषा, हे सर्व मानवाला जगाच्या मोहपाशापासून लांब ठेवत असते. या शिकवणुकींचा गुण हा आहे की त्या साध्या आहेत, अवघड नाहीत. मानव स्वभावच्या कमतरतेचा मान ठेवला गेला आहे आणि त्याच्याकडून यथासामर्थ्य आचरण इच्छिले आहे. नैतिक बिघाडाच्या या काळात अशाच वैचारिक आणि व्यावहारिक व्यवस्थेची नितांत गरज आहे. हे ते अमृत आहे, ज्याच्या स्रोतास विद्वेष आणि दुराग्रहाच्या काळोखाने लपवून ठेवले आहे.

संबंधित लेख

  • इस्लाम व प्रतिगामित्व

    इस्लामवर आरोप करणारे काही भ्रमिष्ट लोक असे म्हटल्याचे ऐकण्यात आहे, की इस्लामी जीवनपद्धत आधुनिक युगाच्या गरजांशी व निकडींशी एकरुप नाही. म्हणून वर्तमान युगातील लोकांना इस्लाम स्वीकारार्ह होऊ शकत नाही. इस्लामचे आदेश केवळ गतकाळाकरिताच होते व आता त्यांची उपयुक्तता संपलेली आहे. इतकेच नाही तर प्रगतीच्या मार्गात ते अडथळा होऊन राहिले आहेत, असे त्यांना वाटते ते असे म्हणतात,
  • एखाद्या प्रेषिताला नाकारणे श्रध्दाहीनता आहे

    प्रेषित्वावर विश्वास अर्थहीन होतो जर या श्रध्देत सर्व प्रेषित येत नाहीत. कुरआन अशा लोकांना श्रध्दावंत (मुस्लिम) म्हणत नाही जे काहींना तर प्रेषित मानतात आणि इतर प्रेषितांना नाकारतात. कुरआन स्पष्टोक्ती आहे, ‘‘जे लोक अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांशी द्रोह करतात आणि इच्छितात की अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांच्या दरम्यान भेदभाव करावा आणि म्हणतात, आम्ही काहींना मान्य करू आणि काहींना मानणार नाही, तसेच अश्रध्दा व श्रध्दा यांच्या दरम्यानातून एक मार्ग काढण्याचा निश्चय करतात ते सर्व पक्के अश्रध्दावंत (काफीर) आहेत आणि अशा अश्रध्दावंतांसाठी आम्ही अशी शिक्षा तयार करून ठेवली आहे जी त्यांना अपमानित व तिरस्करणीय करून सोडणारी असेल. याविरूध्द जे लोक अल्लाह आणि त्याच्या सर्व प्रेषितांना मानतील आणि त्यांच्या दरम्यान फरक करणार नाहीत, त्यांना आम्ही अवश्य त्यांचा मोबदला प्रदान करू आणि अल्लाह मोठा क्षमा करणारा व दया करणारा आहे.’’ (कुरआन ४: १५०-१५२)
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]