Islam Darshan

भक्ती गैरसमजुती आणि त्यांची कारणे

Published : Friday, Feb 12, 2016

भक्तीचा खरा आणि व्यापक अर्थ बुध्दीविवेकाच्या भक्कम पायावर तसेच कुरआन आयतींनुसार आणि धार्मिक विद्वानांच्या संशोधनांवर आधारित आहे. परंतु भक्ती म्हणजे फक्त पूजाअर्चा आणि आराधना, उपासना आहे. हा दुसरा दृष्टिकोन आजही प्रचलित आहे. उदा. नमाज, रोजा, हज, जकात इ. आणि याव्यतिरिक्त धर्मकारण हे भक्तीत मोडत नाही. त्यांच्यानुसार धर्माच्या अनेक शाखा आहेत त्यापैकी भक्ती एक शाखा आहे. हा गैरसमज फक्त सर्वसामान्यांच्या मनात घर करून राहिला आहे असे नाही तर विद्वान मंडळीसुध्दा या गैरसमजुतीला बळी पडली आहे. ही शुल्लक बाब आहे म्हणून त्याकडे कानाडोळा करून चालणार नाही. हा गैरसमज कसा पसरला याबद्दल विचार करणे आवश्यक आहे. भक्तीच्या बाबतीत ही घोडचूक कशी समाजात प्रचलित झाली जेव्हा सर्वकाही स्पष्ट केले गेले होते? याच प्रश्नाद्वारे भक्तीबाबतच्या गैरसमजुतीचे खंडन करणे आवश्यक ठरते.

या गैरसमजुतीची कारणे बौध्दिक नसून मानसिक आहेत, ती खालीलप्रमाणे,

१) ही भक्तीची मर्यादित कल्पना प्रचलित धर्मात आणि इस्लाममध्ये लोकप्रिय आहे. भक्ती आणि प्रार्थना सर्व धर्मांत (इस्लामला सोडून) समानार्थी वापरले जातात. यांच्यापैकी अनेकांमध्ये अयोग्य समजले जाते. जसे भक्ती आणि श्रध्देशी संबंधित कृत्य धार्मिक हद्दीपलीकडचे पार पाडले जाणे आहे. या व्यापक संकल्पनेसाठी वर्चस्वासाठीचे गुण हवे आहेत. हे त्या मनासाठी (लोकांसाठी) आवश्यक आहे जे गैरसमजुतींना बळी पडले आहेत. इस्लामी इतिहासात अनेक अशी उदाहरणे आहेत. बौध्दिक आणि विचारवंताच्या जगात इस्लामचे वर्चस्व होते तोपर्यंत इस्लामेतर तत्त्वे त्यात घुसडली गेली नाहीत. जेव्हा ही परिस्थिती बदलून गेली तेव्हा इस्लामचे दरवाजे अनायासे इस्लामेतर (बनावटी) तत्त्वांसाठी खुले झाले. आता अशी स्थिती आहे की अनेकानेक बनावटी तत्त्वांना इस्लामी रंग दिला जात आहे. याचा अत्यंत वाईट प्रकार हा आहे की इस्लामच्या महत्त्वाच्या संकल्पना (परिभाषा) चा अर्थ यापासून अलिप्त राहू शकलेला नाही. ते शब्द आणि परिभाषा सारख्याच आहेत जशा ते अल्लाहने आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दिल्या होत्या. परंतु त्यांचे मूळ अर्थ बदलून गेले आहेत. अशा परिस्थितीत ‘भक्ती’ हा शब्दप्रयोगसुध्दा या बौध्दिक दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून गेला आणि आपला मूळ अर्थ गमावून एक मर्यादित अर्थ धारण करून बसला. हा मर्यादित अर्थ बाहेरून इस्लामच्या या परिभाषेत (भक्ती) प्रवेश करीत झाला आणि मुस्लिमांनी नंतर त्याला मर्यादित अर्थात स्वीकारला.

२) इस्लामचे नमाज, रोजे आणि इतर उपासनापध्दती इतक्या आकर्षक आहेत की लोकांना इतर बाबींबद्दल विसर पडला आणि आपल्या खऱ्या स्वरूपापासून आणि खऱ्या अर्थापासून दूर भरकटत गेले. जर इस्लामी भक्तीचा व्यापक अर्थ घेतला गेला नाही तर या मर्यादित गोष्टींचाच समावेश भक्तीमध्ये कायमस्वरूपी होईल आणि इतर धार्मिक कृत्यांना आणि आदेशांना पूजा, भक्ती बाहेर कायमस्वरूपी ठेवले जाईल. हे असे व्यावहारिकपणे होतच राहील. हीच कारण आहेत भक्तीच्या गैरसमजुतीबद्दलची. याचे बौध्दिक कारण एकसुध्दा नाही.

संबंधित लेख

  • इस्लाम व दहशतवाद

    आपला स्वार्थी हेतू साध्य करण्यासाठी दहशतवादाचा वापर करण्याची पद्धत जुनी आहे. कधी कधी व्यक्तीकडून ते काम झालेले आहे, कधी लोकांच्या समूहाकडून ते झाले आहे, तर कधी कधी सत्ताधीशांकडून व सरकारांकडूनही ते झाले आहे. आधुनिक युगाचा इतिहास हे स्पष्टपणे दर्शवितो की दहशतवादाचा आरंभ युरोपातून झालेला आहे आणि तेथेच त्याला राजकारणाचे साधनही बनविण्यात आले आहे.
  • इस्लामी शासन

    इस्लामी शासनामध्ये हुकूमशहा असत नाहीत. कारण इस्लाम उदंडता, उन्मत्तपणा व हुकूमशाही सहन करण्याविरुद्ध आहे. तसेच तो आपल्याचप्रमाणे असलेल्या इतर माणसावर, अल्लाह व त्याचे प्रेषित मुहम्मद (स) यांच्या इच्छेला सोडून त्यावर आपण निर्माण केलेले कायदे लादण्याचा प्रयत्न करण्याची परवानगी देत नाही. इस्लामी शासनामध्ये, शासक ईश्वर व जनता या दोहोंना जबाबदार असतो. या जबाबदारीच्या कर्तव्याची ही निकड आहे की त्याने माणसामध्ये ईश्वरनिर्मित कायदे लागू करावे. जर तो आपल्या या कर्तव्यात कुचराई करील तर इतरांवर शासन करण्याचा त्याचा हक्क नष्ट होईल आणि मग कायदेशीर दृष्टीने तो प्रजेकडून आज्ञापालन करण्याची मागणी करु शकत नाही. या वास्तवतेला पहिले खलीफा आदरणीय अबू बक्र (र) यांनी आपल्या पहिल्या भाषणामध्ये अशारितीने व्यक्त केले आहे.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]